जाहीर पेपर नोटीस

Adv.Saurabh Rajput
0

कायदेशीर जाहीर पेपर नोटीस

मित्रानो आज आपण माहिती बघणार आहोत वृत्तपत्रात प्रकाशित केल्या जाणाऱ्या कायदेशीर जाहीर नोटीसी बाबत. तुम्ही जेव्हा एखादी वर्तमानपत्र वाचतात तेव्हा तुम्हाला वर्तमानपत्रात अनेक इतर जहिरांतींबरोबर कायदेशीर नोटीसा दिसत असतात. तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा हा प्रश्न पडला असेल की, का बरं वर्तमानपत्रांत या जाहीर नोटीसा प्रकाशित केल्या जात असतील ? तर आज आपण माहिती बघू की कायदेशीर जाहीर नोटीस म्हणजे काय ? आणि या नोटीस चे काय महत्व आहे ?

चला तर मग बघूया कायदेशीर नोटीस वृत्तपत्रात का प्रकाशित केली जाते. या बाबत माहिती.

कायद्या नुसार जाहीर पेपर नोटीसिला फार महत्व आहे. त्यामुळे अनेक कायदेशीर कारणांसाठी जाहीर नोटीस प्रकाशित केली जात असते.

जाहीर नोटीस यासाठी प्रकाशित केली जाते की तमाम जनतेला एखादी गोष्टीची माहिती मिळावी. मालमत्ता खरेदी विक्री करणे कमीचे व्यवहार असतील किंवा काही कायदेशीर काम असेल तर नोटीस प्रसिद्धी करणे खबरदारी म्हणून अत्यंत महत्वाचे आहे. कारण भविष्यात काही वाद उपस्थित झाला तर खरेदीदार त्याचा बचाव करू शकतो.

वर्तमानपत्रात अनेक कारणांमुळे जाहीर नोटीस प्रकाशित केली जाते. जसे वारस दाखला काढणे असेल. कोणी व्यक्ती हरवलेला असेल व त्याला कोर्टाकडून मृत घोषित करणेसाठी दावा दाखल करणे असेल. कोर्टाकडून जन्म मृत्यू दाखल काढणे साठीचा अर्ज दाखल केलेला असेल. कोर्टाचे काही दावे, नोटीसा असतील, कोणी व्यक्ती फरार असेल, कोर्टात काही वारसांच्या बाबतीत दावा दाखल असेल किंवा करावयाचा असेल. तसेच बँकांना किंवा वित्तीय संस्थांना काही कायदेशीर कारवाई करणे असेल किंवा एखादी मिळकत कायदेशीरपणे जप्ती करणे असेल. तसेच काही दस्त वगैरे किंवा महत्वाचे कागदपत्रे वगैरे हरवले असतील तर त्याचा गैर वापर होऊ नये म्हणून देखिल वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रकाशित केली जाते. एखादी स्थावर मिळकत खरेदी करणे असेल. सौदापावती वगैरे करणे असेल तरी देखिल वृत्तपत्रात जाहीर नोटीस दिली जात असते. बँकेच्या लोन चे कमी जुने चेन दस्त जरुरी असेल व तो हरवलेला असेल तरी देखील जाहीर नोटीस प्रकाशित केली जात असते. कोर्टात कायदेशीर पुरावा म्हणून जाहीर नोटीसला अत्यंत महत्व आहे.

जाहीर नोटीस ही कोणीही संबंधित व्यक्ती प्रसिद्ध करू शकतो परंतु काही कायदेशीर कामासाठी नोटीस असेल तर जाणकार वकिलांकडून सल्ला घेऊन त्याच्या मार्फत नोटीस प्रसिद्ध करणे हे कधीही चांगले असते.

तसेच अजून इतर अनेक कारणांसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केल्या जातात जसे कोणत्याही सरकारी, निमसरकारी, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, रेल्वे, बांधकाम विभाग, कोर्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट वगैरे कार्यालयाचे काही काम, टेंडर वगैरे असेल काही कारवाई असेल तरी त्यांच्या मार्फत जाहीर नोटीस वृत्तपत्रात तसेच त्याच्या अधिकृत वेबसाईटलां प्रकाशित केली जात असते.

बँका देखिल त्याच्या अनेक कायदेशीर किंवा लोन चे कमी जाहीर नोटीस वृत्तपत्रात प्रकाशित करत असतात.

कायदेशीर स्थावर मालमत्ता जसे प्लॉट, घर, फ्लॅट, दुकान वगैरे मिळकत खरेदी करण्यापूर्वी वर्तमान पत्रात कायदेशीर जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे महत्वाचे असते. याचे अनेक फायदे देखिल आहेत.

आजकाल स्थावर मिळकतीच्या किमती मधे खूप वाढ झालेले आहे म्हणून स्थावर मिळकतीच्या व्यवहार सावधान पूर्वक व माहितगार व्यक्तीकडून व योग्या ती माहिती घेऊन करणे फार महत्वाचे आहे. सावध पूर्वक माहिती घेऊन व काळजीपूर्वक आपण काम केले तर आपली फसवणूक होणार नाही. जाहीर नोटीस म्हणजे खरेदीदाराचा बचाव होऊ शकतो.

