पहिली खबर (FIR) म्हणजे काय ?

Adv.Saurabh Rajput
0

  


पहिली खबर म्हणजे काय ?


  हस्तक्षेपीय अपराधाबद्दल (दाखलपत्र गुणहयसाठी) दिलेली खबर, जी पोलीस ठाणे अंमलदाराने प्राप्त केली असता त्याने करावयाच्या कामकाजाबद्दलची रीत कलम १५४ मध्ये दिलेली आहे. यावरून सर्वसाधारणपणे रूढ अर्थाने क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १५४ अन्वये  लिहून घेतलेल्या खबरीस पहिली खबर असे म्हणतात.


पहिली खबर या शब्दाचा अर्थ - ‘‘कुठल्या एखाद्या इसमाने, मग त्यास माहीत असो अगर नसो, हस्तक्षेपीय अपराध (दाखलपत्र गुणहयसाठी)  त्या विशिष्ट ठाण्याच्या हद्दीच्या आत किंवा बोहेर केला असा आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड अन्वये पोलीस ठाणे अंमलदाराने अशा आरोपाबद्दल तपासाचे काम चालवावे व तपासाअंती पुरावा असल्यास अपराधी व्यक्तीस न्यायालयासमोर आणावे या हेतूने तोंडी किंवा लेखी दिलेल्या माहिती अन्वये कलम १५४ अन्वये दाखल करण्यात आलेली खबर यास पहिली खबर (FIR) म्हणता येईल.’’


त्याचप्रमाणे जेव्हा दिलेली खबर ही हस्तक्षेपीय अपराध समक्ष घडल्याची वाच्यता करते, तेव्हा ती पहिली खबर संज्ञेस पात्र ठरते. त्यात अपरासंबंधीचा बारीक सारीक अथवा विस्तृत रूपात तपशील नसला तरी चालेल. त्यामुळे त्याचे महत्व कमी होत नाही. कारण पहिली खबर देतांना त्या व्यक्तीची मन:स्थिती ही सर्वसामान्या असू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही त्याचे पहिली खपर मध्ये असेलच असे नाही. पुरवणी बयान घेऊनसुध्दा संबंधित बाब विचारात घेतली जाते. पहिली खबरमध्ये ठळक ठळक बाबी जरी असमाविष्ठ असतील तरी चालू शकते. कारण पहिली खबर काही एनसायक्लोपिडीया असू शकत नाही, की ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट विचारात घेऊन नमूद करण्यात आली आहे.  घडलेल्या घटनांचे ते ताबडतोब उमटनारे प्रतिबींब असते. मुद्दाम ठरवून व जाणूनबुजून दिलेला तो रिपोर्ट नसतो. त्यामुळे अनवधानाने बऱ्याच गोष्टी नमूद करण्याचे राहून जाते. अशा क्षुल्लक बाबींचा फायदा आरोपीस होत असतो. 


स्वरूप : प्रथम खबर पोलीसांना देण्याचा मुळ उद्देश फिर्यादीचा हा असतो की, तपासाच्या फौजदारी प्रक्रियेला गतिमान करणे व प्रवाहित करणे. त्याचे महत्वाचे दुसरे काण हेही आहे की, उपलब्ध पुरावा ताबडतोब मिळवणे व मिळणारा पुरावा नष्ट होण्यापासून वाचविणे. त्यायोगे जास्तीत जास्त पुरावा अपराधी व्यक्ती विरूध्द मिळविणे. 


‘प्रथम खबर’ ही अतिशय महत्वाची बाब आहे. प्रथम खबर हे ते दस्तऐवज असते, ज्यावर संपूर्ण तपासाची इमारत उभी असते. न्यायदाणाच्या क्षेत्रात अरोपीस शिक्षा मिळण्यासाठी ते एकमेव दस्तऐवज असते. तपासाची नींव व बांधणी सर्वस्वी ‘प्रथम खबर’ वर अवलंबून आहे. तपासाचा पाया हाच मुळात जर कच्चा असेल, म्हणजे प्रथम खबर अर्धवट असेल, अपुरी असेल, संदिग्ध असेल तर त्याची परिणती निश्चित पूर्णत्वाकडे राहणार नाही व तो तपास व्यर्थ आणि कागदोपत्री तपास ठरून वेळ, श्रम व्यर्थ घालविणारा ठरेल. 


गुन्ह्याची सत्यता शेधण्यासाठी प्रथम खबर विशेष कामगिरी बजावत असते. ही महिती पुरविणारा स्वत: क्षतिग्रस्त तरी असतो किंवा प्रत्यक्षदर्शी जाणकार साक्षदार तरी असतो, जो तत्परतेने हस्तक्षेपीय अपराधाची वाच्यता करतो. प्रथम खबर ही जरी परिपूर्ण व एकमेव पुरावा नसली तरी आरोपीला शासन करण्याच्या प्रक्रियेत महत्वाचा दुवा म्हणून कार्य करीत असते. कुठल्याही घटनेचा  ती उगमस्थान असते. परंतु शेवट मात्र निशिचतच नसतो. यामध्ये पुरावा अरोपीस कलम १४५ पुरावा कायद्याप्रमाणे विरोधाभास  त्रुटी दाखविण्यासाठी उपभोगात आणला जाऊ शकतो. तसेच पुरावा कायद्याच्या २१ पुरावा अधिनियमाप्रमाणे आरोपीने केलेले कथन त्याचेच विरुध्द वापरले जाऊ शकते. 


आरोपीसाठी प्रथम खबरेचे महत्व - तसे पाहिले असता जेवढे महत्व प्रथम खबरेचे फिर्यादीला असते त्यापेक्षाही अधिक महत्वाचे आरोपीसॉठी राहात असते. फिर्यादीच्या प्रथम खबरवरून फिर्यादी पक्षाची बाजू व मांडणी आणि त्या संबंधाने असणारी  एकूण रुपरेषा कळून येते. त्याचप्रमाणे आरोपीस आपल्याविरूध्द कुठल्या कलमाखाली गुन्हा कायम करण्यात आला हे कळते.  त्यावरून फिर्यादीच्या उलटतपासणीत कुठल्या बाबींचा समावेश करण्यात येईल याबद्दल आराखडे बांधता येतात. फिर्यादीनेपहिली खबर कशी दिली आहे याचा आभ्यास करून जास्तीत जास्त त्रुटी शोधण्याचे काम तो करेल आणि सत्यता शोधून काढण्यासाठी मदतच करेल. भारतीय पुरावा अधिनियमाच्या कलम १४५ प्रमाणे त्याने दिलेली प्रथम खबर व नोंदविलेले बयान यामध्ये तफावत शोधुन काढण्याचा प्रयत्न करेल.


आरोपीने दिलेल्या पहिल्या खबरीचे स्वरूप व महत्व - अनेकदा अरोपी स्वत: केलेल्या गुन्ह्याची कबुली देतो. कित्येकदा गुन्ह्यात वापरलेले शस्त्रसुध्दा तेव्हाच सादर करतो अशा वेळेस  झालेल्या हस्तक्षेपीय गुन्ह्याची पहिली खबर ही प्रत्यक्ष अरोपीनेच दिली असते.अशा वेळेस फिर्यादी हाच आरोपी असतो. तेव्हा झालेल्या  अपराधाची नोंद प्रथम खबर म्हणून करण्यात यावी; परंतू ही पहिली खबर नोंदविणार्‍या  पोलीस अधिकार्‍या मार्फत  शाबीत केली जाईल. जेव्हा अरोपीने दिलेल्या पहिल्या खबरेवरून गुन्ह्याचा तपास होतो. व त्याच्या रिपोर्टामध्ये गन्ह्याचा कबुली जबाब नसेल तर त्याने दिलेली इतर माहिती अंगीकार म्हणून भारताच्या पुरावा कायद्याच्या २१ कलमान्वये आरोपीच्या विरूध्द सिध्द करता येते. 


प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे घडणारर्‍या गुन्ह्याबाबतची पहिली खबर - विविध गुन्ह्या अंतर्गत विविध अधिनियमांच्या कलमांचे व तरतुदींचे उल्लंघन केले जाते. प्रतिबंधक कायद्याप्रमाणे घडलेल्या गुन्ह्याबाबत माहिती देण्यास जनता सहसा अनुत्साही असते व तशी माहिती मिळण्याकरीता पोलीस यंत्रणेला धंदेवाईक माहितगारावर अवलंबून राहावे लागते तो इसम अशा माहितीवर सही करण्यास तयार नसल्याने पहिली खबर लिहिता येत नाही. अशा प्रकरणात पहिल्या खबरीची विस्तृत नोंद न करता कारवाई करता येते. कारवाई केल्यानंतर व पोलीस स्टेशनला परत आल्यावर पहिली खबर लिहिली जावी. अशा स्वरुपात लिहिलेली पहिली खबर ही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ अन्वये ग्राह्य ठरते.


खोटी पहिली खबर - जी कोणी व्यक्ती जाणीवपूर्वक कोणतीही खबर ही खोटी असल्याचे त्यास माहीत असूनसुध्दा ती पोलीस अंमलदाराला देईल, तर त्याचे विरुध्द आय.पी.सी. कलम १८८ अन्वये खटला भरता येतो. अशा परिस्थितीत असा खटला दाखल करतांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५(१)(अ) अन्वये त्या पोलीस अंमलदाराने न्यायालयाच्या नावाने फिर्याद करणे आवश्यक आहे. तसेच नुकसान करण्याच्या इराद्याने जर कोणी कोणावर खोटा चार्ज ठेवण्यात यावा म्हणून खोटी खबर पोलीस अंमलदारास देईल तर भारतीय दंड विधान २११ अन्वये त्याचे विरुध्द खटला भरता येतो. मात्र असा खटला दाखल करतांना प्रथम मॅजिस्ट्रेटकडून ‘ब’ समरी मंजूरी करुन घ्यावी व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९५(१)(ब) अन्वये मॅजिस्ट्रेटचे कोर्टात फिर्याद दाखल करणे आवश्यक आहे. मॅजिस्ट्रेटची फिर्याद असल्याशिवाय कोर्टात खटला दाखल करता येत नाही.


पहिली खबर व न्यायालयीन हस्तक्षेप - दैनंदिन कामकाजाबद्दल पोलीस ठाणे येथे जरी कारवाई होत असली तरी प्रत्यक्षात अधिकार क्षेत्राशी संबंधित असलेल्या न्यायालयाचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. न्यायालयाचा पोलीस स्टेशनमधील कारवाईसाठी हस्तक्षेप नसतो; परंतु एखादी व्यक्ती जेव्हा मॅजिस्ट्रेटकडे तक्रार करते तेव्हा चौकशी करण्याचा अधिकार न्यायालयास आहे. प्रथम खबर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावर त्याची एक प्रत न्यायालयाकडे पाठविणे अनिवार्य आहे. त्यावरुन संबंधित आरोपी व्यक्तीचा जमानतीचा अर्ज निकाली निघत असतो. पहिल्या खबरची प्रत न्यायालयाकडे पाठविल्यावर त्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता जवळपास उपलब्ध नसते.


पहिली खबर न्यायालयास प्राप्त झाल्यावर व त्या अनुषंगाने तपास झाला असेल आणि याउपरही पोलीस अंमलदाराने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६९ प्रमाणे अहवाल पाठविला असेल तर तो मान्य करणे अगर न करणे हे सर्वस्वी न्यायालयाचे अखत्यारित असून न्यानुसार वेळ प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) प्रमाणे पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते.


पहिली खबर व उच्च न्यायालयाची दखल - फिर्यादी पक्षाने पोलीस स्टेशनला हस्तक्षेपीय अपराधाबद्दल रिपोर्ट दिला असेल आणि पोलीस दलामार्फत त्याची दखल घेतली जात नसेल आणि गुन्हा हस्तक्षेपीय असून भयंकर स्वरुपाचा असेल तर उच्च न्यायालय संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट लिहून घेण्याचा व तपास करण्याचा आदेश देऊ शकते विंâवा उलटपक्षी उच्च न्यायालयाचे हे निदर्शनास आले असेल की जाणीवपूर्वक खोटी, आकसाने पहिली खबर दिली आहे तर अशा वेळेस प्रथम माहिती फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४८२ अन्वये रद्द करविता येते. केवळ उच्च न्यायालयालाच प्रथम खबर रद्द करण्याचे अधिकार आहेत. दुसर्‍या कोणत्याच न्यायालयाला ‘प्रथम माहिती’ रद्द करण्याचा अधिकार नाही.


पोलीस स्टेशन परिसिमेच्या बाहेर अपराध घडल्यास - एखादा अपराध परिसिमेच्या बाहेर घडला असेल तर तपास करु नये असे फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमूद केलेले नाही. तसेच अशा वेळेस कसा तपास करावा याचाही उल्लेख नाही. उलटपक्षी दाखल होणार्‍या  प्रत्येक हस्तक्षेपीय गुन्ह्याबद्दल दखल घेण्यात यावी असा कायदा आहे. अन्यथा ठाणे अंमलदार कारवाईस पात्र राहील. तसेच कारवाई म्हणून अशा अपराधाची गुन्हा कायम करुन सकृतदर्शनी ज्या पोलीस स्टेशनकडे कारवाई व्हावी असे वाटत असेल त्यांचेकडे पुढील तपासासाठी सर्व कादगपत्रे पाठवून द्यावीत. त्याप्रमाणे नोंद घेऊन कार्यवाही आपल्या पोलीस स्टेशनपुरती पूर्ण करावी.


टेलिफोनद्वारे दिलेली गुनह्याची सूचना - ही गुन्ह्याची पहिली खबर ठरु शकत नाही. ती केवळ पोलीस विभागाला माहिती म्हणून दिलेली असते. त्यामध्ये माहिती देणार्‍या  लेखी रिपोर्ट नसतो व त्याची सहीसुध्दा उपलब्ध नसते. टेलिफोनने दिलेली माहिती ही खरीच असेल असे म्हणता येत नाही. कोणी खोडसाळपणे विंâवा दिशाभूल करण्यासाठीसुध्दा अशी माहिती देतो. टेलिफोनने दिलेल्या माहितीवर एकदम विश्वास ठेवता येत नाही. अशा माहितीची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असते. तसेच अशा माहितीला एकदम अविश्वसनीय म्हणूनसुध्दा गृहीत धरता येत नाही; परंतु मिळालेल्या माहितीवरुन सत्यता पडताळणे व योग्य कारवाई करुन मिळालेल्या माहितीची दखल घेणे पोलीस विभागाचे प्रथम कर्तव्य आहे.


केवळ टेलिफोनद्वारे गुन्ह्याची माहिती मिळाली म्हणून ती पहिली खबर ठरणार नाही असे नाही तर, जर टेलिफोनद्वारे दिलेली गुन्ह्याची हकीकत विस्तृत असेल, त्यात फिर्यादीचे नाव असेल, आरोपीचे नावाचा उल्लेख असेल तर टेलिफोनद्वारे दिलेली गुन्ह्याची माहितीसुध्दा ‘पहिली खबर’ ठरु शकते.


तारेद्वारे देण्यात आलेली अपराधाबद्दलची माहिती - ही सुध्दा पहिली खबर ठरु शकत नाही. ती केवळ पोलीस विभागाला दिलेली माहिती असते. टेलिफोन व तारेद्वारे दिलेली माहिती ही कितपत ग्राह्य आहे हे परिस्थितीनुरुप भिन्नभिन्न राहील. अपराधाबद्दलची माहिती कोठूनही मिळो, तिची दखल घेणे महत्त्वाचे आहे. तारेद्वारे दिलेली खबर पहिली खबर या संज्ञेस जरी पात्र होत नसली तरी पुरावा म्हणून ग्राह्य समजण्यात येते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

Ad Home

Sponsor

Ads