हरवलेल्या वस्तू बाबत कायदेशीर लॉस्ट प्रोसेस.

Adv.Saurabh Rajput
0

हरवलेल्या वस्तू बाबत कायदेशीर लॉस्ट प्रोसेस.

आज आपण माहिती बघू कायदेशीर लॉस्ट प्रोसेस बाबत.



जेव्हा आपली काही महत्वाची वस्तू किंवा काही महत्वाचे कागदपत्रे जसे ड्रायव्हिंग लायसेन्स, आर.सी.बुक, शाळेचा दाखला एल.सी. वगैरे तसेच मालमत्तेचे मुळ कागदपत्रे जसे खरेदीखत, बक्षिसपत्र किंवा जे काही टायटल दस्त असेल ते हरवले तर कायदेशीर लॉस्ट प्रोसेस करणे महत्वाचे असते. त्याचा फायदा असा होतो की, आपल्याकडे कायदेशीर पुरावा होतो की माझी वस्तू किंवा कागदपत्रे हरवले आहेत. तसेच ते कोणाला सापडले तर ते आपल्याला परत मिळणे कमी लॉस्ट प्रोसेस केल्यामुळे मदत होऊ शकते. तसेच पोलिसांना ती हरवलेली वस्तू किंवा कागदपत्रे मिळून आले तर आपल्याला ती वस्तू लगेच परत मिळण्यास मदत होऊ शकते. तसेच त्या हरवलेल्या वास्तूचा किंवा  कागदपत्रांचा कोणी गैरवापर केला तर आपण तक्रार दाखल केलेली असल्यामुळे तो आपला कायदेशीर बचाव व पुरावा होऊ शकतो.


जर आपले मालमत्ते संबधित मुळ कागदपत्रे हरवले तर सर्वात आधी त्यांचा शोध घेऊन बघावा ते मिळतात का ? त्यानंतर हरवलेल्या वस्तूची किंवा कागदपत्रांची, वस्तू किंवा कागदपत्रे हरवल्या बाबत तक्रार (लॉस्ट कंप्लेंट) पोलीस स्टेशन येथे नोंदणी करून द्यावी. तक्रार नोंदणी कमी तुम्ही अर्ज देऊ शकतात किंवा ऑनलाईन देखिल तक्रार दाखल करू शकतात. तक्रारी मध्ये दिनांक, वेळ, नंतर वस्तू कुठे हरवलेले आहे ते ठिकाण नंतर हरवलेल्या वस्तूचे वर्णन तसेच कागदपत्रे हरवलेले असतील तर त्या बाबत नीट व अचूक माहिती नमूद करावी. त्याबाबत काही दस्त, झेरॉक्स कॉपी असेल तर तक्रार दाखल करताना ती देखिल सोबत जोडून द्यावी. आणि तक्रार दाखल केल्याबाबत आपल्याकडे त्याची पोहोच घेऊन घ्यावी. जर ऑनलाईन तक्रार दाखल केली असेल तर त्याची ऑनलाईन प्रिंट तुम्हास भेटून जाईल.


जर स्थावर मिळकतीचे मुळ कागदपत्रे हरवले असतील जसे मुळ खरेदीखत, बक्षिसपत्र किवा मालकी हक्क बाबत टायटल दस्त वगैरे तर स्थानिक पेपर मध्ये त्या बाबत जाहिरात देऊन द्यावी. जाहिरात शक्यतो स्थानिक व एक इंग्रजी अश्या दोन वृत्तपत्रात देऊन द्यावी. त्यानंतर त्या हरवलेल्या दस्तची एक प्रमाणित प्रत नोंदणी कार्यालयातून काढून घ्यावी. त्यामुळे हा एक कायदेशीर पुरावा होतो व आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.


त्यानंतर असे अनेक करणे आहेत की लॉस्ट प्रोसेस पोलीस स्टेशन मध्ये नोंदणी करावी लागते. जसे कोणी व्यक्ती हरवला तर त्याचा शोध घेणे कमी पोलीस तक्रार दाखल करावी लागते. जर ती व्यक्ती किंवा वस्तू व कागदपत्रे शोध घेऊन देखिल मिळाले नाही तर पोलीस स्टेशन मधून हरवलेली वस्तू शोध घेऊन देखिल मिळून आलेली नाही असा दाखला घेऊन घ्यावा. त्यामुळे तो एक कायदेशीर पुरावा होतो. जर कोर्टातून त्या व्यक्तीला मयत घोषित करणे असेल किंवा व्यक्तीचे बँकेत काही पैसे वगैरे काढणे असेल नंतर कोर्टातून वारस दाखला काढणे असेल किंवा कायदेशीर लॉस्ट प्रोसेस करणेकामी पुरावा असतो व तो पुरावा कोणत्याही कायदेशीर कामासाठी किंवा कोर्ट कामकाजासाठी कामात येतो.


तसेच बँक जेव्हा स्थावर मिळकतीवर कर्ज देते तेव्हा त्यांना स्थावर मिळकतीचे जुने मुळ चेन दस्त लागत असतात. जर ते जुने चेन दस्त हरवलेले असतील किंवा मिळून आले नाही तर बँकेकडून कर्ज घेण्यासाठी देखिल द्या हरवलेल्या दस्ताची लॉस्ट प्रोसेस करावी लागत असते.


शाळेचा दाखला एल.सी. वगैरे हरवला तर त्याबाबत तक्रार नोंदविणे कमी प्रतिज्ञापत्र देखिल करून द्यावे लागू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads