मेन्सरिया' (Mens Rea)
अॅक्टस नॉन फॅसि रीट मेसि निसी मेन्स सिट रेरिया (Actus non facit reum nisi mens sit rea)
मेन्सरिया' (Mens Rea) हा फौजदारी (Criminal) कायद्यामधील एक महत्वाचा घटक आहे. कोणताही गुन्हा घडण्यामागील हेतू महत्वाचा असतो.
मराठी अर्थ: केवळ कृतीने कोणी गुन्हेगार होत नाही, जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी हेतू (मनाची दुष्ट भावना) नसेल.
स्पष्टीकरण: फौजदारी कायद्याचे हे एक मूलभूत तत्त्व आहे. गुन्हा सिद्ध करण्यासाठी केवळ शारिरीक कृत्य घडणे पुरेसे नाही, तर तो गुन्हा करण्यामागे वाईट हेतू किंवा जाणीव असणेही आवश्यक असते
भारतीय फौजदारी कायद्यामध्ये मेन्स रिया या तत्वाचा अभ्यास केल्यावर आपणास असे आढळून येते की, नुसती कृती ही कधी ही गुन्हा ठरत नाही. परंतु एखादी कृती गुन्हा ठरण्यासाठी या कृती मागे गुन्हा करण्याची भावना व हेतू असला पाहिजेल. हा मूळ सिद्धांत आहे. हा सिद्धांत Actus Non Facti Resum Nisi Means Sit Rea. या कायदेशीर म्हणीवर आधारलेला आहे. मेन्स रिया या शब्दाला वाईट हेतू किंवा अपराधी भावना, गुन्हेगारी हेतू असे प्रति शब्द वापरले जातात.
मेन्स रिया या तत्वानुसार दोषी व्यक्तीचा हेतू हा अपराध करण्याचा असेल तरच त्याला शिक्षा द्यावी. एखादी कृत्य अपराध गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचे मन, हेतू, इच्छा जर निर्दोष, स्वच्छ असेल तर तो गुन्हा अपराध होत नाही.
उदा. एखादी गाडीचा नकळत अपघात झाला व त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर अशावेळेस हेतू हा जीवे ठार मारण्याचा नव्हता पण अपघात नकळत झाला त्यामुळे तो एक अपघात आहे. त्याला खून म्हणता नाही येणार नाही.
अपघात झाला व तो निष्काळजीपणा, चुकी मुळे झाला तर निष्काळजीपणाचा तसा दुसरा गुन्हा होईल. पण तो खून होणार नाही.
परंतु हेतू जीवे ठार मारण्याचा असेल आणि कोणाला ठार मारण्यासाठी मुद्दाम अपघात घडवून आणला तर तो अपघात म्हटला जाणार नाही तो खून होईल.
मेन्सरिया' (Mens Rea) हा लॅटिन शब्द असून, याचा साधा आणि सरळ अर्थ "गुन्हेगारी मन" किंवा "गुन्हेगारीचा हेतू" (Guilty Mind) असा होतो.
भारतीय न्यायव्यवस्था आणि फौजदारी कायद्यानुसार (Criminal Law), कोणतीही व्यक्ती एखादा गुन्हा घडवून आणताना केवळ शारीरिक कृती करतेच असे नाही, तर त्यामागे तिचे मानसिक स्तरावर गुन्हेगारी कृत्य करण्याचे ठरवलेले किंवा दोषी मन देखील असते.
१. मेन्सरियाचे महत्त्व -
फौजदारी कायद्यातील मूलभूत तत्त्व असे सांगते की:
"अॅक्टस नॉन फॅसिल रीम निसो मेन्स सिट रिया" (Actus non facit reum nisi mens sit rea)
म्हणजेच, "केवळ कोणतीही कृती गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत ती करण्यामागे गुन्हेगारी हेतू (मन) नसेल."
याचा अर्थ असा होतो की, एखाद्या व्यक्तीकडून घडलेल्या चुकीच्या कृतीला शिक्षा करण्यासाठी, त्या कृतीसोबतच तिचा मानसिक हेतू (Intent) किंवा दुर्भावना सिद्ध होणे कायद्यानुसार आवश्यक असते.
२. मेन्सरियाची प्रमुख लक्षणे -
गुन्हेगारी हेतू (Intent): गुन्हा करण्याचा स्पष्ट विचार किंवा कट.
जाणीव (Knowledge): आपल्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात आणि ती बेकायदेशीर आहे याची आधीच कल्पना असणे.
निष्काळजीपणा (Negligence / Recklessness): कायद्याचे किंवा नियमांचे भान न ठेवता अत्यंत बेजबाबदारपणे वागणे.
३. अपवाद (जिथे मेन्सरियाची गरज नसते)
काही विशिष्ट कायदे आणि गुन्ह्यांच्या बाबतीत 'मेन्सरिया' (गुन्हेगारी हेतू) असण्याची अट शिथिल केली जाते किंवा त्याची गरज नसते. अशा गुन्ह्यांना 'स्ट्रिक्ट लायबिलिटी' (Strict Liability) किंवा 'अॅब्सोल्युट लायबिलिटी' (Absolute Liability) म्हणतात. उदाहरणार्थ:
वाहतूक नियम मोडणे (उदा. सिग्नल तोडणे - येथे हेतू महत्त्वाचा नसून झालेला नियमभंग गृहीत धरला जातो).
अन्न अगर औषध भेसळ विरोधी कायदे.
पर्यावरणीय कायदे (Environmental Laws).

