दस्त नोंदणी करण्यासाठी नोंदणी फी (रजिस्ट्रेशन फी) आणि मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) काशी भरावी.
आपण माहिती बघणार आहोत की, दस्त नोंदणी करण्यासाठी नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी) आणि मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) कशी भरावी याबाबत.
आपण जेव्हा दुय्यम निबाधक, नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणी करतो जसे खरेदीखत, हक्कसोड, मृत्यूपत्र, मुखत्यार पत्र (पॉवर ऑफ एटर्नी), घोषणा पत्र, यासाठी आपल्याला दस्त नोंदणी फी (Registration fee) आणि (Stamp Duty) भरावी लागते. चला तर मग बघूया रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्यूटी कशी भरावी ते.
सर्वात आधी आपण महाराष्ट्र शासनाची
https://gras.mahakosh.gov.in/echallan/
ही वेबसाइट ओपण करावी. सदर वेबसाइट ओपण झाल्यानंतर पुढील प्रमाणे पेज चालू होईल.

त्यानंतर आपण Inspector General of Registration यावर ok करावे. त्यांनातर पुढील पेज चालू होईल.
Pay Without Registration
यावर ok करावे. मग पुढील प्रमाणे पेज चालू होईल.

Citizen या ऑप्शन वर ok करावे.
या नंतर आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन फी भरयची आहे का सोबतच स्टॅम्प ड्यूटि सुद्धा भरयची आहे त्यानुसार ऑप्शन सिलेक्ट करावे. त्यानंतर पुढे चलन आणि रजिस्ट्रेशन फी भरण्यासाठी पान सुरू होईल.
या मध्ये आपण चलन ची आणि रजिस्ट्रेशन फी ची माहिती भरावी. Payment Getway SBI - E-pyment यावर ok करावे आणि कॅपचा टाकून Proceed या ऑप्शन वर ok करावे. या नंतर आपल्या आपण जो मोबाइल नंबर टाकलेला आहे त्यावर एक चलन चा नंबर चा मेसेज येईल तो सांभाळून ठेवणे. कारण आपल्याला तो पुढे चलन डाऊनलोड करण्यासाठी कामात येतो.
त्यानंतर ऑनलाइन पेमेंट चे ऑप्शन येईल. ऑनलाइन पेमेंट करावे. पेमेंट success झाल्यानंतर आपोआप एक चलन generate होईल आणि ते डाऊनलोड होईल जाईल.
चलन जर डाऊनलोड झाले नाही किवा परत आपल्याला चलन डाऊनलोड कारचे असेल तर तर आपण चलन ची website
https://gras.mahakosh.gov.in/echallan/ पुन्हा ओपन करावी
येथे चलन चा जो नंबर मोबाइल मध्ये मेसेज द्वारे आलेला आहे तो आणि इतर माहिती भरावी मग पुढील प्रमाणे चलन डाऊनलोड होऊन जाईल.
सदर चलनाचा उपयोग आपण दस्त नोंदणी करू शकतो.






