कोर्टातील निशाणी क्रमांक म्हणजे काय ?
आपण जर कोर्टात कधी आपल्या कामा निमित्त गेला असाल किवा तुमचा कोर्टात दावा किवा केस दाखल असेल तर आपण निशाणी नंबर हा शब्द एकला असेल. निशाणी क्रमांक यालाच इंग्रजीत Exhibit Number असे म्हणतात.
कोर्टामध्ये अनेक दावे, केसेस, अर्ज दाखल होत असतात आणि या केसेस मध्ये वादी व प्रतिवादी हे अनेक कागदपत्रे दाखल करत असतात. जेव्हा कोर्टा द्वारे कोणतेही कागदपत्रे हे केस मध्ये दाखल करून घेतले जातात किवा पुराव्याचे काही कागदपत्रे किवा साहित्य दाखल केले जाते तेव्हा कोर्ट हे त्या प्रत्येक दस्ताला निशाणी क्रमांक देते. कोर्टा कडून दस्त दाखल करून घेतल्या नंतर जो दस्ताला नंबर दिला जातो त्यालाच निशाणी क्रमांक असे म्हातात.
कागदपत्रांना, दस्तेएवज यांना निशाणी क्रमांक दिल्याने कोणता दस्त कोणत्या नंबरला आहे हे बघणे व त्याला सापडवणे हे सोपे होऊन जाते. त्यामुळे तो दस्त अचूकतेचे शोधता येतो. दस्त हा दाखल करून घेण्यात आला तरच त्याला निशाणी क्रमांक देण्यात येतो.
कोर्ट कर्मचारी, वकील, न्यायाधीश यांना केस चे रोजचे कामकाज करणे देखील सोपे होऊन जाते. कोर्टात दाखल होणारे दावे, अर्ज, केस हे दाखल करतांना देखील काही कागदपत्रांचे निशाणी क्रमांक निश्चित असतात म्हणजे त्या क्रमाणेच दस्त जोडावे लागतात. त्यामुळे सर्वत्र कोर्टाच्या कामात समानता देखील असते.
निशाणी क्रमांक एखादी केस मधील दाव्यातील प्रत्येक कागदाला वेळवेगळा असतो. असे कधीही होत नाही की दोन वेगवेगळ्या कागदपत्रांना किवा दस्ताना एकच निशाणी नंबर दिला गेला. त्यामुळे केस मध्ये जितके देखील कागदपत्रे असतील त्यांना निशाणी क्रमांक देण्यात येतो.
दावा दाखल करतांना प्रत्येक दाव्यात निशाणी क्रमांक 1 ते 5 हे जवळ जवळ सारखेच असतात.
निशाणी क्रमांक - 1
निशाणी क्रमांक 1 ला वादी चा दावा असतो. वादी चा दावा हा केस मधील पहिला कागद असतो त्यामुळे त्याला निशनी क्रमांक 1 देण्यात येतो.
निशाणी क्रमांक - 2
निशाणी क्रमांक 2 ला येते वकीलपत्र (वकलतनामा), काही कोर्टा मधील कामकाजाच्या पद्धतीत थोडाफार बादल असतो त्यामुळे निशाणी क्रमांक -2 ला दाव्याचे शपथपत्र असू शकते.
निशाणी क्रमांक - 3
निशाणी क्रमांक 3 ला येते (List of Documents) दस्त यादी. म्हणजे दाव्यासोबत जे काही कागदपत्रे जोडलेले आहेत ते दस्त यादी तयार करून निशाणी क्रमांक - 3 ला जोडले जातात.
यानंतर पुढे निशाणी क्रमांक 4 ला येते वादी ची पत्ता पुरसिस. (भविष्यात कोर्टला वादीला काही नोटिस द्यायची असेल तर त्यासाठी वादी चा पत्ता द्यावा लागतो त्यास पत्ता पुरसिस असे म्हणतात.) त्यानंतर निशाणी क्रमांक 5 ला तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल केला जातो.
वादी दावा दाखल करतो तेव्हा तात्पुरता मनाई हुकूमचा अर्ज हा निशाणी क्रमांक 5 ला असतो. त्यामुळे त्याला निशाणी क्रमांक 5 चा अर्ज असे देखील म्हणतात. वादीने जर दाव्यात तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल केला नाही तर त्या जागी दूसरा जो दस्त आहे त्यास निशाणी क्रमांक देण्यात येईल.