कायद्याचे शिक्षण कसे घ्यावे आणि त्यामध्ये करियर करण्यासाठीं काय काय संधी उपलब्ध आहेत याची आपण आज माहिती घेणार आहोत...

Adv.Saurabh Rajput
0


कायद्याचे शिक्षण कसे घ्यावे आणि त्यामध्ये करियर करण्यासाठीं काय काय संधी उपलब्ध आहेत याची आपण आज माहिती बघणार आहोत...


    देशात प्रत्येक कामं हे कायद्याप्रमाने चालत असते त्यामुळे कायदा हा महत्वाचा आहे. समाजात पदो-पदी कायद्याची गरज पडत असते.  सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कार्पोरेट कंपनी सर्वांनाच कायद्याचे मार्गदर्शन तसेच सहाय्यता याची आवश्यकता पडत  असते. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखन्यासाठी सुद्धा कायदा महत्वाचा आहे.  त्यामुळेच आज आपण विधी चे शिक्षण तसेच त्यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी या विषयीं माहिती बघणार आहोत.

    विधी क्षेत्रात प्रमुख दोन पदवी अभ्यासक्रम तसेच अनेक सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत.


    12 वी नंतर 5 वर्ष कालावधी चा बी.ए.एलएलबी पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच कुठल्याही पदवी चे शिक्षण घेतल्या नंतर तीन वर्षाचा एलएल.बी. हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.


    पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र सामयिक  प्रवेश परिक्षा (एम.एच.टी.-सीईटी) परिक्षा द्यावी लागते.


    याशिवाय विधी शाखेत अध्ययनात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एलएलएम या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय खुला असतो. एलएलएम नंतर पी.एच डी. देखिल करता येते.


    तसेच डिप्लोमा शिक्षणाची संधी डिप्लोमा इन इंटेलेक्चुयल प्रॉपर्टी राइट लॉज, डिप्लोमा इन लेबर लॉज ॲन्ड लेबर वेलफेअर, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज डिप्लोमा कोर्स इन आल्टर्नेटिव डिस्प्यूट रेजल्यूशन सिस्टम, डिप्लोमा इन कंझ्युमर प्रोटेक्शन लॉज, डिप्लोमा इन सायबर लॉज, डिप्लोमा इन ह्यूमन राइट्स, डिप्लोमा इन इंटेलेक्चुयल प्रॉपर्टी राइट लॉज, डिप्लोमा इन लेबर लॉज ॲन्ड लेबर वेलफेअर, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज असे डिप्‍लोमा शिक्षणाचे पर्याय उपलब्‍ध आहेत. संबंधित शाखेतून ज्ञान प्राप्त करू इच्‍छिणारी कुठलीही पदवी शिक्षण घेतलेली व्‍यक्‍ती डिप्‍लोमा अभ्यासक्रम प्रवेशास पात्र ठरते. सर्टिफिकेट कोर्स इन फोरेन्सिक ॲन्ड मेडिकल जूरिसप्रूडन्स, ह्युमन राइट्स, सायबर सिक्युरिटी, ॲग्रिकल्‍चर लॉ अशा विविध विषयांतून प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्‍या संधी उपलब्ध आहेत.


    कायद्यामध्ये पदवीचे शिक्षण घेताना प्रामुख्याने फौजदारी कायदा, दिवाणी कायदा, व्यापारी कायदे, प्रशासकीय कायदा, कंपनी कायदा, पुराव्याचा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, वनविषयक कायदे, सहकार कायदा, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अ‍ॅक्ट, राज्यघटना, पेटंट कायदा, पर्सनल लॉ, कामगार कायदा, नुकसान भरपाईचा कायदा, करार कायदा, मिळकतीचा कायदा, Family Law, आडवोकेट ॲक्ट, न्याय शास्र Juris Prudance, गैर कृत्य Tort, दंड (शिक्षा) शास्त्र penalogy, गुन्हा शास्त्र Criminology, Land Laws, संस्था अधिनियम Trust Act  वगैरे प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जातो.

  • जरा जुने

    कायद्याचे शिक्षण कसे घ्यावे आणि त्यामध्ये करियर करण्यासाठीं काय काय संधी उपलब्ध आहेत याची आपण आज माहिती घेणार आहोत...

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads