स्थावर मिळकतिचे टायटल क्लिअर म्हणजे काय ?
आपण माहिती बघू स्थावर मिळकतिचे टायटल क्लिअर म्हणजे काय असते.
स्थावर मिळकतीचे टायटल क्लिअर असणे म्हणजे ती मिळकत आता ज्या मालकाची आहे त्याचा त्या मिळकतीवर कायदेशीर हक्क आहे. कायद्याने ती मिळकत त्याची आहे. त्या बाबत काही वाद नाही. टायटल क्लिअर माझे तो हे सिद्ध करू शकतो की ती मिळकत त्याची मालकी हक्काची आहे.
जर मिळकतीवर काही वाद असेल. बेकायदेशीर मार्गाने मिळकत हस्तांतर झालेली असेल. काही कर्ज बाकी बाबत कारवाई असेल. वारसांचा वाद असेल म्हणजे त्या मिळकतीचे टायटल क्लिअर नाही.
एखाद्या मिळकतीचे टायटल क्लिअर आहे हे तपासून बघण्या साठी आपल्याला त्या मिळकतीचे सर्व कागदपत्रे पडताळून बघावे लागतात. मिळकतीचा कायदेशीर मालक कोण आहेत हे तपासावे लागते. मिळकतीच्या मालकी हक्का बाबत शोध घ्यावा लागतो. त्याला टायटल सर्च रिपोर्ट असे म्हणतात. शोध घेतल्यावर समजते की एखादी स्थावर मिळकतीचे टायटल क्लिअर आहे की नाही.
कोणतीही स्थावर मिळकत विकत घेण्यापूर्वी त्या मिळकतीचा शोध घेऊन त्या मिळकतीचे टायटल तर क्लिअर आहे ना ? तसेच आपण ज्याच्याकडून मिळत विकत घेत आहोत तोच खरा त्या मिळकतीचा मालक आहे ना ? हे तपासून बघणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही.
कोणतीही बँक मिळकतीवर कर्ज देण्यापूर्वी त्या मिळकतीचा सर्च घेऊन तपासून मग कर्ज देत असते. बँक स्थावर मिळकतीवर कर्ज देण्यापूर्वी खात्री करून घेते की ज्या मिळकतीवर कर्ज देणार आहोत तिचे टायटल तर क्लिअर आहे ना ? तरच मग कर्ज मंजूर केले जाते. बँकेचा सर्च रिपोर्ट हा बँकेचे वकील किंवा बँक पॅनल चे वकिलांकडून घेतला जात असतो.
सर्व कागदपत्रे तपासून व ऑनलाईन सर्च घेऊन तपासून बघावे लागते की, मिळकती बाबत काही व्यवहार झाला आहे का ? मिळकतीवर काही लोन आहे का ? असेल तर त्याची फेड झाली आहे का ? त्या मिळकतीचे जुने उतारे, चालू उतारा, नोंदी तपासून बघाव्या लागतात. नोंदी आणि जुने उतारे आता ऑनलाईन भेटून जातात. तसेच मिळकतीचा सर्च हा पण ऑनलाईन घेता येतो. तसेच मिळकतीचे कागदपत्रे जसे खरेदीखत, बक्षिसपत्र, वाटणीपत्र, मृत्युपत्र जे काही जास्त असतील ते नंतर जुने चेन दस्त. आधीच्या मालकाचे खरेदीखत. चालूच 7/१२ उतारा, सिटी सर्व्हे उतारा, ग्रामपंचायत नमुना नंबर 8 उतारा या पैकी जे असतील ते तपासून बघावे लागतात. उताऱ्यावर मालकाचे नाव, क्षेत्र, गाव काही बोजा आहे का हे तपासून बघावे लागते. मिळकतीचे लाईट बिल, टॅक्स पावती तपासून बघावी लागते, त्या वर मालकाचे नाव आहे ना ? हे तपासून बघावे लागते.
टायटल क्लिअर म्हणजे मालकी हक्का बाबत कोर्टात दावा वैगरे नाही. मिळकतीच्या हस्तांतरण बाबत कुठलेही शासकीय निर्बंध नाहीत. मिळकतीवर काही कर्ज वगैरे बाकी नाही. मिळकत जुन्या मालक पासून आताच्या मलका पर्यंत कायदेशीर मार्गाने हस्तांतर होत आलीलेली आहे. मिळकतीवर काही वारसांचा वाद वगैरे नाही. मिळकतीवर काही बोजा वगैरे बाकी नाही. रहिवास मिळकत असेल तर तपासून बघावे लागते की मिळत एन.ए. झालेली आहे ना ? नकाशा मंजूर आहे ना ? लेआऊट मंजूर आहे ना ? पूर्णत्वाचा दाखल आहे ना ? मिळकत कुठल्या शासकीय कामासाठी भूसंपादन किंवा राखीव तर नाही ना ? मिळकतीवर कुठला झोन आहे का ? याचा शोध घेऊन तपासून बघणे आणि हे सर्व क्लिअर असेल म्हणजे त्या मिळकतीचे टायटल क्लिअर आहे होय. हे सर्व आपल्याला मिळकतीचे कागदपत्रे, नोंदी, ऑनलाईन सर्च घेल्यावर समजत असते. त्यासाठी मिळकतीचा कायदेशीर सर्च घ्यावा लागतो.
क्लिअर टायटल म्हणजे मिळकतीच्या मालकी हक्का बाबत कुठलाही वाद नाही. जर त्या मिळकतीचे टायटल क्लिअर असेल तर ती मिळकत आपण खरेदी करू शकतो.
फक्त 7/12 उतारा आहे, खरेदीखत आहे म्हणजे ती मिळकत त्या मालकाची आहे असे नाही ? या साठी सर्व दस्त महत्वाचे आहे. मिळकत चेन महत्वाची आहे. फक्त एक दस्त आहे म्हणजे मालकी हक्क असेल व टायटल क्लिअर असेल असे नाही. त्या साठी त्या मिळकतीचा शेध घेऊन तपासून बघणे महत्वाचे असते. ज्याचे 7/१२ उताऱ्यावर नाव आहे तो एकटाच मालक आहे असे नाही. त्यामुळे हे महत्वाचे आहे की त्या मिळकतीचा शोध घेऊन तपासून बघणे. कारण बऱ्याच लोकांना वाटते की 7/१२ उताऱ्यावर ज्याचे नाव आहे तो मालक आहे.
मिळकत ज्या मालकाची आहे हे सिध्द होण्यासाठी त्या स्थावर मिळकत टायटल क्लिअर हवे. त्यासाठी त्या स्थावर मिळकतीचा सर्च घेऊ तपासून बघावे लागते की त्या मिळकतीचे टायटल क्लिअर आहे का ? टायटल सर्च हा वकिलामार्फत घेतला जात असतो.
मालकी हक्क बाबत अनेक दस्त आहेत ते पुढील प्रमाणे.
1) खरेदीखत, 2) मृत्युपत्र, ३) बक्षिसपत्र, ४) हक्कसोडपत्र, 4) वाटणीपत्र.
या वरील दस्ताने मिळकत ही हस्तांतर होत असते. खरेदीखत, बक्षिसपत्र, हक्कसोड पत्र हे दस्त नोंदणीकृत असणे गरजेचे आहे नाही तर ती स्थावर मिळकत हस्तांतर होणार नाही. वाटणीपत्र हे नोंदणीकृत किंवा तहसीलदार यांचे कडून होऊ शकते. तसेच मृत्युपत्र हे नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत असू शकते.
या वरील दस्त व्यातिरिक मालकी हक्क बाबत दस्त हा कोर्टाचे वारस हक्क प्रमाणपत्र असू शकते. यालाच Heirship Cerificate असे देखिल म्हणतात. Heirahip Certificate हे सक्षम दिवाणी न्यायालयाकडून दिले जात असते. तसेच वारसा हक्काने देखिल स्थावर मिळकत ही हस्तांतर होते.
वरील सर्व माहिती तपासून बघणे व त्यामध्ये सर्व बरोबर आहे तर मग त्या मिळकतीचे टायटल क्लिअर आहे होय.

