साठेखात / सौदापवती म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0


 साठेखत  / सौदापवती म्हणजे काय ?


आपण माहिती बघू साठेखात म्हणजे काय ? साठेखात यालाच सौदापवती असे देखील म्हणतात.  इंग्रजीमध्ये याला Agreement of Sale Deed (ATS) असे म्हणतात.


जेव्हा एखादी व्यक्ती जमीन, घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करतो तेव्हा त्याला हा प्रश्न पडतो की साठेखत म्हणजे काय ? 


साठेखात / सौदापवती म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज असतो ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये मालमत्तेच्या व्यवहाराबाबत प्राथमिक करार केला जातो. साठेखतामध्ये व्यवहाराची अटी, किंमत, पेमेंटची पद्धत, वेळ आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला असतो.


साठेखत म्हणजे काय हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण हा दस्तऐवज भविष्यातील खरेदी विक्री व्यवहारा संबंधित महत्वाचा दस्त असतो. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पारदर्शकता राहते आणि कोणत्याही वादाची शक्यता कमी होते. व्यवहाराला कायदेशीर महत्व प्राप्त होते.


साठेखत / सौदापवती का केली जाते?

 जेव्हा मालमत्तेचा व्यवहार त्वरित पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा साठेखत केले जाते. यामध्ये खरेदीदार काही रक्कम अँडव्हान्स देतो आणि उर्वरित रक्कम ठरलेल्या वेळेत देण्याचे मान्य करतो आणि मग ठरलेल्या वेळेत खरेदी दस्त केला जात असतो.


साठेखत केल्याने खरेदीदाराला खात्री मिळते की मालमत्ता त्यालाच विकली जाईल आणि विक्रेत्याला देखील व्यवहार निश्चित झाल्याची खात्री मिळते. त्यामुळे साठेखत म्हणजे काय हे समजणे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.


साठी खतामध्ये / सौदापवती मध्ये पुढील प्रमाणे माहिती असते 


माहिती

पक्षांची माहिती

खरेदीदार आणि विक्रेत्याचे नाव, पत्ता

मालमत्तेचे तपशील

जमीन/घराचा पूर्ण तपशील

किंमत - एकूण व्यवहार ठरलेली रक्कम

आगाऊ रक्कम दिलेली token amount

पेमेंट अटी - उर्वरित रक्कम कशी दिली जाईल

कालावधी व्यवहार पूर्ण करण्याची मुदत. / खरेदी करण्याची मुदत.

खरेदी / व्यवहाराचा कोणी व कसा करावा.

 आपसात ठरल्याप्रमाणे अटी व शर्ती तसेच विशेष अटी.


साठेखत आणि खरेदीखत यात फरक

साठेखत म्हणजे काय समजून घेताना साठेखत आणि खरेदीखत (Sale Deed) यातला फरक समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुद्दा.                      साठेखत खरेदीखत

स्वरूप प्राथमिक करार अंतिम दस्तऐवज

मालकी हक्क.    हस्तांतर होत नाही हस्तांतर पूर्ण होते

नोंदणी ऐच्छिक अनिवार्य

कायदेशीर ताकद मर्यादित.                       पूर्ण

साठेखत म्हणजे काय हे समजून घेतल्यावर हे लक्षात येते की साठेखत हा व्यवहाराचा पहिला टप्पा आहे तर खरेदीखत हा अंतिम टप्पा असतो.


साठेखत नोंदणी आवश्यक आहे का?

साठेखत म्हणजे काय या संदर्भात अनेकांना प्रश्न पडतो की साठेखत नोंदणी करणे आवश्यक आहे का. कायद्याने साठेखत नोंदणी अनिवार्य नाही, पण ती करणे अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच नोटरी समक्ष देखील करू शकतात.


नोंदणीकृत साठेखत केल्यास तो दस्तऐवज न्यायालयात अधिक मजबूत पुरावा म्हणून वापरता येतो. तसेच भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास आपले हक्क सिद्ध करणे सोपे होते. 


साठेखत / सौदापवती करण्याची प्रक्रिया :-

 साठेखत करण्यासाठी प्रथम दोन्ही पक्षांमध्ये चर्चा करून अटी निश्चित केल्या जातात. त्यानंतर वकील किंवा दस्तऐवज साठेखत / सौदापवती तयार केली जाते.


तयार झालेला दस्तऐवज दोन्ही पक्षांनी वाचून त्यावर स्वाक्षऱ्या कराव्यात. दस्त  जर नोंदणी करायची असेल तर तो दस्तऐवज उपनोंदणी कार्यालयात नोंदवला जातो.


साठेखत / सौदापवती करण्याचे फायदे :-

साठेखत म्हणजे काय हे समजल्यावर त्याचे फायदे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. साठेखत केल्याने व्यवहार सुरक्षित होतो आणि दोन्ही पक्षांचे हित जपले जाते.


साठेखतामुळे खरेदीदाराला मालमत्तेवर हक्क मिळण्याची खात्री मिळते. तसेच विक्रेत्याला व्यवहार निश्चित झाल्याची खात्री मिळते. भविष्यातील वाद टाळण्यासाठी साठेखत अत्यंत उपयुक्त ठरते.


साठेखत / सौदापवती  करताना घ्यावयाची काळजी

साठेखत म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर ते करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मालमत्तेचे कागदपत्र पूर्णपणे तपासून घ्यावेत. मालमत्ता वादमुक्त आहे याची खात्री करावी.


तसेच व्यवहारातील सर्व अटी स्पष्टपणे साठेखतामध्ये नमूद कराव्यात. 


साठेखत रद्द करता येते का?

Agreement of Sale म्हणजे काय या संदर्भात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. साठेखत हे एक करार असल्यामुळे ते दोन्ही पक्षांच्या संमतीने रद्द करता येते. मात्र जर एक पक्ष करार मोडत असेल तर दुसऱ्या पक्षाला न्यायालयात जाण्याचा अधिकार असतो.


Agreement of Sale कायदेशीर महत्व - 

स्थावर मिळकत खरेदी विक्री करण्यापूर्वी आपसात ठरल्याप्रमाणे साठेखत / सौदापवती करणे म्हणजे हा एक वैध करार असून तो भारतीय करार कायद्याच्या अंतर्गत येतो. यामुळे तो न्यायालयात ग्राह्य धरला जातो.

थोडक्यात म्हणजे -

साठेखत म्हणजे काय हा विषय प्रत्येक मालमत्ता व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. Agreement of Sale हा व्यवहाराचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य प्रकारे साठेखत केल्यास भविष्यातील अनेक समस्या टाळता येतात. त्यामुळे कोणताही मालमत्ता व्यवहार करताना Agreement of Sale समजून घेणे आणि योग्य पद्धतीने करणे अत्यावश्यक आहे.

  • थोडे नवीन

    साठेखात / सौदापवती म्हणजे काय ?

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads