जमिनीचे क्षेत्रफळ.

Adv.Saurabh Rajput
0

मित्रांनो आपण माहिती बघू जमिनीच्या क्षेत्रा बाबत. 


सर्व शासकीय कामकाजात जमिनीचे क्षेत्र हे हेक्टर आर / चौरस मीटर मध्ये मोजणी / गणना केले जात असते. 


पूर्वी पारंपरिक पद्धतीने जमिनीचे क्षेत्र हे गुंठ्या मध्ये मोजणी केले जात होते. आज देखील काही ठिकाणी या पद्धतीचा अवलंब केला जातो.


परंतु 1956 साली आपल्या देशा मध्ये Matrix System या पद्धतीचा अवलंब केला गेला, त्यामुळे सरकारी कामकाजामध्ये या हेक्टर आर / चौरस मीटर पद्धतीचा उपयोग केला जातो. तद्नंतर, सरकारी कागदपत्रे हे फूट आणि गुंठ्या मधून चौरस मीटर / हेक्टर आर मध्ये रूपांतर करण्यात आलेत व तेव्हापासून ही पद्धत वापरण्यात येत आहेत. त्यामुळे शासकीय कामकाज व जमीन मोजणी साठी या पद्धतीचा वापर केला जातो.


त्यानुसार शासकीय दस्त तसेच जमिनीचा ७/१२ उतारा यावर क्षेत्र हे हेक्टर आणि आर मध्ये दर्शविलेले असते. (प्लॉट असेल तर चौरस मीटर मध्ये क्षेत्र असते).


__________________________________________


आता आपण माहिती बघू चौरस फूट आणि चौरस मीटर बाबत. त्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या त्यामुळे तुम्हास माहिती समजणे सोप्पे होईल. 


1 आर क्षेत्र म्हणजे 100 चौ.मी. क्षेत्र. (10 चौ.मी. x 10 चौ.मी.)


1 हेक्टर क्षेत्र म्हणजे 1000 चौ.मी. क्षेत्र. (100 चौ.मी. x 100 चौ.मी.)


(१ आर या प्रमाणे 1000 चौरस मीटर क्षेत्र झाले की 1 हेक्टर क्षेत्र होते)


पारंपरिक पद्धत :-


1 गुंठा म्हणजे = 1089 चौरस फूट क्षेत्र.  (33 चौरस फूट  X 33 चौरस फूट तुकडा). गुंठेवारी प्लॉट हा शब्द आपण एकलाच असेल.


1 गुंठा म्हणजे 1089 चौ.फूट.

1 गुंठा म्हणजे 101.17 चौ. मीटर.


चौरस फूट चे चौरस मीटर मध्ये रूपांतर पुढील प्रकारे केले.

101.17 चौरस. मीटर. म्हणजे (1089 /भागिले/ 10.764 = 101.17. चौ.मीटर).



40 गुंठे म्हणजे 1 एकर क्षेत्र. 

(१गुंठा) 1089 X 40 (गुंठे) = 43,560 चौरस फूट. (एक एकर क्षेत्र म्हणजे 43,560 चौ.फूट क्षेत्र). 


हेच क्षेत्र चौ.मीटर मध्ये - 43,560 /भागिले/10.764 = 4046 चौरस मीटर होते.


(1 गुंठा याप्रमाणे 40 गुंठे झाले की 1 एकर क्षेत्र होते.)


__________________________________________

1 चौरस मीटर म्हणजे 10.764 चौरस फूट क्षेत्र होते.


त्यामुळे चौरस मीटर चे चौरस फुटत रूपांतर करतांना 10.764 ने गुणवे लागते. आणि चौरस फुटाचे चौरस मीटर मध्ये रूपांतर करतांना 10.764 ने भगवे लागते.



_________________________________________


आता आपण माहिती बघू हेक्टर चे रूपांतर गुंठ्या मध्ये कसे करावे.


उदा. समजा ७/१२ उताऱ्यावर क्षेत्र आहे 15 हेक्टर 00 आर. त्याचे रूपांतर गुंठे / एकर मध्ये करावयाचे आहे तर ते पुढील प्रमाणे करता येईल.


[1 गुंठा म्हणजे 1089 चौ.फूट.

1 गुंठा म्हणजे 101.17 चौ. मीटर.]

हे माहिती म्हणून लक्षात ठेवा म्हणजे calulation करणे सोप्पे जाईल.


आपण वर बघितले आहे की 40 गुंठे म्हणजे 1 एकर. 


1089 चौ.फू. X 40 गुंठे = 43560 चौरस फूट.

101.17 चौ.मी. X 40 गुंठे = 4046 चौरस मीटर.



आपण एक सूत्र (फॉर्म्युला) तयार करू.


हेक्टर /भागिले/ एकर =


10,000 / 4046 = 2.471 याचा आपल्याला वापर करावयाचा आहे.


1 हेक्टर म्हणजे 2.47  एकर.


आता आपल्याला 15 हेक्टर 00 आर चे एकर मध्ये रूपांतर करणे आहे. 


जेवढे एकर क्षेत्र  आहे त्याला 2.47 ने गुणवे.


15 हेक्टर / आर जमीन आहे आणि तिचे एकर / गुंठे करायचे आहे तर पुढील प्रमाणे होईल.


15 X 2.47 = 37.05 एकर // आर.


आता आपण बघू एकर चे हेक्टर कसे करावे.

जेवढे एकर असतील त्याला भागले 2.47 करायचे. आपल्याला हेक्टर मध्ये उत्तर मिळून जाते.


उदा. समजा 25 एकर जमीन आहे आणि ती आपल्याला हेक्टर मधे करणे आहे.


25 /भागिले/2.47 = 10.12 एकर.


सदर माहिती तुम्हाला नीट समजली नसेल तर एका कागदावर प्रत्यक्ष वरील प्रमाणे कॅल्क्युलेशन करून बघा मग वरील माहिती तुमच्या लवकर लक्षात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads