दस्त नोंदणी कमी ऑनलाइन पब्लिक डेटा एंट्री कशी करावी.

Adv.Saurabh Rajput
0


दस्त नोंदणी करणे कमी ऑनलाइन पब्लिक डेटा एंट्री (PDE)  कशी करावी 




आपण जेव्हा एखादी दस्त जसे खरेदीखत, मृत्यूपत्र, हक्कसोडपत्र, घोषणापत्र वगैरे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालत नोंदणी साठी सादर  करतो त्यासाठी आपल्याला आधी त्या दस्ताची ऑनलाइन डेटा एंट्री करावी लागते.

ऑनलाइन डेटा एंट्री म्हणजे आपण जो दस्त नोंदणी करणार आहोत त्या दस्ताची माहिती ऑनलाइन नोंदणी विभागाच्या  वेबसाइट वर भरावी लागते. पक्षकारांचा वेळ वाचवा आणि माहिती अचूक भरली जावी यासाठी ही सेवा नोंदणी विभगा मार्फत सुरू करण्यात आलेली आहे. आपण जी दस्ता मधील  माहिती डेटा एंट्री करताना भरलेली आहे. ती माहिती भरल्या नंतर आपल्याला त्याची प्रिंट काढावी लागते आणि ती दस्त नोंदणी करते वेळी कागदपत्रानसोबत  सादर करावी लागते. 

सांगणीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्ताविषयक माहिती जसे की, मिळकत प्रकार, मिळकतीचे वर्णन, दस्तातील पक्षकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, ओळखदार इत्यादी विषयांची माहिती संगणकात भरावी लागते. ही माहिती पक्षकाराला स्वतःला कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणाहून भरता यावी, यासाठी नोंदणी  विभागाच्या संकेतस्थळावर जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्यालाच पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) असे म्हणतात.

या ऑनलाइन सेवे मुळे पक्षाकरांना अनेक फायदे होत आहे.  जसे  पब्लिक डाटा एन्ट्री द्वारे पक्षकार स्वतःच्या दस्ताची माहिती केव्हाही व कोठूनही भरु शकतात. ही माहिती पक्षकार स्वतः भरत असल्याने अधिक अचूक असते. दस्त नोंदणीसाठी पक्षकारांचा दुय्यम निबंधक कार्यालयातील वेळ वाचतो.


चला तर मग बघूयात की ऑनलाइन डेटा एंट्री कशी केली जाते ते. 


यासाठी सर्वात आधी आपण महाराष्ट्र शासनाची नोंदणी व मुद्रांक विभाग यांची पुढील वेबसाइट सुरू करावी. 
 त्यानंतर पुढील प्रमाणे वेबसाइट सुरू होईल
  
 



या नंतर पीडीई (रजि) या वर ok करावे.  त्यानंतर सेवा पीडीई (आय-सरिता 1.2) उर्वरित महाराष्ट्रा साठी यावर ok करावे.  त्यानंतर पुढील पेज चालू होईल. 



त्यावर Proceed to Login यावर ok करावे.

 
      

यानंतर हे Login चे पेज सुरू होईल त्यावर लॉगिन करून घ्यावे. आपण पहिल्यांदा ही वेबसाइट सुरू केलेली असेल तर Create new user account यावर ok करून आपले नवीन खाते तयार करून घ्यावे आणि आपला आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवावा. 

त्यानंतर आपला यूजर आयडी, पासवर्ड आणि दिलेला कॅपचा टाकून वेबसाइटला लॉगिन करून घ्यावे. त्यानंतर आपण वेबसाइट ला लॉगिन होऊन जाल व पुढील प्रमाणे वेबसाइट चे पेज सुरू होईल. 

   
या नंतर Registration (Public Data Entry for isarita property registration) या option वर ok करावे.  

त्यानंतर आपण पुढील पेज वर याल. 


यावर आपण नवीनच डेटा एंट्री करत असू तर आपल्याला new Token Entry करून घ्यावी लागेल. त्यासाठी new Token Entry या नवा खाली  भाषा, जिल्हा आणि कार्यालय हे सिलेक्ट करून घ्यावे आणि Start या option वर ok करावे. 

आपण आधीच टोकन जेनरेट केलेले असतील किवा जुने टोकन असतील ते  देखील आधीचे टोकन आपल्याला स्क्रीन वर दिसतील.  


                                             
यानंतर आपल्याला ज्या टोकन मध्ये माहिती भरायची असेल त्या टोकन वर edit या ऑप्शन वर ok करावे.


आपण पहिलेच Token तयार करून ठेवलेले असेल तर Show all token information या ऑप्शन वर ok करावे. त्यानंनातर आपल्याला पुढील प्रमाणे टोकन ची माहिती दिसेल. 

(आपण या ठिकाणी पहिले जे टोकन तयार करून डेटा एंट्री केलेली असेल त्याची प्रिंट देखील प्रिंट या ऑप्शन वरुण काढू शकतो.) 

edit या ऑप्शन वर ok केल्यानंतर डेटा एंट्री भरण्यास सुरवात होईल व पुढील प्रमाणे पेज सुरू होईल. 


त्यामध्ये आपल्या डॉक्युमेंट नुसार अनूच्छेद निवडा येधून आपले जे डॉक्युमेंट असेल ते निवडून घ्यावे.



आणि इतर माहिती भरून Next  या ऑप्शन वर ok करावे. त्यानंतर आपण पुढील पेज वर याल. 


त्यानंतर वरील पेज वर दिलेली माहिती जसे गाव मिळकतीचे वर्णन वगैरे भरून घ्यावी आणि Save यावर ok करावे. तसेच आपल्याला खाली Previous Cancel Next हे options दिलेले आहे आपण त्याचा वापर आपल्या गरजे नुयासर करू शकतो. त्यानंतर आपण साठवलेली माहिती खाली दिसेल. त्यात काही चूक झाली असेल तर आपण डिलीट करून पुन्हा माहिती भरू शकतो. आपली भरलेली माहिती बरोबर असेल तर save या वर ok करून द्यावे आणि Next / पुढे  यावर ok करावे. त्यानंतर पुढील पेज सुरू होईल.  



या पेज वर पक्षकारचा क्रमांक, लिहून घेणार, लिहून देणार, व्यवसाय, पत्ता ही सर्व माहिती भरावी लागते. आपण जी माहिती मराठी मध्ये भरू ती आपोआप बाजूच्या इंग्रजी कॉलम मध्ये इंग्रजी मध्ये येऊन जाईल.आपली भरलेली माहिती बरोबर असेल तर save या वर ok करून माहिती save करून घ्यावी आणि  त्यानंतर Next / पुढे  यावर ok करावे.  आणि आपण पुढील पेज वर येऊन जाल. 


या वरील पेज वर आपल्याला साक्षीदार / ओळख यांचे नावे, पत्ता, वय, ओळखीचा पुरावा इत्यादी माहिती भरावी. आपण सदर माहिती मराठी मध्ये भरली तरी आपोआप बाजूला इंग्रजी या कॉलम मध्ये इंग्रणी मध्ये येऊन जाईल. आपली माहिती भरली गेल्यावर  save या वर ok करून आपण भरलेली माहिती save करून घ्यावी. 

आपण भरलेली माहिती यात काही चूक झाल्यास अथवा  आपल्याला ओळखदारांची नावे बादल कराची असल्यास आपण डिलीट या option वर ok करून  ती माहिती पुन्हा भरून घेऊ शकतो. 

त्यानंतर आपण माहिती save करून पुढे या वर ok करावे. त्यानंतर आपण पुढील पेज वर येऊन जाल. 



त्यानंतर आपण    Next    या option वर ok करावे व  आपण त्यानंतर पुढील पेज वर याल. 



त्यानंतर आपण Submit या option वर ok करावे आणि 
आपले डेटा एंट्री चे काम पूर्ण होऊन जाईल. 

त्यानंतर View Deta Entry Details / डेटा एंट्री पहा    यावर ok करून आपल्या झालेल्या डेटा एंट्री चे पेज डाऊनलोड करून घ्यावे. ते पेज पुढील प्रमणे दिसेल. 



सादर डेटा एंट्री चे पेज आपण नोंदणी करीत असलेल्या दस्ता बरोबर सादर करावे. 

आपण केलेल्या डेटा एंट्री मध्ये काही चूक अथवा बादल असल्यास आपण पुन्हा  वरील वेबसाइट ला लॉगिन करून edit या पर्याया चा वापर करून बदल  करून घेऊ शकतो व नवीन प्रिंट काढू शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads