पुरावा // Evidance

Adv.Saurabh Rajput
0

 

पुरावा

पुराव्याने महत्व.


मित्रानो आपण माहिती बघू पुरावा व त्याचे महत्त्व.
 कायद्यानुसार आणि कोर्ट कारवाई मध्ये तसेच शासकीय कामकाजात पुरव्याला खूप महत्त्व आहे. पुराव्याचे कायद्यानुसार अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. भारतात पुराव्या बाबत Indian Evidence Act 1872 लागू होता परंतु आता त्या मध्ये सुधारणा होऊन तो भारतीय साक्ष अधिनियम अधिनियम 2023 (BNS) असा झालेला आहे. कोर्टात कोणता पुरावा ग्राह्य धरला जाईल. कसा दाखल केला जाईल याबाबत सर्व कामकाज हे या कायद्यानुसार चालत असते. कोर्ट कारवाई मध्ये असे नाही की काहीपण पुरावा दाखल करू. कसा पण पुरावा दाखल करू. केव्हा ही दाखल करू, पुरावा बाबत हे सर्व कामकाज या कायद्यानुसार करावे लागते. ह्या कायद्या मध्ये संपूर्ण माहिती आहे की कोणता पुरावा गृहीत धरला जाईल आणि कोणता नाही. तो कसा दाखल करावा. त्याची प्रक्रिया काय आहे वगैरे.

कायद्यानुसार आणि कोर्ट कारवाई मध्ये पुराव्याला खूप महत्त्व आहे या मुळे आरोपीला शिक्षा होते. केसचा यावर निकाल लागतो. कोण दोषी आहे आणि कोण नाही हे ठरवले जाते.

जो व्यक्ती कोर्टात केस / दावा दाखल करतो / त्याची जी मागणी आहे ती मागणी सिद्ध करणेची जबाबदारी त्याची स्वतः वर असते. त्याला त्याची मागणी सिद्ध करणेसाठी पुराव्याला खूप महत्त्व आहे.

जर एखादी व्यक्ती समोरील व्यक्तीवर काही आरोप करत असेल तर त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीवर जबाबदारी असते की तो जे आरोप करीत आहे ते पुराव्यानिशी सिद्ध करणे.

जर एखादी व्यक्तीवर पोलिसांनी काही गुन्हा दाखल केला तर पोलिसांची जबाबदारी असते की त्या केस चां संपूर्ण तपास करून पुरावा सादर करून त्या व्यक्तीला कोर्टात दोषी सिद्ध करणे आणि मग जर तो व्यक्ती दोषी असेल तर कोर्ट त्याला शिक्षा करेल.

वकील केव्हाही कामकाज करत असताना पुराव्याचा विचार करतो. वकील कायद्याचा व इतर विचार तर करतोच पण पुराव्याचा देखिल विचार करतो कारण त्याला माहित आहे की केस जिंकण्यासाठी व काही सिद्ध करण्यासाठी पुरावा महत्वाचा आहे.

वकील कधी ही असा विचार करतो की, समजा एखादी स्थावर मिळकत आहे, त्याच्या पक्षकारांनी किंवा कोणी सांगितले की ही मिळकत माझी आहे, तर वकील म्हणेल की, ती मिळकत तुझी आहे तर तुझ्याकडे त्या मिळकतीचे काय काय दस्त आहेत ? की त्यामुळे सिद्ध होईल ती मिळकत तुझी आहे. जसे मालकी हक्काचे दस्त खरेदीखत असू शकते, बक्षिसपत्र असू शकते, वाटप पत्र आसू शकते, हक्क सोड पत्र असू शकते, मृत्युपत्र असू शकते, 7/१२ उताऱ्यावर त्याचे मालक म्हणून नाव असेल. त्या मिळकतीच्या नोंदी असतील. त्या मिळकतीच्या टॅक्स भरल्या बाबत पावत्या असतील, त्या मिळकतीचे मालकाच्या नावाने लाईट बिल असेल. जर वारसा ने मिळकत भेटली असेल तर त्या बाबत दस्त. कोर्टाचा वारस दाखला असेल तर तो. म्हणजे त्यामुळे असे सिद्ध होते की ही मिळकत कोणाची आहे. 

वकील कोणत्याही गोष्टीवर कागदोपत्री आणि पुराव्याने जास्त विश्वास ठेवतो. कारण त्याला माहिती आहे की पुरावा हा फार महत्वाचा आहे.

कोणी व्यक्ती मयत झाला असेल तर त्याचा पुरावा म्हणून मृत्यु दाखला गरजेचे आहे. कोणाचे लग्न झालेले असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून महत्वाचे आहे. तसेच पुरावा म्हणून जन्म दाखला, शाळेचा दाखला हे दस्त देखिल महत्वाचे दस्त आहेत. पुरावा म्हणून तसेच सरकारी व शाळा कॉलेज चे कमी Domocile, Nationality प्रमाणपत्र महत्वाचे असते.

जर एखादी मिळकती सदर्भात वारसांचा वाद असेल तर त्या व्यक्तीचे नेमके वारस कोण ? हे सिद्ध करणेकामी पुरावा म्हणून कोर्टाचा वारस दाखला लागेल.

समजा एखादी गाडी असेल तर वकील विचार करेल की या गाडीचे RC बुक कोणाच्या नावाने आहे. गाडी कोणाच्या ताब्यात आहे. कोणी गाडी विकत घेतली असेल तर त्याच्या नावाने गाडी आहे का ? का काही त्या बाबत स्टॅम्प वगैरे आहे. गाडी चे इन्शुरन्स व इतर कागदोपत्री कोणाचे नाव आहे. असा वकील संपूर्ण बाजूने विचार करतो.

जर एखादी अपघात झाला तर वकील विचार करतो की कोणी साक्षीदार आहे का ? अपघात घडला तिथे CC TV होते का ? अपघाता बाबत पोलीस केस दाखल झाली आहे का ? त्याची कंप्लेंट ची कॉपी / त्या मध्ये काय नमूद आहे. अपघातात जखमीला लागले त्याबाबत त्याने कुठे उपचार घेतला. त्यामध्ये डॉक्टर साक्षीदार होतील की ही व्यक्ती अपघातामध्ये जखमी होती. डॉक्टरांचे रिपोर्ट पुरावा होईल. ज्याने अपघात केला त्या कडे लायसन्स आहे का ? इन्शुरन्स आहे का ? अपघात झाला तेव्हा इन्शुरन्स वैद्य होता का ? अपघातास कोण कारणीभूत आहे ? कोणाची चुकी आहे ? वकील असा विचार करतो कारण त्याला त्याचे केस चे कमी पुरावा पाहिजेल असतो.

कोणी व्यक्ती हरवला असेल तर त्याचा पुरावा म्हणून पोलीस तक्रार दाखल असेल. पेपर नोटीस दिलेली असेल. तो व्यक्ती काही वेडा वगैरे असेल तर त्याचे उपचार घेतल्या बाबत कागदपत्रे असतील हा पुरावा होतो.

तसेच आपण जे काही विविध अर्ज देतो पोस्टाने अर्ज पाठवतो त्याची पोहोच घेतो तो देखिल आपल्याला एक पुरावा होत असतो. आपण कोणाला नोटीस दिली. नोटीस उत्तर दिले हा देखिल एक पुरावा असतो. आपण कोणाला काही लेखी कळवले हा एक पुरावा होईल. आपण पेपर मध्ये काही कामा संदर्भात जाहीर नोटीस दिली तर हा एक पुरावा होईल. एखादी गोष्ट हारली, चोरीला गेली तर त्याची तक्रार नोंदवली म्हणजे तो पुरावा होईल. त्या हरवलेल्या वास्तूचा कोणी गैरवापर केला तर आपल्याकडे एक पुरावा असेल की वस्तू हरवली आहे आणि हरवल्या बाबत पोलीस तरकर दाखल केलेली आहे 


आपण कोणाला कायदेशिर कामासाठी चेक देतो. ऑनलाईन पैसे पाठवतो हा देखिल एक पुरावा असतो. माहितीच्या अधिकारा अन्वये अर्ज देऊन मिळालेली माहिती पुरावा होऊ शकते.

आपण उसने पैसे दिल्यावर पावती करतो, स्टॅम्प करतो, ऑनलाईन किंवा चेक ने ते पैसे देतो हा एक कायदेशीर पुरावा होतो की आपण समोरल व्याकिता उसने पैसे दिलेले आहेत.

जर आपण एखादी स्थावर मिळकत जसे प्लॉट, घर वगैरे विकत घेत असू तर त्या बाबत करारनामा केला असेल, नोंदणीकृत सौसापावती असेल, पैसे चेक ने किंवा ऑनलाईन दिले असतील. त्यामधील साक्षीदार असतील हा पण पुरावा होत असतो. नोटरी समक्ष काही दस्त केला, प्रतिज्ञापत्र केले हा देखिल एक पुरावा होतो.

आपण कुठे प्रवास केला असेल ठराविक वेळेला तर त्याचा पुरावा म्हणून तिकीट असू शकते. प्रवास केला त्याबाबत रेल्वे स्टेशन असेल बस स्टॉप असेल तेथील सीसीटीव्ही कॅमेरे पुरावा होऊ शकतो.

एखादी घटना घडली परंतु त्यामध्ये तुमचे नाव आले आणि त्या घटनेशी तुमचा काही एक संबंध नसेल. व तुमच्याकडे पुरावा असेल की, सदर घटना घडली तेव्हा तुम्ही दुसरीकडे होता तर तुम्ही त्या पुराव्याने ते सिद्ध करू शकतात. याला कायद्यानुसार लॅटिन भाषेत शब्द आहे अलिबी.

कोणी व्यक्ती मयत झाला त्याचे कारण काय ? यासाठी poatmartam हा देखिल पुरावा आहे. डॉक्टरांचा दाखला की मृत्यूचे कारण काय हा देखिल पुरावा आहे. पोलिसांचा घटना स्थळाचा पंचनामा.

काही कागदपत्रे, स्टॅम्प हे दस्त वगैरे देखिल पुरावा होऊ शकतो.

नोकरीच्या ठिकाणी हजेरी बुक, पगार दाखला, PF दाखला, विविध नोंदणी प्रमाणपत्र, दुकान नोंदणी दाखला, लग्नाचा नोंदणी दाखला, आधार कार्ड, Pan कार्ड हा देखिल पुरावा आहे. एका कुटुंबात किती लोक आहेत हे रेशन कार्ड वरून समजते तो एक पुरावा आहे.

विविध दाखले सरकारी विभागाकडून दिले गेलेले, विविध सर्टिफिकेट की जे कायद्याने मान्य आहेत. मान्यताप्राप्त हस्ताक्षर एक्स्पर्ट दाखला. हे सर्व पुरावे आहेत.

जर काही इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे जसे पेनड्राईव, सीसीटीव्ही व्हिडिओ, संगणक, लॅपटॉप, मोबाईल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअँप हे पुरावे दाखल करणे बाबत पद्धत आहे. या साठी ज्यांना अधिकार आहे ज्यांची नियुक्ती कायद्याने केली गेली आहे त्यांचे प्रमाणपत्र लागते. कारण या पुरावा मध्ये काही छेडखानी होऊ शकते.

एखादी गुन्हा घडला म्हणजे पोलीस देखिल आरोपी विरुद्ध पुरावे शोधत असतात. जसे फिंगर प्रिंट, फॉरेन्सिक एक्स्पर्ट कडून विविध पुरावे शोधतात. कारण आरोपीला पकडणे कमी आणि त्याला शिक्षा देणे कमी पुरावे फार महत्वाचे आहे.

जर एखादी व्यक्तीने त्याच्या स्थावर मिळकतीवर बँकेचे कर्ज घेतले असेल आणि त्याने ते भरले नाही व बँकेला कर्ज वसुली कामी काही कायदेशीर कारवाई करणी असेल तर बँकेकडे कर्ज दिल्या बाबत पुरावा असतो जसे की, कर्जाचा करारनामा, कर्ज दिल्या बाबत कर्ज sanction letter, नोंदणीकृत गहाणखत, NOI किंवा / Deposit Of Title Deed. कर्ज मागणी नोटीस. ग्राहकास त्याच्या खात्यात दिलेली कर्ज रक्कम, जर ग्राहकाचा कर्ज हप्ता, चेक bounce झाला तर हे सर्व बँकेसाठी पुरावे आहेत. आणि कर्ज वसूल करणेच्या कायदेशीर कारवाई मध्ये ते बँकेस दाखल करावे लागतील.

आपण देखिल आपल्या रोजच्या आयुष्यात नीट अलर्ट  राहून विचारपूर्वक काम करणे महत्वाचे आहे. आपण वकील असेल किंवा नसाल. कारण तुमच्यावर काही अन्याय झाला. गुन्हा घडला ? तुमच्या विरुद्ध गुन्हा घडला किंवा त्यामध्ये तुमचा काही संबंध नसेल व तुमचे नाव आले तर तुम्ही स्वतः शोधलेला पुरावा तुम्हाला कामात येईल.

तसेच तुम्ही काही कोर्टात केस / तक्रार / दावा वगैरे दाखल केला, तुम्हाला न्याय हवा असेल तर तुमचा वकील देखिल तुमच्याकडून सर्व माहिती घेऊन तुम्हाला न्याय मिळून देणे साठी पुरावे शोधेल व ते कोर्टात मांडेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads