महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कमल 157

Adv.Saurabh Rajput
0

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कमल 157 - 



आज आपण माहिती बघू महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कमल 157 बाबत. 

सर्वात आधी आपण बघू हे कलम काय आहे.


Section 157 of the Maharashtra Land Revenue Code, 1966, establishes the presumption of correctness for land records. It states that an entry in the record of rights and a certified entry in the register of mutations are presumed to be true until the contrary is proved or a new entry is lawfully substituted.


 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 157 हे अधिकार अभिलेख (Record of Rights/7-12) आणि फेरफार नोंदवही (Mutation Register) मधील नोंदींच्या सत्यतेबद्दल. यानुसार, प्रमाणित (Certified) फेरफार नोंदणी खरी मानली जाते, जोपर्यंत त्याविरुद्ध पुरावा सादर केला जात नाही किंवा त्याऐवजी कायदेशीररीत्या दुसरी नोंद केली जात नाही.


पुराव्याचे गृहीतक (Presumption of Truth): 7/12 उतारा किंवा फेरफार नोंदणीवर जोपर्यंत कुणी हरकत घेत नाही, तोपर्यंत ती खरी मानली जाते.


प्रमाणित फेरफार: केवळ प्रमाणित (Verified/Certified) फेरफार नोंदींनाच कलम 157 अंतर्गत कायद्याने संरक्षण मिळते.


कलम 157 हे केवळ नोंदीच्या सत्यतेचे गृहीतक आहे, मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही. जर नोंद चुकीची असेल, तर त्याविरुद्ध अपील करून फेरफार दुरुस्त केला जाऊ शकतो.


या कलमा द्वारे असे गृहीत धरले जाते की, नोंद हा देखिल एक पुरावा आहे. हे एक गृहीत धरणे बाबत कलम आहे. 


जर एखादी स्थावर मिळकती बाबत वाद झाला. आणि तो वाद कोर्टात गेला. दावा, तक्रार दिवाणी किंवा महसूल कोर्टात दाखल झाली. तर सदर केस सिद्ध करणेसाठी पुरावा लागतो. जर पुरावा असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. त्यामुळे स्थावर मालमत्ते संदर्भात हे कलम महत्वाचे आहे. फेरफार हा देखिल एक पुरावा आहे आणि या कलमने तो पुरावा आपण कोर्टात सादर करू शकतो.


फेरफार म्हणजे काय -

कोणत्याही स्थावर मिळकती मध्ये 7/१२ उताऱ्यावर. सिटी सर्व्हे उताऱ्यावर काही बदल झाला. मालकी हक्कात बदल झाला तर त्याबत फेरफार मंजूर केली जाते. फेरफार म्हणजे एक विशिष्ट नंबर असतो. त्याला फेरफार असे म्हणतात.


उदा. समजा शेतजमीन संदर्भात काही वाद झाला व कोर्टात केस दाखल झालीं. शेतजमिनीच्या रस्त्या संदर्भात वाद असेल. कोणी बाजूच्या व्यक्तीने शेताचा रस्ता बंद करून टाकला आणि त्याने कोर्टात केस दाखल झाल्यावर त्याने कोर्टात सांगितले इथे तर पाहिले पासून रस्ता नाहीच आहे. परंतु त्या रस्त्या बाबत फेरफार मंजूर झालेला असेल की इथून रस्ता आहे. तर ती फेरफार कोर्टात पुरावा म्हणून दाखल करता येईल. 


त्यामुळे स्थावर मिळकती संदर्भात महसूल नोंद पुरावा म्हणून सदर करणेकामी हे कलम अत्यंत महत्वाचे आहे. 


कोर्टात ज्या व्यक्तीने दावा दाखल केला असेल. त्याची काही मागणी असेल तर त्याची मागणी बाबत खारेपणा सिद्ध करणेची. त्याबाबतचा पुरावा देऊन ती गोष्ट सिद्ध करणेची जबाबदारी त्याच्यावर राहतें. त्यामुळे जमिनी संदर्भातील वादात महसूल नोंद कोर्टात पुरावा म्हणून सदर करणेसाठी हे एक महत्वाचे कमल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads