हिंदू विविह कायदा, 1955 नुसार न्यायालया मार्फत घटस्फोट.

Adv.Saurabh Rajput
0

 


हिंदू विविह कायदा, 1955  नुसार  न्यायालया मार्फत घटस्फोट 


मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत न्यायालया मार्फत घटस्फोट कसा घेतला जातो. 

आपल्या देशात घटस्फोटासंदर्भात धर्मानुसार वेगवेगळे कायदे आहेत व हे कायदे  ज्या त्या धर्मा नुसार लागू होतात. जसे हिंदू लोकांसाठी हिंदू विवाह कायदा आहे. या कायद्या नुसार  घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली जाते. 


हिंदू विवाह कायदा हा हिंदू लोकांना लागू असून या कायद्या नुसार विवाह पार पडला जातो आणि घटस्फोट देखील घेतला जातो. 

त्यानंतर Special Marriage Act हा सर्व धर्मासाठी सागू आहे. या कायद्या नुसार सुद्धा विवाहा होतो आणि  घटस्फोट देखील घेतलं जातो. परंतु आज आपण माहिती बघणार आहोत हिंदू विवाहा कायदा या बाबत. 

घटस्फोट दोन पद्धतीने घेतला जातो जसे एकतर्फे आणि दोघे पाती आणि पत्नी दोघांच्या समतीने. 

दोघांच्या समतीने जो घटस्फोट घेतला जातो त्याला  Mutual Consent Divorce असे म्हातात. 

दोघांची समती ही मुक्त सामंती असावी लागते. मुक्त सामंती  म्हणजे त्यांच्यावर कोणताही व कोणाचाही दबाव नसावा. त्यांची दोघांची स्वत:ची मर्जी असावी लागते. यालाच Free Consent असे म्हणतात. 

जर घटस्फोट घ्यायला एका पक्षाची संमती असेल व एकाची नसेल तर त्याला contested divorce असे म्हणतात.  

एकतर्फे म्हणजे फक्त पती किवा पत्नी एकालाच घटस्फोट घ्याचा असतो आणि एक पक्ष तयार नसेल. 

आशा वेळेस ज्या एका पक्षाला म्हणजे पती किवा पत्नीला घटस्फोट घ्यायचा आहे त्यासाठी हिंदू विवाह कायदा 1955, कलम 13 या मध्ये काही करणे (Grounds) दिलेले आहेत. त्यानुसार एकतर्फे घटस्फोट घेता येऊ शकतो.  

विवाहबाह्य संबंध -   पती किवा पत्नीचे लग्न झालेलं असताना परपुरुष किंवा परस्त्रीशी संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास घटस्फोट घेता येतो.

क्रूरतेची वागणूक / छळ - छळ हा कोणताही मानसिक, शारीरिक, लैंगिक कोणत्याही प्रकारचं असू शकतो.  

कोणतेच संबंध नसणे- नवरा आणि बायकोने एकमेकांशी कोणताच संबंध ठेवला नसेल, एकाच घरात राहून परक्यासारखे राहत असतील किंवा एकमेकांकडे दुर्लक्ष करत असतील तर अशा परिस्थितीत घटस्फोट घेता येतो.

वेडेपणा-  पती किंवा पत्नी वेडसर झाले असतील किंवा त्यांचं मानसिक संतुलन गमावलं असेल तर अशा परिस्थितीत घटस्फोट घेता येतो.

धर्मांतर-  पाती किंवा पत्नीने धर्म बदलल्यास घटस्फोट घेता येतो.

संन्यास- पाती किवा पत्नीने एकाने संसारातून संन्यास घेतल्यास तेसुद्धा घटस्फोटाचं एक  कारण होऊ शकतं.

बेपत्ता होणे- पती किंवा पत्नी पैकी एखादा जण सात वर्षांपेक्षा जास्त काळ बेपत्ता असेल तर त्याला कायदेशीरदृष्ट्या मृत घोषित करतात. अशा वेळी लग्न मोडल्याचं प्रमाणपत्र कोर्टाकडून मिळवता येतं.  

जर पती हा पत्नीला नांदवत नसेल, तिचा मानसिक, शारीरिक छळ करून तिला क्रूरतेची वागणूक देत  असेल, किवा पत्नीला माहेरी हाकलून दिलेले असेल तर अश्या वेळेस पत्नी ही हिंदू विविह कायदा, 1955 मधील कलम 13 मध्ये  दिलेल्या तरतुदी नुसार एकतर्फी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकते. परतू त्या आधी नोटीस द्यावी लागते. कारण त्यामुळे पतीला  त्याची चूक समजून शकते व पती नांदवायला घेऊन जाऊ शकतो.  

तसेच पत्नी ही काही कारण नसताना पतीला सोडून माहेरी / घर सोडून निघून गेलेली असेल तर पती देखील घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात हिंदू विविह कायदा, 1955 मधील कलम 13 मध्ये  दिलेल्या तरतुदी नुसार एकतर्फी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो.  

परंतु सदर अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालय संपूर्ण चौकशी, पुरावा, सर्वांचे म्हणणे एकूण घेऊन त्यावर न्यायनिर्णय देत असते.  

घटस्फोट घेण्या आधी पती किवा पत्नी जर एक कोणीही संसार करण्यास नकार देत असेल किवा एकाचा त्याग केलेला असेल तर पती किवा पत्नी वैवाहिक सबंध पुन्हा पूर्णर्प्रस्थापित  करण्यासाठी हिंदू विविह कायदा, 1955 मधील कलम 9 प्रमाणे न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. सदर अर्ज कोर्टात दाखल करण्या अगोदर पहिले वैवाहिक संबध पूर्णर्प्रस्थापित करण्या संदर्भात नोटीस पाठवावी लागते. या नोटीसीला HMP Section 9 ची नोटीस असे देखील म्हणतात.  

पती आणि पत्नी दोघांच्या परस्पर समतीने घटस्फोट. 

पती आणि पत्नी यांना दोघांना जर परस्पर समतीने घटस्फोट घ्यावयाचा असेल तर ते दोघेही न्यायालयत  हिंदू विविह कायदा, 1955 मधील कलम 13 ब प्रमाणे वकिला मार्फत दाखल अर्ज दाखल  करू शकतात.
अर्ज दाखल करणे काम पुढील पूर्तता होणे गरजेचे आहे. 

पहिली अट :- सदर अर्ज दाखल करण्यासाठी लग्न होऊन एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी झालेला असला पाहिजे तरच अर्ज दाखल करता येतो.  

दुसरी अट :- पती आणि पत्नी एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी पेक्षा विभक्त राहत असलेले पाहिजेल. 


तिसरी अट :- पती आणि पत्नी दोघांचे ही एकत्र राहणे शक्य नसेल. त्यांना एकत्र राहणे शक्यच नसेल, लग्न आता टिकूच शक्त नाही.  असे त्यांना वाटत असेल.   त्यावेळी परस्पर समतीने घटस्फोट मिळण्याकमी ते अर्ज करू शकतात. 

घटस्फोट घेण्यासाठी जेथे कौटुंबिक न्यायालय असेल तेथे अर्ज दाखल करावा लागतो. किवा सीनियर कोर्टात. जेथे अधिकार क्षेत्र असेल तेथे अर्ज दाखल करावा लागतो. 

ज्या शहरात लग्न झालेले आहे किवा पती किवा पत्नी यांचे रहिवासचे ठिकाण जिथे असेल तेथील न्यायालयात अर्ज दाखल करता येतो.

पती आणि पत्नीने न्यायालय परस्पर समतीने घटस्फोट मिळणे कमी अर्ज केला म्हणजे घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. सदर अर्ज हा वकिला मार्फत दाखल करावा लागतो. 

पती आणि पत्नी यांचे एकत्र राहणे जर शक्यच नसेल तर ते अर्ज दाखल करू शकतात. 


परस्पर समतीने घटस्फोट घेण्याची प्रक्रिया. 


घटस्फोट घेण्यासाठी सर्वात आधी पती आणि पत्नी यांना न्यायालयात अर्ज दाखल करावा लागतो.

  त्या अर्जात दोघी अर्जदारांचे नाव, पत्ता, त्यांचा विवाह कधी, कुठे झाला. नंतर ते एक वर्षा पेक्षा जास्त काळा पासून विभक्त राहत आहेत व  आता कधीही एकत्र राहू शकत नाही, असे नमूद करावे लागते. 

त्यांनातर त्याचात काय काय काय ठरलेले आहे म्हणजे देणे घेणे वगैरे काही ठरलेले आहे का ? त्याचे आता एकमेकांकडे काही घेणे देणे राहिलेले नाही. नंतर त्यांना मुले वागेरे असतील तर त्याचा कोण सांभाळ करेल, त्यांना भेटणे वगैरे काय ठरले आहेत त्या बाबत नमूद करावे लागते. 

त्यानंनातर अर्जावर दोघी अर्जदार म्हणजे पती आणि पत्नी यांची सही असते. त्यानंतर सोबत दोघांचे प्रतिज्ञापत्र करावे लागतात. त्यानंनातर सोबत दस्त जोडावे लागतात जसे त्याची लग्न पत्रिका, त्याचा लग्नाचा फोटो, वाईगैरे. अर्जावर वकील साहेबांची सही होते,  मग त्यानंनातर ऑनलाइन E-filling करून अर्ज न्यायालयात दाखल केला जातो. 

अर्ज दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांचा cooling period असतो. म्हणजे न्यायालया मार्फत दोघांना वेळ देऊन बघितले जाते का त्यांना घटस्फोट घ्याचा आहे का. त्याचात काही समझोता होऊन त्याचे मन परिवर्तन होते का ? कधी कधी असे होऊ शकते की छोटे भांडण असले तर पती पत्नी यांनी रागाच्या भरात अर्ज दाखल केला असेल. नंतर त्याचे मत परिवर्तन होऊन जाईल. यासाठी हा cooling period असतो.  

न्यायालया द्वारे म्हद्यस्थी (Mediator) मार्फत कौन्स्लिंग होऊ शकते. 

जर पती आणि पत्नी मध्ये परत समझोता होण्याची काही शक्यता नसेलच आणि ते एकत्र राहुच शकत नसतील तर हा सहा महिन्याचं cooling period आपण न्यायालयात अर्ज देऊन wave करू शकतो. म्हणजे कमी करून घेऊ शकतो. 

त्यानंतर न्यायालयत पुरवयाचे शपथपत्र दाखल करावे लागते. जर पुढील तारीख असेल तर तर तेव्हा दाखल करावे लागते. 

त्यानंतर कोर्टात वकिलांचा उक्तीवाद होतो. न्यायालय खात्री करते की खरच घटस्फोट घ्यावयाचा आहे ना. आणि कोर्ट अर्ज मंजूर करून आदेश पारित करते आणि त्याप्रमाणे हुकूमनामा तयार केला जातो. त्यांनातर ऑनलाइन कोर्टाच्या app किवा वेबिते वर न्यायलायच्या आदेशाची   प्रत (copy) बघू शकतो आणि न्यायालयाच्या सही शिकक्याची नक्कल आपल्याला न्यायलयातून भेटून जाते. ती नक्कल तुम्हाला वकीलन मार्फत देखील भेटून जाईल. सदर आदेशाची नक्कल आपल्याला भविषयत कधी ही लागली तरी आपन न्यायालयातून योग्य ते शुल्क भरून व अर्ज देऊन काढून घेऊ शकतो. 

इतर महसूल ब्लॉग पोस्ट :-


Click Above To See Post 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads