कोर्टामधील तसेच ई कोर्ट App वरील काही शब्द व त्यांचे अर्थ.

Adv.Saurabh Rajput
0


कोर्टातील तसेच रोजनामा व ई कोर्ट App वरील  काही शब्द  व  त्यांचे  शॉर्ट फॉर्म्स व त्यांचे अर्थ. 


आज आपण माहिती पाहू कोर्टातील काही कामकाजा संदर्भातील शब्द त्यांचे अर्थ व त्यांचे शॉर्ट फॉर्म्स. 


बर्‍याच वेळा आपले कोर्टात केस संबंधात काही कामकाज असते त्यामुळे आपण कोर्टात किवा वकिलांच्या कार्यालयात जातो. तिथे आपल्याला आपल्या केस संदर्भात कामकाजा संदर्भातील अनेक नवीन कोर्टाचे शब्द एकण्यास मिळतात. तसेच आपण आपल्या केस ची माहिती ऑनलाइन कोर्ट वेबसाइट किवा कोर्टाच्या मोबाइल App ला बघत असतो तेव्हा देखील आपल्याला कोर्ट कामकाजाच्या बर्‍याच शब्दांचा अर्थ समजत नाही. तसेच वकील, त्यांचे जूनियर, कोर्टातील कर्मचारी हे  केस संबंधित आपसात बोलतात तेव्हा ते काही शब्द व त्यांचे काही Short Forms वापरुन ते शब्द बोलत  असतात. त्यामुळे ते काय बोलत आहे हे  आपल्याला समजत नाही. तसेच आपण जेव्हा कोर्टाच्या ई केस App वर कोर्टाच्या केस ची माहिती व केस चा रोजनमा बघतो तेव्हा आपल्याला  रोजनाम्यातील  काही शब्द व त्यांचे अर्थ समजत नाहीत. त्यामुळे आज आपण माहिती पाहू कोर्टातील काही महत्वाचे  शब्द, त्यांचे अर्थ व त्यांचे शॉर्ट फॉर्म्स. 


V.P. -   वकीलपत्र, जेव्हा कोर्टात नवीन केस दाखल करावी लागते त्यासाठी  वकीलपत्र हे पक्षकारचे वकिलांना दिलेले अधिकारपत्र असते. याला वाकालतनामा असे देखील म्हणतात. त्यावर पक्षकारला केस दाखल करण्यापूर्वी त्यांची सही करावी लागते. 


E.P . -   Execution Petition म्हणजेच याला मराठी दारखास्त असे म्हातात. जेव्हा कोर्टात दरखास्त दाखल करायची असेल तेव्हा म्हटले जाते की E.P . -   Execution Petition दाखल करायची आहे. 


DH - म्हणजे दारखास्त मधील Decree Holder -यालाच धनको असो म्हणतात. ( धनको म्हणजे कर्ज देणारा.) 


JD - म्हणजे दारखास्त मधील Judgement Debtor - यालाच ऋणको असे म्हणतात. ( ऋणको म्हणजे कर्ज घेणारा.) 

ज्याने दरखास्त दाखल केलेली आहे त्याला  D.H. म्हणजेच Decree Holder असे म्हणतात. आणि ज्याच्या विरूद्ध दरखास्तीचा आदेश झालेला आहे त्याला J.D. म्हणजेच Judgement Debtor असे म्हणतात.  

ज्यावेळी फौजदारी केस मध्ये आरोपीस हजर राहण्यास समन्स काढले जाते. जर समन्स पाठवून देखील आरोपी हा कोर्टात हजर झाला नाही तर त्याला BW काढले जाते. BW म्हणजे Bailable Warrant. 


त्यानंतर देखील आरोपी हा कोर्टात हजर झाला नाही तर त्याला NBW काढले जाते. NBW म्हणजे Non Bailable Warant. त्यालाच अजामीनपात्र पकडण्याचे वारंट असे म्हणतात. 


ई कोर्ट App मध्ये केस ची माहिती बघितल्यावर केस च्या स्टेज नुसार दिसते की  NBW --Ready,  NBW --Unready त्यामुळे बर्‍याच लोकांना वाटते की  वारंट NBW Unready म्हणजे वारंट अजून तयार केलेले नाही. त्यामुळे ते निश्चिंत बसतात. त्यांना याचा अर्थ समजत नाही त्यामुळे यातील फरक व अर्थ देखील आपण समजून घेऊ. 


  रेडी आणि अनरेडी म्हणजे काय ? 


कोणत्या ही केस ला दोन प्रकार असतात एक असते रेडी प्रकरण आणि दुसरी असते अनरेडी प्रकरण. रेडी आणि अनरेडी बोर्ड हे दिवाणी दाव्यात देखील पाहावयास मिळतात. तसेच फौजदारी केसेस मध्ये देखील पाहावयास मिळतात.


 सरकारी  फौजदारी केस मध्ये बघितले तर ज्या वेळी चार्जशिट कोर्टा समोर पोलिसांतर्फे दाखल केले जाते त्यावेळी आरोपीवर चार्ज ठेवणे गरजेचे असते. 


चार्ज ठेवणे म्हणजे ज्या गुन्ह्या च्या अनुषंगाने आरोपी वर कलमे लावली गेलेली आहे ते निश्चित करणे तसेच आरोपीस विचारले जाते की त्याला गुन्हा काबुल आहे. जर आरोपी याने गुन्हा काबुल केला तर त्याला कायद्या मध्ये नमूद शिक्षा दिली जाते ती व केस निकाली निघून जाते म्हणजे Dispose होऊन जाते. 


परंतु जर आरोपी ने गुन्हा नाकाबुल केला तर व म्हटले की, गुन्हा ना काबुल आहे, गुन्हा काबुल नाही. तर अशा वेळेस ती केस पुढे चालते. जो पर्यन्त आरोपी वर चार्ज ठेवले जात नाही तो पर्यन्त ती केस अनरेडी बोर्ड वर असते. आणि आरोपी वर हा चार्ज ठेवण्यासाठी प्रथम त्यास समन्स काढले जाते. त्यानंतर BW बेलेबल वारंट काढले जाते. त्यानंतर देखील आरोपी हजर झाला नाही तर NBW Non Bailable वारंट काढले जाते. आणि हे प्रकरण अनरेडी बोर्ड वर असल्याने आपल्याला ऑनलाइन App वर केस ची स्टेज NBW Unready अशी दिसते. 


जेव्हा आरोपी वर चार्ज ठेवला जातो आणि केस पुढे चालते तेव्हा  आपल्याला केस ची स्टेज ऑनलाइन App ला Ready अशी दिसते. 


मराठी मध्ये अनरेडी बोर्ड ला तजबीज बोर्ड असे म्हणतात व रेडी बोर्ड ला चौकशी बोर्ड असे म्हणतात. 


ही सर्व माहिती झाली ज्या फौजदारी केस मध्ये फिर्‍यादी महाराष्ट्र शासन असते. 


BW, NBW असे  खाजगी फौजदारी केस मध्ये देखील जास्त करून बघावयास मिळते. त्यामुळे आपण (Cheque Bounce) धनादेश अनादारीत या केस मधील ही प्रक्रिया कशी असते ते बघू.  


धनादेश अनादारीत केस मध्ये BW आणि NBW, BW Ready आणि UnReday म्हणजे काय ते बघू. 


चेक Bounce म्हणजेच धनादेश अनादारीत या केस मध्ये फिर्यादीने   फिर्याद म्हणजेच केस दाखल केली की सर्वात आधी केस चे सत्यपान (Verification) केले जाते. त्यानंतर केस मधील आरोपीस समन्स काढण्याचा आदेश होतो. 


आरोपी हा समन्स काढून देखील कोर्टात हजर झाला नाही तर कोर्टा कडून आरोपीस BW काढले जाते. व  Unready बोर्डाला असलेली ही केस ई केस App ला BW_Unreaday अशी दिसते. 


आरोपी हा BW ला देखील कोर्टात हजार झाला नाही तर त्याला NBW काढले जाते. आणि ही स्टेज आपल्याला NBW_Unready अशी दिसते. 


ज्यावेळेस आरोपी ची Plea होते त्यावेळेस ही केस Unready Board वरून  Ready Board वर जाते. त्यावेळी जर आरोपी हा केस चे कमी गैरहजर राहत असेल तर अशा  वेळेस कोर्ट त्या आरोपीस NBW काढतात तेव्हा ही स्टेज ई कोर्ट App ला NBW_Ready अशी दिसते. 


आता आपण पाहू First Order - 


फौजदारी केस असो किवा दिवाणी केस असो सर्वात आधी त्या केस मध्ये कोर्टाची पहिली स्टेज येते ती म्हणजे Order होत असते. त्यास First Order असे म्हणतात कारण ती पहिली ऑर्डर असते. कोणत्याही केस मध्ये प्रथम आदेश  (First Order) घेणे महत्वाचे असते.  कारण प्रथम आदेश झाला म्हणजे केस ची सुरुवात होत असते. 


दिवाणी दाव्या मध्ये प्रतिवादीस दाव्याचे समन्स व वादीने जर तुरतातूर्त मनाई हुकूमचा अर्ज दाखल केला असेल तर त्याची  करणे दाखवा नोटीस काढण्यात यावी तसेच पुढील तारीख काय ठेवण्यात आलेली आहे या बाबत पहिला आदेश होतो. 


त्याच प्रकारे फौजदारी केस मध्ये पहिली ऑर्डर दोन प्रकारे असू शकते. फौजदारी केस  जर सरकारी असेल तर चार्ज शिट वर असा आदेश केला जातो की Issue summons to the accuse  म्हणजे आरोपीस समन्स काढण्यात यावे अशी पहिली ऑर्डर असू शकते. 


समजा Negotiable Instrument Act Section 138 म्हणजेच चेक बाऊन्स ची जर केस असेल, तर यात केस मध्ये  पहिली ऑर्डर Verification ची होत असते. 


आणखी एक स्टेज WS. आणि Say म्हणजेच म्हणणे किवा कैफियत अशी देखील असते.  


वादी जेव्हा दिवाणी दावा दाखल करतो त्यानंतर प्रतिवादीस दाव्याचे समन्स काढले जाते.  दावा प्रतिवादी च्या विरूद्ध असल्याने प्रतिवादी ला त्या दव्यावर काय म्हणणे आहे. विरोध आहे हे म्हणणे कैफियत दाखल करून कोर्टस सांगावे लागते. वादी ने जे काही दाव्यात कथन केलेले आहे त्यामध्ये जे अमान्य आहे ते प्रतिवादीने अमान्य करावे लागते. 


दावा दाखल झाल्यानंतर दाव्याच्या समन्स ची बजावणी प्रतिवादीस  झाली की त्यास त्याचे म्हणणे व कैफियत द्यावे लागते ही स्टेज असते. ही स्टेज आपल्याला ई कोर्ट या App वर पाहावयास मिळते. या तीन स्टेजेस एका पाठोपाठ एक नेहमीच बघावयास मिळतात. 


1) Say On Exhibit --------- Unready 

2) Argument On Exhibit -------- Unready 

3) Order On Exhibit ------------ Unready 


या तीन स्टेजेस एका पाठोपाठ एक असतात. 


  या सर्व स्टेजेस समजण्यासाठी Exhibit, Ready, Unready काय असते हे मी संगीतलेलेच आहे. Exhibit म्हणजे काय हे पुन्हा एकदा थोडक्यात  काय तर, जेव्हा कोणताही पक्षकार एखादी केस मध्ये काही कागद पुराव्यात वाचण्यासाठी दाखल करत असेल तर जेव्हा तो कागद कोर्टात दाखल करून घेण्यात येतो तेव्हा तो कागद एक संकेत अंकाने ओळखता यावा व त्याला एक विशिष्ट नंबर असावा यासाठी कोर्ट त्याला एक निशाणी नंबर देते. त्यास (Exhibit Number) निशाणी क्रमांक असे म्हणतात. त्यास Shortcut मध्ये Exh. असे देखील लिहिले जाते. 


या वरील तीनही केसेस आपल्याला निट समजाव्यात यासाठी एक उदाहरण बघू. 


उदा. जर वादी ने प्रतिवादी विरूद्ध दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्यात प्रतिवादीने कोर्टात दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रूल 11 चा  अर्ज दिला. (दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 व रूल 11 चा आदेश यासाठी असतो की वादीचा दावा प्राथमिक स्टेज ला काढून टाकण्यात यावा) यासाठी बर्‍याच तरदूती आहेत. 


 ( जर वादीने कमी व चुकीची कोर्ट फी भरली असेल, गरजेचे पक्षकार दाव्यात समाविष्ट नाही केले वगैरे असे  बरेच करणे असू शकतात. ही गोष्ट प्रतिवादीने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली तर कोर्ट वादीचा दावा प्राथमिक स्टेज ला काढून टाकू शकते.) 


प्रतिवादीने सदर अर्ज कोर्टात दाखल केल्यावर त्या अर्जास कोर्टात निशाणी क्रमांक लागेल. त्यनंतर कोर्टने वादी चे म्हणणे मागवले तर ई कोर्ट App वर ही स्टेज Say On Exh ------ Unready Board अशी दिसेल. 


प्रतिवादीच्या अर्जास वादीचे म्हणणे आले त्यावर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला मग त्यावर कोर्ट ऑर्डर करेल. त्यानंतर ई कोर्ट App वर स्टेज दिसते Order On Exhibit ---- Unready  आणि मग त्या अर्जावर कोर्टातर्फे आदेश केला जातो. 


आता आपण बघू पुढची स्टेज Issue - ही देखील दाव्यातील महत्वाची स्टेज आहे. Issue म्हणजे मुद्दे. कोर्ट वादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत पाहून दोघांमध्ये विरोधाभासीत असणार्‍या बाबींच्या अनुषंगाने मुद्दे काढतात.  त्या मुद्द्यांना वादी आणि प्रतिवादी यांनी दाव्या मध्ये पुढे पुरावे देऊन सिद्ध कारचे असते. 


त्यानंतर पुढील स्टेज येते पुरावा म्हणजेच Evidence किवा Hearing ची. 

कोर्टाकडून मुद्दे काढले गेल्यावर ते वादी आणि प्रतिवादी यांना पुरावे देऊन सिद्ध करावयाचे असतात. कोर्ट जेव्हा मुद्दे काढते ते असे देखील सांगू शकते की कोणता मुद्दा कोणी सिद्ध करायचा आहे. जसे मुद्दा आहे की - वादी ही सिद्ध करतो का की दावा मिळकत ही त्याची वडीलोपार्जित मिळकत आहे. तर या ठकणी ती मिळकत वादीची वडीलोपार्जित मिळकत आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी वादी वर आहे. 


त्यानंतर असा मुद्दा असेल की दावा मिळकतीवर प्रतिवादीचा कब्जा आहे का ? तर या ठिकाणी कब्जा प्रतिवादीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही प्रतिवादीवर असते. 


यासाठी पुरावा वादीचा असो किवा प्रतिवादीचा ही स्टेज आपल्याला ई कोर्ट App वर Evidence अथवा Hearing अशी दिसेल. 


दाव्यात अजून एक स्टेज असते ती म्हणजे स्टेप (Step)  -


  ज्यावेळी दाव्यात अशी काशी परिस्थिती निर्माण झालेली असते की दाव्यातील पक्षकारणे कोर्टसमोर काही अर्ज देणे आणि त्याद्वारे दाव्याचे कामकाज पुढे चालवण्याचे असते त्यावेळी आपल्याला ही स्टेज पाहावयास मिळते.


 उदा. दाव्यात दोन प्रतिवादी आहेत आणि त्यापैकी एक प्रतिवादीस दाव्याच्या समन्स ची बजावणी झालेली आहे. परंतु जो दूसरा प्रतिवादी आहे त्यास समन्स ची बजावणी होतच नाही आहे. आणि त्यामुळे संपूर्ण दाव्याचे कामकाज थांबलेले असते. मग अश्या वेळेस वादीने समन्स दुसर्‍या प्रकारे देणे साठी अर्ज देणे  महत्वाचे असते. आणि यालाच दाव्यात वादीने पुढील स्टेप घेणे म्हटले जाते. आणि ई कोर्ट App वर ही स्टेज दिसत असेल तर अश्या वेळेस त्या दाव्यात वादी किवा प्रतिवादीने दाव्यात पुढील स्टेप घ्यावयाची असते. 


बर्‍याच वेळेस असे देखील होते की दाव्यात वादी किवा प्रतिवादी पुढील स्टेप घेताच नाही आणि दावा काढून देखील टाकला जातो. 


उदा. वादीचा कोर्ट कमिशन चा मोजणीचा अर्ज मंजूर झालेला आहे मग कोर्ट कमिशन चे कामकाज तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय यांचेकडे कोर्टा तर्फे पाठवणे गरजेचे असते. 


या कोर्ट कमिशन च्या कागदांमध्ये वादीचा अर्ज असतो. कोर्टाने वादीचा कोर्ट कामिशनचा अर्ज मंजूर केलेला आदेश असतो तसेच दावा मिळकती सांधर्भातील 7/12 उतारे असतात. 


हे सर्व कागदपत्रे वादीने जुळवाजुळव करून ते संबधित टेबल क्लार्क याचेकडे देणे व पाठवणे गरजेचे असते. याला आपण कागदपत्रांची पूर्तता करणे म्हणजेच Compliance करणे असे म्हणत असतो. 


ही पूर्तता झाल्यानंतर कोर्टातर्फे कोर्ट कमिशन चे कामकाज पुढे पाठवले जाते. त्यामुळे पूर्तता करणे महत्वाचे आहे. 


फौजदारी केस च्या बाबतीत Hearing Before Charge किवा Evidence Before Charge अशी स्टेज असते. ही स्टेज फक्त प्रायवेट तक्रारी मध्ये बघायला मिळते. 


याचा मराठी अर्थ असतो की एखादा गुन्हा दोषारोप आरोपीवर ठेवण्या अगोदर फिर्यादी चा घेतलेला पुरावा.  


कारण सरकारी केस मध्ये तर Charge Sheet म्हणजेच दोषारोप पत्र हे पोलिसांकडून तयार होऊन येते. 


आणि खाजगी केस (Private Complaint) आपण तेव्हाच दाखल करतो ज्यावेळेस पोलिस आपली FIR किवा NC नोंद करून घेत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असतील तर ते कोर्टात दाखल करावे लागतात. आणि आपण हे पुरावे आरोपीवर चार्ज लागण्या अगोदर द्यावयाचे असल्याने त्याला Evidence Before Charge असे म्हणतात. किवा Before Charge असे म्हणतात. ही स्टेज ई कोर्ट App वर अशीच दिसते. 


ही माहिती वाचल्यावर आपल्याला कोर्टा च्या काही शब्दांचे अर्थ व त्याचे शॉर्ट फॉर्म्स समजून जातील. तसेस कोर्ट रोजनमा म्हणजे कोर्टात रोजचे केस चे काय कामकाज झाले हे व  ई कोर्ट App वर केस मध्ये  कोर्टाच्या स्टेजेस व काय कामकाज झाले हे समजण्यास मदत होईल. 


इतर ब्लॉग पोस्ट :-


E -  Court Mobile Application


Click Above To See Blog Post 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads