लिगल वेटिंग रिपोर्ट म्हणजे काय ?
लिगल वेटिंग रिपोर्ट म्हणजे कागदपत्रांची पडताळणी करणे होय. वेटींग रिपोर्ट वकिलामार्फत तयार केला जातो. लिगल वेटिंग रिपोर्ट तयार करतांना मालमत्तेचे कायदेशीर दस्तऐवज तपासले जातात आणि त्याचा अहवाल (रिपोर्ट) तयार केला जातो. त्याला Legal Vetting Report असे म्हणतात. कायदेशीर दस्त / कागदपत्रे तपासून त्याचा अहवाल / रिपोर्ट बनवणे म्हणजे लीगल वेटिंग रिपोर्ट बनवणे होय.
लिगल वेटिंग रिपोर्ट तयार करतांना मालमत्ता किंवा इतर कायदेशीर दस्त / कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाते व त्याचा रिपोर्ट तयार केला जातो. जर सर्व दस्त योग्य असतील तर रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल काही अडचण असेल तर रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो.
बँक मालमत्तेवर कर्ज देण्यात अगोदर त्या मालमत्तेचे कागदपत्रे कायदेशीर रित्या योग्य आहेत का ? हे पडताळणी / तपासणी करणेसाठी वकिलांकडून Legal Vetting Report काढला जातो.
बँकेचे Panal चे वकील किंवा Inhouse वकील यांचेकडून बँक वेटींग रिपोर्ट तयार करत असतें जेणेकरून त्यांनी दिलेले कर्जाचे पैसे सुरक्षित राहतील.
वेटींग रिपोर्ट positive आला म्हणजे बँक ग्राहकास मिळकतीवर घेतलेले लोन disburse करते.
मालमत्तेच्या कागदपत्रांचा वेटींग रिपोर्ट करणे म्हणजे मालमत्तेची खरी मालकी कोणाची आहे हे तपासले जाते. मिळकती वर काही कर्ज वगैरे दिसत आहे का ? हे तपासले जाते. मालमत्ता बोजा-मुक्त (Clear Title) मालमत्तेवर पूर्वीचे कोणतेही कर्ज, तारण, किंवा कायदेशीर वाद (Litigation) नाही ना, हे तपासले जाते. मिळकतीचे हे सर्व दस्त तपासून कायदेशीर रित्या कागदपत्रे योग्य व बरोबर आहेत ना याची तपासणी केली जाते.
कायदेशीर दस्तांची कायदेशीर वैधता (Legal Validity तपासली जाते. म्हणजे दस्तांची कायदेशीर अंमलबजावणी होऊ शकते ना ? तपासले जाते. त्यामुळे कायदेशीर फसवणूक होण्यापासून सुरक्षा मिळते. त्यामुळे वेटींग रिपोर्ट हा एक महत्वाचा कायदेशीर दस्त आहे.
मिळकतीचे सर्व मूळ कागदपत्रे जसे टायटल डॉक्युमेंट जे असेल ते जसे खरेदीखत, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, वाटणी पत्र जे, गहाण खत, NOI, जे काही दस्त असतील ते तपासले जातात. दस्त योग्य रित्या नोंदणी झालेला आहे ना ? हे तपासले जाते. दस्ताचे सर्व पाने, नोंदणीकृत दस्तची ची सूची दोन ची नक्कल, नोंदणी पावती तपासली जाते. मिळकत हस्तांतर होतांना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे का ? याची तपासणी केली जाते. भविष्यात मालमत्तेच्या कागदपत्रांची काही अडचण येऊ शकते का ? हे तपासले जाते.मिळकतीचा उतारा जसे 7/१२, सिटी सर्व्हे उतारा जो असेल तो तपासला जातो.
थोडक्यात, **लिगल वेटिंग रिपोर्ट** म्हणजे मालमत्तेच्या "कायदेशीर कागदपत्रांची तपणी व पडताळणी करणे होय.

