Notice Of Intimation समजण्यासाठी आधी आपण बघू इक्विटेबल मॉर्गेज (Equitable Mortgage) म्हणजे नेमके काय.
मालमता हस्तांतरण अधिनियम,1882 चे कलम 58 मध्ये गहाण व्यवहारासंबंधी (Mortgage) तरतुदी आहेत. यातील खंड (एफ)
मध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या तरतुदी आहेत.
त्यानुसार कर्ज घेणार व्यक्ती संबंधित मिळकतीचे हक्कलेख कर्ज देणा-याकडे निक्षेपित
(जमा) करुन (By way of Depositing of Title Deeds) कर्जाची रक्कम प्रतिभूतीत (Secure) करु शकते. ही कार्यवाही केवळ राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे ठरवून दिलेल्या शहरांमध्ये करता
येते. या पध्दतीला इक्विटेबल मार्गेज किंवा Mortgage by
way of depositing of title deeds असे संबोधले जाते.
इक्विटेबल मॉर्गेज संदर्भात फायलिंग
ऑफ नोटीस ऑफ इंटिमेशन म्हणजे काय ? त्याबाबतची कायदेशीर तरतूद काय आहे ?
मालमता हस्तांतरण अधिनियम,1882 चे कलम 58 (एफ) मध्ये डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने कर्जव्यवहार करण्याच्या तरतुदी आहेत.
त्यानुसार कर्जदाराने कर्ज घेण्यासाठी त्यांचेकडील हक्कलेख (Title Deeds) बँकेच्या ताब्यात देणे व बँकेने किंवा कर्जदाराने त्याबाबतचे टिपण तयार करणे पुरेसे असते. दोन्ही पक्षकारांनी मिळून करारनामा तयार करतात. तरी देखील काही प्रकरणामध्ये उभयपक्षांमध्ये लोन अग्रीमेंट किंवा तत्सम नावाचा करार निष्पादित होतो. मात्र त्या कराराची नोंदणी करण्याची पध्द्त नव्हती.
डिपॉझिट ऑफ टायटल डीड
पध्दतीच्या कर्जव्यवहारांची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अभिलेखावर यावी, त्याद्वारे संबंधित पक्षकाराचे हित
संरक्षित व्हावे तसेच त्या मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीसंदर्भात
झालेल्या कर्जव्यवहारांची माहिती इतरांनाही व्हावी या उददेशाने नोंदणी अधिनियम,1908 मध्ये दि. 01/04/2013
पासून पुढीलप्रमाणे सुधारणा
करण्यात आल्या आहेत.
1.
डिपॉझिट ऑफ टायटल डीड पध्दतीने होणा-या कर्जव्यवहारांसाठी जर बँक/वित्तीय संस्था आणि कर्ज घेणार
यांचेदरम्यान Agreement किंवा अशा कोणत्याही नावाचा करारनामा निष्पादित करण्यात आला तर तो
करार दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य (Compulsory)
करण्यांत आले आहे. त्यासाठी कलम 17 मध्ये सुधारणा करण्यांत आली आहे.
2.
मात्र जर अशा कर्जव्यवहारामध्ये उभय पक्षांमध्ये असा कोणताही
करारनामा निष्पादित करण्यात आलेला नसेल तर त्या कर्ज प्रकरणातील कर्ज घेणा-याने
उक्त कर्जव्यवहाराबाबची माहिती नमूद असलेली नोटीस दुय्यम निबंधक कार्यालयात
फायलिंगसाठीसादर केली पाहिजे, अशी तरतूद नोंदणी अधिनियम,1908 चे कलम 89 ब मध्ये करण्यात आली आहे.
नोटीस ऑफ इंटिमेशन कधी व कोठे फायलिंगसाठी सादर करावयाची आहे ?
नोटीस ऑफ इंटिमेशन कर्ज दिनांकापासून (टायटल डीड डिपॉझिट
केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत संबंधित नोटीसीतील स्थावर मिळकत ज्या दुय्यम
निबंधक कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येत असेल त्या दुय्यम निबंधक यांचेकडे
फायलिंगसाठी सादर करावयाची आहे.
नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्याबाबतची
कार्यपध्दती कोणत्या नियमाद्वारे विहित करण्यात आलेली आहे ?
महाराष्ट्र दस्तऐवजाच्या सत्य प्रती आणि नोटीसा दाखल करणे
नियम, 2013 अन्वये, नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल
करण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. सदर नियम नोंदणी व मुद्रांक
विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Publications या सदराखाली Rules या ठिकाणी उपलब्ध आहे.
नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्याची
सर्वसाधारण कार्यपध्दत काय असते ?
नोटीस ऑफ इंटिमेशन फाईल करण्यासाठी सर्वसाधारण कार्यपध्दत खालीलप्रमाणे आहे.
1. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in
या संकेतस्थळावर Online
Services या
सदराखाली उपलब्ध असलेल्या PDE for Filing प्रणालीचा वापर करुन विहित नमुन्यातील नोटीस तयार करावी.
2. सदर नोटीसवर योग्य मुद्रांक
शुल्क भरावे.
3. त्यावर नोटीसकर्त्याने (कर्ज
घेणा-याने) स्वत:चा फोटो लावून सही करुन अंगठा याचा
ठसा उमटवावा.
4. संबंधित बँकेकडून सदरच्या नोटीसीमधील पक्षकाराचा फोटो सांक्षांकित करुन घ्यावा.
5. फायलिंग फी रुपये 1000/- ई-पेमेंटद्वारे शासन जमा करावी.
6. कर्ज घेणा-या व्यक्तीने संबंधित
दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष हजर राहून नोटीस सादर करावी. त्याबरोबर पुढील
कागदपत्रे आवश्यक आहेत.
1) नोटीसकर्ता (कर्ज घेणा-या) व्यक्तीचे छायाचित्र असलेले ओळखपत्र.
2) मुद्रांक शुल्क अन्य दस्तावर
भरले असल्यास त्या दस्ताची सत्यप्रत.
3) फायलिंग फी व मुद्रांक शुल्क भरल्याचा पुरावा.
7. दुय्यम निबंधक यांनी नोटीस व
कागदपत्राची छाननी करुन नोटीस फायलिंगसाठी स्विकारल्यास, रुपये 300/- दस्त हाताळणी शुल्क रोखीने दुय्यम
निबंधकांकडे जमा करावे आणि दुय्यम निबंधकांकडून त्या रकमेची पावती आणि नोटीसीची पोचपावती घ्यावी.
फायलिंग करावयाच्या इक्विटेबल मॉर्गेज
संदर्भातील नोटीस ऑफ इंटिमेशनमध्ये कोणत्या बाबी नमूद असणे आवश्यक आहे ?
इक्विटेबल मॉर्गेज संदर्भात नोटीशीमध्ये -
·
कर्ज घेणा-याचे नाव व पत्ता-
·
कर्ज देणा-याचे ( बँक /वित्तीय संस्था) नाव व पत्ता-
·
कर्जव्यवहाराचा दिनांक -
·
कर्जाची रक्कम -
·
व्याजाचा दर -
·
निक्षेपित (Deposit) केलेल्या दस्तांची यादी -
·
त्या दस्तातील स्थावर मिळकतीचा तपशील -
इत्यादी बाबी नमूद असणे आवश्यक आहे.
नोटीसीचा नमुना नोंदणी व
मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Downloads या सदराखाली Draft
Notices या ठिकाणी
उपलब्ध
नोटीस आफ इंटिमेशन कोणत्या
दुय्यम निबंधक कार्यालयात फाईल करावी लागते ?
बँकेकडे डिपॉझिट केलेल्या टायटल
डीडमधील मिळकत ज्या दुय्यम निबंधक यांचे कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट आहे त्या
दुय्यम निबंधक कार्यालयात सदर नोटीस फाईल करावी लागते.
एखादया कर्जव्यवहारामध्ये एकापेक्षा अधिक दुय्यम निबंधक यांच्या कार्यक्षेत्रातील मिळकती समाविष्ट असतील तर कोणत्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोटीस देणे आवश्यक आहे ?
·
एखादया कर्ज व्यवहारामध्ये एकापेक्षा
अधिक दुय्यम निबंधक यांच्या कार्यक्षेत्रातील मिळकती समाविष्ट असतील तर अशा
प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात अशी स्वतंत्र नोटीस देणे आवश्यक आहे.
·
मूळ नोटीसीवर योग्य मुद्रांक शुल्क दिल्यानंतर इतर प्रत्येक
नोटीसीला रुपये 100/- इतके
मुद्रांक शुल्क देय आहे.
· अशा प्रत्येक नोटीसीकरीता रुपये 1000/- इतकी फायलिंग फी व रुपये 300/- इतकी दस्त हाताळणी शुल्क त्या त्या दुय्यम निबंधक कार्यालयात भरणे आवश्यक आहे.
नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंगसाठी कोणकोणते शुल्क/फी भरावी लागते ?
नोटीस ऑफ इंटिमेशन फायलिंगसाठी खालीलप्रमाणे शुल्क/फी भरावी लागते -
·
मुद्रांक शुल्क (Stamp Duty)
·
फायलिंग फी ( Filing Fee)
·
दस्त हाताळणी शुल्क (Document
Handling Charges)
इतर ब्लॉग पोस्ट :-
Equity Mortgage आणि Registered Mortgage काय असते ?
![]() |
Click above to see post |