"तज्ञ" वकील / आपल्या क्षेत्रात "तज्ञ" होण्यासाठी काय करावे ?
या लेखाचा फायदा वकिली व्यवसाया व्यतिरिक्त अन्य इतर दुस-या कोणत्याही क्षेत्रत तज्ञ / यशस्वी होण्यासाठी सुध्दा नक्किच होईल.
(यशाची व्यख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असू शकते परंतु आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात चांगले काम करून त्यात तज्ञ होणे हे देखील आपल्यासाठी एक यशच असू शकते. आणि ते ब-याच लोकांचे स्वप्न देखील असते.)
चंगला वकील किंवा कायदयाच्या क्षे़त्रामध्ये मध्ये तज्ञ होण्यासाठी आपण कायदयाचे शिक्षण घेवून तज्ञ होवू शकतो. त्याचप्रमाणे कायदया मध्ये तज्ञ होण्यासाठी वाचन आणि आभ्यास हा महात्वाचा आहे. रोज आपण वाचन केले पाहीजेल. कोणतीही गोष्ट सोप्पी करून टप्प्या टप्प्या ने आपण समजून घेतली पाहीजेल. रोज नवीन नवीन काहीरी शिकत रहावे. आपले ध्येय हे निश्चित असावे. आपल्याला काय करावयाचे आहे. आपले ध्येय आपल्याला माहीत पाहिजेल. जितक्या लवकर आपल्याला आपले ध्येय माहीत होईल तेवढे लवकर आपण आपले ध्येय गाठू शकू. ज्यांना त्यांचे ध्येय लहानपणापासून माहीती असते व ज्या क्षेत्रात करीयर करावयाचे आहे त्याची माहीती असते ते लवकर त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होत असतात व त्यांना त्यांचे आवडीचे करीयर करता येते व ते त्या क्षेत्रात तज्ञ होवून काम करीत असतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तज्ञ होण्यासाठी आपल्याला आपले आवडीचे क्षेत्र, आपल्याला कोणत्या क्षेत्रात करीयर करावयाचे आहे याची आपणास माहीती पाहीजेल.
कायदा नीट व लवकर समजावून घेण्यासाठी इंग्रज भाषेवर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे करण वरच्या कोर्टात काम याच भाषेत चालत असते. ब-याच कोर्टांचे न्यायनिर्णय देखील इंग्रजी भाषेतच असतात. बरेच कायदे हे देखील इंग्रजी भाषेत लवकर समजत असतात. त्यासाठी रोजी इंग्रजीचे वाचन करणे, इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन करने महत्वाचे आहे. वृत्तपत्राचे रोज वाचन केल्याने आपले शुध्दलेखन सुधारेल, आपला शब्द भांडार Vocabulary वाढेल. त्याचा फायदा आपल्याला निश्चीतच आपली Drafting /Legal Drating / Witting सुधारण्यास होईल. रोज इंग्रजी व मराठीचे लिखान करणे. रोज नवीन नवीन शब्द शिकणे. इंग्रजी मध्ये चांगले इंन्पीरेन्शनल, न्युजचे, कयदयाचे व्हिडीओज बघणे. इंन्पीरेंन्सल व्हीडीओज इंग्रजी मध्ये बघण्याचे दोन फायदे आपल्यास होतील ते म्हणजे आपली इंग्रजी सुधारेल, उच्चार सुधारेल व आपल्याला इंन्सीरेशन पण त्यातून भेटेल. त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात आपल्याला तज्ञ (Expert) होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे रोज सराव. कोणत्याही गोष्टीचा आपण सराव केल्याने आपण त्या गोष्टीत तज्ञ होत असतो. त्यासाठी मेहनत व चिकाटी ही महत्वाची गोष्टी आहे. त्यामुळे आपल्या अंगी काही चांगले गुण आपण आत्मसाद करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही गोष्टीत सातत्यता महत्वाची आहे. कोणतीही गोष्ट ही लगेच होत नसते. आपण रोज योग्य दिशेने योग्य मेहेनत केली तर आपल्याला त्याचे परिणाम दिसावयाला लगतात व आपण अपल्या ध्येयाजवळ पोहोचत असतो. त्यासाठी कोणत्याही गोष्टीत सातत्यता ठेवणे महत्वाचे आहे.
रोज वाचन केल्याने व लिखान केल्याने आपले Comprehension Skill आणि Drftng Skills सुधारेल. तुम्ही जे काही वाचन कराल ते तुम्हांस लवरात लवकरत व चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. यामुळे तुमेच लिखान / Drafting / Reading and Writing सुधारण्यस देखील मदत होईल.
नियोजन करणे त्याप्रमाणे अभ्यास व सराव करणे. रोज थोडा थोडा वेळ पण सातत्य ठेवून काम करणे महत्वाचे आहे. उदा. एखादया विदयार्थ्याने सुरवातीपासूनच वर्षभर थोडा थोडा अभ्यसा केला तर त्यांला चांगले मार्कस पडतात व तो त्या परिक्षेत सफलता प्रात्प करू शकतो परंतु जो विदयार्थी ऐनवेळी जागा होवून आभ्यसकरतो त्याच्यावर तणाव येतो, वेळ कमी पडतो व त्याला चांगले प्रदर्शन करण्यास त्याला अडथळे येवू शकतात.
याठिकाणी एक गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणात असणे गरजेचे असते त्यामुळे आपली प्रगती देखील होत असते. जसे तणाव / दबाव पण आपल्या प्रगतीसाठी चांगला असतो. कारण त्यामुळे आपण मेहनत करत असतो. उदा. विदयाथ्यांना टेंन्शन असते पेपरचे म्हणून ते अभ्यसा करत असतात. त्यामुळे आपली प्रगती देखील होत असते. जो व्यक्ती तणावाचे निट नियोजन करून योग्य रितीने त्याला समोरे जातो त्या परिस्थीतीला योग्य रित्या हाताळत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीचा अभ्यस, अनुभव, त्याचप्रमाणे तनाव योग्य रितिने हाताळणे आवश्यक असतो.
त्यांनतर कोर्टाच्या जुन्या केसेस, चा आभ्यास करणे. कोर्टाने जुन्या न्यानिवाडयात काय न्यायनिर्णय दिला. वकिलांनी काय बाजू मांडली. कादयाला कसे इंटरप्रिट केले गेले. त्यातून शिकणे. जुन्या कसेसे चे क्तंजिे बघणे. त्याप्रमाणे इंग्रजी मध्ये आरग्युमेंट करणे शिकणे. त्याची तयारी करणे. आपले हावभाव बोलणे, उच्चार त्या प्रमाणे सुधारणे म्हणजे आपण न्यायालयात प्रभावीपणे युक्तवाद करू शकतो. याचा सराव करणे.
आपण कायदयाचे शिक्षण घेत असाल किंवा घेतले गेले असेल तर एक चांगल्या अनुभवी व जेष्ट वकीलाकडे आपण ज्युनियर म्हणून काम करणे महत्वाचे आहे. कारण आपण सर्वांत महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडूनच शिकणार आहोत. आपण आपल्यात कामात प्रामणीक राहीलो तर ते सुध्दा आपल्याला एक चांगला अभिवक्ता / वकील आपल्याला चांगले घडवून बनवत असतात. आपण ब-याच गोष्टी या बघून शिकत असतो त्या मुळे निरिक्षण करणे आपले सिनियर कसे काम करतात व त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करणे.
त्यांनतर आपण आपले बोलणे समोरच्या व्यक्तिला समजावून सांगण्याची कला, बोलण्याची कला सुधरवली पाहीजेल. आपल्या बोलण्यातून सुध्दा लोकांना बळ मिळण्याचे काम होत असते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार ठेवून काम करावे. व लोकांना देखील सकारात्मक ठेवावे. लोकांशी बोलण्याची कला सुधरावी. लोकांचे बवनदेमससपदह करणे सुध्दा वकीलाला जमायला हवे कारण त्याच्याकडे येणारे बरेच पक्षकार हे अडचणीत असतात त्यांना मानसिक आधाराची देखील गरज असते. आपण त्यांची चांगली कौंन्सलींग केली तर त्यामुळे त्यांना चांगले वाटेल. व आपण त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चांगला सल्ला देवू शकतो.
आपण सामाजीक कामात अग्रसर राहून ही कला सुधारू शकतो म्हणून सामाजीक अग्रेसर राहणे. त्यामुळे तुमचे व्यवहार ज्ञान देखील वाढण्यास मदत मिळेल. लोकांशी चांगले कॉन्टॅंक्ट व ओळख वाढविणे. त्यामुळे सुध्दा आपल्याला कामे भेटत असतात. याठीकाणी एक गोष्ट महत्वाची आहे की आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असाल आपण प्रामाणिकपणे काम केले तर लोकांचा आपल्यावर विश्वास राहतो. व आपण दिलेले काम व्यवस्थितपणे पूर्ण केले तर आपल्याला खुपसारे कामे मिळतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मेहनत करून तज्ञ होवून व प्रामाणिकपणे काम करणे महत्वाचे आहे.
त्यांनतर महत्वाची गोष्ट म्हणजे तनाव व दबावा मध्ये काम करणे शिकणे. आपली पर्सनॅलीटी सुधारणे. चांगले कपडे परिधान करणे त्यामुळे आपला चांगला प्रभाव लोकांवर पडतो.
कोणताही व्यक्ती हा त्याच्या क्षेत्रातील त्याचा अभ्यास, अनुभव, सातत्यता, मेहनत, या गोष्टींनी श्रेष्ट होत असतो. त्यामुळे आपण अनुभव घेणे गरजेचे आहे. चुकिला घाबराचे नाही. पण त्यातून आपली सुधारणा करत राहावयाची. कारण जे काही अनुभवी लोक असतात ते त्यांच्या तसेच इतरांच्या चुकितूनच जास्त शिकत असतात. आपल्याला चुकिची किंम्मत मोजावी लागते तेव्हाच आपण त्यातून शिकत असतो.
तूमच्याकडे जर अनुभव, अभ्यास, सातत्यता असेल तर अशी वेळ देखील येते की तूम्ही तुमच्या सिनियर पेक्षा कधीतरी चांगले काम करू शकतात व तूम्हाला तुमचे सिनियर त्यासाठी नक्कच शाब्बासकी देखील देतील.
चांगला वकील होण्यासाठी कॉमन्स सेन्स देखील खुप महत्वाचा आहे. कारण कायदवयात एक म्हण आहे Law is Nothing But Comman Sence त्यामुळे । Alert राहून कॉमन सेंन्स ने काम करणे. तसेच कॉमन्स सेन्स ठेवून आपली विनोदी वृत्ती पण आपण आढवली तर आपण तणावात काम करतांना दुस-यांना हसवून आनंदीत ठेवू शकतो व आपला नक्कीच चांगला प्रभावा लोकांवर पडण्यास मदत होईल.
एक चांगला वकील होण्यासाठी आपल्याला कॉफीडंट असणे फार महत्वाचे आहे. त्याचा आपल्याला खुप फायदा होत असतो. आपल्याला त्याचा अभाव असेल तर तो आपण सुधारणे आवश्यक आहे.
कारण एखादा व्यक्ती जेव्हा खोट जरी बोलत असला पण तो कॉफीडंट असता तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. व एखादा व्यक्ती खर बोलत असता पण आत्मविश्वास कमी असला तर लोक शक करू शकतात. याठीकाणी मी असे नाही म्हणत की तुम्ही खोट बोला परंतु आपल्या व्यक्तिमहत्वाचा प्रभाव पडत असतो याचे तुम्हांस मी उदाहरण दिलेेले आहे. तुम्हांला बोरांची गोष्ट तर माहीतीच असेल जो मानूस बोलका असतो त्याचे अंब बोरे पण लवकर विकली जातात जो व्यक्ति शांत असतो त्याच्यापेक्षा. हे उदाहरणे मी चुकिसाठी नाही दिलेत पण आपल्यात सुधारणा करण्यासाठी दिलेले आहेत.
त्यानंतर आपण जेव्हा ज्युनियर म्हणून काम करतो तेव्हा कोणतेही काम सुरवातीला मिळाले पैसे कमी मिळो किंवा नाही ते काम शिकण्यासाठी ते काम व्यवस्थित व उत्साहाणे कारणे गरजेचे आहे कारण त्याुमुळे आपल्याला ब-याच गोष्टी या शिकावयास मिळातात. कोणत्याही गोष्टासाठी आपल्याला संधी मिळणे गरजचे असते त्या आपल्याला संधीच असतात फक्त आपल्याला त्या ओळखत आल्या पाहीजेत. बरेच ज्युनियर हे पैसे मिळत नाहीत किंवा कमी पैसे मिळतात म्हणून नाराज असतात पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजे आहे. आपण जेव्हा चंागले काम शिकु व काम चांगल्याप्रमाणे करू तेव्हा आल्याला खुप कामे देखील भेटतील व चांगले पैसे देखील मिळकतील. जे कोणी तज्ञ व्यक्ती आपले सिनियर्स असतात ते सुध्दा अपयस किंवा अशा परिस्थतीमधून काधी काळी गेलेले असतात. ते पण त्यांना आलेल्या अनुभवातून व मेहनतीमधूनच हुशार झालेले असतात. ?
त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नवीन नवीन शिकण्यासाठी आपण आपला कंफर्ट झोन सोडणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आपला कंफर्ट झोन सोडून काम करणे. त्यामुळे आपली प्रगती होते तनावात कसे काम करावयाचे आपले स्किल्स वाटतात. त्यामुळे नवीन संधी मिळाली बाहेरगांवी फिरायची संधी मिळाली, काम करावयाची संधी मिळाली तर नक्की ते करावयाचे कारण वकील म्हटल तर नवीन नवीन खुप फिरावयाला सुध्दा लागते त्यामुळे आपली प्रगती होण्यास मदतच होत असते. नवीन ठिकाणी फिरल्याने आपला कंफर्ट झोन सोडल्याने नवीन नवीन लोंकांना भेटल्याने आपल्याला त्याचा देखील फायदाच होत असतो व त्यामुळे आपले व्यक्तित्व देखील सुधारण्यास मदत होत असते.
ज्युनियर म्हणून वकीलाने काम करतांना एक गाष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक सिनियर वकीला मोठया वकीलाला एक चांगल्या ज्युनियरची गरज असते. त्यामुळे आपण एकदम चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे तुम्हाला देखील चांगले सिनियर वकील मिळतील, कामे मिळतील, शिकायला मिळेल व ते दखील तुमहाला नक्कीच काहीतरी चंागले शिकवतील.
वकीलाला सर्व क्षेत्रातील माहीती असायला हवी त्यामुळे सर्व क्षेत्रातील थोडा थोडा का होवेना अभ्यास, वाचन करत रहावे, माहीती घेत रहावी. त्याच्यामुळे आपले ज्ञान देखील वाढण्यास मदत होईल.
त्याचप्रमाणे आता बरेच कामे देखील ऑनलाईन झालेले आहेत. याला कोर्ट देखील अपवाद नाही. कोर्टाचे देखील बरेच कामे ऑनलाई होत असतात. ऑनलाईन कामा मुळे बरेच फायदे झालेले आहेत. सर्व क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी झाला आहे. कामे जलत गतीने होतात. उतारा, महसुल नोंदी, मिळकतीचा सर्च रिपोर्ट काढणे, पास्टाचे पार्सल ट्रॅकिंग करणे, कोर्टात केस दाखल करणे, कोर्टाची तारीख घेणे, कोर्ट केसच्या कामकाजाची माहीती घेणे, ऑनलाईन कागदपत्रे काढणे, खरेदी विक्री, बक्षीसपक्ष, हक्कसोडपत्र, इ. नोंदणीचे कामे करण्यासाठी सुध्दा आता ऑनलाईन डेटा ऐंन्ट्री करावी लागते. हे सर्व कामे आता ऑनलाईन झालेली आहेत. त्यामुळे सर्व ऑनलाईन कामे, कॉम्प्युटर, टायपिंगचे कामे कशी करतात ते आपण शिूकून घ्यावीत. त्यामुळे आपले कामे जलत गतीने होतात तसेच आपल्याला या कामांसाठी कोणावर जास्त अवलंबून नाही रहावे लगत.
आपली एकाग्रता वाढविणे गरजेचे आहे त्यामुळे आपण कोणतेही काम योग्य व चांगल्याप्रकारे करू शकतो. कोणतेही काम करतांना च्तमेमदज मध्ये राहून काम करणे त्यामुळे आपले काम देखील चांगले प्रकारे होण्यास मदत होईल. त्यामुळे एकाग्रता वाढविणे गारजचेे आहे. त्यासाठी नियमित ध्यान करावे. व्यायामा करावा त्यामुळे आपल्याला बरेच फायदे होतील.
आपल्यात ज्या काही कमतरता आहेत त्या ओळखून त्यात सुधारणा कराव्यात. पुढील Inspirational मेसेज आहे हा सर्वांसाठी तसेच ज्यांला स्वतःमध्ये सुधारणा करावयाची आहे त्याच्यासाठी पण चांगल्याच आहेत.?
जिद्द, मेहनत, फोकस, ध्यास, स्वतःवरचा विश्वास, पॉझिटिव्ह अॅटिटयुड, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्याची शैली, मनाला आणि बुध्दीला नवीन सकारात्मक विचार मिळविण्यासाठी नेहमी सतर्क राहणे, स्वतःवरचा प्रचंड आत्मविश्वास, स्वतःसाठी व दुस-यासाठी काही करण्याची धडपड, आत्मकेंद्रीत होवून स्वतःला सकारात्मक Affirmations देत राहणे, आणि स्वतः रोल मोडल असणे.
ज्यावेळी ही यशाचे बुलेट पॉइंट्स आपल्यात भिनविले जातील तेव्हा आपण आपल्या यशापर्यंत नक्की लवकर पोहोचू.