चाप्टर केस म्हणजे काय ?
कलम 106 ते 109 चॅप्टर केस संदर्भात आहेत. पुढे 111 ते 124 मध्ये त्याची कार्यपद्धती दिलेली आहे. पोलीस भाषेत यालाच चॅप्टर केस असे म्हणतात.
चॅप्टर केस ही सार्वजनिक आणि खाजगी शांतता राखण्यासाठी आणि चांगल्या वागणुकी साठी जमीन घ्यावयासाठी आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई साठी आहे. याचा प्रमुख उद्देश हा आहे की समाजात शांतता राखली जावी.
समाजात शांत ठेवण्याचे काम न्यायालया बरोबरच पोलीस यंत्रणेचे असते. समाजात शांत राखणे आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्या साठी पोलीस तसेच तहसीलदार (Executive Magistrate) यांना चॅप्टर केस संबंधात अधिकार दिलेले आहेत. चॅप्टर केस ही गुन्हे होऊ नये म्हणून दाखल घेण्यासाठी आहे. (Prevention is better than cure).
चॅप्टर केस झाली तर न्यायालय त्या व्यक्ती चे बंधपत्र घेत असते. आणि त्या व्यक्ती ने बंधपत्र नाही करून दिले तर त्याला शिक्षा होत असते.
एखादी छोटा गुन्ह्या घडलेला असेल तर पोलीस एन.सी. नोंदविता. एखादी व्यक्ती शांतता भंग करीत असेल. तसेच कोणाला मारायची धमकी देत असेल. असा कमी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असले तर पोलीस एन.सी. नोंदवितात.
जर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा असे गुन्हे करत असेल किवा वर्षातून एखाद्या व्यक्ती विरोधात 3 ते 4 वेळा एन.सी. नोंदविली गेली असेल तर अशा वेळेस पोलीस त्या व्यक्तीवर चॅप्टर केस ची सुरुवात करतात व चॅप्टर केस दाखल करतात.
चॅप्टर केस ची जर सुरुवात झाली तर एक्सझी क्युटिव्ह मॅजिस्ट्रेट समन्स पाठवितात की तुमच्यावर चॅप्टर केस दाखल झाली आहे. तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
कोर्टाच्या सांगण्या प्रमाणे कोर्टाला योग्य वाटेल त्याप्रमाणे पर्सनल बॉण्ड भरून द्यावा लागतो. किंवा शुवरटी द्यावा लागतो. किंवा जमीन करावा लागतो. आणि त्या बॉण्ड मध्ये लिहून द्यावे लागते के मी पुन्हा गुन्हा करणार नाही. माझी वागणूक चांगली राहील.
म्हणजेच हे प्रकरण उद्या अपराध होऊ नये, यासाठी घेतलेली काळजी आहे. हा शिक्षेचा भाग नाही. कोणताही व्यक्ती असेल त्याच्या कडून सार्वजनिक किंवा खाजगी शांतता भंग होण्याची संभाव्यता असेल तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांना दिलेला हा एक अधिकार आहे. पोलिसांच्या माध्यमांतून कार्यकारी दंडाधिकारी बांधपत्र घेत असतात. कारण कार्यकरी दंडाधिकारी याना C.R.P.C. कलम 20 प्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबादारी दिलेली आहे.
या संबंधी काही कलम
(C.R.P.C) प्रकरण 8
कलम 106 व 107 हे शांतता राखण्यासाठी आहे. 108, 109 व 110 हे चांगल्या वर्तनासाठी जमीनासाठी आहे. कलम 111 ते 124 याची कार्यपद्धती दिलेली आहे.
कलम 106 - कोणतेही न्यायालयत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध झाल्यावरील कार्यपद्धती आहे.
107 ते 110 याला पोलीस यंत्रानेत चापटर केस म्हणतात. हे कलम खाजगी आणि सार्वजनिक शांतता राखण्या साठी आहे.
कलम 108 प्रक्षोभक साहित्य प्रस्तुत करणाऱ्या व्यक्ती कडून चांगल्या वर्तनाचा जमीन. जो व्यक्ती समाजात मध्ये राग, तेढ निर्माण करत असेल तसेच देशातील शांतता भंग करत असेल किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल असे साहित्य निर्माण करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आणि समाजात शांतता ठेवण्यासाठी हे कलम आहे.