पोलिस तक्रार.

Adv.Saurabh Rajput
0



पोलिस तक्रार


मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत पोलिस तक्रार करण्या विषयीची. आपल्याला आयुष्यात कधी तरी पोलिसात तक्रार करण्याची गरज पडू शकते. त्यामुळे ही माहिती तुमच्या कामात येऊ शकते. 


चोरी, भांडण, विनयभंग, धमकी, अपघात, वगैरे असे अनेक गुन्हे घडल्यावर पोलिसात तक्रार दाखल करावी लागते. अशा वेळेस उशीर न करता तक्रार दाखल करावी. कारण वेळेत तक्रार दाखल केल्याने  गुन्ह्याचा शोध लावण्यास तथा गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्यास व लवकर  शिक्षा  होण्या कमी मदत होत असते. गुन्हा नोंद केल्याने तो पुरावा देखील तयार होतो आणि आपल्याला तो पुरावा न्यायालयात देखील केस च्या वेळी कामी येतो. म्हणून वेळेत तक्रार देणे / दाखल करणे गरजेचे आहे. जर तक्रार वेळेत दाखल नाही झाली तर याचा फायदा आरोपीला होत असतो आणि तो त्याचा बचाव करू शकतो. गुन्हा नोंद करण्यास उशीर झाला व योग्य कारण असेल तर आपण तसे कारण तक्रार देताना नमूद करावे.


गुन्ह्यांचे दोन प्रकार आहेत एक दखलपात्र असलेले व दूसरा दखलपात्र नसलेले म्हणजे अदाखलपात्र गुन्हे.  जेव्हा तुम्ही दखलपात्र गून्ह्याची तक्रार पोलीस स्टेशनला देता तेव्हा त्याची दखल पोलीस घेतात त्यालाच प्रथम सुचना अहवाल first information report (एफ. आय. आर.) म्हणतात. गून्ह्याच्या तपासाला यामुळेच चालना मिळत असते व पुरावा कायद्यान्वये तक्रारकर्त्याची सत्यता न्यायालयात पडताळतांना या रिपोर्टला महत्वाचे समजले जाते. दखलपत्र गुन्हा म्हणजे यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे येतात. पोलिसांना यात तपास करण्याचे तसेच गुन्हेगारास अटक करण्याचे व अजून बरेच काही अधिकार असतात. दखलपात्र गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलिस त्यात चौकशी व कार्यवाही  करतात. त्यासाठी त्यांना न्यायालयाच्या परवानगीची आवशकता नसते. 


जर दाखलपत्र गुन्ह्यात पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला किवा गुन्ह्याची नोंद केली नाही तर आपण गुन्ह्याची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकारी जसे उपविभागीय अधिकारी, अप्पर पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करावी.  गुन्ह्याची नोंद आपण समक्ष तोंडी, लेखी, पोस्टा द्वारे पण आपण करू शकतो व तो आपल्याला पुरावा देखील होत असतो. 


गुन्हा घडल्यावर किवा त्याची आपल्याला माहिती झाल्यावर त्याची सर्वात आधी पोलिसात तक्रार करावी कारण आपण डायरेक्ट न्यायालयत देखील गेलो तरी आपल्याला न्यायालय विचारू शकते की तुम्ही आधी पोलिसात का नाही गेलात व आपल्याला योग्य ते कारण द्यावे लागेल. 


पोलीस स्टेशनला तक्रार तोंडी किंवा लेखी स्वरुपात देता येते. तोंडी तक्रार पोलीसांनी लिहून घेतली पाहिजे व तक्रारकर्त्याला वाचून दाखवली पाहिजे. तक्रारकर्त्याने त्यावर सही केली पाहिजे. तक्रारकर्त्याला नक्कलप्रत ताबडतोब विनामूल्य दिली जाते अशी तरतूद आहे.


पोलीस स्टेशन प्रमुखांनी जर तक्रार घेण्यास नकार दिला व त्यामुळे अन्याय झाला असे वाटत असेल तर कायद्यान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त (जेथे आयुक्त असेल त्या ठिकाणी) त्यांच्याकडे पोस्टाने तक्रार पाठविता येईल. किवा समक्ष तक्रार देता येईल. हे अधिकारी स्वतः गून्ह्याचा तपास करू शकतात किंवा आपल्या हाताखालिल अधिकाऱ्यास तपासाचा आदेश देऊ शकतात.


पोलीस स्टेशन प्रमुखांनी तक्रार घेतली नाही तर भादंवि १६६ अन्वये त्यांच्याविरुध्द कारवाई होऊ शकते. शिक्षेपासून कुणाचा बचाव करण्याच्या हेतूने कायद्यातचा भंग केला म्हणून विविध कायद्यांवये गुन्हा ठरतो.


घटना जर दखलपात्र नसलेल्या गून्ह्याची असेल तर पोलीस तशी नोंद (फौजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५५) व  नवीन भारतीय नागरिक नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 174 अन्वये दखलपात्र नसलेल्या गुन्ह्यांच्या रजिस्टरमध्ये करून ठेवतात.अशा गुन्ह्यामध्ये पोलीसांना गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करता येत नाही. त्यासाठी शक्यतो तक्रारकर्त्याला न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची सुचना पोलीसांनी तर्फे दिली जाऊ शकते, अशी तरतूद आहे. यालाच सर्वसामान्य पणे, एन. सी. नोंदविने म्हणजे (non cognizable offence) रिपोर्ट नोंदविने असे म्हणतात.


तक्रार दाखल करत असताना / देताना घटनेत दिवस, वेळ, स्थळ, नूकसानीचे वर्णन, उपस्थित व्यक्ति इत्यादि नमूद करावे. तक्रार घटना घडल्यानंतर विनाविलंब नोंदविली पाहिजे. तक्रारीमध्ये घटनेचा महत्वाचा भाग व्यवस्थित नमूद करावा. तक्रार करण्यास उशीर झाला असेल तर त्याचे योग्य ते कारण नमूद करावे अन्यथा आरोपीला संशयाचा फायदा मिळतो व तो निर्दोष होऊ शकतो. 


तक्रार देऊनही पोलीसांनी काहीही कारवाई केली नाही तर न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल करता येतो. पोलीसांना चौकशी करण्याचा आदेश न्यायालय देऊ शकते. 


पोलीस स्टेशन प्रमुखाने तक्रार नोंदविली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे आपण तक्रार करू शकतो. आपण दिलेल्या तक्रारीचे काय झाले ? याची माहिती, माहिती अधिकार कायद्यान्वये विहीत नमुन्यात अर्ज करून देखील आपण मागू शकतो. 


तसेच आता महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांनी देखील त्यांच्या वेबसाइट वर ऑनलाइन बर्‍याच सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या  आहेत त्यामुळे मोबाइल चोरीची वगैरे जरी काही तक्रार असेल तर ती  आपण ऑनलाइन  दाखल करू शकतो. तसेच  आपल्याला एफआयआर ची कॉपी लागल्यास आपण ती ऑनलाइन महाराष्ट्र पोलिस याच्या वेबसाइट वर जाऊन काढून शकतो. तसेच पोलिस verification करण्याची सुविधा देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.  

कोर्टातील फौजदारी केस ची प्रक्रिया

Click Here To See Post 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads