हौसिंग सोसायटी म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0

 हौसिंग सोसायटी म्हणजे काय ? 




हौसिंग सोसायटी तिचे नियमन आणि कामकाज.


मित्रांनो आज आपण माहिती बघू हौसिंग सोसायटी म्हणजे काय ? आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडला असेल हौसिंग सोसायटी काय असते ? किंवा थोडेफार त्याबाबत माहिती असेल. 


सदनिका / बिल्डिंग चे नियमन करण्यासाठी व कामकाज नीट चालण्यासाठी हौसिंग सोसायटीची कायद्यानुसार स्थापन केली जाते.


आपण मोठ्या शहरात राहत असाल किंवा पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरात गेलात तर आपल्याला तिथे मोठ मोठ्या बिल्डिंगा, सदनिका, फ्लॅट मिळकती दिसतात. एकाच मोठ्या बिल्डिंग मध्ये  अनेक कितीतरी लोक वेगवेगळे कुटुंब एकत्र राहतात. पण आपण कधी विचार केला आहे का हे सर्व कामकाज व्यवस्थित कसकाय चालते. तर हे सर्व कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी कायद्याने हौसिंग सोसायटीची स्थापना करावी लागते.


एका बिल्डिंग मध्ये अनेक लोक एकत्रित राहत असल्याने ते रहात असलेल्या बिल्डिंग चे सर्व कामकाज व्यवस्थित नियमाप्रमे व कायदेशीर चालावे. यासाठी विचारपूर्वक कायदेशीर रित्या तयार केली गेलेली संघटित व्यवस्था म्हणजे हौसिंग सोसायटी होय. 


जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन एखादी व्यवस्था चालवावी लागते आणि ते सर्व कामकाज कायदेशीर व्हावे यासाठी सोसायटीची स्थापना केली जाते. 

जशी हौसिंग सोसायटीची स्थापना होते त्याच प्रमाणे अनेक विविध कामासाठी देखील कायद्याप्रमाणे विविध सोसायट्यांनी स्थापना होत असते. 


हौसिंग सोसायटी ही एक कायदेशीर नोंदणी केलेली संस्था आहे. सोसायटी ची नोंदणी, नियमन तसेच कार्य हे Maharashtra Co-operative Societies (MCS) Act, 1960 या प्रमाणे होत असते. हौसिंग सोसायटी ची स्थापना यासाठी केली जाते की, बिल्डिंग चे कामकाज सुरळीत व कायदेशीर चालावे. त्यावर शासनाचे कायदेशीर नियंत्रण राहावे


बिल्डिंग मध्ये अनेक लोक एकत्रित राहत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत असतात. जसे संपूर्ण बिल्डिंग चे मेंटेनन्स कोण करेल. बिल्डिंगच्या सार्वजनिक जागेत साफसफाईचे काम कोण करेल. जर काही अडचण निर्माण झाली जसे लिफ्ट बंद पडली तर ते काम कोण करेल. हे सर्व काम बिल्डिंग मधील सर्व रहिवाशांचे काम असल्याने कोणी एक व्यक्ती तर ही कामे करू शकणार नाही.


अजून अनेक कामे असतात जसे वॉचमन नेमणे, त्याला पगार देणे या सर्व कामांसाठी जे पैसे लागतील ते जमा करणे. त्याचा हिशोब ठेवणे या सर्व गोष्टी कायदेशीरपणे होणे महत्वाचे आहे. कारण या गोष्टींमुळे  बिल्डिंग मधील लोकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. वाद होऊ शकतात त्यामुळे कायद्याने एक अशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे की जी बिल्डिंग मधील रहिवाश्यांच्या सर्वांच्या सामूहिक जीवनाला एक कायदेशीर आणि शिस्तबद्ध आकार देते, सुरक्षा देते त्यासाठी कायद्याने हौसिंग सोसायटीची स्थापना करावी लागते. 


सोसायटी म्हणजे हा काही फक्त ठराविक लोकांचा गट नसून कायद्यानुसार चालणारी एक व्यवस्था आहे. हौसिंग सोसायटी म्हणजे त्या बिल्डिंग मधील सर्व लोक एकत्र येऊन त्या बिल्डिंगचा सर्व सार्वजनिक कारभार बघतात.


हौसिंग सोसायटीचे काही खास वैशिष्ट्य आहेत. (१) ही संस्था कायदेशीर नोंदणीकृत संस्था असते व सर्व कामकाज कायद्याप्रमाणे चालते. (२) प्रत्येक फ्लॅट धारक हा त्या हौसिंग सोसायटीचा सभासद असतो. तो आपोआप त्या सोसायटीचा सभासद बनतो. (३) नियम आणि जबाबदाऱ्या कायद्याने स्पष्टपणे ठरलेल्या असतात. प्रत्येकाचे हक्क काय व जबाबदाऱ्या काय हे कायद्याने स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे इथे कोणाची मनमानी चालत नाही.


महाराष्ट्रात सर्व हौसिंग सोसायट्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्या अंतर्गत नोंदविलेल्या असल्यामुळे. याचा फायदा असा होतो की यामुळे सोसायटीचे ऑडिट, निवडणुका आणि बाकी साऱ्या गोष्टी कायदेशीर होतात. त्यामुळे संपूर्ण कारभारात एकप्रकारची पारदर्शकता टिकून राहते. 


हौसिंग सोसायटीची स्थापन कशी होईल तिचे कामकाज कसे चालेल वगैरे सर्व गोष्टी या कायद्यात नमूद आहे व त्याप्रमाणे  सोसायटीचे सर्व कामकाज चालत असते.


हौसिंग सोसायटी बनवण्याचा अनेक उद्देश आहेत त्यापैकी आपण काही मुख्य उद्देश पाहू.


1) समुदाय व्यवस्थापन - एकत्र राहणाऱ्या कुटुंबांमध्ये एक समन्वय साधणे त्यांच्या एकोप्याची आणि सहकार्याची भावना वाढवणे. त्यामुळे कायद्यात नमूद असल्याप्रमाणे सभा घेतल्या जातात, सर्वांच्या एक मताने निर्णय घेतले जातात.

2) देखभाल - (मेंटेनन्स) :- इमारतीची लिफ्ट, पाण्याची टाकी, स्वच्छता, सिक्युरिटी अशा अनेक गोष्टी असतात. या सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात. यांची जबाबदारी कोण घेईल तर ही सर्व जबाबदारी सोसायटी घेते. त्यामुळे अपार्टमेंट बिल्डिंग मधील लोकांचे रोजचे आयुष सुखकर होते.


3) पैशांचे व्यवस्थापन - सोसायटी चालविण्यासाठी जो काही खर्च येतो तो सर्व सदस्य मिळून वाटून घेतात. ज्याला आपण मेंटेनन्स म्हणतो. पैशांचा हिशोब पारदर्शक ठेवला जातो आणि तो फक्त सोसायटीच्या कामांसाठीच वापरला जातो.

आता आपल्याला माहीत झाले असेल सोसायटी म्हणजे काय व तिचे काय कामकाज व कार्य काय असते. आता आपण बघू सोसायटीचे व्यवस्थापन कसे होत असते.


सोसायटीच्या व्यवस्थापनासाठी खास एक व्यवस्थापन समिती नेमली जाते याला मॅनेजिंग कमिटी असे म्हणतात. या कमिटी मध्ये अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सभासद असे प्रमुख लोक असतात. त्यांना सर्व सदस्य मिळूननिवडणुकी द्वारे निवडून देतो. ते रोजचे सोसायटीचे कामकाज बघतात. पण अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मात्र सर्व सदस्यांच्या हातात असतो. थोडक्यात म्हणजे ही सोसायटीची एक लोकशाहीच आहे. जर सोसायटी मधील कोणाला काही अडचण आली तर ते कायद्याने दाद मागू शकतात.

सोसायटी मध्ये राहण्याचे अनेक फायदे आहेत पण या सर्व फायद्यांना जो आधार मिळतो तो म्हणजे कायद्यामुळे. थोड्यात सांगायचे तर सोसायटीमुळे त्यामधील लोकांना एक सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने जगता येते. सर्व मिळून निर्णय घेतात म्हणून पारदर्शकता येते. सर्व सुविधांचे व्यवस्थापन खूप सोपे होते. बिल्डिंग मधील सर्व लोकांमध्ये एकोप्याची व सहकार्याची भावना निर्माण होते


सोसायटी म्हणजे  नियम कायदे तर आहेत परंतु याव्यतिरिक्त तर हा एक सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे. त्यासाठी कोणतीही व्यवस्था यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्यांनी मनापासून, सक्रियतेने आणि आपुलकीने भाग घेणे महत्वाचे व गरजेचे आहे.  


जर Co-operative Societies Act, 1960 प्रमाणे बिल्डिंग मधे हौसिंग सोसायटीची स्थापना झालेली असेल तर बिल्डिंग चे कामकाज तसेच नियमन या सोसायटी कायद्यानुसार चालते. आणि बिल्डिंग मधे जर Maharashtra Apartment Ownership Act, 1970 नुसार अपार्टमेंटची स्थापना झालेली असेल तर बिल्डिंगचे कामकाज व नियमन या अपार्टमेंट कायद्यानुसार चालते.


बिल्डिंग ज्यावजेवर बांधलेली आहे ती जगमालक / बिल्डर कडून सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स करून घेणे महत्वाचे आहे त्यामुळे सोसायटी कायदेशीर रित्या त्या जागेची मालक होऊन जाते. 


सोसायटी मध्ये सभासदांमध्ये आपसात काही  काही वाद झाल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था या अधिनियमानुसार सहकारी न्यायालयात दाद मागता येते.


सोसायटीच्या कागदपत्रांमध्ये सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र, फ्लॅट धारकांचे शेअर सर्टिफिकेट, फ्लॅट खरेदी विक्री किंवा भाड्याने देणे कमी सोसायटीचा ना हरकत दाखला म्हणजेच (NOC). सोसायटीचे काही महत्वाचे ठराव असतील ते. सोसायटीची नियमावली, by laws, जागा मालक / बिल्डर ने सोसायटीच्या नावे करून दिलेले कव्हेन्स डिड असे अनेक कागदपत्रे हे सोसायटी संबंधात महत्वाचे कागदपत्रे  असतात. 

इतर ब्लॉग पोस्ट

कन्व्हेयन्स डीड

सदनिका / बिल्डिंग ची जागा मालक / विकासक (Builder) कडून सोसायटीच्या नावे करून घेणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads