वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज.

Adv.Saurabh Rajput
0

 


वहिवाटीच्या नोंदीसंबंधीचे अर्ज..


१) संबंधित जमिनीचा ७/१२ उतारा २) जमिन मालकाने करुन दिलेले करारपत्र वाट्याची पावती, खंडाच्या पावत्या, भाडेपट्ट्याची पावती. ३) वहिवाटीच्या प्रकरणात पीक पाहणीनंतर तलाठ्याने नमुना १४ मध्ये अहवाल पाठविला आहे काय हे पाहिले पाहिजे. ४) जमिनीत विहिरी किवा झाडांच्या नोंदी करण्याच्या असल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. ५) वहिवाटीच्या प्रकरणात आगाऊ नोटीस देऊन गावी जाऊन  व प्रत्यक्ष जमिनीत जाऊन चौकशी केली जाते. ६) खरीपाची पीकपाहणी दि.१५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर या मुदतीत तर रब्बीची पीकपाहणी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या मुदतीत करणे आवश्यक आहे.


वहिवाटीच्या चौकशीची पध्दत


नियम ३१ प्रमाणे वहिवाटीच्या चौकशीमध्ये खालील निकषांवर सविस्तर चौकशी अहवाल तयार केला जातो. वहिवाटीच्या प्रकरणात संबंधितांना आगाऊ नोटीस देऊन प्रत्यक्ष जमिनीत जाऊन चौकशी करणे आवश्यक आहे. शेतकर्‍याने आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये स्वत:ची वहिवाट आहे. याची दरवर्षी ७/१२ चा उतारा घेऊन खात्री केली पाहिजे. वहिवाटदार सदरी ‘खुद्द’ अशी नोंद असेल तर ७/१२ च्या मालक सदरी ज्या व्यक्तींच्या नावे आहेत त्या सर्वांची स्वत:ची वहिवाट आहे असे मानले जाते. जाते. अ) दुसर्‍याची  जमीन कायदेशीररित्या एखादा शेतकरी कसत असेल तर अशा शेतकर्‍याने आपले नाव वहिवाटदार सदरी लागण्यासाठी पुढील कादगपत्रे जोडून अर्ज केला पाहिजे. १) संबंधित जमिनीचा ७/१२ चा उतारा, २) जमिनमालकाने करुन दिलेले करारपत्र, वाट्याची पावती, खंडाची पावती, भाडेपट्ट्याची पावतीची प्रत. ब) असा अर्ज गाव कामगार तलाठी यांचे नावे द्यावा व तलाठ्याने नमुना १४ मध्ये तहसिलदाराकडे अहवाल त्वरीत पाठविला काय याची संबंधित व्यक्तीने खात्री करावी. 


क) जमिनीमध्ये विहिरी किवा झाडांच्या नोंदी पीकपाहणीच्याच काळात तलाठ्याकडे अर्ज करुन नोंदवून घेणे आवश्यक आहे. वहिवाटीच्या नोंदीसाठी केलेल्या अर्जाची चौकशी पुढीलप्रकारे करण्यात ये

ते.

१) वहिवाट सांगणार्‍या व्यक्तीने आपली वहिवाट कशी अस्तित्वात आली याबद्दल सबळ पुरावा दिला पाहिजे. 

२) सदर व्यक्तीचे वहिवाटीबद्दल लेखी पुरावा, भाडेचिठ्ठी, खंड चिठ्ठी विंâवा इतर करारनामा असल्यास ती हजर करणे आवश्यक आहे. 

३) वहिवाटीबद्दल शेजारच्या शेतकर्‍यांचा  तोंडी पुरावा नसल्यास इतर सबळ व विश्वसनीय पुरावा देणे आवश्यक आहे. 

४) वहिवाट सांगणारी व्यक्ती ज्या गावी जमीन आहे त्या गावी राहते काय? नसल्यास परगावी राहून त्यास सदर जमीन कसणे शक्य आहे काय ? 

५) सदर इसमास बैलबारदाना आहे का ? 

६) बैल बारदाना नसल्यास त्याने जमिनीची मशागत, नांगरट, पेरणी, कोळपणी कशी केली त्याबद्दल पावत्या वगैरे लेखी पुरावा हजर करणे आवश्यक आहे.

  ७) बी-बियाणे, मजुरीच्या पावत्या हजर करणे आवश्यक आहे.

  ८) पिकाची विल्हेवाट कशी लावली याबद्दलचा पुरावा हजर करणे आवश्यक आहे.

फेरफार नोंदणी संबंधीचे अर्ज

अ) अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत

१) खरेदीखताची, बक्षीसपत्राची, भाडेपट्ट्याची नोंद असल्यास संबंधित इतर हक्कातील व्यक्तीचे १०० रु. च्या स्टॅम्पवर हक्कसोड (रिलीज डीड) केवळ अर्जावरुन इतर हक्कातील नोंद कमी करता येत नाही.

 २) वारसनोंदीचे बाबतीत मृत्यूचा दाखला. ब) वारसनोंद करतांना ती स्थानिक चौकशीने करणेत येते. स्थानिक चौकशीचे तपशिलाचे सविस्तर टिप्पणी वारस रजिस्टरला ठेवली जाते. 

क) जमिनीच्या इतर हक्कातील नोंदीच्या हुकूमांची नोंद पन्हा कोर्टाने तसा  हुवूâम दिल्याशिवाय कमी करता येत नाही.

बिगरशेती अतिक्रमण नियमबध्द करणेसाठी अर्ज 

गायरान, गावठाण किवा इतर शासकीय जमिनीवर असणारी बहुतेक अतिक्रमणे ही बिगरशेती वापरासाठी केली आहेत. अशी अतिक्रमणे नियमबध्द करण्यासाठी किमान खालील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

अ) अतिक्रमण क्षेत्राचा वापर ज्या कारणासाठी केला जातो तो वापर विकास योजना आराखड्यानुसार अनुज्ञेय असला पाहिजे. 

ब) अतिक्रमण नियमबध्द करणेस ग्रामपंचायत किवा नगरपरिषद यांचा ना हरकत ठराव पाहिजे. 

क) अतिक्रमण करुन बांधलेली इमारत इत्यादी काढले तर अतिक्रमण करणाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असेल तरच अतिक्रमण नियमबध्द करता येईल.

  ड) केलेले अतिक्रमण जाणूनबुजून केलेले असेल तर ते नियमबध्द करता येत नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads