CERAI म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0


आज आपण माहिती बघू CERSAI म्हणजे काय ? तसेच  CERASI ची निर्मिती कधी व का केली गेली  ? व   CERASI निर्मिती करण्या मागचा उद्देश काय होता  ?  


 CERASI चा फूल फॉर्म आहे Central Registry of Securitization Asset Reconstruction and Security Interest.  


भारत सरकर यांनी व  नेशनल हाऊसिंग बँक आणि इतर संस्था याच्या मदतीने  सन 2011 मध्ये CERSAI  ची  निर्मिती केली गेली.   CERASI हे ऑनलाइन पोर्टल आहे. ज्यावर बँक जी मिळकत गहाण ठेऊन (Secure) कर्ज देत असतात त्याची नोंदणी बँकेस  या पोर्टल वर करावी लागत असते. 

 CERASI तयार करण्याचा उद्देश हा  आहे की, बँक मिळकत गहन ठेऊन जे सिक्युर कर्ज देत असतात त्या गहाण असलेल्या मिळकतीवर बँक त्यांचा बोजा (चार्ज) निर्माण करत असतात व  त्या बाबतची नोंदणी बँक म्हणजेच जे काही Financial इंस्टीट्यूट आहेत त्यांना  CERSAI च्या पोर्टल वर त्यांचा security इंट्रेस्ट रजिस्टर करावा लागतो. 

याचा फायदा हा होत असतो की, जी मिळकत बँकेकडे गहन आहे त्या  मिळकतीवर  CERASI पोर्टल वर चार्ज creation केलेला  असल्यामुळे जेव्हा CERSAI पोर्टल  वर  एखादी मिळकतीचा सर्च घेतला जातो तेव्हा हे  समजण्यास मदत होत असते  की,   मिळकत कुठे एखादी बँकेकडे  गहन ठेऊन तर कर्ज घेतलेले नाही ना ? आणि कर्ज असेल तर किती कर्ज आहे व कोणत्या बँकेचे कर्ज आहे ही समजण्यास मदत होत असते. 

त्यामुळे बँकेने एखादी मिळकत गहाण ठेऊन कर्ज दिले तर त्यांचा त्याचा चार्ज  CERASI पोर्टल वर नोंदणी करावा लागतो. 

याचा फायदा हा आहे की बँक मिळकत गहाण ठेऊन जे (Secure) कर्ज देत असते  त्यामध्ये  फसवणूक होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झालेली आहे. 

बँकेने कर्ज दिले म्हणजे तीस दिवसात CERASI पोर्टल वर बँक त्यांचा चार्ज नोंदणी करत असतात. त्यामुळे गहाण खत नोंदविले गेले की बँक CERASI पोर्टल वर कर्जा बाबत नोंदणी करत असतात. 

कोणतीही बँक मिळकती वर कर्ज देण्या अगोदर CERASI पोर्टल वर त्या बाबतचा सर्च घेत असतात. 

या मुळे कोणी फसवणूक करून कर्ज घेत असतेल तर ते समजण्यास बँकेस  मदत होत असते व यामुळे बँकेचे फसवणुकीचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत झालेली आहे.

कोणी मिळकत गहाण घेऊन बँकेकडून अगोदरच  कर्ज घेतले असेल व तरी देखील दिशाभूल करून दुसऱ्या बँकेकडून त्याच मिळकतीवर कर्ज घेत असेल तर ही गोष्ट बँकेस CERASI मुळे समजण्यास मदत होत असते व  बँकेची होणारी फसवणूक टळू शकत असते.  
    

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads