महसूल अभिलेख फेरफार नोंदी.
आपण माहिती बघू महसूल अभिलेख फेरफार नोंदणी बाबत.
कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या मालकी हक्कात बदल हा कोणत्याही नोंदणीकृत दस्ताने जसे खरेदीखत, बक्षीसपत्र तसेच वाटणीपत्र, मृत्युपत्र, वारसाने किंवा न्यायालयीन हुकूम, महसूल आदेश याद्वारे होत असतो.
सातबारा फेरफार नोंद म्हणजे मालमत्तेच्या मालकी हक्कात झालेल्या बदलाची अधिकृत नोंद. जर जमीन विकत घेतली, वारसा हक्काने मिळाली किंवा इतर कोणत्याही कायदेशीर मार्गाने मिळकतीच्या मालकी हक्कात जर बदल झाला तर त्या बदलाची नोंद महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावर करावी लागते. यालाच फेरफार नोंद असे म्हणतात. फेरफार नोंद याला इंग्रजीमध्ये Muatation Entry असे म्हणतात.
तसेच अजून बऱ्याच कारणांसाठी फेरफार घेतले जातात जसे वरील कारणांच्या व्यतिरिक्त अजून इतर कोणताही बदल सातबारा उताऱ्यावर झाला असेल, जसे संबंधित महसूल विभागाचा काही आदेश / ऑर्डर असेल. गट नंबर सर्वे नंबर किंवा क्षेत्र यामध्ये काही चूक झाल्यामुळे महसूल न्यायालय / महसूल अधिकाऱ्यांकडून किंवा कोर्टाकडून चूक दुरुस्ती बाबत काही आदेश झाला असेल, गट नंबर / क्षेत्र एकत्र किंवा वेगळे झाले असेल, गट किंवा प्लॉट नंबर मधे काही बदल वगैरे झाला असेल. प्लॉट एकत्रीकरण झाले असेल, बिनशेती आदेश असेल, लेआऊट मंजुरी बाबत आदेश असेल किंवा काही संबंधित आदेश असेल तर त्याबाबत देखील आधी फेरफार मंजूर केली जाते. मग ती फेरफार तलाठी हे सबंधित फेरफार पुस्तकात नमूद करतात. मग तो फेरफार नंबर सातबारा उताऱ्यावर नमूद होऊन मग तो संबंधित बदल सातबारा उताऱ्यावर केला जातो. म्हणजेच सातबारा वरील कोणताही बदल हा बिना फेरफार मंजूर होता होत नाही.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 नुसार जमिनीबाबतचे विविध कामे नियंत्रित केले जातात. व त्यानुसार जमिनी बाबतचे कामकाज हे आपल्या महाराष्ट्रात या कायद्यानुसार चालत असते. फेरफार मुळे मालमत्तेच्या मालकी हक्कातील बदल अधिकृतपणे नोंदविले जातात. जमिनीबाबतचे कामकाज व्यवस्थित पारदर्शक चालावे. कोणतीही गुंतागुंत होऊ नये. तसेच सातबारा उताऱ्यावर काय बदल होत आहे व तो कशामुळे होत आहे याची कायदेशीर नोंद राहावी. यासाठी फेरफार बाबत ची तरतूद संबंधित कायद्यामध्ये आहे व त्यानुसार याबाबतचे सर्व कामकाज हे वरील कायद्याप्रमाणे चालते व कायदेशीर नोंदी प्रमाणित होत असतात. महाराष्ट्र ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी तसेच मंडळ अधिकारी व तहसीलदार हे याबाबतचे कामकाज बघत असतात. फेरफार ची नोंद ही तलाठी मार्फत घेतली जाते व ती फेरफार मंडळ अधिकारी द्वारे मंजूर केली जाते.
कोणतीही फेरफार नमूद होण्यापूर्वी संबंधित महसूल अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या महसूल विभागाच्या सांकेतिक स्थळावर म्हणजे गाव चावडी येथे आधी नोटीस प्रसिद्ध केली जाते. या नोटिसद्वारे तमाम जनतेस कळविले जाते की, संबंधित फेरफार मुळे सातबारा उताऱ्यावर संबंधित बदल होणार आहे त्यास कोणाची काही हरकत असेल तर दिलेल्या वेळेत हरकत नमूद करावी. याप्रमाणे कोणाच्या काही हरकती आहेत का हे बघितले जाते. अन्यथा कोणाची काही हरकत नसेल तर सदर फेरफार हा मंजूर केला जातो. सदर नोटीस देणे मागील कारण हे की, संबंधित लोकांना त्या फेरफार बाबत माहिती व्हावी आणि कोणाची काही हरकत असेल तर त्याला त्याबाबत माहिती मिळावी. बेकायदेशीर फेरफार होत असेल तर ती कायदेशीर मार्गाने थांबवता यावी यासाठी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाते. आणि त्यास कोणाची हरकत आली नाही तर ती फेरफार मंजूर केली जाते. फेरफार मंजूर झाली म्हणजे त्या फेरफारला विशिष्ट नंबर दिला जातो. त्या फेरफार बाबत संबंधित मजकूर हा संबंधित महसूल अधिकारी म्हणजे तलाठी मार्फत त्यांच्या फेरफार पुस्तकात नोंदवली जाते. सदर फेरफार चा नंबर हा सातबारा उताऱ्यावर नोंद केला जातो. त्यानंतर सदर फेरफार ही संबंधित महसूल कार्यालयात जसे तलाठी कार्यालय वगैरे येथे तसेच ऑनलाईन उपलब्ध करून दिला जातो. सदर फेरफार आपण तपासला म्हणजे आपल्या समजते की, या फेरफार मुळे सातबारा उताऱ्यावर काय बदल झाला आहे.
सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद म्हणजे मालमत्तेच्या मालकी हक्कात झालेल्या बदलाचे अधिकृत नोंद. तसेच इतर कोणत्याही झालेल्या बदलाची अधिकृत नोंद असते. जर जमीन विकत घेतली किंवा वारस हक्काने मिळाली किंवा इतर कोणत्याही प्रकारे मालकी हक्कात बदल झाला असेल तर त्या बदलाची नोंद महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यावर करावी लागते. महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेखा नुसार महाराष्ट्रात जमीन किंवा मालमत्तेच्या मालकी हक्कात झालेल्या बदलाची नोंद Mutataion प्रक्रिया म्हणजे फेरफार होय.
जमिनी संदर्भातील फेरफार हे अतिशय महत्त्वाचे आहेत कारण त्यामुळे जमिनीचा कायदेशीर इतिहास समजण्यास मदत होते. यामुळे नवीन मालकाच्या नावावर जमिनीची शीर्षक कायदेशीर रित्या हस्तांतरित होते. तसेच फेरफार मुळे अनेक कायदेशीर गोष्टी माहिती होण्यास व सिद्ध करण्यास मदत होते. काही मालकी हक्काबाबत किंवा रस्त्याबाबत विहिरीबाबत काही वाद उपस्थित झाला तर फेरफार नोंदी हा न्यायालयामध्ये पुरावा म्हणून महत्त्वाच्या असतात.
पुढील वेगवेगळ्या कारणांसाठी फेरफार हे मंजूर केले जात असतात.
विक्री दस्ता आधारे फेरफार (Slae Mutataion) :-
जेव्हा मालमत्तेची विक्री केली जाते, ते पण नवीन खरेदी दाराच्या नावाची नोंद करण्यासाठी हा फेरफार केला जातो.
वारस फेरफार (inheritance mutation) :-
वारस हक्काने स्थावर मालमत्ता प्राप्त झाल्यास, वारसांच्या नावाची नोंद करण्यासाठी हा फेरफार केला जातो.
बक्षीस पत्र आधारे फेरफार (Gift Mutation) :-
एखादी मालमत्ता बक्षीस म्हणून कायमस्वरूपी बिना मोबदला म्हणून मिळाल्यानंतर मालकी हक्कात बदल करण्यासाठी हा फेरफार केला जातो.
वाटणी पत्र आधारे फेरफार (Partition Mutation):-
मालमत्तेचे विभाजन झाल्यानंतर, वाटणी पत्रानुसार वाटणी होऊन हा फेरफार घेतला जातो.
कर्जाच्या बोजा गहाण खत (Morthgage Mutation) आणि गहाण खत रद्द केल्याबाबत फेरफार नोंद. (ReConveyance of mortgage mutation) :-
जेव्हा एखादी स्थावर मिळकत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले जाते तेव्हा त्या कर्जाचा बोजा संबंधित सातबारा उताऱ्यावर चढविला जातो त्याबाबत फेरफार नोंद ही सातबारा उताऱ्यावर घेतली जाते. तसेच संबंधित कर्जाची परतफेड झाल्यानंतर कर्ज फेडल्याबाबतचा फेरफार सातबारा उताऱ्यावर घेतला जातो व त्याची नोंद केली जाते.
अदलाबदल दस्त आधारे फेरफार : (exchange mutation) :-
जेव्हा नोंदणीकृत दस्ताद्वारे स्थावर मिळकतीची अदलाबदल केली जाते. त्याबाबत फेरफार नोंदणी केली जाते.
न्यायालयाच्या किंवा महसूल विभागाच्या आदेशाने फेरफार :- (Cort Order / Order by Revenue Court / Department)
वरील सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त सातबारा उताऱ्यावर फेरफार हा एखादी संबंधित न्यायालयाच्या निर्णयाने किंवा संबंधित महसूल विभागाच्या निर्णयाने फेरफार घेतला जातो.
फेरफार म्हणजे स्थावर मिळकती संबंधित अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर भाग आहे.









