आपण माहिती बघू नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणी करतांना कोणकोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात.
दस्त नोंदणी म्हणजे पक्षकारांनी तयार केलेला दस्त ज्याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक असते असा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर करणे आणि त्याची नोंदणी करणे होय.
दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केला म्हणजे तो एक कायदेशीर पुरावा होतो आणि त्याचा अर्थ होतो की पक्षकारांनी त्यांच्या सह्या स्वतः स्वइच्छेने तो दस्त नोंदणी केलेला आहे.
दस्त नोंदणी करतांना पुढील गोष्टी तपासून घेणे महत्वाचे आहे.
(१) मालकी हक्काची खात्री :-
जी व्यक्ती मिळकत हस्तांतर करत आहे तो खरच त्या मिळकतीचा मालक आहे का ? त्याला ती मिळकत हस्तांतर करण्याचा त्याला कायदेशीर अधिकार आहे का ? विक्रेत्याकडे कायदेशीर आणि वैध मालकी हक्क आहे ना ? त्याच्याकडे ती मिळकत कशी व कोणत्या दस्ताने आलेली होती. चालू 7/१२ उतारा, सिटी सर्व्हे उताऱ्यावर मालक म्हणून नाव नमूद आहे ना ? त्या संबंधित मिळकतीचे जुने मालकी हक्काचे दस्त तपासून घ्यावेत.
दस्त लिहून घेणार आणि लिहून देणार यांचे नावे व पत्ता -
दस्त लिहून घेणार लिहून देणार यांचे नावे नीट बरोबर नमूद केलेले आहे ना ? आधार कार्ड, पॅनकार्ड वरील नाव, पत्ता आणि दस्तातील नावे तपासून घ्यावीत.
मालमत्तेचा अचूक तपशील :-
Property Description :-
दस्तामध्ये नमूद मिळकतीचे वर्णन, पत्ता, गट नंबर, सर्व्हे नंबर, क्षेत्र तसेच चतु:सीमा हे योग्य प्रकारे नमूद केलेले आहे ना ? याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे.
बोजा किंवा तारण तपासणी :-
जी मिळकत हस्तांतर होत आहे तिच्यावर काही बोजा वगैरे तर नाही ना ? जर आधी काही कर्ज वगैरे घेतले असेल तर त्याची संपूर्ण परतफेड केली आहे ना ? जर नोंदणीकृत गहाणखत केलेले असेल तर त्याची रिकन्वेयन्स डीड केलेली आहे ना ? उताऱ्यावर काही बोजा वगैरे तर नाही ना ? जर लोन फेडले गेले असेल तर त्याबाबत लोन नील दाखला NOC चेक केली ना ? मिळकतीवर काही कर्ज कर्ज, बोजा वगैरे नाही ना ? याची खात्री करून घ्यावी.
मुद्रांक व नोंदणी शुल्क :-
Stamp Duty and Registration Fee :-
दस्ताला योग्य ती नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क लावलेले आहे ना ? हे नीट तपासून घ्यावे. शासनाने ठरवलेल्या दरानुसार योग्य ती दस्त नोंदणी फी आणि मुद्रांक फी लावलेली आहे ना ? हे तपासून घ्यावे. तसेच इतर दस्त हाताळणी शुल्क हे दस्तामध्ये एकूण किती पाने आहेत त्यानुसार असते ते बरोबर काढलेले आहे ना ? हे तपासून घ्यावे. अपुरे व चुकीचे शुल्क भरलेले असल्यास दस्त नोंदणी करण्यास अडथळा येईल.
साक्षीदार -
दस्तात साक्षीदारांचे नाव, पत्ता नमूद करून आणि ओळख पत्र लावलेले आहे ना ? हे तपासून घ्यावे.
मुखत्यारपत्र : -
General Power of Attorney -
दस्त नोंदणी करणे कमी कोणाला मुखत्यारपत्र करून दिलेले असल्यास ते मुखत्रपत्र नीट तपासून घेणे महत्वाचे आहे.
जर स्थावर मिळकत हस्तांतर करणे कमी मुखत्यारपत्र करून दिलेले असेल तर ते मुखत्यारपत्र नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. मुखत्यारपत्र कधी नोंदविलेले आहे आणि ज्यांनी ते नोंदणी करून दिलेले आहे ते सर्व आज रोजी जिवंत आहेत ना ? जर जास्त जुने मुखत्यारपत्र असेल तर नवीन नोंदणी करून घ्यावे किंवा त्याबाबत प्रतिज्ञापत्र करून घ्यावे.
मुखत्यारपत्र नीट वाचून घ्यावे त्यामध्ये काय काय नमूद केलेले आहे हे तपासून घ्यावे. जी मिळकत हस्तांतर होत आहे तिचे वर्णन त्यामध्ये केलेलं आहे ना ? हे नीट तपासून घावे. कोणी आणि कोणाच्या वतीने कार्य करण्यासाठी केलेले आहे हे तपासून घ्यावे.
इतर संबंधित जोडलेले दस्त -
जो दस्त नोंदणी करत आहोत त्याला इतर संबंधित आवश्यक दस्त जोडलेले आहेत ना ? जसे चालू 7/12 उतारा,सिटी सर्वे उतारा, पक्षकार, साक्षीदार यांचे ओळखपत्र, आवश्यक असतील तर जुन्या नोंदी, लेआऊट वगैरे आवश्यक ते संबंधित दस्त जोडलेले आहेत ना ? हे तपासून खात्री करून घ्यावी.
दस्त नोंदणी करतांना काही चूक झाली तर त्या दस्ताचा चूक दुरुस्ती दस्त नोंदणी करावा लागतो. त्यामुळे आपला वेळ वाया जातो आणि आपल्याला पुन्हा दुरुस्तीचा दस्त नोंदणी करावा लागू शकतो. परंतु मूळ दस्ताच्या उद्देशात बदल होईल असा चूक दुरुस्त दस्त नोंदणी करता येत नाही.
दस्त नोंदणी करताना काळजी घेऊन या सर्व गोष्टी तपासून व खात्री करून दस्त नोंदविला तर दस्त नोंदविताना त्या दस्तामध्ये चूक होणार नाही व भविष्यात काही कायदेशीर अडचणी येणार नाहीत. त्यामुळे कोणतेही काम करताना नीट काळजीपूर्वक नीट करणे महत्वाचे असते. दस्त नोंदणी करताना या वरील गोष्टी तपासून बघणे गरजेचे असते.

