आपले वाचन व लेखन कौशल्य तसेच Legal Drafting कसे सुधारावे.
मित्रांनो मी तुम्हाला आज माहिती देणार आहे की आपले वाचन व लेखन कौशल्य तसेच Legal Drafting कसे सुधारावे.
आपण वकील असाल, विद्यार्थी असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, नोकरी करत असाल तसेच नोकरीचा शोध घेत असाल किवा कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे व कामात येणार आहे.
आपले वाचन व लेखन कौशल्य जर चांगले असेल तर याचे अनेक फायदे आहेत.
काही मुलांचे वाचन व लिखाण कौशल्य हे ते नियमित वचन व लेखन करत असल्यामुळे जेव्हा ते शाळा किवा कॉलेज शिकत असतात तेव्हाच विकसित होऊन जाते. परंतु काही लोकांचे हे कौशल्य कमी व अविकसित असते कारण ते जास्त लिखाण व वाचन करत नाहीत. त्यांना वाचन व लिखाण करण्याची आवड नसते. वाचन व लेखन कौशल्य विकसित न होण्याचे हे देखील एक महत्वाचे कारण आहे की वाचन व लेखनाची आवड कमी असणे.
तुम्हाला तुमचे हे कौशल्य सुधार करावयाचे असेल तर तुम्ही या पुढील गोष्टी केल्यात तर तुम्ही तुमचे वाचन व लिखाण कौशल्य नक्कीच सुधारू शकतात.
तुम्हास जरी वाचन व लिखाणाची आवड नसेल तरी आपण रोज फक्त थोडा - थोडा वेळ लिखाणाचा व वाचनाचा सराव करावा त्यामुळे तुम्हाला वाचनाची व लिखाणाची आवड निर्माण होऊन जाईल. वाचन व लिखाण के एक कौशल्य आहे आपण रोज त्याचा सराव केला तर आपले हे कौशल्य आपोआप सुधारेल व विकसित होऊन जाईल. तसेच तुम्ही दररोज लिखाण केल्यामुळे तुमचे हस्ताक्षर देखील सुधारेल.
आपले लिखाण व वाचन कौशल्य सुधारले तर याचे अनेक फायदे आहेत. जसे यामुळे आपला बौद्धिक विकास होतो. आपल्याला बरीच माहिती ही वाचनातून मिळत असते. इतर लोकांचे अनुभव व पुस्तके वाचून आपण बर्याच गोष्टी शिकू शकतो.
आपल्या क्षेत्रात आपल्याला चांगली कामगिरी करून तज्ञ व्हायचे असेल तर त्यासाठी वचन व अभ्यास करणे देखील महत्वाचे आहे. याचा फायदा आपल्या नोकरीच्या ठिकाणी देखील आपणास होऊ शकतो. आपल्या शरीराला जशी व्यायामची गरज असते तसेच मेंदूचा देखील व्यायाम व्हावा यासाठी वाचनाची गरज असते त्यामुळे आपल्या मेंदू चा व्यायाम होत असतो.
आपले वचन कौशल्य सुधारल्यावर आपण वाचन केलेले लगेच समजते व आकलन होते. आपली लिहाण्याची व वाचण्याची आकलन क्षमता वाढते. त्याचप्रमाणे वाचनाचे अजून अनेक फायदे आहेत. तुम्ही विद्यार्थी असाल तर यामुळे तुम्ही परीक्षेत चांगले गुण प्राप्त करू शकतात. त्यामुळे आपले हे कौशल्य सुधारणे खूप महत्वाचे आहे.
आपले वाचन कौशल्य सुधारण्या करीता आपण रोज वाचन करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण रोज वर्तमानपत्र वाचावे. वर्तमानपत्रा मधील कायद्याचे लेख वाचावेत. वर्तमानपत्र हे मराठी सोबतच इंग्रजी देखल वाचावे कारण त्यामुळे आपली इंग्रजी भाषा देखील सुधारणा होण्यास मदत होते. आपल्याकडे वर्तमानपत्र येत नसेल तर आपण ते मोबाइल वर वाचू शकतात. मोबाइल वर आपण आपल्या आवडत्या क्षेत्राशी सबंधित देखील वाचन करावे. कारण यामुळे आपले आवडत्या क्षेत्रातील ज्ञान वाढेल. आपण एक वक्ते असाल तरी देखल तुम्हास वाचनाचा फायदा होईल. तुमचे शब्द भांडार वाढेल.
आपण यूट्यूब वरील विडिओ बघावेत त्यामुळे आपले वाचान व लिखाण कौशल्या सुधारण्यास मदत होईल. कारण आपले ज्ञान विडिओ पाहून वाढेल व आपल्याला ते लिखाणा कमी कामात येईल.
इतर कोणतेही पुस्तके वचन करावीत, कोर्टाची पुस्तके वाचावीत, कोर्टाचे जुन्या केस मधील ड्राफ्ट वाचवेत. वेगेगळया नोटीसा वाचाव्यात. कोर्टाचे Judgement वाचावीत. बरेच कोर्टाचे Judgments हे इंग्रजी मध्ये असतात ते वचन करावी कारण त्यामुळे आपली इंग्रजी देखील सुधारण्यास मदत होईल. Judgement लिहून काढावेत त्यामुळे आपले legal drafting सुधारण्यास मदत होईल. वाचताना व लिहिताना अगदी लक्षपूर्वक लिहावे व वचन करावे. लिहिताना शुद्ध लेखन कसे केले आहे. वाक्य रचना कशी आहे. विराम चिन्हे कसे वापरले आहेत हे निट बघावे. त्यामुळे आपले शुद्धलेखन सुधारते.
आपण जे काही वाचले आहे ते आपल्या भाषेत, लक्षात असेल तेव्हडे ते तोंडी लिहून काढावे. व आपण जे वाचले आहे ते आठवण करावे त्यामुळे आपली आकलन क्षमता वाढेल. आपण शाळेत शिकत असताना आपल्याला उतारा वाचून प्रश्न व उत्तरे लिहावे लागत. ते यासाठी की आपली वचन व आकलन क्षमता वाढावी.
वचन करताना किवा लिखाण करताना आपल्याला काही शब्द लिहिता आला नाही किवा त्याचा अर्थ समजला नाही तर तो शब्द व त्याचा अर्थ एका वहीत लिहून घ्यावा.
कोणतेही Legal Drafting करतांना किवा काही लिहिताना ते मुद्देसूद लिहावे. क्रमाने घटना क्रम नुसार लिहावे. सोप्या भाषेत लिहावे.
आपल्याला जो काही ड्राफ्ट तयार करावयाचा आहे त्याची आधी संपूर्ण माहिती व कल्पना घेऊन घ्यावी. लिखाण करण्याचा महत्वाचा मुद्दा काय आहे बघून घ्यावे. पक्षकारची सर्व माहिती घेऊन घ्यावी जी ड्राफ्ट साठी लागणार आहे व ती लिहून ठेवावी. म्हणजे आपल्याला ती ड्राफ्ट करते वेळी कामात येईल.
कोणतेही लिखाण करतांना ते नवीन व मनाने लिहाण्याचा प्रयत्न करावा व नवीन लिहावे. फॉरमॅट वापरू नये व कॉपी पेस्ट करू नये. कंटाळा करू नये. कारण या मुळे आपले लिखाण कौशल्या लवकर सुधारात नाही.
आपण Computer वरील टायपिंग शिकून घ्यावे कारण यामुळे आपण फास्ट टाइप करतो व काही न काही टाइप करून लिखाण देखील करत असतो. त्यामुळे देखील आपले कौशल्य सुधारले जाते.
आपण लिखाण व वाचन करत असताना आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्या चुका कमी होतील व आपले वाचन, लिखाण तसेच ड्राफटिंग चे कौशल्य सुधारेल.
आपण ज्या कार्यालयात काम करत असाल तेथील सर्व जुन्या फाइली, कागदपत्रे निट वाचून काढवीत. त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल.
Practice makes a man perfect is a famous proverb tells us the importance of practicing regularly in a particular field.