आरोपींच्या अटकेबाबत ‘‘सर्वोच्च न्यायालयाचे’’ निर्देश...

Adv.Saurabh Rajput
0



आरोपींच्या अटकेबाबत ‘‘सर्वोच्च न्यायालयाचे’’ निर्देश... 


मा.सर्वोच्च न्यायालयांने एखाद्या व्यक्तीस अटक व स्थापनबध्दते बाबत करावयाच्या प्रतिबंधक उपयायोजने संदर्भात खालील निर्देश व मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. रिट पिटीशन क्रमांक ५६९/१९८६ व ५२९/१९९७


हे निर्देश व सूचना अशा :-


१. एखाद्या व्यक्तीस ज्या पोलीस अंमलदाराने अटक किवा  स्थानबध्द अथवा चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. त्या पोलीस कर्मचार्‍यांचे (अंमलदाराचे) पूर्ण नांव, त्याचा हुद्दा, बक्कल नंबर आदी बाबी स्पष्टपणे दिसतील अशा पध्दतीने असाव्यात. तसेच अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नोंद रजस्टिरमध्ये घेण्यात येते तेव्हा त्यास कोणी अटक केलेली आहे, याचीही स्पष्ट नोंद असावी. तसेच त्याच्याकडे कोणकोणते पोलीस अंमलदार चौकशी करत होते. याचीही स्पष्ट नोंद ठेवावी.


२. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, तेव्हा अटक करणार्‍या पोलीस अंमलदाराने त्या व्यक्तीच्या अटकेबाबतचा अटक पंचनामा हा अटक केलेल्या व्यक्तीचे उपस्थितीत व कमीतकमी एका साक्षीदाराचे की, जो त्या व्यक्तीचा नातेवाईक किवा कुटूंबातील व्यक्ती अथवा ज्या भागात अयक केली, त्या भागात राहणार्‍या एखाद्या सभ्य व आदरणीय व्यक्तीच्या उपस्थितीत करावा व त्यावर त्यांची सही घ्यावी तसेच अटक पंचनाम्यात अटकेची वेळ, तारीख, ठिकाण नमूद करावे तसेच त्यावर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची सही घ्यावी.


३. ज्या व्यक्तीला अटक किवा स्थानबध्द केले आहे, आणि ज्याला पोलीस कोठडीमध्ये पोलीस ठाण्यात किवा  चौकशी करण्यात येणार्‍या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याचा कोणीही मित्र किवा नातेवाईक हजर राहू शकेल किवा त्याच्यासोबत राहू शकेल त्याची माहिती त्यांना द्यावी.

४. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, तेव्हा अटकेची दिनांक, वेळ व ठिकाण नमूद करुन आरोपीचे मुळ गावापर्यंत माहिती किवा तो ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणार आहे. तेथे तारेने ८ ते १२ तासाचे आत माहिती द्यावी, ही माहिती कायदेविषयक सहाय्य व मदत देणार्‍या जिल्ह्याचे किवा तालुक्याच्या, संघटनेमार्फत द्यावी.


५. अटक केलेला इसम स्थानबध्दतेतून सुटल्या क्षणी त्याची माहिती द्यावी, की त्याच्या अटकेबाबत कोणत्या व्यक्तीला कळविण्यात आले होते.


६. अटक केलेल्या व्यक्तीला जेथे अटक केली आहे. तेथील पोलीस ठाणे दैनंदिनीत नोंद करावी, तसेच त्याच्या अटकेबाबत कोणत्या मित्रास किवा  नातेवाईकास माहिती देण्यात आली आहे. तसेच तो कोणत्या पोलीस ठाण्याच्या व कोणत्या पोलीस अंमलदाराच्या ताब्यात राहणार आहे. याची माहिती देऊन ती नोंद ठेवावी.


७. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस किरकोळ, काही मोठ्या स्वरुपाच्या जखमा झालेल्या असतील तर त्यांची नोंद अटक पंचनामा, अटक रजिस्टर, लॉकअप रजिस्टरमध्ये तात्काळ घ्यावी. तसेच त्याची एक प्रत अटक केलेल्या व्यक्तीस देण्यात यावी.


८. आरोपीची वैद्यकीय तपासणी ही पोलीसांचे ताब्यात असतांनाच दर ४८ तासानंतर करण्यात यावी याबाबत डायरेक्टर हेल्थ सव्र्हीसेस यांनी मान्यता दिलेल्या व नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांदाडूनही तपासणी करावी त्याबाबत त्यांनी अशी यादी माहितीसाठी प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावर करावी.


९. अटक केलेल्या व्यक्तीच्या अटक पंचनाम्याची एक प्रत व इतर कागदपत्रांची प्रत अधिकारी यांच्याकडे  अभिलेखासाठी तात्काळ पाठवण्यात यावी.


१०. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस चौकशीचे दरम्यान, जरी संपूर्ण वेळ नाही तरी थोडा वेळ तरी त्याचे वकीलास भेटू द्यावे.


११. पोलीस नियंत्रण कक्ष जिल्ह्याचे ठिकाणी असल्यास तेथे अटक करण्यांत आलेल्या सर्व व्यक्तीची अटकेची नोंद २४ तासाच्या आत पाठवण्यात यावी. तसेच अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातील फलकावर लावण्यात यावी.


स्त्री व्यक्तीस अटक व स्थानबध्द करतेवेळी (भारत सरकार वि.महाराष्ट्र व इतर रिट पिटीशन क्रि.आय.जे. ४२२३ मुंबई)


कोणत्याही स्त्री व्यक्तीस अटक व स्थानबध्द स्त्री काँस्टेबल / परिचारीका उपस्थित असल्याशिवाय करु नये तसेच सुर्यास्त ते सुर्योदय या कालावधीत अटक व स्थानबध्द करण्यात येऊ नये.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads