नोंदणीकृत चूक दुरुस्ती दस्त
आपण माहिती बघणार आहोत नोंदणीकृत चूक दुरुस्ती दस्ता बाबत.
कोणताही नोंदणीकृत दस्त नोंदविल्यावर त्यामध्ये जर काही चूक झाली तर झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी नोंदणीकृत चूक दुरुस्तीचा दस्त नोंदणी करावा लागत असतो.
चूक दुरुस्तीचा दस्त या नावावरूनच आपल्याला समजते की, हा दस्त झालेली चूक दुरुस्त करणेसाठी आहे.
चूक दुरुस्त दस्ताला इंग्रजी मध्ये Rectification Deed किंवा Correction Deed असे म्हटले जाते.
जेव्हा आपण दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात खरेदीखत, बक्षिसपत्र, वाटणीपत्र, हक्कासोडपत्र, गहाणखत इत्यादी दस्त नोंदणी करत असतो तेव्हा आपल्याकडून अनावधानाने त्या दस्तामध्ये काही चूक झाली तर झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आपल्याला चूक दुरुस्तीचा दस्त नोंदणी करावा लागतो.
त्यामुळे कोणताही दस्त नीट काळजीपूर्वक तपासून नोंदणी करणे महत्वाचे आहे. कारण दस्ता मध्ये काही चूक झाली तर आपल्याला अडचण येऊ शकते व त्याचा चूक दुरुस्ती दस्त पुन्हा नोंदणी करावा लागेल.
एखादी दस्त नोंदणी करतांना आपणाकडून काही चूक झाली, जसे प्लॉट नंबर, गट नंबर चुकला असेल, काही नाव चुकले असेल किंवा प्लॉट मिळकतीची दिशा वगैरे चुकली असेल तर आपल्याला झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी चूक दुरुस्तीचा दस्त नोंदणी करावा लागतो.
चूक दुरुस्ती दस्त हा आपल्याला ठराविक चुकांसाठीच नोंदविता येतो. जर मूळ दस्ताच्या उद्देशातच बदल होत असेल, किंवा मूळ दस्तच बदलत असेल तर असा चूक दुरुस्ती दस्त आपल्याला नोंदवित येत नाही.
एखादी दस्त नोंदविताना आपल्याकडून टायपिंग मिस्टेक होऊ शकते अशा वेळेस चूक झाली तर आपल्याला चूक दुरुस्ती दस्त नोंदवा लागतो.
चूक दुरुस्ती चा दस्त हा नोंदणी कायद्यातील कलम 17 नुसार होत असते. या कलमानुसार चूक दुरुस्तीपत्राला मान्यता देण्यात आलेली आहे.
नोंदणी कायद्यानुसार चूक दुरुस्ती दस्तासाठी काही महत्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे :-
A correction deed (or rectification deed) is registered under Section 17 of the Indian Registration Act, 1908. Because it alters or confirms an interest in immovable property, registration is mandatory if the original document was also registered.
Factual Errors Only: It can only correct genuine, inadvertent mistakes like typos, spelling errors, or incorrect property numbers.
No Core Changes: You cannot use a correction deed to change the fundamental nature of the transaction, transfer of ownership, or financial consideration.
Mutual Consent: Both parties (buyer and seller) from the original transaction must be present for the registration.
बराच वेळा असे होते की आपण जेव्हा दस्त नोंदणी करतो त्यावेळी झालेली चूक लगेच लक्षात येत नाही. परंतु आपण जेव्हा त्या मिळकतीवर कर्ज वगैरे घेण्यास जातो किंवा ती मिळकत हस्तांतर करत असतो तेव्हा आपल्याला दस्तामध्ये झालेली चूक लक्षात येते, की काय चूक झालेली आहे. त्यामुळे आपल्याला तेव्हा चूक दुरुस्ती दस्त नोंदणी करावा लागत असतो.
मूळ दस्तामधील जे पक्षकार असतील जसे लिहून घेणार, लिहून देणार, संमती देणार वगैरे ते सर्व पक्षकार चूक दुरुतीपत्राचा दस्त नोंदविताना हजर राहणे आवश्यक आहे.
चूक दुरुस्तीपत्र तयार करताना सर्वात आधी दस्ताच्या सुरुवातीलाला चूक दुरुस्तीपत्रक असे शीर्षक असते. त्यानंतर लिहून घेणार व लिहून देणार यांची संपूर्ण माहिती असते. त्यानंतर ज्या दस्ताचा चूक दुरुस्त दस्त करत आहोत त्याची माहिती नमूद करावी लागते. मूळ दस्त कधी नोंदविला, त्याचा क्रमांक काय आहे हे नमूद करावे लागते. तदनंतर मिळकतीचे वर्णन नमूद करावे लागते. त्यानंतर काय चूक झाली होती आणि ती झालेली चूक दुरुस्त करत आहोत त्याबाबत माहिती नमूद करावी लागते.
त्यानंतर दस्ताला आवश्यक ते कागदपत्रे जोडले जातात जसे चालू उतारा, आधार, पॅन कार्ड वगैरे. नंतर डेटा एन्ट्री केल्याबाबत व स्टॅम्प ड्युटी, नोंदणी फी, दस्त हाताळणी शुक चलन इत्यादी कागदपत्रे त्या दस्तासोबत जोडले जातात. आणि सर्वांच्या सह्या व दोन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात आणि चूक दुरुस्तीच्या दस्ताची नोंदणी केली जाते.
चूक दुरुस्ती दस्त कधी व किती वेळाने केला जावा याबाबत कायद्यात काही नमूद नाही. परंतु चूक लक्षात येताबरोबर चूक दुरुस्त दस्त नोंदवून घेणे महत्वाचे आहे. कारण चूक दुरुस्त दस्त लवकर केला नाही तर नंतर चूक दुरुस्त दस्त नोंदणी करणेसाठी बऱ्याच अडचणी येऊ शकतात. जसे जुने दस्तामधील लिहून देणार पक्ष हे दस्त नोंदवून देण्यास टाळाटाळ करू शकतात किंवा जास्त पैशांची मागणी करू शकतात व नकार देऊ शकतात. किंवा जुन्या दस्तामधील लिहून देणार यांच्यापैकी कोणी मयत होऊ शकते. त्यांचे वारस दस्त नोंदवून देऊ शकतात परंतु ते देखील दस्त नोंदणी करून देण्यास नकार देऊ शकतात. त्यामुळे वेळीच चूक लक्षात आल्यावर लवकरात लवकर चूक दुरुस्त दस्त करून घेणे महत्वाचे असते.
चूक दुरुस्त दस्त नोंदविण्यासाठी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी लागते तसेच 100 रुपये नोंदणी शुल्क लागते आणि दस्तास जितके पेजेस असतील त्याप्रमाणे 40 रुपये प्रत्येक पानाप्रमाणे शुल्क लागत असते. या व्यतिरिक्त दस्त जे वकील किंवा वेंडर नोंदणी करून देत आहेत त्यांची फी लागेल. परंतु चूक दुरुस्ती साठी काही पुरवणी दस्त करणे असेल तर या व्यतिरिक्त अजून जास्त खर्च देखील लागू शकतो. (सदर खर्चात शासनाच्या नियमाप्रमाणे वेळोवेळी बदल देखील होऊ शकतो.)
जर जुन्या दस्तामधील पक्ष चूक दुरुस्त करण्यास उपलब्ध नसतील किंवा काही अडचण येत असेल तर अशा वेळेस चूक दुरुस्त दस्त करणे कमी अडचण येत असते. त्यावेळी सक्षम दिवाणी न्यायालयात त्यासाठी दावा दाखल करावा लागतो.
आपण थोडक्यात या दाव्याची कार्यपद्धती बघू.
दावा दाखल करणे आधी जर समोर पार्टी हयात व उपलब्ध असेल तर त्यांना प्रथम नोटीस पाठवावी लागते. नोटीस मध्ये नमूद करावे की, काय चूक झालेली आहे व ती चूक दुरुस्त करणे आहे. त्यामुळे चूक दुरुस्त दस्त लिहून व नोंदवून द्यावा त्यासाठी ठरलेल्या वेळी नोंदणी कार्यालयात उपस्थित राहून दस्त नोंदवून द्यावा. यासाठी 15 ते 30 दिवसांची मुदत समोरील पार्टीला द्यावी.
जर नोटीस पाठवून समोरील पार्टी चूक दुरुस्त दस्त करून देण्यास तयार होऊन गेली तर आपल्याला दावा दाखल करण्याची गरज पडणार नाही.
परंतु जर नोटीस पाठवून देखील समोरील पार्टी उपलब्ध होत नसेल व चूक दुरुस्तीचा दस्त करून देत नसेल तर मग नोंदणी झालेल्या दस्तामधील चूक दुरुस्त होऊन मिळण्यासाठी आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून दाद मागावी लागेल. आणि मग न्यायालयामार्फत योग्य तो दस्त दुरुस्त करण्यासाठी आदेश दिला जाऊ शकतो आणि योग्य ती दुरुस्ती केली जाऊ शकते.

