प्रतिदावा / काउंटर क्लेम म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0





प्रतिदावा / काउंटर क्लेम म्हणजे काय ? 


  मित्रांनो आज आपण माहिती बघू प्रतिदावा (Counter Claim) म्हणजे काय ? 


आपण प्रतिदावा (Counter Claim) हा शब्द बर्‍याच वेळा एकला असेल. काउंटर क्लेम बाबत ची तरतूद ही दिवाणी प्रक्रिया संहिता च्या ऑर्डर 8 रूल 6 A ते 6 G यामध्ये दिलेली आहे. 


वादी ने जर प्रतिवादी विरूद्ध कोर्टात दावा दाखल केल तर त्या दाव्यास प्रतिवादी हा काउंटर क्लेम दाखल करू शकतो.


 वादी ने प्रतिवादी विरुद्ध काही मागणी करणेसाठी किवा काही कारणा साठी दावा दाखल केला व प्रतिवादीचे पण काही त्याच वादाशी व दाव्याशी संबधित वादीकडे काही घेणे आहे किंवा कारण घडले आहे तर त्यासाठी प्रतिवादी हा वादी विरुद्ध काउंटर क्लेम दाखल करू शकतो. 


उदा. योगेश ने तुषार विरुद्ध दावा दाखल केला आणि दाव्यात नमूद केले की माझे तुषारकडे रक्कम रुपये 5,000/- मात्र घेणे आहे. 

    प्रतिवादी तुषार याचेच जर योगेश कडे 10,000/- मात्र घेणे बाकी आहे. यासाठी तुषार ला योगेश विरूद्ध दूसरा दावा दाखल करण्याची गरज नाही. 


प्रतिवादी तुषार हा वादी योगेश विरुद्ध प्रतिदावा दाखल करू शकतो व त्यात नमूद करू शकतो की माझे वादी कडे  10,000/- मात्र घेणे बाकी आहे त्यामुळे वादी ने त्याचे 5,000/- रुपये काढून घ्यावेत व माझे 5,000/- रुपये माला परत देऊन द्यावे. 


6A. Counter - Claim By Defendant :-


Counter-claim by defendant.-(1) A defendant in a suit, in addition to his right of pleading a set-off under rule 6, may set up, by way of counter-claim against the claim of the plaintiff, any right or claim in respect of a cause of action accruing to the defendant either before or after the filing of the suit but before the defendant has delivered his defence and before the time limited for delivering his defence has expired, whether such counter-claim sounds in damages or not.


जेव्हा वादी हा प्रतिवादी विरूद्ध दावा दाखल करतो तेव्हा प्रतिवादी हा त्याच्या (Written Statement) प्रतिवादपत्रा मध्ये काउंटर क्लेम देखील करू शकतो. वादी च्या दाव्याने तसे काउंटर क्लेम करण्याचे कारण घडत असेल तर प्रतिवादी हा वादी विरूद्ध काउंटर क्लेम दाखल करू शकतो. काउंटर क्लेम हा प्रतिवादीस मुदत कायद्या ला आधीन  राहून दाखल करावा लागतो. 


(2) Such Counter Claim shall have the same effect as a cross suit so as to enable the Court to pronounce a final judgement in the same suit, both on the original claim and on the counter claim. 


    यानुसार  काउंटर क्लेम तसाच असतो जसा की वादी चा दावा असतो. म्हणजेच वादी हा प्रतिवादी विरूद्ध जो दावा दाखल करतो त्याच प्रमाणे हा काउंटर क्लेम कोर्टाकडून विचारात घेतला जातो. 


(3) The plaintiff shall be at liberty to file a written statement in answer to the counter claim of the defendant within such period as may be fixed by the Court. 


    या नुसार प्रतिवादी च्या या काउंटर क्लेम ला वादी याने कैफियत (Written Statement) द्यायचे असते. ही कैफियत कोर्टाने ठरवून दिलेल्या वेळेत दाखल करायची असते. 


(4) The counter claim shall be treated as a plaint and governed by the rules applicable to plaints. 


    या नुसार काउंटर क्लेम हा दाव्या सारखाच मानला जातो. आणि दाव्यस जो कायदा लागू होतो तोच कायदा काउंटर क्लेम ला देखील लागू होतो. काउंटर क्लेम हा दाव्या सारखाच असतो.  आणि  वादी कडून काही मागणी असेल तर प्रतिवादीस वेगळा दावा दाखल करावा लागत नाही. प्रतिवादीस त्या वादीच्या दाव्यामध्ये स्वता:ची मागणी काउंटर क्लेम द्वारे करता येते. 


काउंटर क्लेम आणि मुदत अधिनियम : -

आपण वर बघितले काउंटर क्लेम बाबत तरतूद ही दिवाणी प्रक्रिया संहिता चे (ऑर्डर आठ रूल सहा ए ते जी) या मध्ये तरतूद नमूद आहे. परंतु यामध्ये कोठेच मुदत (Limitation) बाबत नमूद नाही. परंतु जर प्रतिवादीने त्याच्या मागणीसाठी दावा दाखल केला असता तर तो दावा दाखल करणेसाठी जी मुदत कायद्या नुसार राहते तेव्हढीच मुदत काउंटर क्लेम दाखल करणे कमी राहते. 


वादीचा दावा दाखल झाल्यावर ज्या मुदती मध्ये प्रतिवादी आपले म्हणणे (Written Statement) कोर्टात दाखल करतो शक्यतो त्याच मुदतीत प्रतिदावा देखील दाखल करावा. काउंटर क्लेम हा दाव्यातील मुद्दे काढणे च्या आधीच दाखल करावा. असे कोर्टाने पूर्वीच्या न्यायनिर्णयात म्हटलेले आहे. काउंटर क्लेम जास्त उशिरा दाखल केला तर प्रतिवादीला काही अडचणी देखील येऊ शकतात. त्यामुळे वेळेत दावा असो का प्रतीदावा दाखल करावा. 


काउंटर क्लेम हा स्वतत्र दाव्यासारखाच असतो. कोर्टाने जरी वादी च्या दावा काढून टाकला किवा रद्द केला तरी प्रतिवादीचा काउंटर क्लेम चालू शकतो. ते केस च्या परिस्थिती व मुद्द्या नुसार तसेच कागदपत्रे, पुरावे, केस काशी चालते यावर अवलंबून असू शकते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads