नोंदणीकृत गहाणखत आणि त्याची Recoveyance Deed.

Adv.Saurabh Rajput
0

 


नोंदणीकृत गहाणखत आणि त्याची Recoveyance Deed. 


आपण माहिती बघणार आहोत नोंदणीकृत गहाणखत आणि त्याची Reconveniyance Deed काय असते व त्याची नोंदणी कशी केली जाते या बाबत.


नोंदणीकृत गहाणखत :-

आधी माहिती बघू नोंदणीकृत गहाणखता बाबत.


बँक जेव्हा स्थावर मिळकतीवर कर्ज देते त्यास सिक्युअर कर्ज असे म्हणतात, कारण बँक ज्या व्यक्तीला कर्ज देत आहे त्या व्यक्तीची मिळकत गहाण ठेऊन त्या व्यक्तीस कर्ज देत असते. याला इंग्रजी मध्ये (LAP - Loan Against Properry) असे म्हणतात.


कर्जदाराच्या मागणीप्रमाणे जेव्हा मिळकतीवर कर्ज दिले जाते तेव्हा बँक कर्जदाराची मागणी आणि बँकेच्या नियमाप्रमाणे व पॉलिसी प्रमाणे सर्व पूर्तता करते. बँकेकडून कर्ज टेक्निकल, लीगल आणि क्रेडिट approval आल्यावर बँकेकडून निश्चित होते की,  किती कर्ज मंजूर केले जाईल त्यानुसार मग बँकेकडून कर्जाचे Sanction letter काढले जाते.


बँकेद्वारे नोंदणीकृत गहाणखत किंवा नोटीस ऑफ intimation केले जाते. परंतु आता आपण माहिती बघणार आहोत नोंदणीकृत गहाणखता बाबत.


बँक नोंदणीकृत गहाणखत करते आणि त्याच बरोबर त्या मिळकतीचे सर्व मूळ दस्त बँक त्यांच्या ताब्यात ठेवते. जेव्हा कर्जाची परत फेड पूर्ण केली जाते तेव्हा बँक ग्राहकास ते मुळ सर्व दस्त परत देते. आणि मग त्या कर्जाचे Reconviniyance डीड करून घ्यावे लागते.


बँक मिळकत गहाण करते परंतु त्या मिळकतीचा ताबा हा त्या ग्राहकाकडे असतो त्यामुळे त्याला नजर गहाणखत असे म्हणतात. कायद्याप्रमाणे गहाणखताचे अनेक प्रकार आहेत परंतु जास्त प्रमाणात नोंदणीकृत गहाणखत / नजर गहाणखत त्याच बरोबर NOI नोटीस ऑफ इंटिमेशन हे जास्त प्रमाणात केले जात असते.


कर्जामध्ये अनेक व्यक्ती असतात परंतु स्थावर मिळकतीचा मालक जो आहे म्हणजे त्याच्या नावावर मिळकत आहे त्याला किंवा अनेक मालक असतील तर त्यांना सर्वांना बँक लोन मध्ये घेत असते तरच कर्ज हे मंजूर केले जाते.


त्यानंतर गहाणखताचा मसुदा लीगल ड्राफ्ट तयार केला जातो. त्यामध्ये कर्ज घेणार ग्राहक म्हणजे कर्जदार, सहकर्जादर नंतर कर्ज देणार बँक यांची संपूर्ण माहिती असते. त्यानंतर कर्जाची रक्कम असते. ज्या स्थावर मिळकतीचे गहाणखत करत आहेत त्याची संपूर्ण माहिती. जसे मिळकतीचे वर्णन, चातु:सिमा, मालकाचे नाव वगैरे माहिती असते. नंतर कर्जास Gaurantor जे असतात त्यांची नावे, साक्षीदार नावे वा पत्ता असतो. अशी त्या कर्जा विषयी माहिती असते. 


त्यानंतर त्या गहाणखतास इतर आवश्यक महत्वाची कागदपत्रे लावले जातात. जसे बँकेचे कर्ज मंजूर पत्र म्हणजेच Loan Sanction Letter. या मध्ये कर्जाची सर्व माहिती. कर्ज मंजूर रक्कम, हप्ता, व्याजदर, परतफेड अशी संपूर्ण कर्जाबाबत माहिती असते. अटी व शर्ती नमूद असतात ते लावले जाते. त्यावर ग्राहकाची सही असते, बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याची सही शिक्का असतो. आता बँकेचे देखिल सर्व कामे ऑनलाईन होत असतात त्यामुळे Loan Sanction Letter वर ई साईन घेतली जात असते.


त्यानंतर गहाण खातास सर्वांचे पत्ता पुरावे, जसे आधार कार्ड, pan कार्ड वगैरे कागदपत्रे जोडले जातात. जर गरज असेल तर आवशकतेनुसार अजून इतर कागदपत्रे जोडले जातात जसे काही NOC, काही संमतीपत्र असेल ते, काही प्रतिज्ञापत्र असेल ते, एका व्यक्तीचे जर दोन नवे असतील तर त्याबाबत दस्त, मिळकतीचा लेआऊट, असे गरजेनुसार दस्त जोडले जातात. नंतर बँक स्थावर मिळकतीचे जे काही मुळ दस्त जमा करून घेत आहे त्याची माहिती असू शकते. हे सर्व कामे बँकेचे वकील किंवा नियुक्त केलेले वेंडर यांचे मार्फत केले जात असतात.


त्यानंतर त्या गहाणखत दस्त याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात केली जाते. पूर्वी मिळकत ज्या ठिकाणी आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी गहाणखताची नोंदणी केली जात होती परंतु आता एक जिल्हा एक नोंदणी होते त्यामुळे मिळकत जिथे आहे तिथे जिल्ह्यात नोंदणी होऊ शकते परंतु शक्यतो जो तालुका असेल तिथल्याच कार्यालयात दस्ताची नोंदणी केली जात असते.


गहाणखत दस्त नोंदणी करण्यापूर्वी सर्व दस्त नीट चेक करून घ्यावा. सर्व नावे, पत्ता, कर्जाची रक्कम,  मिळकतीचे वर्णन, चतु:सीमा हे सर्व नीट तपासून घ्यावे. Saction letter आणि गहाण खतातील नावे आणि कर्ज रक्कम नीट तपासून घ्यावी. आधार कार्ड, Pan कार्ड वरील नावे तपासून घ्यावीत.


त्यानंतर त्या दस्ताची ऑनलाईन डेटा एन्ट्री केली जाते, DHC दस्त हाताळणी शुल्क काढले जाते, नोंदणी फी आणि स्टॅम्प ड्युटी भरली जाते. हे सर्व त्या गहाणखत दस्ताला जोडले जाते आणि त्या गहाण खताची नोंदणी केली जाते.


गहाणखताची नोंदणी, नोंदणी कार्यालयात झाली म्हणजे त्या कर्जाची एंट्री ऑनलाईन सर्च मध्ये दिसत आते, त्या मुळे कोणती ही बँक कर्ज देण्यात आधी ऑनलाईन सर्च घेऊन घेते. त्यामुळे कर्जाची फेड  झाली म्हणजे त्याचे Reconvineyance Deed करून बोजा कमी करून घ्यावा. म्हणजे नवीन कर्ज घ्याचे असेल किंवा मिळकत हस्तांतर करणे असेल तर अडचण येत नाही.


गहाणखत नोंदविताना काही चूक झाली तर त्याचा चूक दुरुस्त दस्त करावा लागू शकतो त्यामुळे शक्यतो दस्त नोंदविताना काळजीपूर्वक व नीट तपासून दस्त नोंदणी करावा. 

इतर ब्लॉग पोस्ट :-

चूक दुरुस्त दस्त म्हणजे काय ? व तो कसा नोंदणी करावा.

गहाणखात नोंदविले म्हणजे बँक त्याप्रमाणे त्यांचा कर्जाचा बोजा उताऱ्यावर नोंद करत असते. मुळ गहाणखत हे बँक जमा करते परंतु कर्जाची परत फेड झाली माझे इतर मुळ कागदपत्रे त्याच बरोबर गहाणखत ग्राहकास परत दिले जाते. कर्जाची परतफेड झाली म्हणजे उतारावरील बोजा कमी करून घ्यावा. जर NOI म्हणजेच नोटीस ऑफ intimatiom केलेले असेल तर शक्यतो त्याचा बोजा उताऱ्यावर नोंद केला जात नाही.


आता माहिती बघू Recoveyance Deed बाबत. 


कर्जाची सर्व परत फेड झाली म्हणजे बँक ग्राहकास मुळ जमा असलेले दस्त परत देते. कर्ज बाकी नाही त्याबाबत NOC देते आणि केलेले गहाणखत रद्द करून घ्यावे लागते म्हणजे त्याचे Recoveyance Deed करून घ्यावी लागते.


Recoveyance हे ग्राहकाला कमी करून घ्यावे लागते. त्यासाठी बँकेशी बोलून आणि नोंदणी कार्यालयाची वेळ घेऊन Recoveyance Deed चां दस्त करून घ्यावा लागतो.


मग Recoveyance Deed चा दस्त तयार केला जातो. त्याला कर्ज फेडलयाबातची NOC जोडली जाते. इतर KYC वगैरे दस्त जोडले जातात. दस्त नोंदणी फी वगैरे काढली जाते. ऑनलाईन डेटा एंट्री केली जाते. बँके चे अधिकृत अधिकारी यांचे ओळखपत्र, बँकेने त्यांना दिलेले अधिकरपत्र त्या दस्तास जोडले जातात. बँकेचे जे अधिकारी असतील ते बँके तर्फे उपस्थित राहतात. दोन साक्षीदार लागतात सर्वांच्या सह्या / अंगठे घेतले जातात आणि Recoveyance Deed चा दस्त नोंदणी केला जातो.


नोंदणीकृत गहाणखत आणि Recoveyance डीड नोंदणी कमी ग्राहकास काही खर्च लागतो जसे नोंदणी फी, डेटा एन्ट्री फी, स्टॅम्प ड्युटी असा काही खर्च लागत असतो.


Recoveyance डीड नोंदणी केली म्हणजे उताऱ्यावर बँकेचा कर्जाचा बोजा असेल तर तो कमी करून घ्यावा.

इतर ब्लॉग पोस्ट :-

7/१२ उताऱ्यावर नवीन मालकाच्या नावाची नोंद / कर्जाची नोंद किंवा बोजा कमी करणे.

उताऱ्यावर बोजा नोंदविणे किंवा कमी करणे कमी तलाठी कार्यालयात अर्ज द्यावा लागतो. दस्ताची प्रत आणि इंडेक्स दोन जमा करावी लागते. आता सदर अर्ज ऑनलाईन देखिल जमा करता येतो.


जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँकेला त्या मिळकतीवर कर्ज वसूल करणेकामी कायदेशीर अधिकार प्राप्त असतो.


जर NOI नोटीस ऑफ intimation नोंदविलेले असेल तर त्याची Recoveyance डीड नोंदविण्याची गरज नसते. कर्ज फेडले म्हणजे बँकेची कर्ज फेडले बाबत NOC महत्वाची असते आणि कर्ज फेडले म्हणजे बँक ग्राहकास सर्व जमा असलेले मुळ दस्त परत देत असते. 

नजर गहाण रद्द लेख नमुना :



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads