स्थावर मिळकतीचे सरकारी मूल्यांकन (Govennment Valuation) अहवाल (रिपोर्ट) ऑनलाइन कसा काढावा.

Adv.Saurabh Rajput
0

 स्थावर मिळकतीचे सरकारी मूल्यांकन (Govennment Valuation) अहवाल (रिपोर्ट) ऑनलाइन कसा काढावा.



आपण माहिती बघणार आहोत स्थावर मालमत्ता मूल्यांकन अहवाल म्हणजे काय ? तो का महत्वाचा असतो ? तसेच तो ऑनलाईन कसा काढावा ?


स्थावर मिळकतीची शासनाने निर्धारित केलेली रक्कम / मूल्य असते त्याला सरकारी मूल्यांकन किंवा Govenmemt Valuation रक्कम म्हणतात. 


Govenmemt Valuation / मूल्यांकन रक्कम आपण नोंदणी कार्यालयात जाऊन देखील काढू शकतो परंतु ही सेवा आता शासनाने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली असल्याने नोंदणी कार्यालयात न जाता ही माहिती तुम्ही ऑनलाइन काढू शकतात.


स्थावर मिळकत विक्री करणे असेल किंवा बँक त्या मिळकतीवर कर्ज / लोन देणार असेल तर त्या वेळी त्या स्थावर मिळकतीची सरकारी मूल्यांकन किंमत (Government Valuation Amount) बाजार भाव (Marcket Rate) काढले जातो. तसेच स्थावर मिळकत योग्य किंमती मध्ये खरेदी विक्री व्हावी यासाठी त्या मिळकतीचे सरकारी मूल्यांकन काढणे गरजेचे असते.


ज्यावेळी आपल्याला स्थावर मिळकत जसे घर, दुकान, सदनिका (फ्लॅट) मिळकतीची खरेदी किंवा विक्री करावयाची असेल त्यावेळी आपसात ठरलेली विक्री किंमत आणि सरकारी किंमत ही वेगवेगळी असते.


जर तुम्हाला तुमचे घर, दुकान, सदनिका जी काही स्थावर मिळकत आहे तिचा मूल्यांकन अहवाल (Government Valuation Amount)  काढणे असेल तर  तो आपण आपण आता ऑनलाईन मोफत काढू शकतो. ही सेवा नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांनी ऑनलाइन नागरिकांना उपलब्ध करून दिलेले आहे.


या साठी सर्वात आधी नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांची पुढील दिलेली वेबसाइट / संकेतिकस्थळ तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटर यावर सुरू करावी.

https://igrmaharashtra.gov.in/




  • थोडे नवीन

    स्थावर मिळकतीचे सरकारी मूल्यांकन (Govennment Valuation) अहवाल (रिपोर्ट) ऑनलाइन कसा काढावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads