मराठी
शुध्दलेखनाचे नियम
भाषेचे लिखान शुध्द करण्यासाठी शुध्दलेखनाचे नियम
माहीती असणे गरजेचे आहे. आपण विदयार्थी असाल,
स्पर्धा परिक्षेची तयारी करत असाल, विधी क्षेत्रातील
असाल, शिक्षण क्षेत्रातील किंवा इतर अन्य कोणत्या क्षेत्रातील असाल
तरी तुम्हांस शुध्द प्रकारे लिखान करावयाचे असेल तर तुम्हांस शुध्द
लेखनाचे नियम माहीती असायला हवे. त्यामुळे तुमचे लिखान शुध्द होण्यास मदत होईल.
त्यामुळे मी तुम्हांस सोप्या पध्दतीने म्हणजेच सोप्या भाषेत मराठी शुध्द लेखनाचे
नियम सांगणार आहे.
शुध्द लेखन करण्यासाठी तुम्हांला शुध्द लेखनाचे नियम तर माहीत
हवेच पण त्यासोबतच रोज नियमित लेखनाचा व वाचना सराव करावा. यामुळे तुमचे लेखन आणि वाचन कौशल्य
सुधारण्यास मदत होईल.
सर्वात प्रथम आपण पुढील काही शब्दांचे अर्थ समजून घेवू
त्यामुळे आपणास मराठी शुध्द लेखनाचे नियम समजण्यास सोप्पे होईल.
एकारांत:-
एकारांत म्हणजे शब्दाचे शेवटचे अक्षर "ए" स्वराने
होते. म्हणजे शेवटच्या अक्षरात मात्रा असतो.
उदा. काळे, लिमये, घारे, गारे ही एकारांती आडणावे आहेत.
आकारांत:-
आकारांत म्हणजे शब्दाचा शेवट कान्याने होतो. म्हणजे शेवटी
"आ" हा स्वर असतो. उदा. कला,
रंभा,
गण्या,
विशाखा,
ही सर्व आकारांत नांवे आहेत.
अकारांत:-
अकारांत म्हणजेच शब्दाच्या शेवटी काना, मात्रा, विलांटी, उकार इत्यादी काहीच
येत नाही. उदा. विमल, शरद, पंकज, दशरथ.
-: ह्स्व
स्वर आणि दीर्घ स्वर यातील मुलभुत फरक :-
ह्स्व स्वर:-
जे स्वर उच्चरण्यासाठी अल्प कालावधी लागतो त्या स्वरांना ह्स्व
स्वर असे म्हणतात. उदा. तुका मधील "तु"
चा उच्चार.
दीर्घ स्वर:-
ज्या स्वरांच्या उच्चारासाठी अधिक कालावधी लागतो त्याना दीर्घ
स्वर असे म्हणतात. तूप मधील "तू" चा उच्चार.
ईकारांत :-
ज्याचा शेवट ई अक्षर किंवा स्वराने होतो असा.
उदा. ताई, माई, इत्यादी ईकारांत शब्द आहेत.
पूर हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही
ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.
उदा. : नागपूर, तारापूर, सोलापूर.
नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी
सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा. : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा
अनुस्वार दिला पाहिजे.
उदा. : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.
वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही
कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. या
नियमानुसार ‘घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं’ हे शब्द ‘घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी’ असे लिहावेत.
‘कोणता, एखादा’ ही रूपे लिहावीत. ‘कोणचा, एकादा’ ही रूपे लिहू नयेत.
खरीखरी, हळूहळू’ यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये
ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील, तर ते उच्चाराप्रमाणे र्हस्व लिहावेत.
उदा. : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु.
एकारान्त नामाचे सामान्यरूप या‑कारान्त
करावे. ए‑कारान्त करू नये.
उदा. :
करणे – करण्यासाठी,
फडके – फडक्यांना.
‘राहणे, पाहणे, वाहणे’ अशी रूपे वापरावीत. ‘रहाणे, राहाणे पहाणे, पाहाणे वहाणे, वाहाणे’ अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही.
इत्यादी’ व ‘ही’ हे शब्द दीर्घान्त लिहावेत. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा.
स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल
शीर्षबिंदू द्यावा.
उदा.: गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा.
तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल
विकल्पाने पर‑सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणार्या
अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर‑सवर्ण म्हणून वापरावे.
उदा. : पंकज = पङ्कज, पंचानन = पञ्चानन, पंडित = पण्डित, अंतर्गत = अन्तर्गत, अंबुज = अम्बुज.
पर‑सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम
शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार)
देऊनच लिहावेत.
उदा.: ‘दंगा, झांज, बंड, खंत, संप’ हे शब्द ‘दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प’ असे लिहू नयेत.
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर‑सवर्ण
जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
उदा. : वेदांत = वेदांमध्ये, वेदान्त = तत्त्वज्ञान देहांत = शरीरांमध्ये, देहान्त = मृत्यू.
काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट
असतो.कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
उदा. : ‘हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांहीं’ हे शब्द ‘हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही’ असे लिहावेत
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी
येणार्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. ‘ज्ञ’ पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.
उदा.: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा हे शब्द ‘संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा’ असे
लिहू नयेत.
नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी
सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा. : लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
आदरार्थी
बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदा. : राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.
वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी
व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत. या नियमानुसार ‘घरें, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं’ हे शब्द ‘घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, काच, जो, घरी’ असे लिहावेत.
र्हस्व‑दीर्घ
मराठीतील तत्सम इ‑कारान्त आणि उ‑कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदा. : कवि = कवी, बुद्धि = बुद्धी, गति = गती.
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व
उकार दीर्घ लिहावा.
उदा. : पाटी, जादू, पैलू.
परंतु, यथामति, तथापि’ ही तत्सम अव्यये र्हस्वान्त लिहावीत.
व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
उदा. : हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.
आणि’ व ‘नि’ ही मराठीतील दोन अव्यये र्हस्वान्त
लिहावीत.
सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला
शब्द) तत्सम र्हस्वान्त शब्द असेल (म्हणजेच मुळात संस्कृतात र्हस्वान्त असेल) तर
ते पूर्वपद र्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्तच लिहावे.
उदाहरणार्थ : बुद्धि – बुद्धिवैभव लक्ष्मी – लक्ष्मीपुत्र.
साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.
उदाहरणार्थ : बुद्धि – बुद्धिमान, लक्ष्मी – लक्ष्मीसहित.
‘विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्’ यांसारखे इन्‑अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या ‘न्’चा लोप होतो व उपान्त्य र्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द
असता) ते र्हस्वान्तच लिहावेत.
उदाहरणार्थ : विद्यार्थिमंडळ, गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.
मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल, तर
त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार र्हस्व
लिहावा.
उदाहरणार्थ : किडा, विळी, पिसू, इथे, निघो फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो.
मात्र
तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दांतील उपान्त्य इकार किंवा उकार
मुळाप्रमाणे र्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ : दक्षिणा, गीता अनुज्ञा, पूजा.
मराठी अ‑कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार
दीर्घ लिहावेत.
उदा. : कठीण, नीट, रतीब, विहीर ऊस, चिरूट, तूप, मूल.
तत्सम (मुळात संस्कृत असलेल्या) अ‑कारान्त
शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे र्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
उदाहरणार्थ : गणित, विष गुण, मधुर दीप, न्यायाधीश रूप, व्यूह.
मराठी
शब्दांतील अनुस्वार, विसर्ग
किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः र्हस्व लिहावेत.
उदा. : चिंच, डाळिंब, भिंग खुंटी, पुंजका, भुंगा छिः थुः किल्ला, भिस्त, विस्तव
कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे र्हस्व
किंवा दीर्घ लिहावेत.
उदा. : अरविंद, चिंतन कुटुंब, चुंबक
निःपक्षपात, निःशस्त्र
चतुःसूत्री, दुःख
कनिष्ठ, मित्र
गुप्त, पुण्य
ईश्वर, नावीन्य
पूज्य, शून्य.
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा
उपान्त्य ई‑कार किंवा ऊ‑कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी र्हस्व लिहावा.
उदा. : गरीब – गरिबाला, गरिबांना चूल – चुलीला, चुलींना.
अपवाद – दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
उदा. : परीक्षा – परीक्षेला, परीक्षांना दूत – दूताला, दूतांना.
मराठी
शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल, तर अशा शब्दाच्या
सामान्यरूपात उपान्त्य ई‑ऊ यांच्या जागी ‘अ’ आल्याचे दिसते.
उदा. : बेरीज – बेरजेला, बेरजांना लाकूड – लाकडाला, लाकडांना.
मात्र पहिले अक्षर र्हस्व असल्यास हा ‘अ’ विकल्पाने होतो.
उदा. : परीट – पर(रि)टास, पर(रि)टांना.
उदा. : परीट – पर(रि)टास, पर(रि)टांना.
शब्दाचे उपान्त्य अक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ असेल, तर
अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ‘ई’च्या जागी ‘य’, आणि ‘ऊ’च्या जागी ‘व’ असे आदेश होतात.
उदा. : काईल- कायलीला, कायलींना देऊळ – देवळाला, देवळांना.
पुल्लिंगी
शब्दाच्या शेवटी ‘सा’ असल्यास त्या जागी
उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी ‘शा’ होतो (‘श्या’ होत नाही)
उदाहरणार्थ : घसा – घशाला, घशांना ससा – सशाला, सशांना.
पुल्लिंगी
शब्दाच्या शेवटी ‘जा’ असल्यास उभयवचनी
सामान्यरूपात तो तसाच राहतो (त्याचा ‘ज्या’ होत नाही).
उदा. : दरवाजा – दरवाजाला/जांना मोजा – मोजाला/जांना
तीन
अक्षरी शब्दातील मधले अक्षर ‘क’चे किंवा ‘प’चे द्वित्व असेल, तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व
नाहीसे होते.
उदाहरणार्थ : रक्कम – रकमेला/मांना छप्पर – छपराला/रांना.
मधल्या
‘म’पूर्वीचे
अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.उदाहरणार्थ : किंमत
– किमतीला/तींना गंमत
– गमतीला/तींचा
ऊ‑कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही
उदा. : गणू
– गणूस दिनू
– दिनूला.
धातूला
‘ऊ’ किंवा ‘ऊन’ प्रत्यय लावताना
धातूच्या शेवटी ‘व’ असेल, तरच
‘वू’ आणि ‘वून’ अशी रूपे होतात; पण
धातूच्या शेवटी ‘व’ नसेल, तर
‘ऊ’ आणि ‘ऊन’ अशी रूपे होतात.
उदा. : धाव – धावू, धावून गा – गाऊ, गाऊन कर – करू, करून.