जेव्हा तुम्ही एखादी स्तरावर मालमत्ता खरेदी करणे पूर्वी जाहीर पेपर नोटीस देतात तेव्हा तुम्ही या जाहीर नोटीस द्वारे जगाला कळवतात की तुम्ही मालमत्ता खरेदी करीत आहात. जर त्या मालमत्तेवर कोणाचा हक्क, अधिकार, वाद वगैरे असेल तर त्यांना हरकत नोंदविण्याची संधी मिळते.

जर मालमत्ता खरेदी केल्यानंतर भविष्यात काही वाद उद्भवला किंवा कोर्टात केस दाखल झाली तर तुमचा कोर्टात बचाव असतो की मालमत्ता खरेदी पूर्वी खबरदारी घेऊन, जाहीर नोटीस देऊनच मालमत्ता खरेदी केलेली आहे. तुम्ही Bonafide म्हणजे खरे खरेदीदार आहेत. तुमचा हेतू कोणाला फसविण्याचा नव्हता. हे दिसून येते त्यामुळे जाहीर नोटीस हा एक भक्कम कायदेशीर पुरावा ठरतो.

एखादी मिळकतीवर काही वाद असल्यास किंवा कुठे मालमत्ता गहाण असल्यास. कौटुंबिक वाद असल्यास. नोटीस प्रसिद्ध केल्यामुळे संबंधित बँक किंवा व्यक्ती काही वाद असल्यास हरकत घेऊ शकतात. त्यामुळे सदर बाब ही खरेदीदाराला खरेदी पूर्व लक्षात येऊ शकते. त्यामुळे खरेदीदाराची होणारी फसवणूक टळू शकते.

जर नोटीस कालावधीत हरकत नाही घेतली आणि नंतर कोणाकडून काही दावा दाखल केला गेला तर कोर्ट संबधित व्यक्तीला विचारणा करेल की जेव्हा जाहीर पेपर नोटीस दिलेली होती तेव्हा तुम्ही का गप्पा होता. ? तेव्हा त्या नोटीसिवर हरकत का नाही घेतली ? याचा फायदा खरेदीदाराला होतो.

नोटीस देताना घ्यावयाची काळजी : -
जाहीर नोटीस कमीत कमी दोन स्थानिक वर्तमानपत्रात द्यावी. एक नोटीस इंग्रजी व एक स्थानिक भाषेत द्यावी.

हरकत नोंदविणे कमी कमीत कमी 7 किंवा 15 दिवसांचा कालावधी द्यावा.

नोटीस मधे नोटीस देणार, मिळकतीचे वर्णन, क्षेत्र, चातु:सिमा, सर्व्हे नंबर, गट नंबर, सी.टी.एस नंबर, प्लॉट नंबर, घर नंबर, ग्रामपंचायत नंबर जो काही असेल ती सर्व माहिती अचूक नमूद करावी.

जाहीर नोटीस ही फक्त एक नोटीस नसून ती कायदेशीर खूप महत्वाची आहे. तिला कायदेशीर रित्या फार महत्व आहे. या नोटीस मुळे नोटीस देणार याला फायदा होऊ शकतो. जाहीर नोटीस ही अनुभवी वकील कडून ड्राफ्ट करून प्रसिद्धीस द्यावी. कारण त्यांना त्या कायदेशिर कामाचा अनुभव असतो.

जाहीर नोटीस ही खरेदी, हक्क, हस्तांतरण किंवा कायदेशीर वारस शोधण्यासाठी किंवा मिळकतीवर काही वाद वगैरे आहे का ? हे शोधनेकामी दिली जाणारी एक अधिकृत सूचना आहे. याचा मुख्य उद्देश व्यवहार पूर्ण करणे पूर्वी मालमत्तेवर कोणाचाही कायदेशीर वाद, बोज किंवा इतरांचा हक्क नसल्याची खात्री करणे हा असतो.

जर एखादी मिळकती बाबत कोर्टात काही वाद चालू असेल तर सदर पक्षकार जाहीर नोटीस द्वारे सूचना देऊ शकतात की सदर मिळकती बाबत वाद चालू असून दावा दाखल आहे किंवा दाखल करणार आहेत. जोपर्यंत वादाचे निराकरण होत नाही तोपर्यंत कोणीही सदर मिळकती बाबत कोणताही व्यवहार करू नये. त्यामुळे आपली स्वतःची व दुसऱ्याची देखिल फसवणूक होण्यापासून बचाव होऊ शकतो.

मिळकती बाबतच्या जाहीर नोटीस मधे काय नमूद असावे : -

शीर्षक स्पष्टपणे जाहीर नोटीस किंवा पब्लिक नोटीस असे असावे.

उद्देश : -

Title Clairance व खरेदी विक्री, वारस, बोजा नाही या बाबत माहिती.

आव्हाहन : -

कोणाला काही हरकत, आपक्षेप, असल्यास कागदपत्रांसह वकील / मालक / पक्षकार यांना दिलेल्या मुदतीत संपर्क साधून त्यांचे समाधान करावे माहिती द्यावी.

संपर्क माहिती : -

जाहीर देणाऱ्या व्यक्तीचे किंवा वलांचे नाव पत्ता.

नोटीस प्रसिद्ध आणि स्थानिक भाषेच्या वृत्तपत्रात द्यावी कारण नोटीस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads