ग्रामपंचायत
आज आपण माहिती बघू ग्रामपंचायती बाबत.
ही माहिती वाचल्यावर आपणास ग्रामपंचायत काय असते ? ग्रामपंचायतीची रचना कशी असते ? ग्रामपंचायतीचे काय काय कामे असतात ? हे समजण्यास मदत होईल.
ग्रामपंचायत ही भारतीय राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा पाया आहे. कारण ग्रामपंचयात ही देशात सर्वात खालच्या स्तरावर काम करत असते. त्यामुळे देशाच्या विकासाची सुरुवात देखील इथूनच सुरू होत असते. ही एक गाव पातळीवर काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
ग्रामपंचायतीची स्थापनेची तरतूद ही भारतीय संविधनातील दिलेल्या तरतुदी नुसार झालेली आहे. यानुसार राज्य कर्त्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत की, ग्रामपंचायती सारख्या संघटना असाव्यात. हे वेळोवेळी झालेल्या घटना दुरूस्ती मध्ये देखील नमूद आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ही एक महत्वाची घटनात्मक संस्था आहे व ग्रामीण पंचायत राज मधील महत्वाचा घटक आहे.
आपल्या भारतीय राज्य घटनेत 73 वी घटना दुरूस्ती ही सन 1992 मध्ये झाली तेव्हा पंचायतराज व्यवस्थेला म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याला सविधानिक दर्जा प्राप्त झाला. घटनात्मक दर्जा प्राप्त झाल्याने पंचायतराज ही व्यवस्था शक्तीशाली झाली. त्यामुळे त्याला अधिकार देखील जास्त प्राप्त झालेत.
1992 चा 73 वी घटनादुरुस्ती कायदा
या कायद्या नुसार :-
- या कायद्याने राज्यघटनेत भाग IX जोडले, “पंचायती” आणि अकरावी अनुसूची देखील जोडली ज्यामध्ये पंचायतींच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश आहे.
- घटनादुरुस्ती कायदा घटनेच्या कलम 40 ला आकार प्रदान करतो, ( राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे ), जी राज्याला ग्रामपंचायतींचे आयोजन करण्यासाठी आणि त्यांना अधिकार आणि अधिकार प्रदान करण्यासाठी निर्देशित करते जेणेकरून ते स्वराज्य म्हणून काम करू शकतील.
- या कायद्यामुळे, पंचायती राज व्यवस्था राज्यघटनेच्या न्याय्य भागाच्या कक्षेत येतात आणि राज्यांना या प्रणालीचा अवलंब करण्याचे आदेश देतात. पुढे, पंचायती राज संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया राज्य सरकारच्या इच्छेनुसार स्वतंत्रपणे घेतली जाईल.
- कायद्याचे दोन भाग आहेत: अनिवार्य आणि ऐच्छिक. राज्य कायद्यांमध्ये अनिवार्य तरतुदी जोडल्या गेल्या पाहिजेत, ज्यामध्ये नवीन पंचायती राज व्यवस्था निर्माण करणे समाविष्ट आहे. दुसरीकडे ऐच्छिक तरतुदी हा राज्य सरकारचा विवेक आहे.
- देशात तळागाळात लोकशाही संस्था निर्माण करण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कायद्याने प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागात्मक लोकशाहीत रूपांतर केले आहे.
महाराष्ट्रा मध्ये ग्रामपंच्यायतीची स्थापना ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 या स्वतंत्र कायद्या नुसार झालेली आहे.
या कायद्याचे आता नवीन नाव महाराष्ट्र ग्रामपंच्यायत अधिनियम 1958 असे आहे. हा नावात बादल सन 2012 या साली झालेला आहे.
गट ग्रामपंचायत : -
ग्रामपंचायत स्थापनेचे काही निकष असतात. महाराष्ट्रात अनेक विखुरलेल्या वस्त्या आहेत. या वस्त्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी एकाच ग्रामपंचायत असते. दोन किवा अधिक गावे मिळून एकच ग्रामपंचायत असेल तर तिला गट ग्रामपंचायत असे म्हणतात. जेव्हा एखादी गावाची छोटी वस्ती असल्याने ग्रामपंचायत स्थापनेचा निकष पूर्ण होत नाही. त्यामुळे तिथे दोन किवा जास्त गावे मिळून गट ग्रामपंचायत असते.
ग्रामपंचायत सदस्य संख्या : -
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ही 7 ते 17 असते. गावाच्या लोकसंखेनुसार हे ठरवले जात असते. यात वेळो वेळी बदल देखील झालेला आहे.
सरपंच : -
ग्रामपंचायतीच्या सरपंचची निवड आता थेट जनते मधून होत असते. त्यानुसार सरपंचची निवड आता लोकनियुक या पद्धतीने होत असते.
सरपंचाची निवड याबाबत आपण एक माहिती बघू : -
73 व्या घटना दुरूस्ती नुसार ग्रामीण शासन व्यवस्था त्रिस्तरीय आहे.
त्रिस्थरिय शासन व्यवस्थ
(ग्रामीण पंचायतराज) : -
जिल्हा परिषद
पंचायत समिती
ग्रामपंचायत
आता आपण बघू ग्रामपंचायतीचा सरपंच कसा निवडला जातो.
पूर्वीला सरपंच हा निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडला जात होता. परंतु आता लोकनियुक्त सरपंच निवडला जात असतो.
सरपंच सदस्यांमधून निवडला जाईल की लोकनियुक्त पद्धतीने निवडला जाईल हे ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार यात वेळोवेळी बदल झालेला आपल्याला दिसतो.
जेव्हा सरपंच हा सदस्यांमधून निवडला जात होता त्यावेळेस ज्या पॅनल चे जास्त सदस्य निवडून येतील त्यांचे सरकार स्थापन होत होते व त्यांचा सरपंच निवडला जात असे. सदस्य हे त्यांच्या मधून एकाची सरपंच व एकाची उपसरपंच म्हणून निवड करत असत.
ग्रामपंचायती मध्ये राजकीय पक्षांना प्रवेश नसतो. त्यामुळे त्यांचे चिन्ह हे वेगवेगळे असतात. देशातील राजकारणाची सुरुवात ही इथूनच होत असते.
कोणत्या गावात ग्रंपंचायतीत किती सदस्य संख्या असेल हे जिल्हाधिकारी ठरवत असतात.
निवडणूक ही प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगा मार्फत घेतली जाते. गावातील लोक हे मतदान करत असतात.
महसुली कायद्या नुसार स्वतंत्र गाव हा दर्जा गावाला मिळालेला आहे. म्हणजे कोणत्याही गावात ग्रामपंच्यायत हवी असेल तर त्याला स्वतंत्र महसुली ग्राम हा दर्जा दिला गेला पाहिजेल. स्वतंत्र महसुली ग्राम किवा गाव म्हणजे काय या बाबत महसुली कायद्यात तरतुदी दिलेल्या आहेत. त्यसाठी गावाचे ठरविल उत्पन्न असावे लागते.
लोकसंखेचा निकष आता किमान 2000 असा केलेला आहे. आता किमान गावाची 2000 लोकसंख्या लागते मग एखादी गावात ग्रामपंच्यायतीची स्थापना होऊ शकते. पूर्वी हा निकष 500 होता. परंतु आता त्याला खूप कालावधी होऊन गेलेला आहे.
आदिवासी किवा तांडे भाग असेल तर हा निकष 1000 आहे. म्हणजे किमान 1000 लोकसंख्या असावी लागते. महसुली गाव असावे. त्या गावाचे ठराविक महसूल उत्पन्न असावे लागते. मग त्या गावाला महसुली गाव असा दर्जा दिला जातो.
ग्रामपंचायतीचे जे मतदार संघ असतात त्यांना वर्ड किवा प्रभाग असे म्हणतात. कोणता वर्ड कुठून केव्हडा असेल ही रचना करण्याचे अधिकार हे तहसिलदार यांना आहेत. कोणत्या गावात किती वर्ड असतील त्याची संख्या किती असेल हे ठरविण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी यांना असतात. व वर्ड केव्हढा असेल म्हणजे वार्डाची रचना हे ठरविण्याचे अधिकार तहसिलदार यांना असतात.
एखादी गावात कमीत कमी 3 वर्ड असतात जास्तीत जास्त 6 वर्ड असू शकतात.
ग्रंपंचायतीच्या निवडणुकीच्या वैधते बाबत वाद झाल्यास दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडे तक्रार दाखल करता येऊ शकते. अशी तक्रार कोणताही उमेदवार किवा मतदार दाखल करू शकतो.
ही तक्रार निकलच्या 15 दिवसांच्या आत दाखल करावी लगात असते.
सदस्यांची पात्रता : -
एखादी सदस्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे रहावयाचे असेल तर त्यासाठी काय पात्रता असते-
त्या व्यक्तीचे त्या स्थानिक मतदार यादीत नाव असावे. उमेदवारचे किमान वय 21 वर्ष असावे.
(73 व्या आणि 74 व्या घटना दुरूस्ती नुसार)
कोणत्याही निवडणुकीत उभे राहण्यसाठी त्या निवडणूक यादीत उमेदवारचे नाव असावे लागते.
उदा. एखादी सदस्याला जर पंचायत समिती च्या निवडणुकिस उभे रहावयाचे असेल तर ती पंचायत समिती असलेल्या गावं पैकी एका गावातील मतदार यादीत त्या उमेदवारचे नाव असावे लागते. जिल्हापरिषदे साथी उभे रहावयाचे असेल तर त्या जिल्हातील एखादी गावातील मतदान यादीती उमेदवारचे नाव असावे लागते. एखादी नगरपालिकेत निवडून याचे असेल तर त्या क्षेत्रातील मतदान यादीत नाव असावे लागते. निवडणुकिस उभे राहण्यसाठी स्थानिक व्यक्ति असणे गरजेचे आहे.
अजून बर्याच तरतुदी आहेत जसे नागरी हक्क सरांक्षण कायदा, अस्पृशता कायदा वगैरे नुसार तो आपत्र नसावा. शासकीय सेवेतून बडतर्फ नसावा. दोन पेक्षा जास्त आपत्य नसावे. अशा अनेक कायदेशीर तरतुदी आहेत.
आता महाराष्ट्रात सरपंच होणेसाठी उमेदवार किमान सातवी पास असावा.
सदस्यांचा कार्यकाल : -
पहिल्या बैठकीच्या दिनांका पासून पाच वर्ष असतो.
आपण जर अजून इतर जरी बघितले तर 73 आणि 74 व्या घटना दुरूस्ती नुसार ज्या संस्था तयार आहेत जसे ग्रामपंचाय, पंचायात समिती, जिल्हापरिषद, नगर पंच्यायत, नगर परिषद, म.न.पा. या सर्वांसाठी पहिल्या बैठकीचे नियत दिनांका पासून 5 वर्षाचा कालावधी असतो. म्हणजे जी पहिली बैठीकाची तारीख घोषित केली असेल त्या तारखेपासून. उदा. जिल्हा अधिकारी यांनी पहिल्या बैठकीची तारीख जी निश्चित केली असेल त्यापासून पाच वर्ष. इतका कालावधी असतो.
सरपंच :-
सरपंच पदा करिता कार्यकाळ : -
गावाच्या मतदान यादीत नाव असावे. किमान 21 वर्ष वय पूर्ण असावे. ज्याचा जन्म सन 1 जानेवारी 1995 नंतर झाला असेल तर तो सातवी उतीर्ण असावा. सरपंच या पदा करिता आरक्षण असते. हे आरक्षण रोटेशन प्रमाणे चालत असते. या प्रमाणे जागेत बादल होत असतो. आरक्षण ही सरपंच या पदासाठी असते उपसरपंच या पदासाठी नसते. (भारतात कोणत्याही निवडणुकीच्या उप या पदला आरक्षण नसते. )
सरपंच हा थेट जंनतेमधून किवा सदस्यां मधून निवडून येत असतो. आता हल्ली थेट जंनतेमधून निवडून येत असतो. याबाबत ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधींनियमात वेळो वेळी दिलेल्या तरतुदी नुसार हे अधिकार प्राप्त आहेत.
उपसरपंच :-
उपसरपंचाचे काम असते जेव्हा सरपंच उपस्थित नसेल तेव्हा अध्यक्ष स्थान भूषवत असतो. सरपंच्या गैरहजेरीत कामे बघणे. हे सर्व कामे उपसरपंच यांची असतात. सदस्य हे आपल्या पैकी एकाची उपसरपंच म्हणून निवड करत असतात.
सदस्यांची जर समान मते पडले तर सरपंचाचे मत हे निर्णायक असते.
राजीनामा :-
निवडून आलेला कोणताही सदस्य सरपंचा कडे आपला राजीनामा देतो.
सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देत असतात.
पंचायत समिती सभापती किवा सरपंच त्यांना प्राप्त झालेला राजीनामा सात दिवसांच्या आत ग्रामपंचायत सचिवा कसे अग्रेषित करतात व ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायतीच्या पुढील सभेत राजीनामा मांडतो.
पदावरून काढणे :-
सरपंच, उपरपंच आणि सदस्याला आयुक्त पदावरून काढू शकतात.
त्यासाठी गैरवर्तन, कर्तव्यात कसूर असे करणे असू शकतात. त्यांच्यावर असे आरोप लागल्यावर त्याची चौकशी ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे करतात.
ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प :-
ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सरपंच तयार करतात.
ग्रामपंचायत सभासद सभा घेणे व त्यांना अंतिम रूप देणे.
ग्रामपंचायती समोर अर्थसंकल्प मांडला जातो.
ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर त्या अर्थसंकलपास मान्यता पंचायत समिती देते.
ग्रामपंचायतीची सभा :-
ग्रामपंचायतीची सभा म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांची सभा.
प्रत्येक महिन्यात किमान एक सभा होते.
सभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचाची. सरपंच उनुपस्तीत असेल तर ती जबाबदारी उपसरपंचाची.
ग्रामसभा :-
गावातील मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तींची मिळून बनलेली सभा म्हणजे ग्रामसभा होय.
वर्षातून किमान चार सभा झाल्या पाहिजेल.
लागच्या दोन सभांमध्ये 4 महिन्यांनापेक्षा जास्त अंतर असू नये.
ग्रामसेवक :-
ग्रामसेवक हा ग्रामपंचायत सचिव म्हणून काम बघत असतो. हे शासणा द्वारे नियुक्त पद आहे.
1) प्रशासन :-
महाराष्ट्र ग्रामपंच्यायत अधिनियम 1958 व त्यानुसार शासनाने वेळो वेळी तयार केलेले नियम व आदेशा नुसार ग्रामपंचायती काम बघणे.
ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पडणे.
नरेगा योजनेचे अभिलेख वेळो वेळी अध्यवत करणे.
ग्रामभा, मासिक सभा त्याचे कामकाज बघणे, नोटिसा देणे, निर्णयांची पूर्तता व अमलबजावणी सहकार्याने करणे.
वर्षातून चार वेळा ग्रामसभा घेणे बंधनकारक.
गावातून विविध कर वसूल करणे. लेखापरीक्षणांत निघालेल्या अपेक्षांची पूर्तता करणे.
ग्रामपंचायत सर्व अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पडणे. हद्दीतील जमीन, रस्ते, इमारत सार्वजनिक जागा मोजमाप करणे व अभिलेख अद्यावत ठेवणे. ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीत अद्यावत ठेवणे.
जन्म -मृत्यू, विवाह नोंदणी इत्यादी बाबत नोंदणी अधींनियमा नुसार निबंधक म्हणून कर्तव्य पार पाडणे.
गावातील विविध सहकारी सओसायटी दूध डेअरी, स्थानिक स्वराज्य संस्था, बचत गट, महिला मंडळ, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत लोकुपयोगी कार्यक्रयम राबविणे.
ग्रामसेवक यांचे विविध कामे असून आपण हे कामे थोडक्यात बघितलेले आहेत.
तलाठी :-
आता आपण महसूल विभागाचे महत्वाचे पद तलाठी याबाबत माहिती बघू. आपले कधीतरी ग्रामपंचायती मध्ये काम निघत असते त्यामुळे आपल्याला तलाठी हे पद तर माहितीच असते. 7/12 उतारा, ड पत्रक, नोंदी, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखल असेल हे कागदपत्रे घेण्यासाठी आपल्याला बर्याच वेळा तलाठी यांचेकडे जावे लागत असते.
महसूल विभागातील ग्राम पातळी वरील सर्वात खालच्या स्तरावरून काम करणारे हे पद असते.
तलाठी यांचे काम असते महसूल दफ्तर जसे 7/12, नोंदी अद्यावत ठेवणे, फेरफार करणे, महसूल विभागात ग्राम पातळीवर तलाठी हे कामकाज बघत असतात.
जिल्हा अधिकारी यांचे कार्यालया मार्फत तलाठी यांची निवड लेखी परीक्षेने करण्यात येत असते. जिल्हाधिकारी यांचे आदेशाने त्यांना नेमणूक मिळत असते.
7/12 उतारे, ड पत्रक नोंदी, उत्पन्नाचा दाखला, फेरफार पत्रक असेल हे देणे व अद्यावत ठेवणे. या बर्याच सेवा आता महसूल विभागणे ऑनलाइन देखील सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर अजून एक महत्वाचे काम तलाठी यांचे आहे की सर्व महसूल अभिलेख ग्रामपातळी वरचा अद्यावत ठेवणे. त्यामध्ये नवीन नोंदी समाविष्ट करणे.
इ फेरफार प्रणाली अंतर्गत 7/12, नोंदी यांचे ऑनलाइन चे कामकाज बघणे. रेकॉर्ड अध्यावत ठेवणे.
तलाठी याचे देखील आता बरेच कामे हे ऑनलाइन सुरू झालेले आहे त्यामुळे त्यांच्याजवळ लॅपटॉप असते, प्रिंटर असते. त्यामुळे त्यांचे देखील बरेच कमी हे आता ऑनलाइन होत असतात.
खरेदी विक्री, हक्कसोड, मृत्यूपत्र, वरसांची नोंद यानुसार मिळकतीवर फेरफार मंजूर करून नावे लावणे, नवे कमी करणे, संबधित यांना त्याबाबत नोटीसा काढणे. मंडळ अधिकारी यांनी फेरफार मजूर केल्यावर त्याची नोंद घेणे. हे काम तलाठीचे असते. नंतर गावातील पीक पाहणीचे कामकाज त्यांना बघावे लागते. जमिनीचा महसूल, शेतसारा ते जमा करत असतात व त्याबाबत पावती ते देततात.
गावात नैसर्गिक आपत्ती आल्यावर नुकसान होत असते या सर्वांचे पंचनामा करण्याचे काम हे तलाठी करत असतात. गावातील पिकांच्या नुकसणीचे पंचनामे करणे हे कामे तलाठी व कृषी सहाय्यक, कृषी विभाग यांचे सोबत काम करणे.
वेगवेगळ्या निवडणुकी मध्ये सुद्धा तलाठी यांना अनेक कामे करावे लागत असतात.
गावातील काही कायदा आणि सुव्यवस्थे बाबत कामकाज असेल तर ते त्यांना करावे लागू शकते.
तसेच तलाठी यांना महसूल कर्मचारी म्हणून, गौण खनिज याबाबत देखील कामकाज करावे लागत असते.
तलाठी यांना महसूल विभागाचे अनेक कामे करावे लागत असतात. तलाठी यांना महसूल आयुक्त, जिल्हा अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार यांचे सुचणे प्रमाणे कामे करावे लागत असतात.
तलाठी यांचे अनेक कामे आहेत परंतु आपण थोडक्यात महत्वाचे त्याचे कामे बघिले आहेत.