वकील म्हणून काम करण्यासाठी काही माहिती.

Adv.Saurabh Rajput
0


वकील म्हणून किंवा एक हुशार व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स. 


मित्रांनो आज आज मी तुम्हास सांगणार आहे वकिली व्यवसायात काम करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स ज्या ज्युनियर म्हणजेच नवीनच वकिली होणाऱ्या किंवा नवीनच वकील झालेल्या वकिलांना कामात येतील. या गोष्टी मी स्वतः कामातून व अनुभवातून आणि  सिनियर अनुभवी लोकांसोबत काम करून शिकलेलो आहे.


तुम्ही वकिली, नोकरी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात जरी काम करत असाल तरी  तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्हास या टिप्स कामत येतील. 


जे काही सिनियर आहेत त्यांना या सर्व टिप्स आणि यापेक्षा अजून जास्त गोष्टी माहिती असतात  कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचा अभ्यास, मेहनत यातून ते  बऱ्याच गोष्टी शिकलेले असतात. मी देखील काही महत्वाच्या गोष्टी या मला आलेला अनुभव, माझा अभ्यास, माझ्याकडून झालेल्या चुका, यातून शिकलेलो आहे. आणि अनेक सिनियर वकिलांसोबत काम करून शिकलेलो आहे. मी माझ्या आयुष्यात वकिली व्यवसायातील जास्त गोष्टी या माझे जवळचे वकील माझे शुभचिंतक यांच्याकडूनच शिकलेलो आहे. मी ज्यांच्यासोबत काम केले त्यांनी मला शिकवले त्यामुळे मी पण त्यांच्याकडून वकिली क्षेत्रातील कामे शिकलो. वकिली चा अभ्यास पूर्ण केला आणि वकील झालो.  


आपण देखील आपल्या क्षेत्रातील अभ्यास, प्रत्यक्ष अनुभव यातून बऱ्याच गोष्टी शिकत असतात. आपले जे काम असेल त्या क्षेत्रातील त्यानुभवाचा आपल्याला फायदा होत असतो. आपले सिनियर हे देखील पूर्वी ज्युनियर असतात त्यांना देखील बऱ्याच गोष्टी या माहिती नसतात परंतु ते देखील त्यांचा अनुभव, अभ्यास, चुका, त्यांचे सिनियर, आई वडील, भाऊ, बहीण, मित्र यांचेकडून बऱ्याच गोष्टी आयुष्यात शिकलेले असतात.


मी ज्यांच्याकडे काम शिकलो ते माझे गुरूच होते. त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरूला महत्व आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्यामधील अनुभवी सिनियर लोकांकडून जर आपण काम शिकलो तर त्याचा आपल्याला फायदा होतो. कारण कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी मेहनत लागते, आपल्याकडून चुका होतात मग त्या गोष्टी आपण शकतो. परंतु सिनीर लोकांना खूप अनुभव असतो. त्याचा आपल्याला फायदा होतो व गोष्टी आपण लवकर शिकू शकतो.


वकील म्हणून काम करतांना एक चौकशी वृत्ती ठेवावी. आपले कुठे काही काम असेल आपण ते काम करायला गेलो की  तिथे आपल्या कामासंबंधीत सर्व माहिती घेऊन घ्यावी. चौकशी वृत्ती ठेवल्याने, प्रश्न विचारल्याने आपल्याला माहिती मिळते आणि आपले काम सोप्पे होते.  माझे सिनियर वकील काम करतांना मला नेहमी सांगत असे CID सारखे काम करावे. म्हणजे चौकस बुद्धी ठेऊन, डोक्याचा वापर करून, कॉमन सेन्स चा वापर करून काम करावे.


कोणताही काम एकदम टॉपचे म्हणजे एकदम नीट लक्ष देऊन व व्यवस्थित करावे. काम कितीपण छोट असो ते नीट लक्षपूर्वक काळजीने करावे. त्यामुळे काय होते आपल्याला लक्षपूर्वक काम करण्याची सवय लागते. त्यामुळे आपला कामावर फोकस वाढतो. असे म्हटले जाते की आपल्याला ठेच ही डोंगराने नाही तर छोट्या दगडाने लागते. म्हणजे छोट्या चुका किंवा एखादी छोट्या कामात पण चुका होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे कोणताही काम काळजीपूर्वक करावे. एक चांगला वकील म्हणून टॉप चे काम करणे असेल तर काम नीट काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. कारण जो हुशार वकील असतो त्याच्या चुका शोधणे पण कठीण काम असते. 


कोणतेही काम नीट लक्षपूर्वक करणे हे मी देखील मोठ्या अनुभवी वकिलांसोबत काम करून शिकलेलो आहे. तुम्ही इतर मोठे लोक जरी बघाल जसे शाहरुख खानचे Motivational व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये देखील सांगितलेले आहे की आपल्या क्षेत्रात मोठे होण्यासाठी नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन काम करणे महत्त्वाचे आहे.


एक वकील म्हणून काम करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक वेळेस एकच काम करावे. कोणते काम महत्वाचे आहे. कोणत्या कामाला किती वेळ द्यावा. आधी कोणते काम करावे हे ठरवून घ्यावे पण एक गोष्ट लक्षात ठेवावी एक वेळेस शक्यतो एकच काम करावे. यामुळे काय होते आपला आपल्या कामावर फोकस होतो. त्या कामात चुका होत नाही. गोंधळ होत नाही. ते काम लवकर पूर्ण होते. आणि आपण एक वेळेस वेगवेगळे प्रकारची कामे केली तर काम करण्याला जास्त वेळ लागतो. कामात चुका होतात. गोंधळ होऊ शकतो. जेव्हा आपण एक कामावरून दुसरे काम स्विच करतो तेव्हा ते काम समजण्यास थोडा वेळ जातो. आणि एक देखील काम लवकर पूर्ण होत नाही.


स्वामी विवेकानंद यांनी देखील सांगितलेले आहे की आपल्याला जर एखादी गोष्टीत / क्षेत्रात एक्स्पर्ट व्हायचे असेल तर फोकस महत्वाचा आहे.


आपल्या कामावर आपला फोकस असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे आपले काम नीट होते. चुका होत नाही. काम योग्यप्रकारे कमी वेळेत पूर्ण होते. आणि कोणतीही आडवघड गोष्ट सोप्या पद्धतीने मांडण्याची कला विकसित होते.


एका वेळेस एकच काम केल्याने आपला आपल्या कामावर फोकस वाढेल. फोकस वाढल्याने. वकील त्याच्या कामातून अशी गोष्ट शकतो की कोणतीही कॉम्प्लीकेटेड, अवघड गोष्ट त्याच्या लवकर लक्षात येते. या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवातून लक्षात येत असतात.


एक गोष्ट आहे ते माझे सिनियर वकील मला नेहमी सांगायचे, व त्यानंतर ही गोष्ट मी देखील माझ्या अनुभवातून शिकलेलो आहे ती म्हणजे,  एक काम एकाचदा करायचे, घडी घडी नाही करायचे, म्हणजे आपण जेव्हा कोणतेही काम करतो ते नीट शांततेत, लक्ष देऊन, एकाच वेळी नीट करून घ्यायचे त्यात चूक होणार नाही याची काळजी घ्यायची. थोडा वेळ लागला तरी चालेल पण ते काम नीट करून घ्यायचे. याचे कारण असे आहे की, आपण घाई घाई मध्ये लक्ष न देता काम केले आणि नंतर समजले त्यात काही चूक आहे, तर ती चूक सुधारण्यात खूप वेळ जातो. आपल्याला एकच गोष्टीवर डबल, पुन्हा पुन्हा काम करावे लागते. आपण जेव्हा ते काम परत करतो तेव्हा त्या कामाचे परत पुन्हा दस्त तपासावे लागतात, पुन्हा त्यावर काम करावे लागते, पुन्हा परत सुरवातीपासून सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतात तपासून घ्याव्या लागतात. या मधे खूप वेळ वाया जातो. आणि त्यामुळे आपल्या दुसऱ्या कामांना वेळ होत जातो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, एक काम एकाचदा व्यवस्थित करून घ्यायचे त्यावर पुन्हा पुन्हा काम करण्याची गरज नको.


मी ज्या अनुभवातून शिकल्या गोष्टी सांगत आहे परंतु अजून महत्वाचे आहे की आपण आपले जे काही काम असेल ते काम परिस्थिती नुसार (situation) नुसार डोक्याचा वापर करून व Comman sence चा वापर करून करणे वकिलासाठी महत्त्वाचे आहे.


वकील हा कोणतेही काम क्रमा क्रमाने करतो. कारण त्याला अनुभवातून माहिती असते की कोणते ही काम सुरवातीपासून स्टेप बाय स्टेप केले तर ते काम पूर्ण होते. तो ते काम करण्याची पूर्ण प्रक्रिया करतो. त्याला माहिती आहे शॉर्टकट घेतला तर ते काम नीट पूर्ण नाही होणार.  तो कामाच्या प्रोसेस वर विश्वास ठेवतो. कारण त्याला माहिती आहे काम होण्यासाठी प्रोसेस महत्वाची आहे. श्रीकृष्णाने देखील सांगितलेले आहे की कर्म महत्वाचे आहे, फळाला ची चिंता करू नका, कारण आपण कर्म, आपले काम नीट केले तर तसे आपल्याला फळ मिळत असेल. काय फळ मिळेल हे जरी आपल्या हातात नसले तरी कर्म करणे आपल्या हातात आहे. जर आपले कर्म योग्य व चांगले असेल तर आपल्याला फळ देखील योग्य व चांगले भेटेल.


कोणत्याही गोष्टीचा सर्च घेणे. ती शोधली की सापडते. ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून शिकलेलो आहे. वकील जसा स्थावर मिळकतीचा सर्च घेतो तेव्हा त्याला सर्व माहिती शोधावी लागते. काही माहिती कागदपत्रांमध्ये मिळते, काही माहिती माहिती ऑनलाइन मिळते, काही माहिती पक्षकारास प्रश्न विचारून मिळते व वकील शोध घेत जातो. त्याला माहिती मिळत जाते आणि त्याचा सर्च पूर्ण होतो. तसेच आपले जीवनात असते आपल्याला काही पाहिजेल असेल ते शोधावे लागते. त्याबाबत शोध घेऊन माहिती घ्यावी लागते. मग ती गोष्ट आपल्याला मिळते. उदा. आपल्याला एखादी ठिकाणी जायचे असेल व पत्ता माहिती नसेल तर आपल्याला शोध घ्यावा लागतो मग आपण आपल्या पत्त्यावर पोहोचतो.


तसेच आपण आपल्या जीवनात आपल्याला काही पाहिजेल असेल व ते आपल्याला मिळाले नाही तर आपण लगेच नाराज होऊन जातो. परंतु ज्या लोकांची शोध वृत्ती आहे. त्यांना माहित असते की शोधले म्हणजे मिळते. आपल्या जीवनात असे प्रत्येक वेळेस होत नाही की आपल्याला जे पाहिजेल ते लगेच मिळून जाईल. परंतु त्यासाठी शोध वृत्ती, प्रश्न विचारणे, चौकशी वृत्ती महत्त्वाची आहे. शोध घेऊन आपल्याला पाहिजेल ती वस्तू मिळाली तर आपल्याला देखील आनंद होत असतो.  वकिलांना त्यांच्या कामात बऱ्याच गोष्टींचा तपास करावा लागतो, शोध घ्यावा लागतो त्यामुळे त्यांची शोध वृत्ती व चौकस वृत्ती वाढते. आपण जर इतिहासातील मोठे शास्त्रज्ञ बघितले तर त्यांनी देखील शोध घेतला म्हणून मोठे मोठे शोध लागले. 


कोणत्याही कामाची एकच वेळेस सर्व माहिती घेऊन घेणे. उदा. सिनियर वकिलाने काम सांगितले कोर्टात जा आणि एखादी काम असेल ते करून आन. किंवा काम सांगितले एखादी केस कोर्टात दाखल करून आन. तुम्ही कोर्टात गेला परंतु संबंधित क्लार्क रजेवर असेल आणि तुमचे काम झाले नाही तर तुम्ही परत वकिलाच्या कार्यालयात परत येऊन जाल. तुमचे सिनियर वकील तुम्हास प्रश्न विचारतील क्लार्क रजेवर आहे त्याचा चार्ज दुसऱ्याला दिलेला असेल तिथे आपण केस दाखल करू शकतो. तेव्हा आपल्या लक्षात येईल आरे आपण तर ही माहिती विचारली नाही. त्यामुळे काय होते आपला वेळ वाया जातो. एक काम डबल करावे लागते. त्यामुळे कधी ही लक्षात ठेवणे आपले जे काही काम असेल ते नीट शांततेत, विचारपूर्वक आणि एकच वेळी पूर्ण करून घ्यावे. पक्षकाराकडून जरी आपल्याला माहिती घेणे असेल तर नीट सर्व माहिती घेऊन घेणे व गरज वाटल्यास महत्वाचे मुद्दे लिहून ठेवावे.


कोणतेही काम आपले स्वतःचे डोक वापरून काम करणे. सर्व काम आपल्याला सांगण्याची गरज नको. म्हणजे समजा तुम्हाला सिनियर वकिलाने सांगितले चल आपल्याला कोर्टात जायचे आहे ? तर फक्त सोबत न जाता ? किंवा सिनियर काम सांगेल तेव्हाच काम न करता ? स्वतःहून स्वतःचे डोक वापरून काम करावे जसे ? पहिलेच आपण स्वतःहून तपासून घ्यायचे आज आपले / सिनियर चे कोर्टात काय काय काम आहे. कोणत्या कोणत्या केसेस ची आज तारीख आहे. ते सर्व दस्त सोबत घेतले आहेत ना ? ही खात्री करून घेणे. कोण कोणत्या केस मध्ये काय काय होणार आहे व आपल्याला काय काय करायचे आहे हे स्वतःहून आपण माहिती घेऊन घेणे. काही माहिती आपल्याला सिनियर मी विचारली नाही किंवा त्याला काही माहित नसेल, ते काही विसरले असतील तर स्वतः आपण त्यांना ती गोष्ट सांगणे. म्हणजे आपला सिनियर पण म्हणेल की, आरे आपला ज्युनियर तर हुशार आहे. आपले सिनियर हे आपल्यापेक्षा हुशारच असतात. आपण देखील कोणतेही काम न सांगता समजून घेऊन, कॉमन सेन्स वापरून करून घेतले पाहिजेल.


हुशार वकील हा कामा संबंधित तसेच त्याच्या केस संबंधित कोणतीही गोष्ट अभ्यास करून, कागदपत्रे तपासून बोलतो. त्यामधील माहिती त्याला माहिती असते . म्हणजे वकील हा हवे मधे गोळ्या मारत नाही. म्हणजे अंदाजे काहीपण सांगत नाही. तो जे काम करतो ते अंदाजे करत नाही.  त्यामुळे त्यांची कोणतीही गोष्ट ही प्रभावी ठरत असते.


वकील जेव्हा कोर्टात कामकाजासाठी जातो तेव्हा त्याचा त्याच्या केस संदर्भात आभास झालेला असतो. कोणते कागदपत्रे कुठे लावलेले आहेत हे त्याला माहीत असते. म्हणजे कोर्टाने केस संदर्भात प्रश्न विचारला म्हणजे त्याला उत्तर देता येते. कोणत्याही कागदपत्रांची गरज पडल्यास ते फाईल मधून क्षणात काढू शकतो.आपण कोणत्याही क्षेत्रात असाल पण या पद्धतीने काम केले तर तुम्हास त्याचा फायदा होऊ शकतो. वकील अभ्यास करून माहीत घेऊन बोलतो. वकिलाला कोणतीही गोष्ट नीट समजून सांगता येते. त्यामधील महत्वाचे मुद्दे काय आहेत हे त्याला लगेच समजतात.


हुशार वकील हा कोणतेही काम त्याचे स्वतःचे डोक वापरून करतो. कोणी करत आहे, कोणी पण सांगत आहे म्हणून करत नाही. कोणतीही गोष्ट दुसऱ्याने जरी सांगितली तरी स्वतः पण तपासून बघतो.


हुशार वकील हा खूप सारे वचन आणि लिखाण करतो. वाचन करणे यासाठी महत्त्वाचे आहे की त्यामधून आपण खूप सारी माहिती शिकतो. आपले नॉलेज वाढते. त्यामुळे वाचन व लिखाण तसेच ड्राफ्टींग स्कील सुधारते. खूप सारे वाचन करणे महत्त्वाचे आहे. वाचन करण्याचा एक फायदा होतो की वाचन कौशल्य सुधारल्यामुळे कोणतेही केस चे कागदपत्रे बघून, वाचून लगेच त्यामध्ये काय आहे हे समजून जाते जास्त वेळ लागत नाही.


कोणत्याही हुशार वकील अनुभवातून व मेहनतीमधून एक गोष्ट शिकलेला असतो त्याला कोणतीही गोष्ट लगेच लक्षात येते. म्हणजे कोणत्याही गोष्टीतील मेन मुद्दा लगेच लक्षात येतो. उदा. पक्षकाराने थोडी जरी केस बद्दल माहिती सांगितली,  कागदपत्रे दाखवले तरी लगेच समजते की केस काय आहे. केस मधील मेन गोष्ट काय आहे ? महत्वाचा मुद्दा काय आहे. आपल्याला काय करावे लागेल. या सर्व गोष्टी अनुभवातून शिकल्या जातात व समजतात. वकिलांचे खूप वाचन झालेले असते. अभ्यास असतो. आणि त्या त्या प्रकारच्या केसेस, कामे पूर्वी भरपूर हाताळली असतात. त्यामुळे त्यांना अवघड काम देखील करणे सोपे जाते.


हुशार वकील बऱ्याच गोष्टी न सांगता समजून जातो.


कोणत्याही केस चे कागदपत्रे बघून वकिलाला महत्वाचा मुद्दा काय आहे हे समजून जाते. त्याला केस गोष्टी न सांगता देखील समजून जातात. परंतु जास्ती जास्त माहिती मिळविण्यासाठी तो प्रश्न विचारतो. आणि काही क्रॉस प्रश्न विचारून खात्री करून घेतो.


अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी माझे सिनियर मला नेहमी सांगत असत. या गोष्टी ते देखील मेहनत अनुभव, झालेल्या चुका यातून शिकलेले होते.


मी जेव्हा माझ्या सिनियर वकिलांकडे मी प्रॅक्टिस करत होतो तेव्हा ते माझे सिनियर सर मला सांगत असे की, ससा आणि कासवाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपल्याला जिंकायचे असेल तर आपण कासव व्हावे. कारण कासवाला वाटते आपण लगेच जिंकून जाऊ. तो कोणती गोष्ट लगेच वेगात करायला जातो. पण तो सातत्य ठेवत नाही. कासव सत्य ठेवतो म्हणून जिंकतो. आपण देखील आपल्या जी गोष्ट शिकायची आहे, करावयाची आहे ती हळू हळू करावयाची. रोज थोडी थोडी, सातत्य ठेवणे महत्वाचे मग आपण हळू हळू खूप पुढे जातो. म्हणून कासव हळू चालतो पण सश्याच्या पुढे जातो. आपण देखील हळू हळू कासवप्रमाणे रोज काही ना काही शिकत रहावे, वाचन करावे मग आपण हळू हळू हुशार होत जाऊ व आपले ज्ञान वाढत जाईल.



जेव्हा काम करतांना माझ्याकडून चूक होत असे. बऱ्याचवेळा असे पण झाले की माझ्याकडून अगदी छोटी चूक झाली पण त्यामुळे आमचा खूप वेळ वाया गेला. त्या चुकीमुळे आपल्या केस मध्ये अडचणीपण येऊ शकतात. अशा वेळेस माझे सिनियर सर नेहमी एक म्हण सांगत असे वकिलाने ताक सुद्धा फुकून प्यावे. म्हणजे वकिलाने छोटे काम सुद्धा काळजीपूर्वक करावे नाहीतर लहानशी चूक देखील मोठे नुकसान करू शकते.


जेव्हा मला काम जमत नसे, काही चूक होत असे, माझे जे काम आहे त्याची मला माहिती रहात नसे व त्यामुळे अडचण येत असे तर माझे सिनियर वकील नेहमी मला एक म्हण नेहमी सांगत असे आधुरा हकीम जान खत्रे में. म्हणजे आपण जे काम करतो त्यामध्ये पूर्ण माहिती ठेवावी. अर्धवट माहिती घेऊन काम नाही करायचे नाही तर धोका निर्माण होऊ शकतो.


आपल्याला केस संदर्भात पक्षकाराला किंवा इतर कोणाला काही माहिती विचाराची असेल तर एकच वेळी महत्वाची माहिती विचारून व लिहून ठेवावी. म्हणजे घडी घडी विचारण्याचे काम नको.


तुम्ही जेव्हा ज्युनियर म्हणून काम करतात तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे व ती म्हणजे स्वतः कोणतेही काम करून घ्यावे. म्हणजे स्वतः हून गोष्टी समजून घ्याव्यात. सर्व गोष्टी सांगण्याचे काम नको. जे हुशार लोक असतात त्यांना गोष्टी आपोआप समजून जातात. कोणाच्या सांगण्याची गरज नको. आपणच हुशार राहून स्वतः काम करून घ्यावे. (तेव्हा समोरील लोकांच्या पण लक्षात येते की, हा व्यक्ती हुशार आहे याला तर काही जास्त सांगायची पण गरज पडत नाही याला तर आपोआप स्वतःहून गोष्टी समजून जातात.)


आपण जेव्हा सिनियर सोबत काम करतो, ज्या त्या क्षेत्रातील एक्स्पर्ट लोकांसोबत काम करतो तेव्हा कळत नकळत आपण देखील हुशार होत जातो. आपण बऱ्याच गोष्टी शकतो. जसे एखादी न्यायाधीश असतील आहे त्यांच्या सोबत त्यांचा स्टेनो काम करत असतो. तेव्हा तो बऱ्याच गोष्टी शिकून जातो आणि बऱ्याच गोष्टी तो स्वतः शिकून अनुभवातून शिकून जातो. घडी घडी त्याला सांगायचे काम नाही. न सांगता तो बरेच काम करून टाकतो. त्याचप्रमाणे सिनीर व हुशार व्यक्ती बरोबर काम करण्याचा आपल्याला फायदा होतो. 


परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे आपल्याला जर खरोखर काही शिकायचे असेल तर त्यासाठी अभ्यास, सराव, खूप सारी मेहनत, चुकांमधून शिकत जाणे. कामात सातत्य ठेवणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि याच गोष्टीमुळे ज्या त्या क्षेत्रातील महान लोक  इतर लोकांपेक्षा पुढे जाऊन प्रगती करतात. परंतु वर जसे स्टेनोचे उदाहरण दिले. किंवा सिनियर सोबत काम करून हुशार होण्याचे उदाहरण दिले अशा वेळेस काही लोक हे थोडे काही काम शिकले की गर्व करतात. त्यामुळे आपली प्रगती होत नाही आपण जास्त काही शिकू शकत नाही. जसे एखादी डॉक्टर च्या हाताखाली काम केले, थोडे काम जमायला लागले की, एकादी माणूस स्वतःला डॉक्टर समजायला लागतो पण वास्तविक ते डॉक्टर पेक्षा हुशार नसतो.


यामुळे आपण किंवा कोणीही एखादी व्यक्तीने हुशार वकिलांसोबत काम केले आपल्या थोडे  जमायला लागले तर आपण पण स्वतःला हुशार समजतो. काही लोकांना खूप गर्व येऊन जातो. परंतु जे हुशार वकील किंवा कोणत्याही क्षेत्रातील हुशार व्यक्ती असतात त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो, खूप चुका केलेल्या असतात. त्यातून ते शिकलेले असतात. त्यांनी आधी त्या क्षेत्रात मेहनत घेतलेली असतें.


एक गोष्ट म्हणजे कर्म महत्वाचे आहे त्याचा रिझल्ट नाही. कारण आपल्या हात कर्म आहे परंतु त्याचा रिझल्ट नाही. पण जर आपले कर्म चांगले असतील तर फळ भेटेल. श्रीकृष्णाने देखील भागवत गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेले आहे की आपले कर्म करावे फळाची चिंता नाही करावी. जर आपण प्रथमच फळाची चिंता केली तर आपल्याकडून कर्म नीट होत नाहीत. हुशार अनुभवी लोकांना तसेच वकिलांना ही गोष्ट माहिती असते. कारण केस या निकाल तर आपल्या हातात नाही पण कर्म आपल्या हातात आहेत आणि ते नीट करणे महत्वाचे आहे.


माझ्या सिनियर वकिलांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेली एक गोष्ट तुम्हास सांगतो. माझे सिनियर वकील पक्षकारांना सांगत असे की वकील म्हणजे जादू ची कांडी नाही. बऱ्याच लोकांना वाटत असते आपण वकिलांकडे गेलो म्हणजे लगेच आपले काम व्हायला पाहिजेल. आपण लगेच केस जिंकून जाऊ. परंतु एखादी केस जिंकण्यासाठी वेळ लागतो. केस चे कागदपत्रे, केस ची वस्तुस्थिती, वकिलाची मेहनत यावरून काम होत असते. असे नाही की लगेच काम होऊन जाईल किंवा वकील जादू करे. परंतु वकील हा त्याचा अनुभव, अभ्यास, मेहनत यावरून काम करत असतो.


वकील म्हणून आपल्या सर्व कामांची माहिती नोंद ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी डायरी ठेवणे महत्वाचे आहे. आपले सर्व केस संबंधात कागदपत्रे नीट व्यवस्थित ठेवणे महत्वाचे आहे. जे अनुभवी वकील असतात त्यांचा पूर्ण डेटा मेन्टेन असतो. कोणतीही माहिती कागदपत्रे त्यांना गरज असेल तेव्हा क्षणात भेटत. त्यांचा कामामध्ये गोंधळ होत नाही. कोणत्याही केस ची फाइल काढली म्हणजे त्यांना फाइल वाचून त्या केस बाबत सर्व माहिती भेटते. केस मध्ये काय काय झालेले आहे. पुढील तारीख काय आहे तसेच केस ची स्टेज काय आहे वगैरे.


तुम्ही वकील असाल किंवा कुठे नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तरी तुम्हाला तुमच्या कामाचा सर्व MIS ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या कामाची सर्व माहिती तुमच्याकडे राहील. तुम्हाला कधीही माहिती लागली तर तुम्ही बघू शकतात किंवा कोणाला काहीं माहिती लागली तर तेव्हा तुम्ही क्षणात ती माहिती देऊ शकतात.


तुम्हाला तुमच्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी निरंतर त्याच क्षेत्रात काम करणे महत्त्वाचे आहे. काही लोक काय करत एका क्षेत्रात काम न करता धर सोड करतात. कोणत्याही एका ठिकाणी काम करत नाहीत त्यामुळे त्यांना यश मिळत नाही. आपल्याला एखादी क्षेत्रात यशस्वी अनुभवी होण्यासाठी निरंतर त्या क्षेत्रात काम करणे महत्त्वाचे आहे. उदाहरण द्यायचे म्हटल्यास आपल्याला जर विहीर खोदणे असेल तर जेव्हा एकच ठिकाणी खड्डा केला जाईल तरच पाणी लागेल. त्यामुळे कोणत्याही कामात सातत्यता महत्वाची आहे. सातत्यता आली की परिणाम दिसतात.


एक डायरी किंवा मोबाईल मधे नोटपॅड ठेवणे - तुम्ही जेव्हा ज्युनियर वकील म्हणून काम चालू कराल तेव्हा तुम्हास बऱ्याच गोष्टी माहिती नसतील. रोज नवीन काही ना काही शिकत राहाल. त्यासाठी एक डायरी ठेवणे यासाठी महत्त्वाचे आहे की, तुम्ही रोज जे काही नवीन शिकतात ते त्या डायरी मधे नमूद करत जावे.


जेव्हा आपल्याकडून काही चुका होतात तेव्हा विचार करावा की आपल्याकडून ही चूक का झालयं.आपण काय केले असते म्हणजे ही चूक झाली नसती. त्या चुकी मुळे काही अडचण झाली आपण त्यावर सोल्युशन शोधतो. किंवा माहितर, सिनियर कोणाला विचारतो, उत्तर शोधतो आणि आपल्याला सोल्युशन भेटले की आपण ते काम पूर्ण करतो. अशा वेळेस आपल्याला जे जे काही प्रॉब्लेम येतात ते आणि त्यावर आपण काय सोल्युशन केले ते ऐका वहीत लिहून ठेवावे. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम चे वेगवेगळे सोल्युशन माहित होतात. जेव्हा आपल्याला काम करताना काही अडचण आली तर सिनियर किंवा एक्स्पर्ट ला विचारण्या आधी आपण स्वतः विचार करावा काय प्रॉब्लेम आहे ? यावर काय करावे लागेल ? हा प्रॉब्लेम कसा सोडला जाईल ? आणि मग आपले उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा ? लगेच सिनियर किंवा एक्स्पर्ट ला विचारायचे नाही? पहिले स्वतःचे डोक वापराचे. बऱ्याच वेळी आपल्याला अशी सवय असते की आपल्याला काही अडचण आली तर आपण लगेच सिनियर किंवा कोणाला विचारतो असे का झाले ? आता काय करावे ? परंतु कधी ही काही अडचण आली तर आधी स्वतःचे डोक वापरावे आणि तो प्रॉब्लेम सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे कधी  कधी कोणाला न विचारता आपण स्वतःच ती अडचण सोडवून टाकतो. आणि तरी प्रॉब्लेम नाही सुटला तर, स्वतःचे एक उत्तर तयार करून घ्यावे की हा प्रॉब्लेम जर मलाच सोडवायचा असता आणि निर्णय घ्यावा लागला असता तर मी काय निर्णय घेतला असता. आणि मग सिनियर किंवा एक्स्पर्ट ला विचारावे. आणि मग तो प्रॉब्लेम सुटला की मग आपला निर्णय आणि त्याचा निर्णय बघावा बरोबर होता का ? एक्स्पर्ट ने काय केले ते बघावे ? त्यातून काही शिकण्यासारखे असेल तर एका डायरीत ते लिहून ठेवावे. त्यामुळे काय होते  तुमच्या क्षेत्रात काय काय वेगवेळे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यावर काय काय करावे लागते हे तुम्हास माहिती होईल. पुढच्या वेळेत परत ती अडचण आली तर तुम्ही लगेच ती सोडवाल.


आपल्याला काही अडचण आली आणि आपण ती कोणाला घडी घडी न विचारता स्वतःहून सोडवली तर त्यामुळे आपले प्रॉब्लेम सोडविण्याचे स्कील वाढते. कोणतेही प्रॉब्लेम मग आपल्याला पटकन सोडवता येतात. आपण घरात देखील काय करतो आपल्याला एखादी गोष्ट सापडली मी तर लगेच घरात कोणाला पण विचारतो, पण असे न करता आपण प्रथम स्वतःहून ती गोष्ट शोधली पाहिजेल, आणि नाहीच सापडली तर  कोणाला दुसऱ्याला विचारावे. कधी कधी काय होते ती वस्तू जवळपासच असते आपण नीट शोधत नाही म्हणून ती वस्तू आपल्याला लवकर भेटत नाही.


आपल्याला नेमके काय काम करायचे आहे हे आपल्याला माहित पाहिजेल. नसेल तर ते समजून घ्यावे. त्यानंतर कोणतेही काम लक्ष देऊन करावे मग चूक होत नाही आणि काम नीट पूर्ण होते. आपण जे काही बोलतो, ऐकतो ते नीट लक्ष देऊन करावे. समोरील व्यक्ती काय सांगत आहे हे ऐकून समजून घ्यावे मगच आपण बोलावे. बोलण्याची घाई नाही करावे. कारण असे होते की समोरील व्यक्ती काय सांगत आहे हे आपण नीट ऐकत नाही, समजून घेत नाही, आणि आपण स्वतःहून काही पण चुकीचे समजून घेतो, चुकीचा अर्थ लावतो आणि आपले काम त्यामुळे चूक होऊन जाते, आपला वेळ वाया जातो, समोरील व्यक्ती म्हणतो आरे मी वेगळे काही सांगितले होते किंवा सांगायचे होते पण आपण ते घाई मुळे नीट समजून घेतले नाही त्यामुळे आपले कामत चूक होतो वेळ लागतो ते काम आपल्याला परत करावे लागते. त्यामुळे कोण काय सांगत आहे, महत्वाचा मुद्दा काय आहे, आपल्याला काय करावे लागणार आहे ह्या सर्व गोष्टी वकील म्हणून नीट समजून घ्याव्यात. तसेच आपल्याला देखील कोणाला काही सांगायचे असेल तर नीट समजून सांगावे व खात्री करून घ्यावी की त्याला किंवा आपल्याला ते काम समजले आहे व समजले असेल. ह्या सर्व गोष्टींमुळे आपण एक हुशार वकील होतो. तसेच हुशार वकील किंवा कोणताही हुशार व्यक्ती हा बऱ्याच गोष्टी न सांगता स्वतःहून समजून घेतो, घडी घडी त्याला सांगण्याची गरज राहत नाही.



वकील म्हणून किंवा एखादी हुशार व्यक्ती म्हणून काम करण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपण जेव्हा एखादी गोष्टी बद्दल माहिती घेत असतो. तेव्हा ती वस्तू आपल्याला खूप काही माहिती देत असते फक्त आपल्याला ती वस्तू नीट काळजीपूर्वक वाचता यायला पाहिजेल, Read करता यायला पाहिजेल. त्यातून आपला माहिती भेटत असते. त्यामध्ये जितकी काही माहिती दिली असेल त्यापैकी आपण जेवढी माहिती वाचू किंवा शोधू तेवढीच माहिती आपल्याला मिळेल. त्यामुळे आपल्याला हवी असलेली जातीत जास्त माहिती त्यामधून शोधावी, त्यामुळे तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती त्यामध्ये मिळेल.


उदाहरणार्थ - माझ्याकडे टायटल सर्च बनविण्यासाठी एखादी केस चे कागदपत्रे आलेत तर त्या मध्ये मला माहिती भेटेल. खरेदीखत असेल तर त्यावरून समजेल मालक कोण आहे ? मिळकत काय आहे ? मिळकत कोणी कोणाला विक्री केली आहे ? मिळकतीचे क्षेत्र किती आहे ? त्याला जोडलेले इतर दस्त असतील आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे त्यावरून आपल्याला माहिती समजत जाते. घडी घडी कोणाला माहिती विचारायची गरज नाही, आपण स्वतःहून माहिती शोधून घ्यावी. समोरील व्यक्तीला प्रश्न विचारावे पण प्रथम आपण सर्व स्वतःहून समजून माहिती काढून घ्यावी आभास करून घ्यावा. मग खात्री करण्यासाठी समोरील व्यक्तील क्रॉस प्रश्न विचारावे.


त्यानंतर अनुभवी वकिलाला एक सवय असते ती कामत गोंधळ होऊ देत नाही. नीट काम करतो. काम ही स्टेप स्टेप नि माहिती घेऊन करतो. काम करताना नोट्स काढतो, लिहत जातो त्यामुळे गोष्टी समजत जातात आणि काम नीट पूर्ण होते गोंधळ होत नाही. 


त्यानंतर वकिलाला अनुभवातून एक सवय असते व तो शिकलेला असतो, की कोणत्याही गोष्टीच्या मेन मुद्द्यावर या, त्याला मेन मुद्दा लगेच लक्षात येतो. कोणी दिशाभूल करत असेल, उडवा उडवा उडविले उत्तरे देत असेल, तर तो फक्त काही महत्वाचे प्रश्न विचारतो, व समोरील व्यक्ती जरी काही हेराफेरी करत असेल तर तो मेन मुद्दा बरोबर बाहेर काढतो.


आपण वकील म्हणून काम करताना अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणतीही गोष्ट विचार करून करणे आणि सांगणे. एखादी काम घेतले असेल तर ते काळजीने आणि वेळेत पूर्ण करणे. कोणाला काही वेळ देताना विचार करून वेळ देणे. आपला जमत असेल तर हो सांगणे. जी गोष्ट हो सांगितली तर ती कमिटमेंट पूर्ण करणे. यामुळे लोकांचा आपल्यावर विश्वास वाढतो. आणि आपल्याला देखील चांगल्या सवाई लागतात.


या जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळ आणि हुशार वकिलाला ही गोष्ट माहिती असते त्यामुळे तो कोणतेही महत्वाचे काम वेळेत करतो. वेळेचे महत्व जाणतो आणि आयुष्यात प्रगती करून पुढे जातो. ज्याला वेळेचे महत्व माहिती आहे असा कोणताही व्यक्ती आपल्या जीवनात प्रगती करतो आणि वेळच त्याला यश प्राप्त करून देते.


जो हुशार वकील असतो त्याला पक्षकाराने किंवा कोणी काही नवीन केस बाबत विचारले तर ते लगेच उत्तर देत नाही. पहिले सर्व समजून घेतो, कागदपत्रे तपासतो आणि मग सांगतो की काय अडचण आहे, त्यासाठी काय करावे लागेल. कारण वर वर जास्त माहिती न घेता मेन व मुख्य प्रॉब्लेम काय आहे हे समजून न घेता काही पण सांगणे योग्य नाही. जसे डॉक्टरला माहिती होत नसेल की पेशंटला काय झालेले आहे, निदान होत नसेल तर डॉक्टर आधी सर्व आवश्यक त्या टेस्ट करतात सर्व कागदपत्रे तपासतात आणि मग त्यांच्या समजते की काय झालेले आहे, व ते त्यांच्या अनुभवातून व अभ्यासातून सांगतात की, काय झालेले आहे, झालेले असू शकते, आणि त्यासाठी काय करावे लागेल.


वकील डायरी - 

वकिलासाठी डायरी तसेच लिखाण ही एक महत्वाची गोष्ट आहे. तो सर्व महत्वाची माहिती लिहून व नोंद करून ठेवतो. त्यामुळे काय होते त्याला त्याचे सर्व काम माहित असते. विसर पडत नाही. कोणतीही गोष्ट लगेच समजण्यास मदत होते. पक्षकाराकडून जरी काही माहिती घेतली तर ती माहिती प्रथम वकील लिहून ठेवतो. कारण त्याला काम करताना ती माहिती कामत येते. प्रत्येक वेळेस तीच तीच माहिती विचारण्याची गरज पडत नाही.


या सर्व गोष्टी आपण अनुभवातून आणि आपल्याकडून झालेल्या चुकांमधून शिकतो. प्रत्येक वकिलाला या गोष्टी माहितीच असतील असे नाही.


प्रत्येक व्यक्ती हा त्याला जीवनात येणारा अनुभव, त्याची स्वतःची समजून घेण्याची वृत्ती, स्वतः अभ्यासाची वृत्ती. चुका आणि त्यामधून शिकणे यामुळे हुशार होत असते. त्यामुळे काही लोक त्यांच्या अनुभवातून यापेक्षा जास्त गोष्टी शिकलेले असतात व ते आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात.


कोणतेही वकील हे काही ही काम करताना महत्वाची मुद्द्याची गोष्ट करतात. इतर अनावश्यक गोष्टी करत नाहीत. म्हणजे बोलताना, काम करताना, कोर्टात जी महत्वाची गोष्ट आहे ती करतात. आवश्यक गोष्टी करत नाहीत. थोडक्यात म्हणजे योग्य ठिकाणी व योग्य वेळी घाव घालतात. म्हणजे त्यांचे काम योग्य व प्रभावी होते.


समजा वकिलांनी कोणाला प्रश्न विचारला तू सकाळी 12 वाजता अमुक अमुक रेल्वे स्टेशन वर होता ना ? तेव्हा समोरील व्यक्ती काही वेळेस उत्तर न देता, इतर ज्या अनावश्यक किंवा दुसऱ्याच गोष्टी सांगतो म्हणजे जसे मी स्टेशन वर जाणार नव्हतो, पण असे झाले तसे झाले पण तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या वर गोष्ट न करता फिरून इतर अनावश्यक गोष्टी करतो. त्यावेळेस वकील म्हणतो की, तुम्हाला जेवढ विचारला आहे तेच उत्तर द्या. उत्तर हा किंवा नाही मधे द्या. म्हणजे वकील ज्या महत्वाच्या आहे त्याच गोष्टी करतो. वकील मेन पॉईंट काय आहे हे बघतो. थोडक्यात सांगायचे झाले तर सिधी बात नो बकवास.


त्यानंतर वकील हा त्याला जी माहिती पाहिजेल आहे ती माहिती काढतो. कागदपत्रे वाचून व पक्षकाराला प्रश्न विचारून. करण पक्षाला माहित नसते की कोणती माहिती वकिलासाठी महत्वाची आहे आणि कोणती नाही. त्यामुळे वकील बरोबर विचारपूस करून कागदपत्रे बघून माहिती काढून घेतो.


उदा. समजा वकिलाने एखादी पक्षकाराला विचारले तुमचा पत्ता काय ? तुम्ही कुठे राहतात ? तेव्हा पक्षकाराने काही पत्ता सांगितला तर वकील बरोबर तो पत्ता कागदपत्रे व आधारकार्ड तपासून क्रॉस व्हेरिफाइड करतो. त्याला माहीत असू शकते पण तो पडताळणी करतो. आणि पक्षकाराने वेगळा पत्ता सांगितला आणि आधारकार्ड वर वेगळा पत्ता असेल तो मॅच नाही झाला तर वकील अजून प्रश्न विचारेल आधारकार्ड वर तर तुमचा वेगळा पत्ता आहे. तेव्हा पक्षराने सांगितले मी इथे जॉब करतो. तर अशा प्रकारे वकील गोष्टी तपासून बघतो. आणि मग वकील दस्तामध्ये पक्षकाराचा पत्ता नमूद करताना गरज वाटल्यास हल्ली मुक्काम आणि कायमचा पत्ता दोन्ही नमूद करतो. पत्ता नमूद करताना वकिलाला माहिती असते पूर्ण पत्ता नमूद होणे आवश्यक आहे कारण त्यामुळे नोटीस, समन्स काही असेल तर त्या पत्त्यावर बरोबर जाईल. म्हणजे कोणतेही काम हुशार वकील सर्व पडताळणी करून, कागदपत्रे तपासून योग्य ते करतों.


प्रत्येक गोष्ट, प्रत्येक केस ही वेगळी असते, त्यामध्ये मुद्दे (fatcts) वेगवेगळे असतात. परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे वकील कोणतेही काम करताना त्या त्या परिस्थिती नुसार काम करतो. काही कॉपी पेस्ट न करता ते काम situation नुसार पूर्ण करतो. कोणाला कॉपी पेस्ट करत नाही किंवा कोणी तसे केले म्हणून तो पण तसे करत नाही. 


उदा. मी एक खरेदीखत बघितले सन 2002 मध्ये झालेले होते. ते खरेदीखत एकदम योग्य व बरोबर बनवलेले होते. सर्व महत्वाच्या कायदेशीर गोष्टी त्यामध्ये नमूद होत्या. सर्व आवश्यक ते दस्त त्यास लावलेले होते. त्यानंतर त्या मालकाने जेव्हा ती मिळकत विक्री केली त्यानंतर ज्याने नवीन खरेदीखत बनवले ते फक्त जुन्या दस्ताचे कॉपी पेस्ट केले. त्यामुळे त्यामध्ये काही वाक्यरचना कोण कोणास विक्री केली यात थोडी अडचण दिसत होती. दस्त नीट तयार नाही झाला. त्यानंतर परत पुढे ती मिळकत विक्री होत होती परत ज्याने दस्त तयार केला त्याने सर्व कॉपी पेस्ट केले. त्यामुळे त्या दस्तामध्ये चूक होत होती. त्यामुळे महत्वाची गोष्ट ही आहे की ही काम कॉपी पेस्ट नाही करायचे, योग्य ते करायचे. ते खरेदीखत योग्य कसे होऊ शकले असते नवीन खरेदी मध्ये जुन्या गोष्टी नमूद करायला हव्यात पण योग्य पद्धतीने, क्रमाने आणि जुन्या दोन्ही उपलब्ध असलेल्या दस्तावरून नवीन दस्त तयार करायला पाहिजेल होता. म्हणजे सांगायचे तात्पर्य असे को, कोणतेही काम कॉपी पेस्ट न करता योग्य प्रकारे कसे होईल हे महत्वाचे आहे.


त्यानंतर आपण जेव्हा एखादी काम करत असतो आपले ते काम पूर्ण होत नाही. आपल्याला हवी ती गोष्ट भेटत नाही परंतु आपल्याला ते काम करण्याची सुरवात करावी लागते. एक एक जशी काही गोष्ट भेटत जाईल तसे तसे शोधत शोधत काम करावे लागते. समजा दोऱ्याची गुंता झाली तर ती सुटत नाही. आणि आपण सोडण्याचा प्रयत्न केला तर अजून गुंता वाढत जाते. अशा वेळी काय करावे लागते हळू हळू एक एक गुंता सोडावी लागते आणि हळू हळू गुंता सुटत जाते. तसे वकिलाला काम करावे लागते. जी काही एक एक माहिती मिळेल, गोष्टी भेटत जातील तसे तसे काम करत जावे लागते. एक एक स्टेप जशी जशी पूर्ण होईल तसे तसे पुढे जावे. एखादी ठिकाणी आपण अडकलो प्रॉब्लेम सुटत नसेल तर तो प्रॉब्लेम स्किप करून पुढे जावे लागते. पुढे आपोआप प्रॉब्लेम सुटत जातात. या पद्धतीने वकिलाला काम करावे लागते.


वकिलाला जेव्हा एखादी अडचण येते किंवा त्याच्याकडे अडचण घेऊन पक्षकार येतो. तेव्हा वकील विचार करतो की, मुख्य प्रॉब्लेम काय आहे ? कशामुळे आहे ? आपण त्यावर काय करू शकतो ? त्यावर उपाय काय आहे ? हे सर्व बघून मग तो काम करतो. त्यामुळे त्याला माहीत असते की पक्षकाराच्या अडचणीचे मूळ कारण काय ? अडचण सोडवायला आपण काय करू शकतो ? त्याचा कायदेशीर इलाज काय ? आणि आपल्याला कोर्टाकडून काय पाहिजेल आपली मागणी काय आहे. तसे वकील त्यासंबंधित जुन्या केसेस चा अभ्यास देखील करतो. काय झाले होते. प्रॉब्लेम काय होता, ते कसा सॉल्व्ह झाला. कोर्टाने काय त्यावर निर्णय दिला. अशा प्रकारे वकिलाने अभ्यास करावा.


अजून एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या मध्ये खूप माहीर / एक्स्पर्ट बनायचे असेल तर त्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. आपल्या हाताखालून जितके त्याच त्याच प्रकारचे काम जाते तसे तसे आपण अनुभवातून व झालेल्या चुकांमधून सुधारत जातो. उदा.वकील जितकी प्रॅक्टिस करेल तेव्हढ शिकत जाईल, डॉक्टर असेल ते त्याच्या प्रॅक्टिस मधून शिकत जातो. एखादी गाडी दुरुस्त करणारा कारागीर जरी असेल तरी तो तेच तेच सारखे काम करून त्यामध्ये एक्स्पर्ट होत असतो. त्यामुळे आपल्याला देखील आपल्या फील्ड मध्ये सातत्यता ठेऊन काम करत व शिकत राहणे महत्वाचे आहे.


योग्य वेळी योग्य काम करा. जे काम महत्वाचे आहे त्याला प्रायोरिटी देऊन ते काम पूर्ण करा. मी जेव्हा सुरवातील काही काम करायचो तेव्हा मला खूप अडचणी यायच्या. करण मला डिस्ट्रेक्शन्स खूप होते. उदा. मी एखादी काम करतो आहे तर मित्राचा फोन येईल आपण फिरून येऊन, आपण सगळ्यांना हो सांगून वेळ देऊन ठेवतो, कामे तर घेतो पण ते पूर्ण करत नाही. त्यामुळे काय होते आपला गोंधळ वाढतो आपले काम नीट पूर्ण होत नाही. याचा अर्थ असा नाही की मित्रांना भेटू नका, खेळू नका, फॅमिली का वेळ देऊ नका, पैसे कमवू नका. या सर्व गोष्टी करा, मित्रान वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या, आपल्या कामाला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या पण नीट नियोजन करून. आणि तुम्ही जे काही काम करत असाल तर त्यावर पूर्ण लक्ष देऊन ते काम करा. उदा. तुम्ही क्रिकेट खेळत असलात तर पूर्ण लक्ष खेळत द्या, एखादी काम करत असाल तर सर्व लक्ष त्या कामावर द्या, मित्रांशी गप्पा मारत असाल तर सर्व लक्ष मित्रांसोबत द्या. यामुळे काय होते तुम्ही कोणतेही काम योग्य प्रकारे करता. तुम्ही जर एखादी खेळ खेळत असाल आणि तुम्हाला कामावरून कॉल येत असतील तर तुमचे खेळला मन लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करणे असेल ते नीट वेळेचे नियोजन करून आणि मन लाऊन करावी आणि त्यामधून आनंद घ्यावा.


आपली चुकी मान्य करायला शिका आणि त्यामधून शिका कारण तशी चुकी परत होणार नाही. काही लोकांना अशी सवय असते की त्यांची चूक असते पण ते मान्यच करत नाही. आपल्याला का आपल्या क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर खरच चूक झाली असेल तर ती मान्य करा ? चूक का झाली हे तपासा. आपण चूक मान्य केली तर समोरील व्यक्ती म्हणा सिनीर म्हणा ते आपल्याला मदत करू शकतात आणि आपण ती चूक सुधारू शकतो किंवा आपल्याकडून परत तशी चूक होणार नाही. करण कधी कधी असे पण होते की, दिवा विझतो करत त्यात तेल कमी पडले, पण ते हवेला दोषी धरतो. तसेच कधी कधी आपले नुकसान हे आपल्या स्वतःच्या चुकीने होते पण आपल्याला आपली चूक दिसत नाही व आपण दुसऱ्याला दोष देतो.


वकील कोणत्याही गोष्टीवर डायरेक्ट प्रथमदर्शनी विश्वास ठेवत नाही. करण त्याला माहीत असते की एका नाण्याच्या दोन बाजू असतात. तळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे काही घटना घडल्यास ते दोन्ही पार्टीचे काय म्हणणे आहे हे समजून घेतो. सर्वांचे ऐकतो. कागदपत्रे तपासतो आणि मग निर्णय घेतो.


आपल्याला अशी सवय की आपल्याला जे काही दिसते त्यावर आपण लगेच विश्वास ठेऊन देतो. आणि त्यावर आपले मत बनून देतो. उदा. आपल्या इंटरनेट वर काही व्हिडिओ दिसले तर आपण लगेच कोणालपण जो दिसेल त्याला दोषी ठरवून देतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याबाबत दुसरे व्हिडिओ येते मग आपल्याला समजते जसे दिसत होते तसे नव्हते तो व्यक्ती तर दोषी नाही, त्याने जे केले ते बरोबर केले. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर प्रथमदर्शनी निष्कर्ष काढताना विचार करून काढावा. समोरील दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्या संबंधी जी माहिती असेल, दस्त असतील काही ते तपासून घ्यावे आणि मग खात्री झाली की मग निष्कर्ष काढावा. वकील म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत. इ


चुका शोधण्यापेक्षा काम करणे ही गोष्ट जरी महत्वाची असली तरी वकील म्हणून दुसऱ्याच्या चुका शोधणे महत्वाचे आहे. दुसऱ्याची चूक शोधणे, नेमकी चूक कुठे झालेली आहे हे शोधणे एक हुशार व्यक्तीचे काम असते. त्यामुळे आपण आपल्या किंवा समोरील व्यक्तीच्या कामात चुका शोधण्यात काय काय चुका आलेल्या आहेत. शोधल्या तर खूप चुका सापडतात. जो व्यक्ती चुका सुधारत जातो आणि झालेल्या चुकीतून शिकत जातो तो व्यक्ती हुशार होत जातो. चुका शोधणे या गोष्टीला आपण वेगळ्याप्रकारे बघायचे आहे. असे नाही की आपल्याला दुसऱ्याच्या चूकच दिसतील. परंतु काय व कुठे चूक आहे हे वकिलाला शोधता येणे महत्वाचे आहे. 


मी माझ्या सिनियर वकिलांकडून अजून एक महत्वाची गोष्ट शिकलेलो आहे ती म्हणजे आपले जे सरकारी आहे. कोर्टातील किंवा आपल्या फील्ड मधील त्यांच्याशी सर्वांशी चांगले संबंध ठेवावे त्यामुळे काय होते आपले कोणतेही काम असो बोलून चालून लवकर पूर्ण होत असते. आपण दुसऱ्यांना सहकार्य केले तर ते पण आपल्याला गरजेच्या वेळी सहकार्य करतात आणि आपले काम सोप्पे होते.


त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या कामाचे रोजचे रुटिंग ठेवावे. जेवणाचा, झोपण्याचा सर्व वेळ ठेवावा रोज आवश्यक ती झोप घ्यावी आराम करावा, आरोग्यदाई जेवण जेवावे, भयेरचे खाणे टाळावे, रोज व्यायाम आणि ध्यान करावे या मुळे काय होईल तुमची काम करण्याची क्षमता वाढेल. तुम्हास काम करण्यास अडचणी येणार नाहीत. करण तुमचे आरोग्य नीट नसेल तर तुम्ही चांगल्याप्रकारे व जास्त काम करून शकत नाही त्यामुळे या गोष्टी देखील आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत.


ही सर्व माहिती मी माझ्या अनुभवातून आणि शिकलेल्या गोष्टींवरून दिलेली आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की एक हुशार व्यक्ती म्हणून कोणतेही काम करताना, परिस्थिती, आपले नॉलेज, वेळ आणि आपल्याजवळ संबंधित उपलब्ध वस्तू  यानुसार योग्य तो निर्णय घेऊन काम करणे महत्वाचे आहे. करण प्रत्येक वेळेस सारख्याच किंवा पाहिले जे केले होतो त्यानुसार आता पण तश्याच प्रकारच्या अडचणीचे निवारण होईल असे नाही. पण योग्य काय करावे हे आपण आपल्याला येणाऱ्या अनुभवातून व झालेल्या चुकांमधून शिकलेलो असतो. आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads