रेल्वे क्लेम केस चे ऑनलाइन स्टेटस कसे बघावे ?
मित्रांनो जेव्हा रेल्वे मध्ये कोणाचा अक्सीडेंट होतो तेव्हा कोणी जखमी किवा मृत झाले तर नुकसान भरपाई मदत मिळण्याकमी जखमी किवा त्याचे कुटुंबिय Railway Accident Claim Tribunal या कोर्टात नुकसान भरपाई मिळण्याकमी वकील यांच्या मार्फत अर्ज दाखल करू शकतात व जखमी किवा मृत तसेच त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळू शकते. या साठी आपल्या देशात रेल्वे च्या विविध विभागा प्रमाणे वेगवेगळे Railway Accident Claim Tribunal कोर्ट आहेत. आपल्या महाराष्ट्रात मुंबई व नागपूर या ठिकाणी Railway Accident Claim Tribunal आहे. ज्या विभागात Accident झाला असेल त्या अधिकार क्षेत्र असलेल्या कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो.
जेव्हा Railway Accident Claim Tribunal ची केस रेल्वे कोर्टात दाखल असते तेव्हा त्या बाबत सर्व माहिती म्हणजे केस ची काय स्टेज आहे, पुढील तारीख काय आहे. वकील कोण आहेत. निकाल या सर्व गोष्टी आपण ऑनलाइन वेबसाइट वर बघू शकतो.
त्यासाठी https://rct.indianrail.gov.in/ ही वेबसाईट सुरू करून घ्यावी.
Website चे Home Peg सुरू होऊन होईल.
त्यानंतर आपण केस ची माहिती जसे पुढील तारीख वगैरे बघू शकतो. त्यासाठी आपल्या जवळ केस नंबर पाहिजेल. केस नंबर टाकून आपण माहिती बघू शकतो. त्यासाठी Case Status वर ok करावे. त्यामध्ये केस नंबर, कोर्ट, केस प्रकार ही माहिती टाकली आपल्याला माहिती भेटून जाईल.
जर आपल्याकडे केस चा नंबर नसेल तर आपण आपण Case Search या वर ok करावे.
या ठिकाणी आपण Date of Accident/Untoward Incident टाकून आपली केस व तिचा Checklist No. भेटून जाईल व तो टाकून आपण आपली केस व तिचा नंबर शोधू शकतो. व माहिती मिळउ शकतो.




