जमिनीचे क्षेत्रफळ
*१ हेक्टर = १०००० चौ. मी.*
*१ एकर = ४० गुंठे.*
*१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट*
*१ हेक्टर = २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे*
*१ आर = १ गुंठा*
*१ हेक्टर = १०० आर*
*१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट*
*१ चौ. मी. = १०.७६ चौ फुट*
---------------------------------
---------------------------------
1 फुट = 12 इंच,
1 इंच = 2.54 सेंटीमीटर
1 सेंटीमीटर = 10 मिली मीटर.
---------------------------------
---------------------------------
आपण जेव्हा शेतजमिनीची व प्लॉटची मोजणी, वाटणी किवा विक्री तसेच सौदापावती करत असतो त्यावेळी आपल्याला या वरील गोष्टी ची माहिती हवी. ही माहिती तुम्हाला असल्यास तुम्हाला हे कामकाज करणे सोपे जाईल व चूक होणार नाही.
---------------------------------
---------------------------------
चौरस मीटर मधील क्षेत्र चौरस फुटा मध्ये कसे रूपांतर करतात. ?
चौरस मीटर मधील असलेली क्षेत्र चौरस फुटा मध्ये रूपांतर करणे साठी सोपी पद्धत आहे.
1 मीटर = 3.28 फुट
1 चौरस मीटर = 10.76 चौरस फुट.
चौरस मीटर चे चौरस फुट काढण्यासाठी चौरस मीटर सख्येला [10.76] ने गुणवे.
उदा. आपल्या ला जर 65 चौरस मीटर चे जर चौरस फुट मध्ये रूपांतर करायचे असेल तर 65 X 10.76 = 699.4 चौरस फुट.
---------------------------------
---------------------------------
चौरस फुटामधील क्षेत्र चौरस मीटर मध्ये करणे
आपल्याला चौरस फुटचे जर चौरस मीटर मध्ये रूपांतर करावयाचे असेल तर त्या संखेला 10.76 ने भाग द्यावा. त्यासाठी आपण पुढील उदाहरण बघू.
उदा. 1000 चौरस फुट = 100 / 10.76 = 92.93 चौरस मीटर.
---------------------------------
---------------------------------
एकादी शेत किवा प्लॉट मिळकत आपल्याला माहिती म्हणून स्वता: हून टेप ने मोजणी करून घेणे असेल तर ती मोजणी कशी करावी याची माहिती आपण बघू .
(मोजणीचे क्षेत्र जास्त मोठे नसेल तर आपण या पद्धतीने स्वता:हून खात्री करून घेणे साठी मोजणी करून बघू शकतात.)
प्रथम आपण मोजणीचे क्षेत्र हे टेप द्वारे फुट मध्ये लंबी व रुंदी मोजून घ्यावी. त्यानंतर आपल्याला त्या जागेचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. जर मोजणी क्षेत्राचा आकार हा आयताकार असेल व प्लॉट ची किवा जमिनीची दोन्ही बाजूची लंबी व दोन्ही बाजूची रुंदी समान असेल तर. आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे लंबी X रुंदी = क्षेत्रफळ.
आता आपल्याला आपण टेप ने मोजणी केलेले क्षेत्र हे लंबी X रुंदी करावे लागेल = आपल्याला प्लॉट चे किंवा जमिनीचे एकूण किती क्षेत्रफळ आहे हे या पद्धतीने मोजणी केल्याने समजून जाईल.
(जर आपण प्लॉट ची मोजणी करत असाल तर प्रथम त्या प्लॉट चा लेआऊट बघून घ्यावा कारण त्यामुळे तुम्हाला त्या प्लॉटचा नेमका आकार किती आहे. त्याची लंबी व रुंदी किती आहे हे समजून जाईल. तसेच प्लॉट चा रस्ता कोणत्या बाजूने आहे हे समजेल. इतर लागत प्लॉट चे क्षेत्र किती आहे हे देखील समजण्यास मदत होईल. बाजूला कोणते प्लॉट आहेत व प्लॉट च्या चतु:सीमा देखील समजतील. त्यामुळे त्या प्लॉट ची मोजणी करणे सोपे जाईल. शेताची मोजणी करणे असेल तर उतार्यावरील क्षेत्र निट बघून घावे. गाव नकाशा बघून घ्यावा. ती प्रत आपल्याला ऑनलाइन देखील मिळू शकते. जुना मोजणी नकाशा असेल तर तो बघून घ्यावा.)
शेतजमिनी चे क्षेत्र हे आपण फुटात मोजले असेल तर त्याला आता आपल्याला एकर मध्ये करून घावे लागेल. ( कोणते ही क्षेत्राचे रूपांतर करणेसाठी तुम्ही सूत्राचा वापर करू शकतात व त्यामध्ये किमती टाकून क्षेत्राचे रूपांतर करू शकतात. किवा जास्त वेळ नसेल तर ऑनलाइन गूगल ची मदत घेऊ शकतात.
1 एकर = 43560 चौरस फुट.
लंबी X रुंदी = ---------- / (भगिले) 43560 केले तर आपले फुटा मधील क्षेत्र हे एकर मध्ये रूपांतर होऊन जाईल.
---------------------------------------
---------------------------------------
आता आपण बघू जर प्लॉट किवा शेत जमीनी चे चारही दिशेचे क्षेत्र जर समान नसेल तर त्याची मोजणी करून क्षेत्र कसे काढावे. जर प्लॉट किवा शेत जमिनीचे चारही बाजूचे क्षेत्र समान नसेल तर मोजणी करून क्षेत्र काढणे ही एक थोडी आव्हघड गोष्ट आहे. परंतु त्या बाबत आपण ठोक्यात माहिती बघू.
अशा वेळेस चारही बाजूचे क्षेत्र हे मोजून घ्यावे लागते. त्यानंतर एक बाजूची लंबी आणि दुयर्या बाजूची लंबी याची बेरीज करून आणि त्याला 2 ने भाग देऊन सरासरी लंबी व सरासरी रुंदी काढून घ्यावी लागते.
त्यानंनंतर त्या मोजणी केलेल्या जागेचे आपल्याला एकूण क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल त्यासाठी लंबी X रुंदी = एकूण क्षेत्रफळ निघेल. आता आपल्याला त्या क्षेत्राचे समान दोन भाग करणे असतील तर त्याला 2 ने भाग द्यावा. किवा जितके भाग करणे असतील त्या संखेने आपण त्याला भाग देऊ शकतो.
(जेव्हा दोघी बाजूंची लंबी आणि रुंदी समान नसेल तेव्हा ते क्षेत्र मोजणे व क्षेत्रफळ काढणे थोडे कठीण काम असते. तसेच त्याची वाटणी देखील करणे कठीण काम असते. त्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजमाप पुन्हा पुन्हा करून बघून खात्री करून घ्यावी लागते. त्याची थोडी अवघड पद्धतात आहे. मी वरील दिलेल्या माहितीने तुम्हाला फक्त अंदाज येईल की मोजणी कशी केली जाते व प्लॉट ची विभागणी कशी केली जाते. वरील माहिती मी फक्त तुम्हाला माहिती साठी दिलेली आहे. तुम्हाला त्यामुळे एक अंदाजित माहिती मिळेल. तुम्हाला जरी खाजगी किवा कोणतीही मोजणी करणे असेल तर तुम्हाला त्यामधील तज्ञ माणूस लागेल.)
जमिनीचा जसा आकार असेल त्याप्रमाणे गणितीय सूत्राचा वापर आपल्याला क्षेत्रफळ काढणेसाठी करावा लागेल. जसे त्रिकोणी प्लॉट असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्राचा वापर आपल्याला करावा लागेल. प्लॉट आयत व त्रिकोणाकर असेल तर आयताचे क्षेत्रफळ काढून मग आपण त्रिकोणी भागाचे काढू शकतो.
(स्वत:हून मोजणी करणे आणि क्षेत्रफळ काढणे बाबत माहिती मी तुम्हाला फक्त मोजणी बाबत माहीती व्हावी म्हणून दिलेली आहे. परंतु तुम्हाला काही कायदेशीर कामासाठी मोजणी करणे असेल तर तुम्हाला सरकारी मोजणीच करावी लागेल. तसेच जमिनीची खाजगी जरी मोजणी करणे असेल तर ती तज्ञ इसमकडून करून घ्यावी. कारण जे या क्षेत्रातील तज्ञ असतात त्यांना याची संपूर्ण माहिती व अनुभव असतो. ते आपले मोजणीचे काम अचूक पद्धतीने करून देऊ शकतात.)
इतर ब्लॉग पोस्ट :-
जमीन मोजणीचा इतिहास व मोजणीचे प्रकार
इतर ब्लॉग पोस्ट :-
डिजिटल 7/12 उतारा आणि डिजिटल महसूल नोंदी ऑनलाइन कशा काढाव्यात ?
स्थावर मिळकतीचा ऑनलाइन सर्च घेणे.
नोंदणीकृत दस्त ऑनलाइन कसा बघवा.
ऑनलाइन स्थावर मिळकतीची Index II नक्कल काशी काढावी.
| Click Here To View Post |
७/१२ उतारा व सिटी सर्वे म्हणजे काय ? तसेच मिळकत खरेदी करणे विषयी माहिती.
जमीनिवर मालकी हक्क सिद्ध करणारे पुरावे.
शेतजमीन खरेदी करतांना काय करावे ?
फ्लॅट मिळकत खरेदी करतांना काय कागदपत्रे बघावेत.
| Click Here To View Post |

