समन्स केस ट्रायल आणि वारंट केस ट्रायल म्हणजे काय ? आणि समन्स ट्रायल व वारंट ट्रायल केस यात काय फरक आहे ?
मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत समन्स केस व वारंट केस म्हणजे काय ? आणि समन्स केस व वारंट केस यात काय फरक आहे ?
आपण यापूर्वी ब्लॉग पोस्ट मध्ये बघितलेले आहे की समन्स म्हणजे काय व वारंट म्हणजे काय.
![]() |
Click Here To See Post |
आज आपण बघणार आहोत की समन्स केस ट्रायल म्हणजे काय व वारंट केस ट्रायल म्हणजे काय.
समन्स केस ट्रायल आणि वारंट केस ट्रायल हे फौजदारी (Criminal) केस चे दोन प्रकार आहेत. फौजदारी केस चे सर्व कामकाज हे फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) या प्रमाणे चालत असते. समन्स केस ट्रायल आणि वारंट केस ट्रायल ची सर्व प्रक्रिया फौजदारी प्रक्रिया संहिता यात दिलेली आहे.
जेव्हा एखादी गुन्हा घडतो तेव्हा त्याची तक्रार नोंद होते. त्यानंतर पोलिस त्यात चौकशी करतात व गुन्ह्याची न्यायालत संपरीकक्षा (Trial) चालते. याचे दोन प्रकार आहेत एक आहे समन्स केस Trial आणि दुसरी आहे वारंट केस Trial.
वारंट केस ट्रायल म्हणजे यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात. ज्या गुन्ह्या मध्ये शिक्षा दोन वर्षा पेक्षा जास्त असते. किवा आजीवन कारावास किवा मृत्यू दंडाची शिक्षा असते.
वारंट केस ही पोलिस रिपोर्ट किवा तक्रारी नुसार पण होऊ शकते.
वारंट केस मध्ये आरोपी याच्यावर चार्ज फ्रेम करणे अनिवार्य आहे.
वारंट केस मध्ये कोर्टा कडून पहिले वारंटच काढले जाईल असे नाही कोर्ट पहिले समन्स पण काढू शकते.
वारंट म्हणजे कोर्ट हे पोलिसांना काढत असते एखादी आरोपी किवा व्यक्ती याला पकडून आणून कोर्टात हजर करणेसाठी. तसेच कोर्ट आरोपी ची तो राहत असलेल्या जागेची झडती घेण्या साठी देखील वारंट काढू शकते.
वारंट केस यात गंभीर स्वरूपाचे अपराध येतात त्यामुळे यात खरोखरच गुन्हा घडला असे दिसून येत असेल तर जामीन भेटणे अवघड असते.
आता आपण बघू समन्स केस म्हणजे काय ?
समन्स केस म्हणजे यात जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे येत नाही. ज्या गुन्ह्यात दोन वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्या गुन्ह्याची Trial समन्स केस Trial या प्रमाणे चालते.
समन्स केस मध्ये आरोपी त्याचा वकिलांमार्फत देखील हजर होऊ शकतो. त्याला स्वतःला हजर राहण्या साठी सूट भेटू शकते. जो पर्यन्त कोर्ट काही आदेश काढत नाही तो पर्यन्त.
समन्स केस मध्ये Charge sheet चार्ज फ्रेम करणे अनिवार्य नाही.
थोडक्यात समन्स केस म्हणजे यात सादे गुन्हे येतात त्यामध्ये दोन वर्षा पेक्षा जास्त शिक्षा नसते.
वारंट केस म्हणजे यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात जसे तीन वर्षा पेक्षा जास्त किवा जन्मठेप किवा मृत्युदंड.
मित्रांनो मी तुम्हाला समन्स केस आणि वारंट केस ची थोडक्यात माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की समन्स केस आणि वारंट केस म्हणजे काय असते.