दस्त नोंदणी कसा करावा.
सदर दस्त तयार करण्यासाठी आपण सर्वात प्रथम पक्षकाराकडून मिळकती बाबत तसेच दस्त लिहून घेणार लिहून देणार यांची सर्व माहिती तसेच त्यांचे आधार कार्ड, मिळकतीचा उतारा, लिहून घेणार देणार साक्षीदार यांचे फोटो तसेच दस्ताच्या अनुषंगाने इतर माहिती व कागदपत्रे घ्यावेत.
सदर दस्त त्यांना हस्तानतर करण्याचा हक्क आहे ना वगैरे इत्यादी कायदेशीर बाबी तपासून बघणे.
सादर दस्त लिहुन type करून draft करून घेणे आणि तपासून घेणे.
एका पानावर सर्वांचे आधारकार्ड ची रंगीत झेरॉक्स काढून घेणे. दस्तावर फोटो चिटकवीने. दस्ता ला चालू मिळकत उतारा वगैरे दस्त प्रकारा नुसार आवश्यक कागदपत्र लावणे.
दस्त दुय्यम निबधक कार्यालयात जाऊन तपासून घेणे व Stamp Duty ची रक्कम काढून घेणे.
त्यानंतर online chalan, Registration fee काढून घेणे. Online data entry करून घेणे. DHC Document Handling chalan (20Rs. Per Page) चे चलन काढुन घेणे.
(Online Chalan, Registration fee, DHC चलन, ऑनलाइन Deta Entry कसे केले जाते या बाबत मी वेगवेगळ्या पोस्ट तयार केलेल्या आहेत. सदर माहीती आपण या ब्लॉग वर वाचू शकतात.)
इत्यादी सर्व Documents सदर दस्ता सोबत जोडणे.
त्या नंतर पक्षकाराला घेऊन दुय्यम निबन्धक कर्यलयात जाणे. सदर दस्ता वर प्रत्येक पानावर पक्षकार, साक्षीदार यांच्या सह्या आणि अंगठे घेणे.
त्या नंतर सदर दस्त संबंधित साहेबांकडे देणे. सबंधित क्लार्क, कर्मचारी हे ऑनलाईन एन्ट्री करतात व प्रिंट आपल्याला तपासाणी साठी देतात. आपण नाव मिलकत क्रमांक, पत्ता वगैरे सर्व माहिती नीट तपासून घ्यावी व सही करावी.
त्यानंतर सर्वांचे Online Thumb आणि Photos घेतले जातात.
पक्षकार आणि साक्षीदार यांच्या सह्या रजिस्टर ला घेतल्या जातात. आणि दस्ताची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. आपल्याला पावती दिली जाते. आणि दस्त तयार झाला की काही वेळात दस्त आपल्याला मिळतो. या प्रकारे दस्त नोंदणी केली जाते.