दिवाणी दाव्यातील विविध कोणते अर्ज आसतात व पुरसिस म्हणजे काय ?
आज आपण माहिती बघू दिवाणी दाव्यातील दाखल होणारे विविध अर्ज कोणते व पुरसिस म्हणजे काय ?
कोर्टात जेव्हा दाखल झालेल्या दाव्याचे कामकाज चालू असते तेव्हा अनेक प्रकारचे संबंधित अर्ज कोर्टात वेळो वेळी दाखल करावे लागत असतात. काही वेळा वकील हजर नसतात त्या वेळी काही अर्ज हे पक्षकार यांना देखील दाखल करावे लागत असतात. किवा काही अर्ज वादी किवा प्रतिवादी यांचे सही ने दाखल केले जातात.
जेव्हा दिवाणी दाव्यात गैरहाजेरी माफी साठी अर्ज दाखल केला जातो. तर तो अर्ज दिवाणी प्रक्रिया संहिता चे ऑर्डर 17 व रूल 1 प्रमाणे असतो. तसेच फौजदारी केस मध्ये हा अर्ज फौजदारी केस प्रक्रिया संहिता चे कलम 309 प्रमाणे देत असतो. वेगवेगळे अर्ज कायद्यातील नमूद तरतुदी नुसार व वेळेनुसार तसेच गरजे नुसार दाखल करावे लागत असतात.
(आता फौजदारी प्रक्रिया संहिता यात नव्याने बदल होऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अशी झालेली असून हे नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होत आहेत.)
प्रत्येक दाखल होणार्या पुरसिस व अर्जा मध्ये सर्वात वर कोर्टाचे नाव असते. त्यनांनातर खाली केस नंबर असतो. त्यानंतर खाली वादी व प्रतिवादी चे नाव. त्यानंतर अर्ज कोणत्या कायद्या ने व कलमा अन्वये व कशासाठी दाखल केलेला आहे ते लिहावे लागते. त्यानंतर केस / दाव्या ची स्टेज नमूद करावी. ही माहीत प्रत्येक अर्जात थोडी सारखीच असते. पुढे अर्जतील मुख्य मजकूर हा वेगवेगळ्या अर्जा नुसार बदलत असतो. त्यांनातर विनंती नमूद करावी. काही अर्ज पूर्णपने देखील वेगळे राहू शकतात. सर्व अर्ज व पुरसिस मध्ये वरील सुरवातीचा मजकूर थोडा सारखाच असतो. परंतु खालचा मुख्य मजकूर हा बदलत असतो.
त्यानंतर अर्जा मध्ये संबंधित महत्वाची माहिती असेल ती लिहावी लागते. जसे गैरहाजेरी माफी साठी अर्ज असेल तर त्यामध्ये नमूद करावे की, विलंबा माफी का हवी आहे ? काय कारण आहे, जसे पक्षकार हजर नाही, वकील साहेब हजर नाही, जे काही कारण असेल ते नमूद कारवे. कोर्टात हजर राहणे का शक्य नाही ते नमूद करावे. त्यानंतर पुढील तारीख मिळावी असे नमूद करून पुढे विनंती लिहावी. व खाली डाव्या बाजूस तारीख व ठिकाण टाकावे व सही करावी. हा विनंती अर्ज असून यास 10 रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प तिकीट लावणे गरजेचे असते. कोणताही विनंती अर्ज असला म्हणजे त्यास योग्य ते तिकीट लावणे गरजेचे असते.
फौजदारी केस मध्ये ज्यावेळी आरोपी गैरहजर असतो त्यावेळी आरोपी च्या गैरहाजेरी मध्ये केस चे कामकाज चालवणे कमी अर्ज दाखल करावा लागतो. अशा हा अर्ज देखील वरील प्रमाणे सांगितल्या नुसार लिहावा योग्य ते तिकीट लावावे.
ज्यावेळी वकील साहेब व आरोपी देखील केस चे कमी नेमलेल्या तारखेस हजर राहू शकणार नसतील त्या वेळी कामकाज तहकूब होऊन पुढील तारीख नेमणे कमी अर्ज दाखल करावा लागतो.
कधी कधी केस मधील साक्षीदार उपस्थित नसतात त्यावेळी देखील कोर्टात पुढील तारीख मिळने कमी अर्ज दाखल करावा लागतो. त्या अर्जा मध्ये नमूद करावे की, आज रोजी सदर केस मधील साक्षीदार उपस्थित नसलेने पुढील तारीख मिळावी व सविस्तर कारण नमूद करावे.
कधी कधी पुरावे उपलब्ध नसतात त्यांसाठी मुदत मिळणे कमी अर्ज द्यावा लागतो.
एखादी केस मध्ये एखादी पक्ष हजर राहत नसेल किवा काही कागदपत्रे दाखल करत नसेल तर त्यासाठी अर्ज दाखल करावा लागू शकतो. प्रकरण बोर्डावर घेणे कमी अर्ज द्यावा लागतो.
जर दाव्यात प्रतिवादी समन्स मिळून देखील प्रतिवादी हजर राहत नसेल तर एक तर्फा आदेश होणे कमी अर्ज दाखल करावा लागतो. मुदतीत प्रतिवादी याने त्याची कैफियत व म्हणणे कोर्टात दाखल केले नाही तर बिना कैफियत आदेश (No Ws) ऑर्डर होणे कमी अर्ज वादीला द्यावा लागतो.
केस मध्ये महत्वाचे दस्त दाखल करणे असतील, केस लॉं दाखल करणे असेल तर त्यासाठी परवानगी अर्ज दाखल करावा लागतो. त्यामध्ये नमूद करावे लागते की आज रोजी वादी किवा प्रतिवादी जो असेल तो आज रोजी महत्वाचे दस्त केस मधील दाखल करत आहे. ते दस्त केस कमी महत्वाचे असून ते दाखल करनेस परवानगी असावी हे त्या अर्जात नमूद करावे.
दिवाणी दाव्यातील Ex Party Order व No Say Order म्हणजे काय ?
![]() |
Click here to see post |
आता आपण बघू पुरसिस म्हणजे काय ?
अर्ज आणि पुरसिस यातील फरक समजून घेणे करिता आपण अर्ज आणि पुरसिस मधील फरक काय आहे ते बघू.
जो विनंती अर्ज असतो त्याद्वारे आपण कोर्टस विशिष्ट मागणी करत असतो. पुरसिस ही केस मधील किवा दाव्या मधील एखादी माहिती कोर्टस कळावी यासाठी द्यावी लागते. पुसीस ही अर्जा प्रमाणेच लिहावी लागते. त्यात नमूद करावे की, वादी की प्रती वादी तर्फे पुरसिस आहे.
पुरसिस या अनेक प्रकारे असतात. जसे की, केस मधील पुरावा बंद करण्याची पुरसिस. वादी किवा प्रतिवादी ची पत्ता पुरसिस. वादी व प्रतिवादी मध्ये तडजोड झाल्या बाबतची पुरसिस. दाव्यातील एखादी प्रतिवादी मयत झाला असेल तर त्याची पुरसिस. ही सर्व माहिती कोर्टस कळावी यासाठी वेळो वेळी केस मध्ये वेगवेगळ्या पुरसिस दिल्या जात असतात. कोणत्याही प्रकारच्या पुरसिसला कोणताही स्टॅम्प अथवा तिकीट लागत नाही. त्यामुळे पुरसिस मध्ये फक्त माहिती असणे गरजेचे आहे.