वारस नोंद कशी करावी ?

Adv.Saurabh Rajput
0


                         

वारस नोंद कशी करावी ?

    खातेदार मयत झाला की प्रथम प्रमुख वरसणे  मृत्युचा अस्सल दाखला काढून घ्यावा. नंतर सदर दाखल घेऊन व चालू मिळकतीचा उतारा घेऊन 100 रूपया च्या स्टॅम्प पेपर वर नोटरी समक्ष प्रतिज्ञापत्र (Affidavit) करून घ्यावे. (मिळकत जर सी.टी. सर्वे हद्दीत असेल तर 200/- रूपयांचा स्टॅम्प घेणे.) त्या शपथपत्रा मध्ये खातेदार मयत झाला ती तारीख, त्याला किती वारस आहेत त्यांची संपूर्ण नावे. त्यांचे वय व पूर्ण पत्ते, व वरील नावांच्या (वरसांच्या) व्यतिरिक्त अन्य कोणतेहे नावे  नाहीत असा मजकूर हवा. नंतर हे मूळ शपथपत्र मृत्युचा अस्सल दाखला जोडून व अर्जदारची आधार कार्ड ची झेरॉक्स त्यासोबत जोडून साध्या कागदावर तलाठी यांचाकडे वारस नोंदणीचा अर्ज सादर करावा. सदर वारसाचा अर्ज हा तहसील कार्यालच्या जवळच्या झेरॉक्स दुकानावर  सहसा मिळून जातो. त्यावर अर्जदारचा फोट चिटकवावा. तलाठी यांचेकडे वारस नोंदीबाबत अर्ज करावा. त्याची पोहोच मागून घ्यावी. सदर अर्जाप्रमाणे तलाठी वारस रजिस्टरला नोंद घालतात. वारस रजिस्टरमध्ये मयत व्यक्तीचे नाव व वारसांची नावे नमूद केली जातात. सदर व्यक्ती ह्या खरोखर वारस असलेबाबत स्थानिक चौकशीमध्ये आढळून आल्याचे मंडल अधिकारी नमूद करतात. त्यानंतर वारस ठरावाप्रमाणे पेâरफार नोंद लिहीली जाते. हितसंबंधीत व्यक्तींना १५ दिवसांची नोटीस काढून व त्यांच्या हरकती असल्यास त्या विचारात घेऊन नोंदीवर निर्णय घेतला जातो. वारसनोंदीसाठी कोणताही शासकीय फी रोख स्वरुपात द्यावी लागत नाही.
आता वरसांची नोंद करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. 
Click Here To See Blog Post 


वारस पोस्ट 2

मयाताच्या मृत्यू नंतर मिळकतीस वारस लवण्यकामी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका/महानगरपालिका यांच्या कार्यालयातून पुरुष किंवा स्त्री यांच्या मृत्यूचा दाखला मिळवावा व सदर दाखला घेऊन योग्य त्या फोटो ओळखपत्रासह शासकीय सुविधा केंद्रात तहसीलदार कार्यालयात जाऊन वारस प्रतिज्ञापत्र करण्याविषयी अर्ज करावा. त्यात मयत सभासदाच्या सर्व वारसांची नावे, वय, पत्ता, धंदा याचा उल्लेख करावा. असा अर्ज कोणीही एखादा सज्ञान वारस इतर सर्व वारसांच्या वतीने दाखल करू शकतो किंवा सर्व मिळून असे अर्ज दाखल करू शकतात. अलीकडे सर्व सुविधाकेंद्रे ही संगणकीकृत झालेली आहेत, अशा केंद्रात अर्जदाराचा फोटो घेतला जातो व शपथेवर वारसाचे प्रमाणपत्र नोंदविले जाते. 

असे शपथपूर्वक निवेदन शासकीय अधिकाऱ्यापुढे करताना चुकूनही एखाद्या वारसाचे नाव वारसाहक्कातून काढू नये बऱ्याच वेळेस गैरसमजूत किंवा हेतुपुरस्सरपणे बहिणी / अज्ञान व्यक्ती यांची नावे गाळली जातात, मात्र असे करणे हे प्रतिज्ञापत्राच्या काय‌द्यानुसार फौजदारी गुन्हा ठरतो.

वारसांचे प्रतिज्ञापत्र तयार झाल्यावर सदर प्रमाणपत्रासहित एकतर तलाठी किंवा नगर भूमापन कार्यालयात ७/१२वा मालमत्ता पत्रकावर मयताच्या वारसांच्या नोंदीसाठी अर्ज करावा
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार असा हक्कसंपादन अर्ज मृत्यू तारखेपासून तीन महिन्यांच्या आत करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे फेरफार नोंद होऊन ७/१२ वा मालमत्ता पत्रकावर सर्व वारसांची नोंद होते. हिंदू वारसा कायदा २००५ नुसार सर्व मुलींना मुलांसारखाच वारसाहक्क मिळालेला आहे, त्यामुळे त्यांची वारस नोंद न होणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. 

इतर ब्लॉग पोस्ट :-


Click Here To See Blog Post 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads