स्थावर मालमत्तेचे कायदेशीर कागदपत्रे

Adv.Saurabh Rajput
0

 


मित्रानो आज आपण माहिती बघणार आहोत स्थावर मिळकतीचे  (मालमत्तेचे) कोणकोणते कायदेशीर कागदपत्रे असतात. 


    मालमत्तेचे खरेदी विक्री, हस्तांतरण  करतांना तसेच मालमत्तेवर कर्ज घेताना मालमत्तेच्या  अनेक कायदेशीर कागदपत्रांचा वापर होत असतो. अश्या वेळेस संपूर्ण कागदपत्राची तपासणी करावी लागत असते. त्यामुळे आपल्याला याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. 


ताबा पत्र (Possession Letter) :- 

     ताबापत्र म्हणजे मालमत्तेचा वास्तविक ताबा जेव्हा खरेदीदाराला दिला जातो तेव्हा मालमत्तेचा विक्रेता याने खरेदीदाराला दिलेले हे एक प्रमाणपत्र आहे. हा दस्त प्रमाणित करतो की खरेदीदाराला मालमत्तेचा ताबा दिलेला आहे. आता तो त्या मिळकतीचा कायदेशीर मालक म्हणून उपभोग घेऊ शकतो. 


     (Allotment Latter) :-   जेव्हा एखादी संस्थे मार्फत सभासदाला प्लॉट  मिळकत दिली जाते तेव्हा सदर संस्था Allotment Latter  देत असते. 


खरेदीखत  (Sale Deed) :-  खरेदीखत (सेल डीड / डीड ऑफ सेल) हा मालमत्तेच्या विक्रेत्याने मालमत्तेचे खरेदीदाराकडे मिळकत (मालमत्ता) हस्तांतरण करण्यासाठी केलेला कायदेशीर दस्त आहे. यालाच खरेदीखत (सेल डीड) असे म्हटले जाते. खरेदीखताने मालकी हक्क हस्तांतर होत असते . हा दस्त नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत करावा लागतो. 


    खरेदीखत तपासतांना त्यावर दिनांक, लिहून देणार, लिहून घेणार, कोणी कोणास मिळकत हस्तांतर केलेली आहे, त्यामध्ये काय अटी व शर्ती नमूद आहेत. मिळकतीचा काय इतिहास नमूद आहे. नमूद  मिळकतीचे वर्णन, मिळकतीच्या चतु:सीमा, दस्ताचे  एकूण सर्व पाने आहेत ना, सह्या, अंगठ्याचे ठसे, फोटो, सही शिक्के, नोंदणीची पावती, सूची दोन ची नक्कल व त्यासोबत जोडलेले इतर दस्त  इत्यादी सर्व तपासून बघावे लागत असते. 

    

       एन.ओ.सी. / ना हरकत प्रमाणपत्र - (NOC) :-  हा एक अधिकृत दस्त आहे, हा दस्त संबंधित संस्था, व्यक्ती किवा संबंधित अधिकारी यांच्या द्वारे दिले जाते. हे प्रमाणपत्र प्रमाणित करते की काही हरकत नाही. एखादी कृती किवा व्यवहार करण्यास आमची काही हरकत नाही. एखादी व्यवहाराला आमचा आक्षेप नाही. 


     उपयुक्प्रतता  प्रमाणपत्र   (Utility Certificate) :-   हा  एक अधिकृत दस्तऐवज  आहे जो मालमत्तेच्या विविध सेवा  (उपयुक्तता) योग्य आहे तसेच  सक्रीय, उपलब्ध असल्याची पुष्टी करतो. त्यात मालमत्तेमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध  आहेत असे प्रमाणित करतो. जसे लाईट, पाणी, वीज,  Gas वगैरे. 


   सौदापावती / साठेखत  (Agreement of Sale) :-   स्थावर मिळकत खरेदी करण्यासाठीचा  हा एक करार आहे. खरेदीखत करण्याआधी हा करार  केला जातो व त्यामध्ये खरेदी विक्री बाबत सर्व अटी व शर्ती नमूद असतात. 


    बांधकाम परवानगी प्रमाणपत्र (Commencement Certificate) :- स्थावर मिळकतीवर  बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यसाठी हे प्रमाणपत्र संबधित शासकीय कार्यालयाकडून जसे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंच्यायत  वगैरे याच्याकडून हे प्रमाणपत्र  दिले जात असते.


    पूर्णत्वाचा दाखला / प्रमाणपत्र (Completion Certificate) :-  जेव्हा  स्थावर मिळकतीवर  बांधकाम  शासकीय नियमाप्रमाणे पूर्ण केले जाते तेव्हा संबधित शासकीय कार्यालयाकडून जसे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंच्यायत  वगैरे संबधित याच्याकडून हे प्रमाणपत्र  दिले जात असते.


    टायटल डीड : - ज्या दस्ता मुळे मालकी हक्क प्रस्थापित होतो जसे खरेदीखत, बक्षीसपत्र वगैरे दस्त त्याला  टायटल डीड असे म्हटले जाते. 


    घोषणापत्र  (Deed of Decleration / Deed of apartment) :-   जेव्हा एखादी सदनिका / Flat मिळकतीचे बांधकाम पूर्ण होते त्यावेळी Maharashtra Apartment Ownership Act 1970  नुसार मिळकत ज्यांनी विकसित केलीली आहे त्यांना त्या मिळकतीचे नोंदणीकृत  घोषणापत्र करून द्यावे लागत असते. या मध्ये त्या मिळकतीचा पूर्ण इतिहास. त्यामध्ये किती सदनिका आहेत. सर्वांची कॉमन जागा, लिफ्ट, मेंटेनन्स, मोकळी जागा, पार्किंग  या बाबत सर्व माहिती नमूद करावी लागत असते.


    आपण जेव्हा मिळकती बाबत एखादी दस्त तपासून बघत असतो तेव्हा मालकाचे मिळकत उताऱ्या वरील नाव, टायटल दस्त, खरेदीखत यावरील नाव, आधार कार्ड यावरील नाव, Pan कार्ड करील नाव व इतर  सर्व ठिकाणी नाव सारखे असणे गरजेचे आहे. नावात बदल नको ? हे निट पडताळून पाहणे गरजेचे. कुठे जर नावात बदल असेल किवा चुकीचे नाव नमूद झालेले असेल तर त्यामध्ये दूरूस्ती  करून घेणे महात्वाचे आहे.  


    तसेच मिळकतीचे अन्य कागदपत्रे जसे बोजा प्रमाणपत्र, मालमत्ता कर पावत्या, लाईट बिल, यांची पडताळणी करून तपासून घेणे महत्वाचे आहे.  मिळकतीवर काही कर वगैरे बाकी तर नाही ना ? हे तपासून बघावे. 


    गहाणखत रद्द लेख / नजर गहन खात रद्द (Reconveyance Deed / Release Deed) :-  जेव्हा एखादी मिळकतीवर बँकेकडून  कर्ज घेतले जाते व त्याची संपूर्ण  परतफेड केली जाते तेव्हा त्या मिळकती वरील बोजा कमी करणे कमी नोंदणीकृत  गहाणखत रद्द लेख  केला जात असतो व त्याची नोंदणी कार्यालयात नोंदणी केली जाते. 


    चूक दूरूस्ती दस्त (Correction Deed) :- जेव्हा एखादी नोंदणीकृत दस्ता मध्ये चूक होते त्यावेळी ती चूक दुरुस्त करणे कमी नोंदणीकृत चूक दूरूस्ती दस्त तयार करावा लागत असतो. 


    ले-आउट - (Lay-out) :- जेव्हा एखादी स्थावर  मिळकत रहिवास किवा इतर  प्रयोजनासाठी एन.ए. केली जाते व त्यामध्ये प्लॉट पाडले जातात त्याचा ले-आउट तयार केला जातो. त्यामध्ये एकूण प्लॉट, त्याचे क्षेत्र, चतु:सीमा वगैरे माहिती नमूद असते. हा ले-आउट नगर रचना विभागाकडून  मंजूर असणे गरजेचे आहे. 


मुखत्यारपत्र (Power of Attorney) :-  जेव्हा एखादा किवा अनेक व्यक्ती त्यांच्या वतीने  काम करण्यासाठी कोणाची नेमणूक करतात त्या दस्ताला मुखत्यारपत्र  असे म्हणतात. जर मुखत्यारपत्राने एखादी मिळकत हस्तांतर होत असेल तर ते खत्यारपत्र नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. खत्यारपत्रा मधील कोणी व्यक्ती मयत झाला तर ते खत्यारपत्र रद्द होत असते. 

  • थोडे नवीन

    स्थावर मालमत्तेचे कायदेशीर कागदपत्रे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads