भारतीय वारस कायदा.

Adv.Saurabh Rajput
0

 


भारतीय वारस कायदा.


आपल्या देशात विविध धर्मांच्या लोकांना मिळकतीत त्यांच्या वारसांचे उत्तराधिकार ठरवण्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. ते म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा मुस्लीम कायदा इत्यादी.


हिंदू वारसा कायदा १९५६ मध्ये अमलात आल्यामुळे त्यात महात्त्वाचे बदल झालेले आहेत. 


हिंदू खातेदार मृत्यू पावल्यास त्याच्या मालमत्तेचे उत्तराधिकारी वारस कायद्या नुसार ठरवले जातात.


खातेदार मरण पावल्यावर त्याच्या सर्व वारसाची नाते वारसाहक्क नोंदवहीत नोंदवावीत संबंधीत वारसामध्ये जमिनीचे वाटप झाले नसल्यास गा.न.नं.७/१२ मध्ये कुटुंब प्रमुख (कर्ता) म्हणून फक्त एकाच वारसाच्या नावाची नोंद करण्यात येते. भूसंपत्ती सर्व किंवा काही वारसामध्ये विभागली असल्यास कब्जेदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात यावी. बाकीच्या कब्जा नसलेल्या मात्र मालमत्तेचे अधिकार असलेल्या वारसांची नांवे त्यांच्या मालमत्तेतील अधिकार व हितसंबंध दर्शविण्यासाठी अधिकार अभिलेखाच्या इतर अधिकारामधे करण्यात येते.


हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ अंमलात आल्यामुळे मयत वारसा नोंदी या अधिनियमाच्या उपबंधानुसार कराव्या लागतात. या अधिनियमाप्रमाणे प्रसंगोचित व महत्त्वाचे उपबंध खालीलप्रमाणे आहे. या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये व कलम ८ मध्ये दिल्याप्रमाणे वारसाचे चार वर्ग आहेत.


अ) मुलगी, विधवा, आई, पूर्व मृत मुलाचा मुलगा, पुर्वमृत मुलीचा मुलगा, पुर्वमृत मुलीची मुलगी, पुर्वमृत मुलाच्या पुर्वमृत मुलाचा मुलगा, पुर्वमृत मुलाची मुलगी, पुर्वमृत मुलाची विधवा


ब) वडील

 १) मुलाच्या मुलीचा मुलगा, २) मुलाच्या मुलीची मुलगी, ३) भाऊ, ४) बहीण


 अ) मुलीच्या मुलाचा मुलगा, ब) मुलीच्या मुलाची मुलगी, क) मुलीच्या मुलीच्या मुलीची मुलगी. 


) भाच्याचा मुलगा, ब) बहिणीचा मुलगा, क) भावाची मुलगी, ड) बहिणीची मुलगी, इ) वडीलांचे वडील, वडीलांची आई. ई) वडीलांची विधवा, भावाची विधवा. उ) वडीलांचा भाऊ, वडिलांची बहिण. ऊ) आईचे वडील, आईची आई. ए) आईचे भाऊ, आईची बहिण


वर्ग दोनमधील भाऊ किंवा बहीण यामध्ये एकच आई परंतू भिन्न वडील असेला भाऊ किंवा बहीण यांचा समावेश होत नाही. पहिल्यांदा जे वारस अ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे नातलग असतील त्यांच्याकडे दुसऱ्यानदा वर्ग - अ मधील कोणताही वारस नसेल तर ब) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या वारसांकडे असते.


पारशी  वारसाहक्क धर्मीय व्यक्तीचे मृत्यूपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसाबाबत नियम पुढीलप्रमाणे आहे.


१) मृत व्यक्तीच्या हयातीत जन्मलेले अपत्य व मृत्यूसमयी पत्नीच्या गर्भात असणारे पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जन्मलेले अपत्य असा भेद होत नाही.


२) मृत व्यक्तीचे पूर्वमृत अपत्य कोणतेही वारस मागे न ठेवता मृत झाले आहेत अशाच्या मिळकतीचे हिस्से पाडतांना विचार केला जात नाही.


३) जेव्हा व्यक्तीच्या पुर्वमृत वारसाची विधवा मयत व्यक्तीच्या हयातीत पुनर्विवाह करते तेव्हा तिला वारसा हक्क मिळत नाही. मृत पारशी पुरुषांच्या मिळकतीची विभागणी खालीलप्रमाणे होईल.


४) मयत पुरुषामागे त्यांची विधवा पत्नी, मुले व मुली असतात तेव्हा प्रत्येक मुलगा व विधवा पत्नी यांना प्रत्येक मुलीच्या दुप्पट हिस्सा मिळेल. किवा


मयत पुरुषामागे विधवा पत्नी नाही व फक्त मुले व मुले आहेत अशा प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीच्या दुप्पट हिस्सा मिळतो.


जेव्हा मृत पारशी पुरुषामागे आई, वडील दोघेही जिवंत असतात व मुले, मुली, विधवा पत्नी असे वारस असतात. तेव्हा मिळकतीचे हिस्से वरील नियमाप्रमाणे पडतात, वडील जिवंत असल्यास मताच्या मुलीस हिश्याचा अर्धा भाग व आई जिवंत असल्यास दिला मृताच्या मुलीस अर्धा भाग हिस्सा मिळतो.


जेव्हा पारशी व्यक्तीमागे त्याची विधवा पत्नी व तिचा विधूर पती किवा विधवा असे वारस ठेवून मयत होते तेव्हा त्या व्यक्तीच्या मिळकतीचे विभाजन खालीलप्रमाणे होते.


a) जर मृत व्यक्तीमागे फक्त तिचे विधवा विंâवा विधूर हेच वारस असतात तेव्हा त्या वारसात मृत व्यक्तीच्या मिळकतीतील अर्धा हिस्सा मिळतो.


b) मृत व्यक्तीमागे विधवा विधवा विधूर याशिवाय तिच्या अपत्याची विधवा ही वारस असेल तर प्रथम मृत व्यक्तीच्या विधवा विधवा विधुरास १/३ हिस्सा मिळेल नंतर तिच्या पुवमृत अपत्याच्या विधवेस १/३ हिस्सा व पुर्वमृत अपत्याचा विधवा एकापेक्षा जास्त असल्यास त्यांची १/३ हिस्सा समान प्रमाणात त्यांच्यामध्ये विभागून दिला जातो.


c) जेव्हा मृत व्यक्तीमागे त्याच्या पुर्वमृत अपत्याची विधवाच फक्त वारस असते तेव्हा मिळकतीतील १/३ हिस्सा तिला मिळतो. व पुर्वमृत अपत्याच्या एकापेक्षा जास्त विधवा वारस असेल तर मिळकतीचा २/३ भाग समप्रमाणात विभागला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads