LAP लोन म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0



LAP लोन म्हणजे काय ?


LAP - Loan Against Property -


मित्रांनो आज आपण माहिती बघू LAP Loan म्हणजे काय ? LAP  म्हणजे Loan Against Property. एखादी स्थावर मिळकत जसे घर, सदनिका / फ्लॅट, रो-हाऊस, प्लॉट मिळकत बँकेस गहाण ठेऊन त्यावर बँकेकडून कर्ज दिले जाते त्याला Lap Loan / Loan Against Property असे म्हणतात.


ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्राहकास बँकेकडून हे कर्ज / लोन दिले जात असते. जर एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त लोन ची आवश्यकता असेल तर त्यासाठी ते स्थावर मिळकतीवर कर्ज घेऊ शकतात.


LAP लोन म्हणजे मालमत्तेवर कर्ज (Loan Against Property) होय. बँकेसाठी हे एक सुरक्षित कर्ज (Secured Loan) आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची राहत्या घराची, जमिनीची किंवा व्यावसायिक मालमत्ता (Property) बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे तारण (गहाण) ठेवून कर्ज घेता. बँक ग्राहकाची मिळकत गहाण करतात त्यामुळे याला सुरक्षित कर्ज (Secure Loan) असे देखील म्हटले जाते.


A Loan Against Property (LAP) is a secured loan where you pledge your residential or commercial property as collateral to borrow funds. Because the loan is backed by an asset, lenders offer higher borrowing amounts, longer repayment tenures, and lower interest rates compared to unsecured options like personal loans.


कर्जदास किती कर्ज दिले जाईल / मंजूर केले जाईल हे कर्जदाराची कर्ज मागणी रक्कम, मिळकतीचे व्हॅल्युएशन, कर्जदाराचे उत्पन्न, कर्जदाराचे वय, कर्ज परत फेड करण्याचा कालावधी, त्याचे दुसरे काही कर्ज चालू आहेत का ? त्याचा सिबल स्कोअर अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. बँकेला काही अडचण वाटल्यास बँक कर्ज देण्या नकार पण देऊ शकते.


स्थावर मिळकतीवर कर्ज घेण्यासाठी कर्जदारास त्या स्थावर मिळकतीचे मूळ / ओरिजिनल दस्त बँकेकडे जमा करावे लागतात आणि बँकेकडून कर्ज दिल्याबाबत नोंदणीकृत गहाण खत किंवा NOI - Notice of Intemation दस्त नोंदणी केला जातो. आणि मग बँक कर्जदारास LAP कर्ज देत असते. कर्जदाराने कर्ज फेडले म्हणजे त्यास बँक कर्ज फेड झाल्याबाबत NOC देते. आणि नोंदणीकृत गहाणखत दस्त नोंदविलेला असेल तर त्याचा रिकनवेयन्स दस्त (नजर गहाणखत रद्द दस्त) नोंदणी करून घ्यावा लागतो आणि उताऱ्यावर काही कर्जाचा बोजा वगैरे असेल तर तो कमी करून घ्यावा लागतो. आणि मिळकतीचे बँकेकडे जमा असलेले सर्व मुळ दस्त बँकेकडून ग्राहकास परत दिले जातात. जो पर्यंत त्या मिळकतीवर कर्जाची रक्कम पूर्ण फेड होत नाही तो पर्यंत कर्जदारास ती मिळकत हस्तांतर, विक्री वगैरे करता येत नाही.


जर कर्जदाराने स्थावर मिळकतीवर कर्ज घेतलेले असेल आणि त्याची परत फेड झालेली नसेल. तर जो पर्यंत ते कर्ज फेड होत नाही तो पर्यंत दुसरी बँक त्या मिळकतीवर दुसरे कर्ज देत नाही. ग्राहकाने बँकेच्या कर्जाची परतफेड नाही केली तर बँक कायद्यानुसार ग्राहकाची गहाण ठेवलेली मिळकत कायदेशीर मार्गाने लिलावाने  विक्री  करून त्यांची कर्जाची रक्कम वसूल करते.


स्थावर मिळकतीवर कर्ज घेण्यासाठी ग्राहकास काही खर्च देखील लागत असतो. जसे बँकेची प्रोसेसिंग फी, केस लॉगिन फी, बँकेचे जे काही लीगल, टेक्निकल चार्जेस असतील ते त्यानंतर गहाणखत किंवा NOI करण्यास सरकारी लागणारा टॅक्स जसे दस्त नोंदणी फी, गहाणखत नोंदणी फी, स्टॅम्प ड्यूटी असा खर्च येत असतो. बँके मध्ये काही कर्ज वाटप करण्याबाबत ऑफर चालू असेल तर लागणाऱ्या खर्चात काही सवलत भेटू शकते किंवा लॉगिन किंवा प्रोसेसिंग फी लागणार नाही.


बँकेची होणारी इतर फी काही वेळेस कर्ज रक्कमेतून वजा होऊन मग कर्ज रक्कम भेटत असते. बँकेचे जे कर्ज मंजूर पत्र (Loan Sanction Letter) असते त्यामध्ये सर्व माहिती नमूद असते जसे कर्ज कोण घेत आहे, कर्जदार, सहकार्जदार कोण कोण आहेत, कर्ज कधी मंजूर झाले ती दिनांक, किती कर्ज रक्कम मंजूर झालेली आहे ती रक्कम. कर्जाचा व्याज दर काय आहे. व्याज प्रकार कोणता आहे. इतर लोन चार्जेस काय काय लागलेले आहेत. कर्जाचा हप्ता कसा आहे व किती आहे ? तसेच बँकेच्या काही अटी व शर्ती असतील तर त्या, अशी ही सर्व माहिती नमूद असते. 


ग्राहकांच्या विविध गरजे नुसार स्थावर मिळकती बाबतच्या लोन चे अनेक प्रकार असतात व लोन चे बँक प्रॉडक्ट असतात ते पुढील प्रमाणे. 


HL - Home Loan -


An HL loan stands for a Home Loan, which is money borrowed from a bank or housing finance company to buy, build, repair, or expand a house. You pay the money back in small monthly parts, called EMIs, over a long time. 


जर एखाद्या ग्राहकास घर, बंगला, रो-हाउस, सदनिका / फ्लॅट विकत घेणे असेल तर त्यासाठी HL - होम लोन दिले जात असते.


HL loan म्हणजे गृहकर्ज (Home Loan) होय. सोप्या भाषेत सांगायचे तर, नवीन घर खरेदी करण्यासाठी, जुने घर दुरुस्त करण्यासाठी किंवा स्वतःचे घर बांधण्यासाठी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून घेतले जाणारे कर्ज म्हणजे HL loan होय.


या लोन मध्ये कर्ज देणार बँक असे करते की, कर्ज घेणार ग्राहक ज्याच्याकडून मिळकत विकत घेत आहे त्याला पैसे देते आणि ती मिळकत ग्राहकास खरेदी करून देते. आणि ती मिळकत बँक गहाण ठेवतो आणि तिचे सर्व कायदेशीर मुळ दस्त बँक ताब्यात ठेवते आणि कर्ज फेड झाली म्हणजे बँक गहाण मुक्त करून मूळ दस्त ग्राहकास परत देते.


BT - Balance Transfer - 


BT - Balance Transfer - In banking terms, a BT (Balance Transfer) case refers to the process where a borrower moves their existing loan from one financial institution to another to secure a lower interest rate or better repayment terms.


होम लोन, Lap लोन किंवा इतर चालू लोन / कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरण करणे म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर (BT - Balance Transfer) होय. यामुळे व्याजदर कमी होणे. टॉपअप लोन भेटणे. लोनचा / कर्जाचा हप्ता हमी कोणे आहे अनेक फायदे मिळू शकतात.


जेव्हा ग्राहकाचे एखादी बँकेत स्थावर मिळकतीवर कर्ज चालू असेल व त्याला अजून अतिरिक्त वाढीव कर्ज पाहिजेल असेल किंवा टॉप अप कर्ज पाहिजेल असेल किंवा एखादी दुसऱ्या बँकेकडून काही कर्जात किंवा व्याजात काही  सवलत भेटत असेल, व्याजदर कमी होत असेल तर अशा वेळेस तो  ग्राहक ते कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतर करतो त्याला BT (Balanace Transfer Case) असे म्हणतात. 


जर एखादी कर्ज मधेच सपूर्ण कर्ज रक्कम परतफेड करून नील करणे असेल तर त्याला foucloser charges लागू शकतात. हे चार्जेस लागतीलच असे नाही. 


Seller BT - Seller Balance Transfer -


A seller BT (Balance Transfer) case is a property resale transaction where the seller still has an active home loan on the property, and the buyer uses a new home loan from a different bank to purchase it. The buyer's new lender uses part of their loan to clear the seller's existing loan balance.


जर एखादी स्थावर मिळकतीवर काही कर्ज चालू असेल आणि त्या मालकास ती मिळकत विक्री करणे असेल अशा वेळेस जो ती मिळकत विक्री घेत आहे तो व्यक्ती नवीन बँकेकडून ती मिळकत विक्री घेण्यासाठी कर्ज घेतो आणि विक्रेत्याच्या बँकेचे कर्ज फेडून देतो. यास Seller BT केस असे म्हणतात. यात देखील External किंवा Internal seller BT केस असू शकते. जर एकाच same बँक असेल तर केस Internal seller BT केस होईल. 


जेव्हा एखादी व्यक्ती (विक्रेता/Seller) अशी प्रॉपर्टी विकत असते ज्यावर तिचे स्वतःचे जुने होम लोन चालू आहे आणि ती प्रॉपर्टी विकत घेणारा खरेदीदार (Buyer) नवीन होम लोन काढत आहे, तेव्हा या प्रक्रियेला 'सेलर बीटी केस' म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads