टायटल सर्च रिपोर्ट (TSR) कसा तयार करावा.

Adv.Saurabh Rajput
0

टायटल सर्च रिपोर्ट (TSR) कसा तयार करावा ?


 आज आपण माहीती बघणार आहोत स्थावर मिळकचा सर्च घेऊन टायटल सर्च रिपोर्ट कसा तयार करावा ? 

सर्च म्हणजे आपल्याला  त्या मिळकतीचा जुना शोध घ्यावा लागतो. सर्च घेतांना शोधावे व तपासून बघावे लागते की, त्या मिळकतीचा खरा कायदेशीर  मालक कोण आहे ? सदर मिळकत हस्तांतर करण्याचा त्याला हक्क व अधिकार तर आहे ना ? त्या मिळकतीवर काही कर्ज बोजे वगैरे तर बाकी नाही ना ? मिळकत कुठे गहाण तर नाही ना ? पहिल्या जुन्या मालकाकडून शेवटच्या मालका पर्यंत मिळकत कशा प्रकारे  हस्तांतरण होत आलेली आहे ? ही सर्व माहिती मिळकतीचा सर्च घेताना पडताळून व तपासून बघावी लागत असते.



मिळकतीचा सर्च हा मागील १३  किंवा ३० वर्षाचा असू शकतो.


मिळकतीचा सर्च घेतांना बघावे की, मिळकत प्रकार कोणता आहे जसे रिकामा प्लॉट, रो-होऊस, सदनिका, बंगला किंवा शेत मिळकत  ? तसेच मिळकत कमर्शिअल, रेसिडेनशीअल, इंडस्ट्रीयल का Agricultural आहे ?  त्यानुसार मिळकतीचे आपल्याला कागदपत्रे तपासून बघावे लागतात. नंतर बघावे की, मिळकत कोणत्या क्षेत्रात येते, जसे नगरपालिका, महानगरपालिका, सिटी सर्व्हे, ग्रामपंचायत, इंडस्ट्रीयल आहे. ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या जवळ उपलब्ध असलेले कागदपत्रे व पडताळून बघितल्यावर  समजेल.


        त्यानंतर मिळकतीचे मालकी हक्काचे व इतर कागदपत्रे तपासावे. जसे मिळकतीचा  टायटल दस्त, खरेदीखत, जो काही दस्त असेल तो जसे बक्षिसपत्र, हक्कासोड वगैरे मिळकतीचा उतारा, मिळकत सिटी सर्व्हे हद्दीत असेल तर सिटी सर्व्हे उतारा, ७/१२ उतारा, मिळकत ग्रामपंचायत हद्दीत असेल तर नमुना नंबर 8 उतारा तपासून बघावा.


    टायटल दस्त, खरेदीखत तपासतांना  सर्व पाने, पान नंबर, दस्तावरील सही शिक्के, फोटो व अंगठ्याचे  ठसे तसेच  दस्ताची नोंदणी पावती (आर.आर.Receipt) व सूची दोन ची नक्कल तसेच सोबत जोडलेले इतर कागदपत्रे नीट तपासून घेणे गरजेचे आहे. दस्त नाविनच नोंदणीकृत झालेला असेल किवा होत असेल तेव्हा देखील  सूची दोन ची नक्कल नीट तपासून घेणे गरजेचे आहे कारण त्यानुसार उताऱ्यावर नाव लागत असते किंवा कर्जाजाचा बोजा चढत असतो. एखादी नोंदणीकृत दस्त बरोबर आहे पण त्याच्या  सूची दोन  मध्ये चूक झाली तर ती दुरुस्त करण्याचा अधिकार तालुका  नोंदणी कार्यालयाला नाही परंतु जिल्हा नोंदणी कार्यालयाकडून परवानगी घेऊन त्यांच्या मार्फत चूक दूरूस्ती करता येते परंतु त्यास बरेच दिवस लागत असतात. नाहीतर मग त्या सदर दस्ताचा नोंदणीकृत  चूक दूरूस्ती दस्त तयार करून नोंदणी करावा लागत असतो. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.. 


नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.


Click Here To View Post

७/१२ उतारा : -


मिळकतीचा ७/१२ उतारा तपासतांना गाव, तालुका जिल्हा तपासावा. त्यामुळे आपल्याला समजेल मिळकत कुठे आहे ?  त्यावर मालकाचे नाव तपासावे. उताऱ्यावर कोणाकोणाचे नाव आहे हे तपासावे ? कोणाचे किती क्षेत्र आहे हे तपासावे. क्षेत्र सामाईक तर नाही ना हे तपासावे. आपण ज्या मिळकतीचा सर्च घेत आहोत तिचे क्षेत्र किती आहे हे तपासावे. उताऱ्यावर एकूण क्षेत्र किती आहे हे तपासावे. एकूण क्षेत्र व इतर सर्व मालक यांचे क्षेत्र यांची  बेरीज बरोब तर आहे ना ? हे तपासून बघावे. उताऱ्यावर तारीख बघावी उतारा केव्हाचा आहे हे बघावे.  चालुचा उतारा तपासून घ्यावा. कारण आपण जुना उतारा  जरी बघितला तरी नंतर ती मिळकत हस्तांतर झालेली असेल तर नवीन उताऱ्यावर दुसरे नाव नमूद असू शकते किवा कर्ज वगैरे नमूद असू शकते त्यामुळे चालुचा आणि डीजीटल सही चा उतारा तपासून बघणे महत्वाचे आहे.  आपल्याकडे चालूचा उतारा जरी उपलब्ध असेल तरी क्रोस चेक साठी  online फ्री उतारा download करून तासून घ्यावा.


    उताऱ्यावर अनेक नवे असतील म्हणजे एका मिळकतीचे अनेक मालक असतील तर शक्यतो  बँक सर्वाना कर्जात समाविष्ठ करत असते. उताऱ्यावर अनेक नवे असतील किवा वारसाने मिळालेली मिळकत असेल तर त्यावर सर्व वारसांचे नाव नमूद होणे आवश्यक आहे. तसेच उताऱ्यावर जे सर्व नावे आहेत ते जिवंत असणे व ते तपासून बघणे महत्वाचे असते. 


७/१२ उताऱ्यावर तपासून घ्यावे की, मालक एक व्यक्ती आहे का अनेक व्यक्ती आहेत क्षेत्र सामाईक आहे का ? कारण सामाईक क्षेत्र असेल तर त्याची विक्री, हस्तांतर किवा त्यावर कर्ज घेणे असेल तर त्यासाठी सर्व मालक लागत असतात. एकटा व्यक्ती ती मिळकत हस्तांतर करू शकत नाही.


 त्यानंतर ७/१२ उताऱ्यावर तपासून घ्यावे जमीन वर्ग १ आहे का वर्ग २ आहे ? कारण वर्ग २ जमीन असेल तर ती जनीन शासनाने दिलेली किवा कुळ वहिवाट जमीन असते. अशी जमीन विक्री करणे असेल तर त्यासाठी शासकीय नजराना रक्कम भरून शासनाची विक्री कमी परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय त्या जमिनीची विक्री करता येत नाही. तसेच शासनाने दिलेली आदिवासी लोकांची शेत मिळकत असेल तर ती जमीन देखील विक्री करणे कमी शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तपासून बघावे की भूधारणा पद्धती काय आहे.


    जमीन भूधारणा पद्धती - भोगवटादार वर्ग - १ व वर्ग - २ जमीन म्हणजे काय असते 

Click Here To View Post

७/१२ उताऱ्यावर बोजा आहे का हे तपासून बघावे. कर्जाची फेड होऊन बोजा कमी झालेला असेल तर त्याबाबत बँक / फायनान्स कंपनी यांची NOC व Recoveyance Deed तपासून घ्यावी. उताऱ्यावर बोजा दिसत असेल व त्याला कंस लागलेला असेल तर तो बोजा नुकताच कमी झालेला असू शकतो. तेव्हा देखील NOC व Recoveyance Deed तपासून घ्यावी. जर कर्जाची परत फेड झालेली असेल व तरी देखील उताऱ्यावर बोजा नमूद असेल तर तो बोजा कमी करून घेणे महत्वाचे आहे. नोंदणी गहाण खत केले असेल तर कर्जाची संपूर्ण रक्कम फेडली म्हणजे त्याबाबत संबधित बँकेची NOC घेऊन Recoveyance Deed करून घ्यावी व उताऱ्यावरील  बोजा कमी करून घ्यावा.


जुन्या मालकाने काही कर्ज  वगैरे घेतले होते का ? आणि घेतले असेल तर ते फेडले आहे ना ? हे  online सर्च घेऊन व  जुन्या नोंदी आणि सूची दोन नक्कल online तपासून समजू शकते. 


 त्यानंतर उताऱ्यावरील जुन्या नोंदी काढून तपासून बघाव्यात त्यामुळे आपल्याला माहिती समजेल की मिळकत कशी कशी हस्तांतरण होत आलेली आहे. मिळकतीवर काय जुने व्यवहार वगैरे झालेले आहेत. ही सर्व माहिती आपल्याला समजेल. या सर्व नोंदी आपण online देखील काढू शकतो. काही जास्त जुन्या नोंदी असतील व त्या online उपलब्ध नसतील तर आपण संबधित तलाठी, तहसील कार्यालय, रेकॉर्ड रूम येथे अर्ज देऊन त्या नोंदी आपण काढू शकतो.


उताऱ्यावर काही बदल झलेला असेल जसे विभाजन, सब प्लॉट पडून प्लॉट नंबर बदल झालेला असेल किवा काही क्षेत्र वगैरे यात बदल झालेला असेल काही नावे कमी किवा जास्त झालेले असतील तर ते तपासासून बघणेसाठी उताऱ्यावरील जुन्या नोंदी तपासून बघाव्यात त्यामुळे समजून जाईल की, काय, कसा व कधी बदल झालेला आहे ?   कारण उताऱ्यावर कोणताही बदल झाला तर त्याबाबत महसूल नोंद पारित होत असतात. 


त्यानंतर उताऱ्यावर बघावे की कोणाच्या नावाला कंस लागलेला आहे का ? नावाला कंस लागलेला असेल तर ते नाव कमी झालेले असते. त्याची नोंद बघून तपासून घ्यावे की ते नाव कसे कमी झालेले आहे ?


उताऱ्यावर अज्ञान व्यक्तीचे नाव नमूद असेल तर त्याच्या नावाच्या पुढे अ.पा.क. असे नमूद असते. त्या मिळकती मध्ये त्या अज्ञान व्यक्तीचा देखील हक्क व अधिकार असतो. अशी मिळकत विक्री करणे कमी सक्षम न्यायालयाची परवानगी घ्यावी लागू शकते. अशा वेळेस न्यायालय काही रक्कम त्या अज्ञान व्यक्तीच्या नावाने फिक्स डीपोझीट मध्ये ठेवण्याचा आदेश देऊ शकते. तसेच अशी मिळकत विक्री करणे कमी तसे कारण देखील लागते. जसे त्या अज्ञान व्यक्तीच्या शिक्षणाला वगैरे  किवा वैध्याकीय वगैरे  काही इतर खर्च लागत असेल तर. त्यामुळे सर्च घेतांना या सर्व गोष्टी तपासून बघाव्या लागत असतात.


  ७/१२ उताऱ्यावर तपासून बघावे की, मिळकत / जमीन एन.ए. तर झालेली आहे ना ? त्याबाबत उताऱ्यावर  अकृषक, बिनशेतीकडे वर्ग असे नमूद असते. उताऱ्यावरील  एन.ए. ची नोंद व एन.ए. ओर्डर तपासून बघावी. तसेच एन.ए. ओर्डर मध्ये तपासावे की, मिळकत कधी एन.ए. झालेले  आहे ? एन.ए. कोणी केलेली आहे ? ७/१२ उताऱ्यावरील एकूण क्षेत्र किती व एन.ए. ऑर्डर नुसार  किती क्षेत्र एन.ए. झालेले आहे. त्यापैकी आपली मिळकत एन.ए. क्षेत्रात येते ना ? हे तपासून बघावे. एन.ए. ओर्डर ची प्रत शक्यतो टायटल दस्त तसेच खरेदीखत या सोबत जोडलेली असते. खरेदीखतात त्याबाबत नमूद असते. किवा नोंद नंबर वरून देखील ही माहिती समजत असते. मिळकत एन.ए. आहे हे तपासणे यासाठी देखील महत्वाचे असते की बँक ज्या मिळकती वर कर्ज देत असते त्या कर्जाची परत फेड झाली नाही व त्याबाबत सर्फेसी कायद्या अन्वये कायदेशीर कारवाई करणे असेल तर त्यासाठी मिळकत एन.ए. असणे आवश्यक असते. मिळकत सिटी सर्वे हद्दीत असेल तर त्यासाठी एन.ए. ओर्डर ची आवशकता नसते.  तसेच दोन किवा अनेक शेत गट असतील व त्यांचे मालक वेगवेगळे असतील तसेच सदर गट एकत्रित एन.ए. झालेले असतील किवा गट एकत्रीकरण झालेले असेल  तर त्एयाबाबत न.ए. आधी चे जुने उतारे तपासून घ्यावेत म्हणजे सर्च घेणे सोपे होईल.


( SERFESAI ACT) कर्ज वसूली ची कारवाई.

Click Here To View Post


  त्यानंतर मिळकती मध्ये पूर्वी एकत्रीकरण होऊन प्लॉट पडलेले आहेत का ? असेल तर त्या बाबत आदेश वगैरे तपासून घावेत. तसे काही असेल तर त्याबाबत शक्यतो खरेदीखत, टायटल दस्त यासोबत तसे कागदपत्रे जोडलेले असतात ते निट तपासून घ्यावेत.


७/१२ उतारा तसेच मिळकत उतारा यावर तपासून बघावे की, मिळकतीवर भूसंपादना बाबत नमूद तर नाही ना ? मिळकत काही शासन प्रकल्पा साठी फ्रीज / राखीव तर नाही ना ? अशा वेळेस ती मिळकत हस्तांतर करण्यास किवा त्यावर कर्ज घेण्यास अडचणी येऊ शकतात. एखादी मिळकत महामार्गा लागत असेल तर अशी मिळकत खरेदी विक्री, हस्तांतर करण्यास संबधित शासकीय विभागाची परवानगी / एन.ओ.सी. घ्यावी लागते. तसेच मिळकती मध्ये काही झोन वगैरे तर नाही ना हे तपासून घ्यावे.


मिळकत सिटी सर्व्हे हद्दीत असेल व सिटी सर्वे उतारा असेल तर सिटी सर्वे उताऱ्यावर नोंदी तसेच जुने व्यवहार नमूद असतात त्यावरून देखील आपल्याला बरीच माहिती समजण्यास  व सर्च घेण्यास मदत होते. सिटी सर्व्हे मिळकतीचा सिटी सर्व्हे नकाशा तपासून घ्यावा. त्यामुळे आपल्याला मिळकतीच्या चतु:सीमा समजण्यास मदत होईल. 


मिळकत जर ग्रामपंचायत हद्दीत असेल तर त्या मिळकतीचा नमुना नंबर 8 चा उतारा असतो. नमुना नंबर 8 उतारा म्हणजे तो व्यक्ती त्या मिळकतीचा ग्रामपंचायत कर भरत असतो असा देखील होत असतो. नमुना नंबर 8 उतारा तपासतांना देखील गाव, मालकाचे नाव, क्षेत्र, बांधीव व  बखळ क्षेत्र, बोजा वगैरे तपासून घ्यावा. मिळकत गावठाण हद्दीत असेल तर त्याबाबत एन.ए. ओर्डर नसेल तर ग्रामपंचायतीचे गावठाण प्रमाणपत्र तपासून बघावे लागते. ग्रामपंचायत गावठाण प्रमाणपत्र देत नसेल तर त्याबाबत वेळो वेळी आलेले शासन निर्णय (GR) तपासून बघावे.


