स्थावर मिळकतीची ऑनलाइन वॉल्युएशन किंमत कशी काढावी.

Adv.Saurabh Rajput
0
 

स्थावर मिळकतीची ऑनलाइन वॉल्युएशन किंमत कशी काढावी. / म्हणजेच मालमत्ता मूल्यांकन अहवाल ऑनलाइन कसा काढावा.


आपण माहिती बघणार आहोत स्थावर मालमत्ता मूल्यांकन अहवाल म्हणजे काय ? तो का महत्वाचा असतो ? तसेच तो ऑनलाईन कसा काढावा ?

ज्यावेळी स्थावर मिळकत घर, दुकान, सदनिका (फ्लॅट) ची विक्री करावयाची असेल त्यावेळी आपसात ठरलेली विक्री किंमत / बाजारभाव किंमत आणि सरकारी किंमत ही वेगवेगळी असते. स्थावर मिळकतीची जी सरकारी किंमत असते त्याला सरकारी मूल्यांकन किंवा Govenmemt Valuation Report म्हणतात. ही माहिती आपण नोंदणी कार्यालयात जाऊन देखील काढू शकतो परंतु ही सेवा आता ऑनलाईन उपलब्ध असल्याने नोंदणी कार्यालयात न जाता ही माहिती ऑनलाइन काढू शकतात.

स्थावर मिळकत विक्री करणे असेल किंवा बँक त्या मिळकतीवर लोन देणार असेल तर त्या वेळी त्या स्थावर मिळकतीची सरकारी मूल्यांकन किंमत (Government Valuation Amount) काढावी लागते. बँक जेव्हा स्थावर मिळकतीवर लोन देते तेव्हा त्या स्थावर मिळकतीचा बँकेकडून व्हॅल्युएशन रिपोर्ट काढला जातो. तो रिपोर्ट या पेक्षा वेगळा असतो. या वेबसाईट वरून मिळकतीचे फक्त ऑनलाईन मूल्यांकन निघते.

कोणतीही स्थावर मिळकत योग्य किंमती मध्ये खरेदी विक्री करणे कामी त्या मिळकतीचे सरकारी मूल्यांकन काढणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला स्थावर मिळकत खरेदी, विक्री तसेच हस्तांतर करणे असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाइन द्वारे सरकारी मूल्यांकन रक्कम काढू शकतात.

या प्रकारे तुम्ही तुमचे घर, दुकान, सदनिका जी काही स्थावर मिळकत आहे तिचा मूल्यांकन अहवाल सरकारी किंमत (Government Valuation Amount) काढणे असेल तर तो आपण आपण आता ऑनलाईन मोफत काढू शकतो. ही सेवा नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांनी ऑनलाइन नागरिकांना उपलब्ध करून दिलेले आहे.

या साठी सर्वात आधी नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र यांची पुढील दिलेली वेबसाइट / संकेतिकस्थळ तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटर यापैकी कशावरून देखील सुरू करावे.


https://igrmaharashtra.gov.in

त्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाईट सुरू होईल. 
ही वेबसाइट तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वर देखील ओपन करू शकतात. ही वेबसाइट अत्यंत युजर फ्रेंडली असल्याने तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ओपन करू शकतात व उपलब्ध सेवा वापरू शकतात. 

या वेबसाईटवर / संकेतस्थळावर अनेक इतर सुविधा उपलब्ध आहेत त्याची माहिती या ब्लॉग मध्ये दुसऱ्या पोस्ट द्वारे दिलेली आहे. ती माहिती देखील तुम्ही या ब्लॉग वर बघू शकतात.

वेबसाइट ओपन झाल्यावर समोर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये विविध उपलब्ध सेवांचे अनेक ऑप्शन दिसतील. त्यापैकी ई व्हॅल्युएशन (E - Valuation) या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर पुढील प्रमाणे विंडो / पेज सुरू होईल.
याठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि समोर दिलेला capcha एंटर करा आणि सेंड OTP यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा. त्यानंतर स्क्रीन वर तुम्हाला पुढील प्रमाणे तीन ऑप्शन्स दिसतील. एक Urban म्हणजे शहरी भाग, दोन Rural म्हणजे ग्रामीण भाग आणि Influance म्हणजे प्रभावित क्षेत्र किंवा व्यावसायिक मालमत्ता. 
तुमचा प्लॉट, फ्लॅट, दुकान, घर ज्या क्षेत्रात येत असेल तो भाग निवडा. मी या ठिकाणी फ्लॅट मिळकतीचे व्हॅल्युएशन काढणे असल्याने त्याप्रमाणे ऑप्शन्स निवडतो.
व्हॅल्युएशन फॉर अर्बन प्रॉपर्टी निवडले. त्यानंतर दोन ऑप्शन्स दिसतील. Open Land आणि Built Up एरिया. त्यानंतर फ्लॅट असल्याने मी Built Up हे ऑप्शन निवडले. यानंतर बिल्टअप टाइप म्हणजे प्रकार काय आहे त्याबाबत पुढील प्रमाणे विविध ऑप्शन्स येतील. यापैकी आवश्यकतेनुसार योग्य तो प्रकार निवडावा.

या नंतर तुम्हाला फ्लॅट, रो हाउस, पेंट हाऊस असे विविध पर्याय दिसतील. यापैकी मी फ्लॅट हा पर्याय निवडला.
 त्यानंतर पुढे एक ऑनलाईन फॉर्म दिसेल. या ठिकाणी योग्य ती संबंधित आवश्यक माहिती नमूद करून घ्यावी. त्यानंतर next या पर्यायावर ओके करा. तुम्हाला तुमच्या मिळकतीचा सर्व्हे नंबर वगैरे इतर काही माहिती हवी असेल तर ती तुमच्या मिळकतीच्या टायटल दस्त जसे खरेदीखत वगैरे यावर नमूद असते.

ही सर्व माहिती नमूद केल्यावर आणि ओके केल्यावर, तुम्ही नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर त्या भागात खुली जमीन (Open Land), रहिवास (Residance), कार्यालय (Office), इंडस्ट्री, औद्योगिक प्रॉपर्टी यासाठी आजचे सरकारी दर काय आहेत ही माहिती दिसेल. हे दर प्रति चौरस मीटर या प्रमाणे दाखवले जातात. आता हा रिपोर्ट डाउनलोड करण्यासाठी next या पर्यायावर ओके करा. म्हणजे पुढच्या पेजवर तुम्ही भरलेल्या लोकेशन ची माहिती दिसेल. आणि त्या खाली तुम्हाला अजून काही माहिती भरण्यासाठी फॉर्म दिसेल. योग्य ती आवश्यक माहिती टाकून हा फॉर्म तुम्ही भरून घ्यावा. त्यानंतर खाली calculate या पर्यायावर ओके करा. त्यानंतर तुम्ही नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर फ्लॅट मिळकतीची claculated कॉस्ट स्किन वर दिसेल.आता या स्क्रीन वर रिपोर्ट या बटणावर ओके करा. त्यानंतर तुम्हाल तुमच्या मिळकतीच्या सरकारी व्हॅल्युएशन किमतीचा रिपोर्ट दिसेल. हा रिपोर्ट तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकतात किंवा त्याची PDF तुम्ही सेव्ह करून घेऊ शकतात. याप्रकारे तुम्ही तुमच्या स्थावर मिळकतीची सरकारी किंमत काय आहे ही माहिती महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग यांचे वेबसाइट वरून काढू शकतात.


  • थोडे नवीन

    स्थावर मिळकतीची ऑनलाइन वॉल्युएशन किंमत कशी काढावी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads