भारताचे संविधान.
संविधान हा देशातील सर्वात महत्वाचा कायदा आहे कारण या प्रमाणेच आपला देश चालत असतो. त्यामुळे त्याला Supreme Law of Country असे म्हटले जाते. देशीतल इतर नवीन जे काही कायदे बनवले जातात ते सर्व संविधना नुसारच बनवावे लागतात.
‘‘आम्ही भारताचे लोक....... स्वत:प्रत अर्पण करत आहोत.’’ असे म्हणून आपला देश कोणत्याही परकीय नियंत्रणाखाली नाही. आपला विकास करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. असे या शब्दांमधून अर्थबोध निघतो. म्हणूनच संविधानाच्या प्रस्तावनेला ‘‘प्रास्ताविका’’ किवा ‘‘उद्देश पत्रिका’’ म्हणतात. आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्या संविधानाप्रमाणे चालतो संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्विकारले आहे. प्रत्येक देशाचे संविधानाचे स्वरुप वेगवेगळे असते. कारण प्रत्येक देशाची समाजरचना, परंपरा, इतिहास आणि भौगोलिक रचना भिन्न असते. गरजा, उद्दीष्टे वेगळी असतात. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम, तरतुदी त्यास संविधान किवा राज्यघटना असे म्हणतात. संविधानात अनेक नियमांनुसार कायदे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार पाहता येतो. अधिकारांचा दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येतो. त्यामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य व हक्क सुरक्षित राहतात. जनतेचे स्वातंत्र्य सुरक्षित राहून लोकशाही बळकट होते. संविधानाची निर्मिती आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर १९४६ साली संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली. ‘‘स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटीशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वत: तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल’’ काही संस्थानेही व त्यांचे प्रतिनिधी या संविधान सभेत होते. अशा प्रकारे प्रांत आणि संस्थानांच्या प्रतिनिधींची मिळून संविधान सभा तयार झाली. भारताच्या संविधान सभेत २९९ सदस्य होते. त्यात विविध भाषा बोलणारे, व्यवसाय करणारे, जाती-धर्माचे लोक होते. या संविधान सभेत डॉ.राजेंद्रप्रसाद, पं. जवाहरलाल नेहरु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी.कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता, इ. मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्या सभेचे अध्यक्ष होते. त्यासाठी वेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या. उदा.- राष्ट्रध्वजाविषयी माहिती, मुलभूत हक्काविषयक समिती. संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीकडे सोपविण्यात आले. त्या समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. अहोरात्र मेहनत करुन संविधानाची निर्मितीमधील या योगदानामुळे त्यांना ‘‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’’ म्हणतात. या संविधानाचा स्विकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला. व अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० हा दिवस निश्चित करण्यात आला. संविधानाच्या तरतुदीनुसार या दिवसापासून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून स्वातंत्र्य, समानता, बंधुता, सहिष्णूता, धर्मनिरपेक्षता या मुल्यांचा स्विकार भारताच्या संविधानात केला गेला. संविधानाची काही उद्दिष्टे ठरविण्यात आली. लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता. म्हणूनच भारतीय संविधानाला ‘‘सामाजिक परिवर्तनाचे साधन’’ म्हणतात. संविधानाने भारतीय नागरिकांना सहा प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे.
१) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, २) सभा स्वातंत्र्य, ३) संघटना स्वातंत्र्य, ४) संचार स्वातंत्र्य, ५) वास्तव्य स्वातंत्र्य, ६) व्यवसाय स्वातंत्र्य.... वगैरे... असे अनेक अधिकार आपल्याला आपल्या संविधानाने प्राप्त करून दिलेले आहेत.