नोटीस.
मित्रांनो आपण माहीती बघणार आहोत कायदेशिर नोटीसी बाबत. आपल्या जीवणात अनेकांना कधीना कधी कायदेशिर नोटीस पाठवण्याची गरज पडत असते.
नियमांचे उल्धन झाल्यास, बेकायदेशिर कारवाई झाल्यास किंवा अन्याय झाल्यास तसेच आपल्याला कायदेशिर कारवाई करावयाची असल्यास समोरच्या पक्षाला प्रथमत: कायदेशिर नोटीस पाठविणे आवश्यक असते. (कायदेशिर नोटीस ही विषेशत: दिवाणी (सिव्हील) मॅटर मध्ये पाठवळी जाते.) काही फौजदारी केस मध्ये देखील नोटीस पाठवली जाते. जसे फसवणूक वगैरे. नोटीस पाठविल्याने समोरच्या पक्षाला माहीती मिळते व त्यांना देखील त्यांची चुक सुधारण्यास मदत मिळते. नोटीस पाठविल्या मुळे समोरच्या पक्षाला माहीती झाल्याने आपला झालेला वाद कोर्टाच्या बाहेर / कोर्टात जाण्याच्या अगोदरच देखील मिटू शकतो त्यामुळे प्रथमत: नोटीस पाठविणे आवश्यक असते.
जर आपल्याला सरकार विरोधात काही कायदेशिर कारवाई / खटला दाखल करावयाचा असेल तर प्रथमत: कायदेशिर नोटीस पाठविणे कायदयाने बंधनकारक आहे.
कायदेशिर नोटीस ही संस्था, कार्यालय, बँका त्यांच्या कायदेशीर आधिकार दिलेल्या व्यक्ती / प्रतिनिधी मार्फत देत असतात. तसेच अन्याय झालेला व्यक्ती स्वत: कायदेशिर नोटीस पाठवू शकतो किंवा वकीलाच्या मार्फत नोटीस पाठवू शकतो. तथापि, वकीलाच्या मार्फत नोटीस पाठविलेले कधीही चांगले असते कारण त्यांना कायद्याचे चांगल्याप्रकारे ज्ञान असतो.
मित्रांनो मी तुम्हांला इथे एक सांगू इच्छीतो की, आपल्याला काही कायदेशिर कारवाई करावयाची असल्यास किंवा केस दाखल करावयाची असल्यास / नोटीस पाठवावयाची असेल तर झालेल्या अन्यायाची / चुकिची आपल्याळा माहीती कळताच लवकरात लवकर दखल घेवून पुढील कारवाई करावी. कारण ब-याचशा दिवाणी (सिव्हील) केसेस मध्ये वेळेवर कारवाई न केल्यामुळे Limitation Act ची सुध्दा बाधा येत असते. लवकर कारवाई केल्यामुळे आपल्याला कायदयाने लवकर न्याय मिळण्यास देखील मदत होते. उशिर होण्यास योग्य कारण असल्यास Limitation Act मध्ये काही सुट देखीळ देण्यात आलेली आहे. मी ही गोष्ट यासाठी सांगु इच्छीतो की, या गोष्टी ब-याच लोकांना माहीत नसतात त्यामुळे त्यांना न्याय मिळण्यास अडचणी येवू शकतात. आपण वेळेवर योग्य ती कारवाई न केल्यास त्याचा फायदा समोरच्या पक्षाला होत असतो. त्यामुळे कोणतेही काम असो आपण ते वेळेत केल्याने आपल्याळा त्याचा फायदा होत असतो.
Limitation कायदया विषयीची एक म्हण आहे की, कायदा हा जागे लकांसाठी आहे. झोपलेल्या लोकांसाठी नाही. झालेल्या अन्याया विरुध्द वेळेवर Action घेतल्यास आपल्याला न्याय मिळण्याच्या दृष्टीने चांगळे व गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळण्यास मदत होत असे.
आपल्याळा कोणी नोटीस पाठवली असेळ तर तीचे नोटीस उत्तर देखील देणे गरजेचे असते. नोटीसीस उत्तर दिल्याने आपल्याला आपले काय म्हणणे आहे ते कळविता येते. नोटीस उत्तर देतांना नोटीस देणार यांचे जे मुद्दे आपल्याला अमान्य आहे ते आपण नोटीस उत्तराव्दारे अमान्य करावेत. आपल्याला वाटल्यास व वाद मिटण्यासारखा असल्यास आपण माहीतगार मध्यस्ती द्वारे बैठक व चर्चा करुन वाद मिटवू शकतो. त्याबाबत आपण नोटीसीत नमुद करु शकतो. त्यामुळे वाद मिटण्यास मदत होवू शकते. त्यामुळे आपला वाद कमी खर्चात व कमी वेळेत मिटू शकतो. कायदेशिर नोटीस पाठवणे हा आपल्यासाठी एक कायदेशिर पुरावा देखील असतो. त्यामुळे आपल्याळा दावा दाखल करते वेळी मदत होत असते.
मित्रांनो मी तुम्हाला नोटीसी बाबत प्राथमिक (बेसिक) माहीती दिलेली आहे. आपल्याला या माहीतीचा नक्कीच फायदा होवू शकतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहीती असणे हे आपल्यासाठी चांगलेच असते. म्हणूनच म्हणतात की, Knowledge Is power.