दिवाणी दाव्यातील Ex Party Order व No Say Order म्हणजे काय ?
वादी जेव्हा कोर्टात दावा दाखल करतो त्यानंतर प्रतिवादीस कोर्टाचे समन्स पाठवले जाते व दाखल केस मध्ये प्रतिवादीस हजर होऊन त्याला त्याचे म्हणणे कोर्टात दाखल करावे लागते. कारण वादी ने दावा दाखल केला म्हणजे प्रतिवादीचे त्यावर म्हणणे एकूण घेणे हे कायद्या च्या तरतुदी नुसार गरजेचे व महत्वाचे आहे.
वादी व प्रतिवादीचे म्हणणे एकल्यावर, कागदपत्रे व पुरावे बघून कोर्ट न्यायनिर्णय देत असते. त्यामुळे दावा दाखल झाला म्हणजे प्रतिवादीस त्या दाव्याचे समन्स पाठवले जाते. त्यामध्ये दावा कोणी दाखल केला आहे ? दाव्याची पुढील तारीख काय आहे ? नमूद तारखेस बचावा बाबत काही कागदपत्रे व पुरावे असतील तर ते घेऊन कोर्टात स्वत: किवा वकिलांमार्फत उपस्थित राहण्या साठी कोर्टाने आदेश केलेला असतो. हे समन्स कोर्टाचे बेलीफ यांचे मार्फत प्रतिवादीस बजावले जाते.
बेलीफने प्रतिवादीस समन्स ची बजावणी केली आणि तसा बजावणी झाल्याचा रिपोर्ट कोर्टासमोर आला म्हणजे समन्स ची बजावणी झाली असे म्हटले जाते.
समन्स मिळून असे होऊ शकते की, एक तर प्रतिवादी कोर्टात हजर होईल किवा हजर होणार नाही. परंतु बर्याच वेळा असे देखील होते की, प्रतिवादी हा कोर्टाचा समन्स मिळून देखील हजर होत नाही.
असे देखील होते की, कोर्टाचा समन्स मिळाला म्हणजे प्रतिवादी कोर्टात हजर होतो परंतु पुढील तारखेस कोर्टात हजर होत नाही व नंतर परत कोर्टात येत नाही.
जर प्रतिवादीस समन्स मिळाला व तो कोर्टात हजर झाला नाही तर त्या प्रतिवादी विरूद्ध दावा एकतर्फा चालवला जातो. त्या प्रतिवादी विरूद्ध एकतर्फा दावा चालविणे बाबत आदेश पारित केला जातो. वादी चा एकट्याचा पुरावा बघून दाव्याचा न्यायनिर्याण दिला जातो.
प्रतिवादीस दाव्याचे समन्सची बजावणी झाल्या पासून मुदतीत कैफियत (Written Statement) दाखल करावे लागते. प्रतिवादी कोर्टात हजर झाल्यावर त्याने मागणी केल्यास ही मुदत वाढवून भेटते.
प्रतिवादीस दाव्याचा समन्स मिळाला व तो पहिल्या तारखेस हजर झाला असेल व वादीच्या दाव्यास म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली असेल परंतु नंतर परत हजर झाला नाही व त्याचे म्हणणे मुदतीत कोर्टात दाखल करत नसेल तर त्या प्रतिवादी विरुद्ध तो दावा बिना कैफियत चालवण्यात येतो. म्हणजे प्रतिवादीचे म्हणणे न घेता वादी च्या दाव्या व पुरवव्या नुसार तो दावा पुढे चालवला जातो.
वादी हजर होत नसेल किवा मुदतीत त्याने त्याचे म्हणणे दाखल केलेले नसेल व कोर्टाने Ex Party Order किवा No Say Order आदेश केला नसेल तर वादी च्या वकिलांनी तसा आदेश होणेसाठी कोर्टस तोंडी किवा तसा लेखी अर्ज देऊन विनंती करावी.
जर एखादी दाव्या मध्ये अनेक प्रतिवादी आहेत आणि समन्स मिळून काही प्रतिवादी हजर झाले व काही झाले नाहीत तर जे प्रतिवादी हजर झाले नाही त्यांच्या विरुद्ध एक्स पार्टी किंवा बिना कैफियत आदेश पारित होईल.
जर प्रतिवादीला मुदतीत वेळेत काही खरे करना मुळे कोर्टात हजर राहता आले नाही आणि त्याच्या विरुद्ध Ex Party Order किवा No Say Order असा आदेश होऊन गेला. त्यानंतर प्रतिवादी कोर्टात हजर झाला तर तो कोर्टात झालेला आदेश रद्द होणे कमी व उशीर झाल्याबाबत विलंब माफी मिळणे साठी अर्ज दाखल करू शकतो. प्रतिवादी ने हा अर्ज कोर्टात दाखल केला म्हणजे कोर्ट त्यावर वादी चे काय म्हणणे आहे ते मागवण्याचा आदेश करू शकते. त्यानंतर पुरावा बघून किवा कोर्टाला वाटले प्रतिवादीस विलंब होण्यास खरे कारण आहे तर कोर्ट तो प्रतिवादीचा विलंब माफी चा अर्ज मंजूर करते.
इतर ब्लॉग पोस्ट :-
प्रतिवादीस कोर्टा मार्फत समन्स ची बाजवणी काशी होते ?
| Click here to see post |

