बिल्डर कडून जागेचे कन्व्हेयन्स

Adv.Saurabh Rajput
0

 

बिल्डर / जागा मालकाकडून जमिनीचे कन्व्हेयन्स सोसायटी किंवा अपार्टमेंट असोसिएशनच्या नावे करून घेणे. 


सर्वात आधी आपण बघू कन्व्हेयन्स म्हणजे काय. कारण त्यामुळे तुम्हास पुढील गोष्टी समजणे सोप्पे होईल.  कन्व्हेयन्स म्हणजे हस्तांतर होय. कोणतीही स्थावर मिळकत ही जेव्हा एका मालकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतर होते त्याला कन्व्हेयन्स असे म्हणतात. मराठी मध्ये याला अभिहस्तांतरण असे म्हणतात. खरेदीखत वगैरे या नोंदणीकृत दस्ताने देखील मालकी हक्क एका मालकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतर होतो म्हणून त्याला देखील आपण कन्व्हेयन्स म्हणू शकतो.


आता आपण माहिती बघू बिल्डर / जागा मालकाकडून जागेचे कन्व्हेयन्स हे हौसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट असोसिएशनच्या नावे करून घेणे म्हणजे काय ? आणि कायदेशीर दृष्ट्या ते का महत्वाचे आहे.

आपण जेव्हा फ्लॅट मिळकत विकत घेतो तेव्हा त्याबाबत कायदेशीर गोष्टी आपल्याला माहित असतील तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. कारण फ्लॅट मिळकत विकत घेणे म्हणजे त्यामध्ये खूप मोठी पैशांची आर्थिक  गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे शक्यतो आपण एक किंवा दोनच वेळेस फ्लॅट मिळकत विकत घेतो किंवा या व्यतिरिक्त गुंतवणूक म्हणून फ्लॅट मिळकत विकत घेत असतो. त्यामुळे त्याबाबत कायदेशीर गोष्टी आपल्याला माहिती असल्यास फ्लॅट मिळकत विकत घेतांना आपल्याला अडचणी येणार नाहीत. त्याचा तुम्हास फायदा होईल आणि जरी फ्लॅट मिळकत विकत घेतली गेलेली असेल व तुम्ही त्या फ्लॅट मिळकती मध्ये रहिवास करत असाल तरी त्याबाबत तुम्हास कायदेशीर गोष्टी माहिती असल्याने त्याचा तुम्हास नक्कीच फायदा होईल.

जेव्हा बिल्डिंग बांधून पूर्ण होते. तेव्हा त्या बिल्डिंग मध्ये अनेक लोक एकत्रितपणे रहिवास करत असतात. अशा वेळेस त्या बिल्डिंग चे कामकाज, नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी त्याबाबत दोन महत्वाचे कायदे  आहेत ते म्हणजे एक आहे Maharashtra Co-operative Societies Act, 1960 आणि दुसरा म्हणजे Maharashtra Apartment Ownership Act, 1970. हे कायदे तयार करण्यामागे कायदेशीर हेतू हा आहे की,  बिल्डिंग चे कामकाज व्यवस्थित कायदेशीरपणे चालून त्यावर कायद्यामार्फत शासनाचे कायदेशीर  नियंत्रण राहावे.


जर Co-operative Societies Act, 1960 प्रमाणे बिल्डिंग मधे हौसिंग सोसायटीची स्थापना झालेली असेल तर बिल्डिंग चे कामकाज तसेच नियमन या सोसायटी कायद्यानुसार चालते. आणि बिल्डिंग मधे जर Maharashtra Apartment Ownership Act, 1970 नुसार अपार्टमेंटची स्थापना झालेली असेल तर बिल्डिंगचे  कामकाज व नियमन या अपार्टमेंट  कायद्यानुसार चालते.


जेव्हा बिल्डिंग बांधून पूर्ण होते तेव्हा त्या बिल्डिंग मध्ये दोन प्रकारचे मालकी हक्क येतात. एक म्हणजे बिल्डिंग ज्या जागेवर बांधकाम केलेली आहे त्या जागेचा मालकी हक्क आणि दुसरा म्हणजे फ्लॅट चा मालकी हक्क. 


फ्लॅटचा कायदेशीर मालकी हक्क हा तुमच्याकडे खरेदीखत किंवा डिड ऑफ अपार्टमेंट (खरेदीने) येऊ शकतो.


जर सोसायटीची स्थापना झालेली असेल तर संबंधित फ्लॅट मालकाकडून खरेदीखत करून फ्लॅट तुमच्या नावाने मालकी हक्काने होऊन जाईल आणि जर अपार्टमेंट असोसिएशन ची स्थापना झालेली असेल तर डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदी) ने अपार्टमेंट मधील फ्लॅट तुमच्या नावाने होऊन जाईल. परंतु बिल्डिंग ज्या जागेवर बांधलेली आहे तिचा मालकी हक्क हा त्या बिल्डर किंवा मूळ मालकाकडेच राहील. तर त्यामुळे तो मालकी हक्क सोसायटीची स्थापना करून तिच्या नावे किंवा अपार्टमेंट असोसिएशन ची स्थापन करून असोसिएशन च्या नावे हस्तांतर करून घेणे म्हणजे कन्व्हेयन्स (हस्तांतर) करून घेणे होय.


जर बिल्डिंग मध्ये जर हौसिंग सोसायटी स्थापन असेल तर त्यासाठी बिल्डरकडून कन्व्हेयन्स डीड करून घ्यावी लागेल त्यामुळे बिल्डिंगचा मालकी हक्क सोसायटीच्या नावे हस्तांतर होईल. आणि बिल्डिंग मधे जर अपार्टमेंट कायद्यानुसार अपार्टमेंट ची स्थापना झालेली असेल तर जगमालक / बिल्डर यांचे कडून दीड ऑफ डिक्लेशन ची नोंदणी करून घ्यावी लागते. त्यामुळे बिल्डिंग जागेचा मालकी हक्क अपार्टमेंट असोसिएशनचे नावे हस्तांतर होऊन जाईल.


बिल्डिंग चे कामकाज कायदेशीर होण्यासाठी सोसायटी कायद्यानुसार हौसिंग सोसायटीची किंवा अपार्टमेंट कायद्यानुसार अपार्टमेंट असोसिएशन ची स्थापना करावी लागते. आणि बिल्डिंग ज्या जागेवर बांधली गेलेली आहे त्या जागेचा मालकी हक्क सोसायटी किंवा अपार्टमेंट असोसिएशन च्या नावे हस्तांतर करून घेणे म्हणजे कन्व्हेयन्स होय.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads