दखलपात्र (cognizable) आणि अदखलपात्र (non-cognizable) गुन्हे या विषयी माहिती.
प्रथम खबरी तक्रार दाखल झाल्यानंतर ज्या गुन्ह्यामधे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या वारंट शिवाय पोलीस अरोपीला अटक करू शकतात, प्राथमिक तपास करू शकतात असे गुन्हे दखलपात्र गुन्हे आहेत. खुन, बलात्कार व हुंडाबळी यासारखे गुन्हे या सदरात येतात.
याउलट न्यायालयीन आदेशा शिवाय ज्या प्रकरणांमधे पोलीसाना संपूर्ण तपास करता येत नाही व अशा प्रकरणातील आरोपीला न्यायालयाच्या अटक वारंट शिवाय अटक करता येत नाही असे गुन्हे हे अदखलपात्र गुन्हे आहेत. चोरी/दरोडा, फरवणुक व मानहाणी इ. गुन्हे हे अदखलपात्र गुन्हे आहेत.
1) दखलपात्र गुन्हा:- Cognizable offence
ज्या गन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, तो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात.दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.
व्याख्या:- फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २(सी) नुसार.....
दखलपत्र गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यासाठी पोलीस अधिकारी, पहिल्या अनुसूचीनुसार किंवा सध्याच्या इतर कोणत्याही कायद्यानुसार, वॉरंट किंवा मॅजिस्ट्रेटच्या परवानगी/आदेशाशिवाय अटक करू शकतो.
तसेच कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ अंतर्गत, एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने दखलपात्र गुन्ह्याच्या बाबतीत एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वी तो काही प्रकारची प्राथमिक चौकशी देखील करू शकतो. या गुन्ह्यांमध्ये, दोषीला अटक करून विहित वेळेत दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाते.
तपासाअंती, जर केस निष्पन्न झाली, म्हणजे आरोपपत्र आरोपीविरुद्ध दाखल झाले, तर दंडाधिकारी अटकेचा आदेश देऊ शकतात. खटला प्रलंबित असताना जामीन अर्ज संबंधित न्यायदंडाधिकार्यांसमोर करता येतो.
दखलपात्र गुन्हे हे जामीनपात्र आणि अजामीनपात्र दोन्ही आहेत.
दखलपात्र गुन्ह्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:
युद्ध पुकारणे किंवा पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, बलात्कार, हुंडाबळी, अपहरण, चोरी, विश्वासचे बेकायदेशीर उल्लंघन, अनैसर्गिक गुन्हे.
--------------------------------------------------------------
२) अदखलपात्र गुन्हा:- Non-Cognizable offence
ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा कमी शिक्षा सांगितलेली असते, त्या गुन्ह्याला अदखलपात्र गुन्हा किंवा N. C. म्हणतात.अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार नसतो.
व्याख्या:- फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २(एल) नुसार.......
अदखलपात्र गुन्हा हा भारतीय दंड संहितेच्या पहिल्या अनुसूची अंतर्गत सूचीबद्ध केलेला गुन्हा आहे आणि तो जामीनपात्र आहे. अदखलपात्र गुन्ह्याच्या बाबतीत, पोलीस वॉरंटशिवाय आरोपीला अटक करू शकत नाही तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास सुरू करू शकत नाही. अशे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे नसतात नैसर्गिक रित्या हे छोटे असतात.
अदखलपात्र गुन्हे त्यांच्या गैर गंभीर स्वरूपामुळे सहसा जामीनपात्र असतात.