ग्रामपंचायत हद्दीतील नमुना नंबर 8 च्या मिळकतीचा सर्च  घेतांना  जुने उतारे, ग्रामपंचायत प्रोसिडिंग बुक, ग्रामपंचायत नोंदी, गावठाण प्रमाणपत्र, चतु:सीमा प्रमाणपत्र टायटल दस्त खरेदीखत, बक्षीसपत्र, मृत्युपत्र जे काही असेल ते व त्यावरील नाव, गाव, क्षेत्र तसेच कर भरणा पवती, लाईट बिल व त्यावरील नाव तपासून बघावे.


 त्यानंतर तपासून बघावे की, आता मिळकतीचा मालक कोण आहे ? त्याला ती मिळकत कशी मिळाली. त्याच्या ताब्यात मिळकत कधीपासून आहे ? त्याने ती मिळकत विकत घेतली आहे का ? त्याची ती  वडिलोपार्जित मिळकत आहे   का स्वकष्टार्जित मिळकत आहे ? हे तपासणे महत्वाचे असते. कारण मिळकत वडिलोपार्जित असेल तर त्यात इतर वारसांचा देखील हक्क व अधिकार असू शकतो. त्यामुळे हे तपासणे महत्वाचे आहे. मिळकत वडिलोपार्जित असेल तर तिचे हस्तांतर किवा विक्री करण्यास सर्व वारसांची समती घेणे किंवा सर्व वारसांनी मिळकत हस्तांतर करणे गरजेचे आहे.  


मिळकतीचे मालक यापैकी  कोणी मयत झाले असेल तर  पश्चात  सर्व वारस तर नमूद झालेले आहेत ना ? हे तपासून बघावे  व मयत्ताचा मयात दाखला तपासून बघावा.


        ग्रामपंचायत नमुना नंबर 8 मिळकत असेल व बऱ्याच वेळा कोणी मयत झालेत तर त्याचे सर्व वारस उताऱ्यावर लावले जात नाहीत. तसेच मिळकत ही संमतीपत्र  किवा  वाटणी ने हस्तांतर केली जात असते. तेव्हा हे तपासून बघणे गरजेचे आहे की सर्व वारसांचे नावे तर लागलेले आहेत ना ? मिळकत योग्यप्रकारे हस्तांतर  झालेली आहे ना ? सदर माहिती ही पक्षकारा कडून निट विचारपूस करून विचारून घ्यावी.


मिळकत वारसांमध्ये हस्तांतर झालेली असेल, तर सर्व वारसांमध्ये ती  हस्तांतर झालेली आहे ना ? सर्वांना त्यांचा कायेदेशीर हिसा  मिळालेला आहे ना ? हे तपासून बघणे मात्वाचे असते.


ग्रामपंचायत मिळकती मध्ये  नमुना नंबर 8 जूने उतारे तपासावेत. त्याच्यावरील नांव, क्षेत्र, मिळकत कशी आहे बखळ की बांधीव हे तपासावे. जूने उतारे व आताचे नवीन उतारे यावरील नाव, क्षेत्र व मिळकत नंबर तर बदल झालेला नाही ना हे तपासावे. कारण ग्रामपंच्यायत मिळकत नमूना नंबर 8 मिळकत उताऱ्यावर बऱ्याच वेळ बदल होत असतो तसेच मोजणी नुसार क्षेत्र कमी जास्त झाले तर त्याची नोंद उताऱ्यावर होऊ शकते. त्यामुळे  ग्रामपंच्यायत मिळकत असेल तर जुने व नवीन उतारे तपासणे महत्वाचे असते काही बदल वगैरे तर झालेला नाही ना ? हे तपासून घ्यावे व तसा काही बदल झालेला असेल तर त्याबाबत ग्रामपंचायती चा तसा दाखला घेऊन घ्यावा. ग्रामपंचायत उताऱ्यावर ग्रामसेवक याची सही व शिक्का आहे तर आहे ना ? हे तपासून खात्री करून घ्यावी. 


  मिळकत नंबर किव क्षेत्रात बदल  झालेला असतेल तर त्याबाबत ग्रापंचायतीचे तसे प्रमाणपत्र / सर्टीफिकेट /  घ्यावे लागत असते.   मिळकत ही हस्तांतर  झालेली असेल  तर त्याबाबत फेरफार प्रमाणपत्र व प्रोसिडींग बुक तपासावे लागत असते. त्यानंतर ग्रामपंचायतीने दिलेले चतुःसिमा सर्टीफिकेट व गावठाण सर्टीफिकेट तपासावे लागत असते. तसेच टायटल टाॅक्युमेंट असेल तर त्यावरील चतुःसिमा तपासून खात्री करून घ्यावी की चतुःसिमा बरोबर नमुद आहेत. तसेच यात देखील बांधीव मिळकत असेल तर लाईटबील व चालु व जुन्या टॅक्स पावत्या तपासाव्यात. मालक टॅक्स भरत आहे ही खात्री करून घ्यावी.  tax पावती व लाईट बिल हे जुन्या मालकाच्या नावाने किवा दुसऱ्याच्या नावाने असेल तर ते आताच्माया लकाच्या नावाने करून घ्यावे.


   मिळकतीचे जे काही दस्त असतील जसे खरेदी, बक्षीस, वाटणी वगैरे ते कायदेशीर आणि रजिष्टर / नोंदणीकृत  झालेले आहेत ना ते तपासून घ्यावे.  दस्ता प्रमाणे मिळकतीच्या उताऱ्यावर नाव, क्षेत्र, दिशा, नोंद योग्य नमूद आहे तर आहे ना ?  हे तपासून घ्यावे. 


  त्यानंतर आताच्या मालकाचा टायटल दस्त तपासून बघावा जसे खरेदीखत, बक्षिसपत्र, मृत्युपत्र जो काही जास्त असेल तो ? त्यानंतर तपासून बघावे की, आताच्या मालकाच्या ताब्यात ती मिळकत कधीपासून व कशी आलेली  आहे ?  मिळकत कोणाकडून व कशी - कशी हस्तांतर होत आलेली आहे. दस्तावरील लिहून देणार व  लिहून घेणार यांचे नाव, दिनांक, मिळकतीचे वर्णन, क्षेत्र हे सर्व तपासून बघावे व इतर दस्त व उतारे, नोंदी यावर ते क्रोस चेक करून घावे. त्यानंतर दस्ता मध्ये मिळकतीचा पूर्व इतिहास असेल तर तो तपासून घ्यावा. जुना मालक कोण होता ? त्याला ती मिळकत कशी मिळालेली होती हे तपासून घ्यावे. त्याला किती व कोणते तसेच कोणत्या दिशेचे क्षेत्र मिळालेले होते व त्यानंतर त्याने तेच क्षेत्र विक्री केलेली आहे ना ?  हे  तपासून घ्यावे. जुना दस्त व आताचा दस्त या मधील मालक, मिळकत वर्णन, दिशा  यात काही चूक तर झालेली नाही ना हे तपासून घ्यावे. जर चूक झालेली असेल व त्या बाबत चूक चूक दुरुस्त दस्त झालेला असेल तर तो तपासून घ्यावा. खरेदीखत, बक्षिसपत्र हे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे तरच ते कायदेशीर आहे. जर चूक झालेली असेल तर त्याचा चूक दुरुस्ती दस्त हा नोंदणीकृत असणे कायद्याने गरजेचे आहे. त्यानुसार उताऱ्यावर देखील दूरूस्ती करून घ्यावी. 


त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे मालकाचे नाव सर्व दस्तावर सारखेच व बरोबर तर  नमूद आहे ना ? जसे उतारा, खरेदीखात, टायटल दस्त, आधार कार्ड, Pan कार्ड वगैरे ठिकाणी. कारण नावात बदल असेल किवा चुकीचे नाव  असेल व आपण ते नीट तपासले नाही तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे निट तपासून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे मिळकत उतारा, टायटल दस्त, आधार कार्ड यावरील नावे सर्व ठिकाणी बरोबर तर नमूद  आहेत ना ?  हे नीट तपासून घेणे महत्वाचे आहे.   


त्यानंतर मिळकतीचा मंजूर ले-आउट तपासावा. ले-आउट तपासतांना त्यावरील मिळकत नंबर तपासावा. ले-आउट वरील तारीख सही शिक्का तपासावा. ले-आउट वरील सही शिक्का तपासून Town paling विभागाकडून मंजूर आहे ना ? हे तपासून घ्यावे. त्यानंतर ले-आउट मध्ये आपण सर्च घेत असलेला प्लॉट, त्याचे क्षेत्र, ले-आउट मधील चतु:सीमा आणि टायटल दस्तातील चतु:सीमा तपासून बघाव्यात. या चतु:सीमा आणि Valuation  रिपोर्ट मधील चतु:सीमा तपासून बघ्याव्यात. कारण Valuation रिपोर्ट मध्ये प्रत्यक्ष जागेवरील चतु:सीमा देखील नमूद असतात. यावरून आपल्याला समजून जाईल की चतु:सीमेत बदल तर नाही ना. किवा चुकीच्या चतु:सीमा नमूद तर नाहीत ना ? तसेच Valuation रिपोर्ट मधील प्रत्यक्ष जागेवरील क्षेत्र आणि उतार्यावरील व टायटल दस्तातील क्षेत्र तपासून घ्यावे कारण त्यामुळे आपल्याला समजून जाईल की प्रत्यक्षात क्षेत्र बरोबर आहे ना ? आपण जेव्हा Bank कामासाठी मिळकतीचा सर्च घेतो तेव्हा आपल्याला शक्यतो Valuation रिपोर्ट बँकेकडून उपलब्ध होऊ शकतो.


 मिळकतीच्या चतु:सीमा, क्षेत्र, रस्ता इत्यादी समजून घेण्यासाठी मिळकतीचा मंजूर ले-आउट तपासून घेणे महत्वाचे असते. 


बँक जेव्हा मिळकतीवर कर्ज देत असते बँक RCU करून कागदपत्रे तपासून घेत असते. तसेच बँके ने कर्जदाराला मिळकतीवर कर्ज  देण्या आधी PD होते व बँक सर्व माहिती काढत असते व मिळकतीचे मोजमाप केले जाते व मिळकत तपासली जात असते. 


आपण जे काही मिळकतीचे कागदपत्रे तपासतो त्या सर्व कागदपात्रांवरील नाव, क्षेत्र वगैरे माहिती सर्व ठिकाणी बरोबर आहे ना ? हे तपासून बघावे. तसेच काही कागदपत्रे हे जुने असू शकतात तेव्हा त्यावरील महिती वाचण्यास किवा समजण्यास अडचण येत असते अश्या वेळेस दुसऱ्या दस्तावर जर तीच माहित नमूद असेल तर तिथून ती माहिती वाचून व  खात्री करून घ्यावी. किंवा त्या दस्ताची संबधित विभागातून प्रमाणित प्रत काढून घ्यावी. सर्व कागदपत्रे, दस्त यावरील माहिती क्रोस चेक करून पडताळून बघावी. तेव्हा आपल्याला समजून जाते की कुठे काही चुकीचे तर नमूद नाही ना ? किवा एखादी दस्त चुकीचा तर नाही ना ? 


इतर ब्लॉग पोस्ट :-

 


    डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?

 

नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.

Click Here To View Post

 

जेकाही आताचे व जुने टायटल दस्त असतील, खरेदीखत, बक्षीसपात्र, हक्कसोड वगैरे यांची सूची दोन (इण्डेक्स दोन) ची नक्कल व नोंद नेट वरून काढून घेऊन तपासून घ्यावी. त्यावरील लिहून घेणार, लिहून देणार, क्षेत्र, मिळकत दिशा, दिनांक, मोबदला हे सर्व तपासून घ्यावे. म्हणजे आपली खात्री होऊन जाते की दस्त खरा व बरोबर आहे.


ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी. 

Click Here To View Post



  जेव्हा आपण जुने दस्त तपासतो तेव्हा ते थोडे काळजीपूर्वक तपासून घ्यावी की ते नोंदणीकृत व बरोबर आहेत ना ?


मिळकतीचा हस्तांतरणाचा दस्त, खरेदीखत वगैरे झाल्यानंतर उताऱ्यावर नवीन मालकाचे नाव लागण्यास काही दिवस लागत असतात. अश्या वेळेस नाव लागण्याची प्रक्रिया झाली आहे का ? का चालू आहे हे तपासून घ्यावे. त्याबाबत acknowledgement receipt तपासून घ्यावी. त्याबाबत कोणाची काही हरकत तर आलेली नाही ना हे तपासून घ्यावे. त्याबाबत इ हक्क प्रणाली गाव चावडी वर त्या दस्ता बाबत / फेरफार बाबत online नोटीस तपासून बघावी. 

    डिजिटल गाव चावडी.

फेरफार आव्हाणीत कसा करावा ?

Click Here To View Post

तसेच मिळकत खरेदी विक्री करणे अगोदर  पेपर नोटीस देऊन द्यावी. त्यामुळे कोणाची काही हरकत असेल तर ती येऊ शकते तसेच  मिळकत विकत घेणार हा बोनाफाईड पर्चेसर आहे असे दिसून येते. त्यामुळे पेपर नोटीस देणे गरजेचे असते. बँकेचे नोटीस ऑफ intimation करायचे असेल तर त्याबाबत देखील पपेर नोटीस दिलेले चांगले असते. 


त्यानंतर मिळकतीचे इतर कागदपत्रे तपासावे जसे कर पावती, लाईट बिल, हे चालूचे तपासून घ्यावे. त्यामुळे समजेल की मिळकतीचा कर (Tax) कोण भरत आहे व (Tax) कर वगैरे तर थकीत नाही ना ? 


कोणतीही मिळकत ही हस्तांतण होत असताना ती कायदेशीर मार्गाने तसेच नोंदणीकृत दास्ताने हस्तांतरण होणे महत्वाचे आहे त्यामुळे ती मिळकत योग्यप्रकारे हस्तांतरण होत आलेली आहे ना ? हे तपासून घ्यावे.


  एखादी मिळकत  मुखत्यारपत्र (Power of Attorney) या द्वारे  हस्तांतर होत असेल  तर अशावेळेस हे  तपासणे महत्वाचे आहे की, सदर दस्त नोंदणीकृत आहे ना कोणी कोणास व काय अधिकार दिलेला आहे ? हे तपासून घ्यावे. तसेच  मुखत्यारपत्राद्वारे (POA) ने  काही मिळकत हस्तांतर वगैरे झालेली असेल किवा होत असेल  तर ज्या वेळेस ती प्रक्रिया झाली तेव्हा त्या मुखत्यारपत्रा मधील सर्व व्यक्ति हे जीवंत असणे गरजेचे आहे. कोणी मृत झाले तर  मुखत्यारपत्र  हे  रद्द होत असते. मिळकत विक्री साठी तसेच  मिळकत हस्तांतर करणे असेल तर त्यासाठी नोंदणीकृत मुखत्यारपत्र असणे गरजेचे आहे. मुखत्यारपत्र हे जास्त जुने असेल व आता त्या दस्ताचा वापर होत असेल तर त्या दस्तातील सर्व जिवंत आहे या बाबत त्या सर्वांचे प्रतिज्ञापत्र करून घ्यावे किवा नवीन मुखत्यारपत्र नोंदणीकृत करून घ्यावे. 

मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटर्नी)

Click Here To View Post

    मिळकतीची बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा, लेआउट, भोगवटादार सर्टीफिकेट तपासावे. त्यावरील नाव, क्षेत्र हे सर्व ठिकाणी क्राॅस व्हेरीफाय करणे. म्हणजे बरोबर तर नमुद आहे ना. हा त्याच संबंधीत मिळकतीचा दस्तएवेज आहे ना ? हे तपासून खात्री करून घेणे. सर्टीफिकेट वर  सही, शिक्का दिनांक तपासून इत्यादी तपासून बघावे.  


     मिळकती चे नगरपालिका किवा संबंधित कार्यालयाचा पूर्णत्वाचा दाखला / Completion सर्टिफिकेट,  Occupancy सर्टिफिकेट / भोगवटादार प्रमाणपत्र  असेल तर ते तपासून घ्यावे कारण त्यामुळे आपले काम सोप्पे होत असते कारण सर्व बरोबर झाल्यावरच संबंधित कार्यालय हे  दाखले देत असतात. व त्याबाबत त्याची देखील  कायदेशीर जबाबदारी असते. 


    सदनिका मिळकत असेल तर त्याचे घोषणापत्र / Deed of Apartment, Development Agreement,  Power of Attorney निट तपासून घ्यावे. 


टायटल सर्च रिपोर्ट तयार करतांना मिळकतीचे पूर्ण वर्णन नमूद करावे. एकूण क्षेत्र, दिशा, बांधकाम क्षेत्र, चटई क्षेत्र नमूद करावे. त्यानंतर  मिळकतीचा पूर्ण इतीहास नमुद करावा. सुरवातीला मिळकत कोणाची होती. एन. कधी झाली. नंतर मिळकत कशी कशी हस्तांतर होत गेली. हा सर्व माहिती नमूद करावी. आपल्याकडे जे काही कागदपत्रे उपलब्ध असतील त्याची सर्व माहीती अनुक्रमे नमुद करावी. उदा. पारवानगी प्रमाणपत्र  वगैरे. 


    आपण कोणकोणते कागदपत्रे तपासले त्याची सर्व यादी सर्च रिपोर्ट मध्ये नमूद  करावी. तसेच  आपण कोणते कागदपत्रे मुळ बघीतली व कोणते दस्त  झेराॅक्स, प्रमाणित  बघीतले हे नमुद करावे. 


कधी कधी आताच्या मालकाकडे मिळकत ही मागील 15 ते 20 वर्षापासून असते. जुने खरेदीखत उपलब्ध असते. जूने टायटल चेन कागदपत्रे व बरेच कागदपत्रे उपलब्ध असतात अशा वेळेस मिळकता सर्च घेणे सोपे होवून जाते व मिळकतीचा सर्व लवकर घेतला जातो. तसेच बरीच माहिती ही online उपलब्ध असल्याने सर्च घेणे सोप्पे होत असते. 


       मिळकतीचा सर्च हा मागील 12 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा घेतला जात असतो. या मागचे कारण असे आहे की, कोणाचे त्या मिळकतीवर  अॅडव्हर्स पजेशन तर नाही ना. ? ती मिळकत आताच्या मालकाच्या ताब्यात किती वर्षापासून आहे. तसेच रिडीमशन ऑफ Mortgage च्या मुदती नुसार मिळकतीवर काही कर्ज वगैरे तर बाकी नाही ना ? त्याबाबत वाद तर नव्हता ना. ? तसेच आपण सर्च घेत  असलेल्या मिळकतीत कोणा अज्ञान व्यक्तीचा चा हिस्सा तर नव्हता व नाही  ना ?  या सर्वांच्या बाबतीत काही वाद असेल तर कोर्टात दावा दाखल करण्यासाठी मुदतीच्या कायदया नुसार मुदत असते. त्यामुळे हा मागील सर्च घ्यावा लागत असतो. व हे बघावे लागते की मिळकतचे टायटल क्लेयर व मार्केटेबल आहे. 


      जेव्हा एखादी व्यक्ती एखादी मिळकत खरेदी करत असतो त्याने ती संपूर्ण मिळकत खरेदी केली तर त्याने जून्या मालकाकडून आधीचे टायटल डाॅक्युमेंट घेणे गरजेचे असते. 


         उदा. अ या व्यक्तीचा एक 2000 चै.फु. प्लाॅट आहे. व त्याने तो संपूर्ण प्लाॅट ब या व्यक्तीला विक्री केला तर ब या व्यक्तीने अ या व्यक्तीकडून त्याचे जूने टायटयल डाॅक्युमेंट घ्यावे. 


       आणि जर अ या व्यक्तीने ब या व्यक्तीला 2000 चै.फु. पैकी 1000 चै.फु. इतकीचा प्लाॅट विक्री केला तर अ हा व्यक्ती ते आधीचे टायटल डाॅक्युमेंट त्याच्या जवळ ठेवत असतो. अशा वेळेस जूने टायटल डाॅक्यमुेंट उपलब्ध होत नाही. पण आपण प्रमाणित  टायटल डोक्युमेंट तसेच त्याची इंडेक्स दोन सुची व आर.आर. पावती ची सर्टीफाईड काॅपी /नक्कल आपण नोंदणी कार्यालयातून विहीत फी भरून काढू शकाते. तसेच online  देखील काढू शकतो. 


       जर आताच्या मालकाने  ने पूर्वीच्या मालकाकडून सर्वच मिळकत विकत घेतली असतेल तर त्याच्याजवळ आपण जूने टायटल डाॅक्युमेंटची मागणी करू शकतो शक्यतो त्याने आधीच्या मालका कडून ते जूने टायटल डाॅक्युमेंट घेतले असतेल तर आपल्याला ते उपलब्ध होवू शकते.  बँक कर्ज देते त्यावेळी जर कर्ज रक्कम जास्त असेल तर बँक त्यांच्या policy नुसार जुना टायटल चेन दस्त ची मागणी करू शकते. 


         त्यानंतर महत्वाची स्टेप म्हणजे सदर मिळकचा online आय.जी.आर. या वेबसाईट वरून सर्च घेणे. नोंदणी व मुद्रांक विभागाची आपण फी भरून आपण महाराष्ट्रा मधील कोणत्याही स्थावर मिळकतीचा सर्च घेवू शकतो. हा सर्च घेतल्याने आपण  online  तपासू शकतो की आपण सर्च घेत असलेल्या मिळकतीचे मागे कोण कोणते व कधी कधी व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे  online  सर्च घेणे महत्वाचे असते.  online सर्च घेण्यासाठी आपल्याला फी भरावी लागते. त्याचे चलन व पावती  निघत असते. आपण घेतलल्या मिळकतीचा सर्च हा एक्सल फायली व्दारे डाउनलोड होवून मिळत असतो. मिळकतीचा  online  सवर्च हा निट काळजीपूर्वीक तपासून घ्यावा त्यामुळे आपणास समजून जाईल की, मिळकत कधी कधी कोणा कोणा व्दारे हस्तांरीत झालेली आहे. मिळकतीवर बोजा कधी चढवला गेला व कधी कमी झाला आहे ? बोजा वगैरे बाकी तर नाही ना ? ही सर्व माहीती आॅनलाईन सर्च मघ्ये मिळू शकते. जे काही रजिष्ट्रर डाॅक्युमेंट आधी झालेले असेल त्याचीच माहीती या आॅनलाईन सर्च मध्ये दिसत असते. आपण आॅनलाईन सर्च घेतल्याचे व फी भरल्याचे चलन डाउनलोड होत असतेव एक पावती जनरेट होत असते. आपण त्या चलन चा अपयोग केला म्हणजे नवीन चलन होवून त्यावर डिफेस असे नाव येत असते. चलन वर जर डिफेस असे नाव आले तर समजावे की हे चलन वापरले गेले आहे. या एका चलनचा आपण एकच सर्च घेण्यासाठी उपयोग करून शकतो. 

 

                                     स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.

Click Here To View Post

    जर आपण एखादी बॅकेचे लिगलचे कर्मचारी असाल किंवा बॅंकेचे वकिल असाल तर सर्च घेतांना बॅंकेची पाॅलिसी प्रमाणे काम करणे. तसेच मिळकतीचे त्याप्रमणे कागदपत्रे घेणे व सर्च तयार करणे महत्वाचे असते. 

          बँक सर्च घेताना SARSAI पोर्टल वरुन देखील सर्च घेत असते की, सदर मिळकतीवर कर्ज बोजे तर नाही ना ? मिळकत दुसरीकडे गहाण तर नाही ना ? आणि कर्ज दिल्यावर SARSAI पोर्टल वर त्याची नोंद केली जात असते. तसेच  नोंदणीकृत गहाण खत असेल तर उताऱ्यावर कर्ज बोजा बसवला जात असतो. किंवा त्याबाबत बँके द्वारे नोटिस  ऑफ केले जात असते. 


        सर्च तयार करताना ही सर्व माहिती व कागदपत्रांची नोंद सर्च रिपोर्ट मधे करावी आणि आणि शेवटी त्या मिळकती बाबत काय लीगल ओपेनियन आहे ते नमून करावे लागते.  अशा प्रकारे  सर्च रिपोर्ट तयार होईल. 


     मिळकतीचे मूळ दस्त सांभाळून ठेवणे खूप महत्वाचे असते कारण तो एक मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा असतो किवा त्याचा गैर वापर होऊ शकतो.  मिळकतीचे मुळ दस्त हरवले तर पोलिस तक्रार करणे, पेपर नोटिस देऊन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करणे महत्वाचे असते. 


     आज काल खरेदी विक्री तसेच बरीच कामे ऑनलाइन झालेली आहे त्यामुळे फसवणुकीचे प्रकार कमी होण्यास मदत झालेली आहे व खरेदी विक्री व कायदेशीर कामे करणे कामी  सुरक्षितता देखील आलेली आहे. 


CERAI म्हणजे काय ?


इक्वीटेबल मॉर्गेज संदर्भात नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंग. Notice of Intimation Filing in respect of Equitable Mortgage.


 गाहाणखत (Mortgage Deed).

 

Click Here To View Post

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads